Maharashtra

Thane

CC/12/12

श्री. भास्‍कर शंकर घरत - Complainant(s)

Versus

महाराष्‍ट्र स्‍टेट इलेक्‍ट्रीक सिटी डिस्‍ट्रीबुशन कं. लि. - Opp.Party(s)

ए. एन. शहा

21 Oct 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/12/12
 
1. श्री. भास्‍कर शंकर घरत
R.No.281, Shelavali, Tq.Shahapur, Thane.
...........Complainant(s)
Versus
1. महाराष्‍ट्र स्‍टेट इलेक्‍ट्रीक सिटी डिस्‍ट्रीबुशन कं. लि.
Engineer,Deshmukhwadi, Tq.Shahapur, Thane.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 

 
 

 

               न्‍यायनिर्णय   

               (द्वारा सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे- मा. सदस्‍या)

 

 

  1.              तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून घरगुती वापरासाठी विदयुत पुरवठा घेतला आहे. तक्रारदारांनी सदरची मिळकत (घर) श्रीमती सुनिता लक्ष्‍मण पवार यांचेक‍डून विकत घेतले.                   दि. 24/01/2007 चे शपथपत्राद्वारे त्‍यांनी सदर मिटरचे विद्युत देयक पूर्णतः भरणा केल्‍याबाबत नमूद केले आहे. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार विकत घेतलेले सदरचे घर 5-7 वर्षांपासून बंद होते. तक्रारदारांनी घर विकत घेतले त्‍यावेळी एकूण रु. 15,600/- एवढया रकमेचे विद्युत देयक प्रलंबित होते व विद्युत पुरवठा खंडीत केला होता.
  2.         तक्रारदारांनी वरील रु. 15,600/- रकमेच्‍या विद्युत देयकांचा सामनेवाले यांचेकडे भरणा केला व रिकनेक्‍शन चार्जेस रु. 50/- देऊन विदयुत पुरवठा पूर्ववत करुन घेण्‍यासाठी अर्ज केला. सामनेवाले यांचे वायरमन विद्युत जोडणी करण्‍यासाठी आले असता मिटर चालू नसल्‍यामुळे तक्रारदारांना विदयुत पुरवठा त्‍यांचे नांवावर (transfer) हस्‍तांतरीत झाल्‍यानंतर मिटर बदलून घेण्‍यासाठी सामनेवाले यांचेकडे अर्ज करण्‍यास सांगितले.
  3.        तक्रारदारांनी दि. 29/05/2007 रोजी रु. 1,000/5 transfer charges भरणा केले तसेच विद्युत मिटर “faulty” असल्‍यामुळे बदलून मिळण्‍यासाठी सामनेवाले यांचेकडे अर्ज केला. सामनेवाले यांना           दि. 29/05/2007 रोजी अर्ज प्राप्‍त होऊनही मिटर बदलून दिले नाही. तक्रारदारांनी तोंडी व लेखी विनंती अनेकवेळा सामनेवाले यांचेकडे करुनही फॉल्‍टी मिटर बदलून देण्‍याची कार्यवाही केली नाही.
  4.         सामनेवाले यांचे भरारी पथकाने दि. 23/10/2010 रोजी तक्रारदारांच्‍या मिटरची पाहणी केली व मिटर तपासणीसाठी घेऊन गेले. तक्रारदारांना सामनेवाले यांनी दि. 27/10/2010 रोजीच्‍या पत्रान्‍वये मिटर faulty असून 2.2 kw विद्युत भार असल्‍याचे कळवले. तक्रारदारांना सामनेवाले यांनी ऑफिसमध्‍ये हजर राहण्‍यासाठी बोलावले होते परंतु कामकाजामुळे व आजारपणामुळे त्‍यांना जाणे शक्‍य झाले नाही.
  5.      तक्रारदारांना दि. 07/12/2010 रोजी प्राप्‍त झालेल्‍या समन्‍समध्‍ये त्‍यांचेविरुध्‍द विजचोरीचा गुन्‍हा दाखल झाल्‍याचे तसेच विज चोरीचे देयक दंडासहीत दि. 08/12/2010 रोजी सामनेवाले यांचेकडे भरणा करण्‍याबाबत नमूद केले होते. सामनेवाले यांचेकडे विज चोरीच्‍या पंचनाम्‍याची मागणी केली. तक्रारदारांनी जिल्‍हाधिकारी यांचेकडे तक्रार केल्‍यानंतर दि. 05/03/2011 रोजी पंचनाम्‍याची प्रत प्राप्‍त झाली. तक्रारदारांनी तडजोडीच्‍या (Compounding) विदयुत देयकाची रक्‍कम सामनेवाले यांचे‍कडे भरणा केल्‍यानंतर सामनेवाले यांनी विजचोरीच्‍या FIR ची फिर्याद परत घेतली. तक्रारदारांनी सामनेवाले यांना मिटर फॉल्‍टी असल्‍याबाबत तक्रार देऊनही सामनेवाले यांनी त्‍याबाबत सुमारे 3 वर्षे कार्यवाही केली नाही व त्‍यानंतर चुकीचे विजचोरीचे बिल देऊन त्रुटीची सेवा दिली असे तक्रारदारांचे म्‍हणणे आहे.
  6.      सामनेवालेविरुध्‍द यांचेविरुध्‍द  एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला आहे.
  7.           तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद, तोंडी युक्‍तीवाद यावरुन खालीलप्रमाणे बाबी स्‍पष्‍ट होतातः
  8.  
  1.     तक्रारदारांनी श्रीमती सुनिता लक्ष्‍मण पवार यांचेकडून दि. 22/12/2006 रोजी मिळकत विकत घेतली असून (पूर्वीच्‍या मालकांनी) त्‍यांनी सदर मिळकतीतील विदयुत पुरवठा, मिटरसहीत तक्रारदारांचे नांवावर हस्‍तांतरण करणेबाबत व पूर्वीची काही देय रक्‍कम असल्‍यास जबाबदारीबाबत दि. 24/11/2007 रोजी शपथपत्र करुन दिल्‍याचे दिसून येते.
  2.  

ब.        तक्रारदारांनी दि. 29/05/2007 रोजी सामनेवाले यांचेकडे विदयुत पुरवठयातील नांवात बदल करणेसाठी (change of name) रक्‍कम रु. 1,000/- तसचे दि. 09/07/2007 रोजी रु. 50/- (Reconnection Charges) विदयुत पुरवठा पुर्नजोडणीसाठी भरणा केल्‍याच्‍या पावत्‍या मंचात दाखल आहेत.

क.       तक्रारदारांनी दि. 29/05/2007 रोजीच मिटर क्र. 9000427699 फॉल्‍टी असल्‍यामुळे बदलून नविन मिटर देण्‍याबाबतचा अर्ज सामनेवाले यांना दिला आहे. सामनेवाले यांना सदर अर्ज दि. 29/05/2007 रोजी प्राप्‍त झाल्‍याची पोच पावती मंचात दाखल आहे.

ड.     सामनेवाले यांचे भरारी पथकाने दि. 23/10/2010 रोजी तक्रारदारांना पाठवलेल्‍या पत्रानुसार, भरारी पथकाने तक्रारदारांच्‍या मिटरची चाचणी केली असता मिटर बंद असल्‍याचे आढळले. मिटरच्‍या पुढील तपासणीसाठी दि. 27/10/2010 रोजी कल्‍याण चाचणी विभाग येथे तक्रारदारांना उपस्थित राहण्‍याबाबत कळवले. त्‍यानंतर सामनेवाले यांनी दि. 27/10/2010 रोजीच्‍या पत्रान्‍वये मिटरमध्‍ये फेरफार असल्‍याचा संशय आल्‍यामुळे तपासणीबाबत दि. 08/11/2010 रोजी तक्रारदारांना उपस्थित राहण्‍याबाबत स्‍मरणपत्र पाठवले. तसेच दि. 07/12/2010 रोजीच्‍या पत्रान्‍वये तक्रारदारांच्‍याविरुध्‍द विदयुत कायदा कलम 135 अन्‍वये विजचोरीचा गुन्‍हा दाखल असल्‍यामुळे दि. 08/12/2010 पर्यंत विजचोरीची व दंडाची रक्‍कम भरणा करण्‍यासाठी कळविले असल्‍याचे वरील पत्रावरुन दिसून येते. तक्रारीमध्‍ये यासंदर्भातील कागदपत्रे दाखल आहेत.

इ.     तक्रारदारांनी दि. 13/12/2010 रोजी विज चोरीची रक्‍कम         रु. 21,610/- सामनेवाले यांचेकडे भरणा केल्‍याची पावती मंचात दाखल आहे. त्‍यानंतर तक्रारदारांनी दि. 14/12/2010 व दि. 05/01/2011 रोजीच्‍या पत्रान्‍वये सामनेवाले यांचेकडे विजचोरीच्‍या पंचनाम्‍याची व FIR च्‍या प्रतीची मागणी केली असता सदरील प्रकरण न्‍यायप्रविष्‍ठ असल्‍यामुळे न्‍यायालयातूनच मिळेल असे सामनेवाले यांनी कळविले.

ई.     सामनेवाले यांचे मिटर तपासणी अहवालानुसार व पंचनाम्‍यानुसार तक्रारदारांचे मिटर बंद होते, मिटरमध्‍ये टॅम्‍परींग केलेले असून मिटरचे रिडींग उलटे केले आहे (Reverse) म्‍हणजेच बिलावर मिटर रिडींग 02391 असून मिटरवरील रिडींग 02321 आहे. मिटरची काच फुटलेली असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. तक्रारदारांनी रु. 8,000/- तडजोडीची रक्‍कम (Compounding Bill) दि. 02/11/2011 रोजी सामनेवाले यांचेकडे भरणा केली.

उ.    तक्रारदारांनी सदर मिटर फॉल्‍टी असल्‍यामुळे बदलून देण्‍यासाठी सामनेवाले यांचेकडे दि. 29/05/2007 रोजी दिलेल्‍या अर्जावर काय कार्यवाही झाली? त्‍याबाबत तसेच लोकशाही दिनामध्‍ये झालेल्‍या कार्यवाहीबाबत व कंपाऊडींग बिल मिळणेबाबत सामनेवाले यांचेकडे माहिती अधिकार अधिनियम, 2005 अन्‍वये मागणी केलेली माहिती सामनेवाले यांनी दि. 25/10/20111 रोजीच्‍या पत्रान्‍वये तक्रारदारांना दिली आहे. सामनेवाले यांचे पत्राचे अवलोकन केले असता तक्रारदारांच्‍या अर्जाप्रमाणे फॉल्‍टी मिटर बदलला नाही असे नमूद केल्‍याचे दिसते. यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारांचा faulty मिटरचा अर्ज प्राप्‍त झालेला असूनही सुमारे तीन वर्षे मिटरची तपासणी केली नाही अथवा मिटर बदलून दिला नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

ऊ.      तक्रारदारांच्‍या दि. 09/01/2007 रोजीच्‍या विदयुत देयकाचे अवलोकन केले असता सदर मिटर ऑगस्‍ट, 2006 पासून “faulty” असल्‍याचे नमूद केले आहे.

ए.        वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी सदर मिळकत/ घर विकत घेतल्यानंतर प्रलंबित देयकाचा भरणा केला, मिटर त्‍यांचे नांवावर बदलून घेतले, रिकनेक्शन चार्जेस भरुन बंद मिटर चालू करुन घेतले. तसेच मिटर faulty  असल्‍याबाबत दि. 29/05/2007 रोजी अर्ज केला. परंतु सामनेवाले यांनी त्‍यांचे मिटरबाबत सुमारे 3 वर्षे कोणतीही कार्यवाही केली नाही. सामनेवाले यांची सदरची कृती सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे.

         परंतु तक्रारदारांना सामनेवाले यांनी दिलेल्या विजचोरीच्‍या देयकासंदर्भात निर्णय देण्‍याची बाब मंचाच्‍या अधिकारक्षेत्रात येत नाही. मंचाने यासंदर्भात खालील मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या व मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या खालील न्‍यायनिवाडयांचा आधार घेतला आहेः

         1. मा. सर्वोच्‍च न्यायालयाच्‍या सिव्‍हील अपिल क्र. 5416/12 यु.पी. पॉवर वि. अनिस अहमद मध्‍ये दि. 01/07/2013 रोजी दिलेल्या न्‍यायनिवाडयातील खालीलप्रमाणे नमूद केले आहेः

 

 46. The acts of indulgence in "unauthorized use of electricity" by a person, as defined in clause (b) of the Explanation below Section 126 of the Electricity Act,2003 neither has any relationship with "unfair trade practice" or "restrictive trade practice" or "deficiency in service" nor does it amounts to hazardous services by the licensee. Such acts of "unauthorized use of electricity" has nothing to do with charging price in excess of the price. Therefore, acts of person in indulging in 'unauthorized use of electricity', do not fall within the meaning of "complaint", as we have noticed above and, therefore, the "complaint" against assessment under Section 126 is not maintainable before the Consumer Forum. The Commission has already noticed that the offences referred to in Sections 135 to 140 can be tried only by a Special Court constituted under Section 153 of the Electricity Act, 2003. In that view of the matter also the complaint against any action taken under Sections 135 to 140 of the Electricity Act, 2003 is not maintainable before the Consumer Forum.

2.         मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या  रिव्हीजन पिटीशन 1112/14 दि. 13/01/2015 रोजी दिलेल्‍या न्‍यायनिवाडयातील परिच्‍छेद 7 मध्‍ये खालीलप्रमाणे नमूद केले आहेः

 On account of allegation of theft of electricity, the Consumer Forum lacks inherent jurisdiction to entertain the complaint, it cannot proceed to adjudicate upon the factual issue raised in the complaint and cannot adjudicate one way or the other way on merits.  The Consumer Forum would in such circumstance have to keep its hand off the matter, leaving it to the aggrieved person to approach an appropriate Forum for redressal of his grievance. 

 

       वर नमूद केलेले न्‍यायनिवाडे प्रस्‍तुत प्रकरणात लागू होतात असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी विजचोरीचे देयके, दंडाची रक्‍कम व तडजोडीची रक्‍कम सामनेवाले यांचेकडे भरणा केली आहे. यावरुन सदर देयक तक्रारदारांनी मान्‍य केल्‍याची (accept) बाब स्‍पष्‍ट होते. मंचाला सदर देयकासंदर्भात निर्णय देण्‍याची बाब मंचाचे अधिकारक्षेत्रात (Jurisdiction) येत नाही.

       सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

 

            आ दे श

  1. तक्रार क्र. 12/2012 अंशतः मान्‍य करण्‍यात येते.
  2. तक्रारदारांनी दि. 29/05/2007  रोजी सामनेवाले यांचेकडे faulty मिटरची तक्रार करुनही सामनेवाले यांनी सुमारे तीन वर्षे कार्यवाही न करुन त्रुटीची सेवा दिल्‍याचे जाहिर करण्‍यात येते.
  3. तक्रारदारांना सामनेवाले यांनी दिलेल्‍या विदयुत देयकांबाबत कोणतेही आदेश नाही.
  4. सामनेवाले यांनी faulty meter बाबत कार्यवाही न करुन त्रुटीची सेवा  तक्रारदारांना दिल्‍याबाबत नुकसान भरपाईची रक्‍कम रु. 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) व तक्रारीच्‍या खर्चाची रक्‍कम  रु. 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार) दि. 07/12/2015 पर्यंत दयावा. विहीत मुदतीत अदा न केल्‍यास 9% व्‍याजदाराने दयावी.
  5. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.
  6. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्‍य पोष्‍टाने पाठविण्‍यात   याव्‍यात.
 
 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.