Maharashtra

Ahmednagar

CC/20/91

शेख एजाज अब्‍दुल हक्‍क - Complainant(s)

Versus

महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी मर्या. अहमदनगर करीता १.वरीष्‍ठ अभियंता साहेब,२. अति.कार्यकारी - Opp.Party(s)

ए.डी. चौधरी

30 Jul 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/20/91
( Date of Filing : 14 Feb 2020 )
 
1. शेख एजाज अब्‍दुल हक्‍क
रा.बी-१८ लेखा कॉलनी,गोविंदपुरा,अहमदनगर-४१४००१
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी मर्या. अहमदनगर करीता १.वरीष्‍ठ अभियंता साहेब,२. अति.कार्यकारी अभियंता
कार्यालय-कोटी रोड,अहमदनगर कॉलेज जवळ,अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 3. कनिष्‍ठ अभियंता,
फकीरवाडा कक्ष,नगर औरंगाबाद रोड,अहमदनगर-४१४००१
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 30 Jul 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – ३०/०७/२०२०

(द्वारा द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अन्‍वये सदर तक्रार दिनांक १४-०२-२०२० ला दाखल केलेली होती. वरील नमुद तक्रारीत तक्रारदारतर्फे दिनांक २५-०२-२०२० ला दाखल सुनावणीवर युक्तिवादासाठी ठेवण्‍यात आली होती. त्‍यानंतर तक्रारदाराचे विनंतीवरून पुढील तारीख अतिरीक्‍त दाखल सुनावणीचे युक्तिवादाकरीता दिनांक २६-०२-२०२० ला ठेवण्‍यात आलेली होती. त्‍यानंतर दिनांक ११-०३-२०२०, ३०-०३-२०२०, ०४-०६-२०२० व आज दिनांक ३०-०७-२०२० ला ठेवण्‍यात आलेली असुन तक्रारदार व त्‍याचे वकील सतत गैरहजर आहेत.  

२.   तक्रारीची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, तक्रारदार व सामनेवाले यांमध्‍ये वीज वापराविषयी वाद आहे. तसेच सामनेवालेने तक्रारदाराला राज्‍य विद्युत अधिनीयम २००३ कलम १३५ नुसार वीज चोरी संदर्भात नोटीस पाठविली आहे. सदर नोटीसवर तक्रारदार याचा आक्षेप आहे, म्‍हणुन सदर तक्रार या जिल्‍हा आयोगात दाखल करण्‍यात आलेली होती.  मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने यु.पी. पावर कॉर्पोरेशन विरूध्‍द अनिस अहमद या न्‍यायनिवाड्यात दिलेल्‍या  निर्णयानुसार जर विद्युत धारकाचे विरूध्‍द कलम १३५ विद्युत कायदा २००३ प्रमाणे तक्रार दाखल करण्‍यात आली तर त्‍या तक्रारीविषयी जिल्‍हा ग्राहक मंचाला त्‍या वाद निवारण करता अधिकार क्षेत्र नाही. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आदेश

 

१. तक्रारकर्ताची तक्रार अस्‍वीकृत करण्‍यात येत आहे.

 

२. तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

 

३. या आदेशाची प्रथम प्रत तक्रारदार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी

 

४. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.