उपस्थिती तक्रारकर्त्या तर्फे अधिवक्ता एस.के.गडपायले
विरुध्द पक्षा तर्फे अधिवक्ता पोपट
( आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा, श्रीमती आर.डी.कुंडले)
-- निकालपत्र --
( पारित दि. 19 जनवरी 2012)
तक्रारकर्ता तर्फे ऍड. गडपायले व विरुध्द पक्षा तर्फे ऍड. पोपट हजर. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद दिनांक 31.12.2011 रोजी ऐकला. त्यानंतर अध्यक्ष व सदस्य 15 दिवस भंडारा येथे कामकाजासाठी होते. त्यानंतर दि. 16.01.2012 रोजी गोंदिया येथे पुन्हा रुजु झाले. त्यामुळे आदेश 15 दिवसाच्या आत पारित करता आला नाही.
1 तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष बँकेकडे दि. 07.02.2011 रोजी रुपये 1,00,000/- चा चेक (चेक नं.732124) रोखीकरणासाठी खाते नं. 11119444679 दिला. हा चेक तक्रारकर्त्याला आय.पी.गौतम ने दिला होता. आय.पी.गौतमच्या खात्यात (पंजाब नॅशनल बँक खाता नं. 632200) पुरेशी रक्कम नसल्यामुळे हा चेक बाऊन्स झाला व ऍडव्हाईससह विरुध्द पक्षाकडे परत आला असे तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाने सांगितले.
2 तक्रारकर्त्याने बाऊन्स झालेल्या चेकची मागणी केली असता तो पोस्टाने तक्रारकर्त्याला पाठविण्यात येईल असे सांगितले.
3 पोस्टाने तक्रारकर्त्याला चेक मिळाला नाही. म्हणून दि. 29.07.2011 रोजी दोन लोकांना सोबत घेऊन विरुध्द पक्षाकडे जाऊन सहाय्यक प्रबंधकाची भेट घेतली व चेकची मागणी केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असे तक्रारकर्ता म्हणतो.
4 दि. 5.08.2011 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला वकिलामार्फत नोटीस देऊन चेकची मागणी केली. त्यावर विरुध्द पक्षाने दुसरा नवीन चेक प्राप्त करुन सादर करण्यास सांगितला. दि. 9.9.2011 रोजी तक्रारकर्त्याने पुन्हा विरुध्द पक्षाला दुसरी नोटीस दिली. याचे उत्तर विरुध्द पक्षाने दिले नाही असे तक्रारकर्ता म्हणतो.
5 तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, विरुध्द पक्षाने चेक हरविला त्यामुळे ते परत करण्यास असमर्थ आहेत. बाऊन्स झालेल्या चेकबद्दल तक्रारकर्त्याला चेक देणा-या आय.पी.गौतम यांची तक्रार दाखल करावयाची असल्याने तक्रारकर्त्याला चेकची आवश्यकता होती. विरुध्द पक्षाने चेक परत न केल्याने त्याची मुदत संपली. त्यामुळे तक्रारकर्त्याचे आर्थिक नुकसान झाले.
6 बाऊन्स झालेला चेक परत न करणे ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी ठरते. म्हणून या चेकची रक्कम रुपये 1,00,000/- (व्याजासहीत) आणि नुकसान भरपाई व खर्च मिळून रुपये 1,00,000/- अशी रुपये 2,00,000/- ची मागणी तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडून करतात.
7 तक्रारी सोबत एकूण 11 कागदपत्र जोडलेली आहेत.
विरुध्द पक्षाचे उत्तर थोडक्यात
8 विरुध्द पक्षाने तक्रारकर्ता व आय.पी.गौतम (चेक देणारा) यांच्यातील व्यवहाराबद्दल अनभिज्ञता व्यक्त केली आहे.
9 विरुध्द पक्ष हे मान्य करतात की, तक्रारकर्त्याने दि. 7.2.2011 रोजी रुपये 1,00,000 चा चेक सादर केला. तो विरुध्द पक्षाने Drawee (ड्रॉई) बँकेकडे (पंजाब नॅशनल बँक) पाठविला असता, त्यांनी दि. 8.2.2011 रोजी खात्यात अपुरी रक्कम हे कारण देऊन ऍडव्हाईससह परत पाठविला. तसे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला तोंडी सुचित केले. बाऊन्स झालेला उपरोक्त चेक व ड्रॉई बँकेचे पत्र (ऍडव्हाईस) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला साध्या पोस्टाने दि. 9.2.2011 रोजी पाठविला. ते गहाळ झाले असेल म्हणून तक्रारकर्त्याला प्राप्त झाले नसावे.
10 या संदर्भातील तक्रारकर्त्याच्या दि. 5.8.2011 व दि. 9.9.2011 च्या दोन्ही नोटीसेसला अनुक्रमे दि. 17.8.2011 व दि. 29.10.2011 रोजी विरुध्द पक्षाने वकिला मार्फत उत्तर देऊन उपरोक्त चेक विरुध्द पक्षाच्या हातून हरविला नसून पोस्टातून हरविला असावा असे म्हटले आहे.
11 तक्रारकर्ता चेक देणा-या आय.पी.गौतम विरुध्द कलम 138 (निगोशिएबल इनस्ट्रुमेंट ऍक्ट) अंतर्गत तक्रार करुन रक्कम वसूल करु शकला असता. त्याने तसे केले असते तर चेक हरविल्याबद्दल सांगण्यास व तक्रारकर्त्याला मदत करण्यास विरुध्द पक्ष तयार होते. परंतु तक्रारकर्त्याने आय.पी.गौतम विरुध्द रक्कम वसुलीची कारवाई न करता विरुध्द पक्षाकडून चेकच्या रक्कमेची मागणी केली आहे. ती सर्वथा अप्रस्तुत असून गैर आहे असे विरुध्द पक्ष म्हणतात.
12 शेवटी विरुध्द पक्ष बँकेनेच चेक देणा-या आय.पी.गौतम यांना दि. 13.06.2011 रोजी पत्र देऊन डुप्लीकेट-फ्रेश चेक देऊन प्रकरण आपसातील तडजोडीने मिटविण्याची विनंती केली, त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
13 म्हणून विरुध्द पक्षाने आय.पी.गौतम जिथे काम करतात तेथील प्रमुखाला सुध्दा दि. 17.10.2011 रोजी पत्र देऊन त्यांच्या कर्मचा-याने (आय.पी.गौतम) खात्यात रक्कम नसतांना चेक दिल्याबद्दल व तो दंडनीय अपराध असल्याबद्दल अवगत केले व त्यांनी आय.पी.गौतमला तशी समज द्यावी म्हणून विनंती केली.
14 तक्रारकर्त्याचा मंचात तक्रार करण्याचा हेतू शुध्द नाही. विरुध्द पक्ष चेक अंतर्गत रक्कम देण्यास बाध्य ठरत नाही. चेक हरविल्याचे लक्षात आल्याने विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला. विरुध्द पक्षाच्या सेवेत त्रृटी नाही. म्हणून ही तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्द पक्ष करतात.
15 चेकच्या रक्कमेची अफरातफर होऊ नये म्हणून ड्रॉई बँकेला विरुध्द पक्षाने स्टॉप पेमेंटची सूचना दि. 15.06.2011 रोजी दिली. तसेच चेक हरविल्याबद्दल दि. 12.10.2011 रोजी पोलिस स्टेशनला रिपोर्ट दिला.
16 उपरोक्त चेक पोस्टातून गहाळ झाल्याने पोस्ट ही आवश्यक पार्टी आहे. तक्रारकर्त्याने त्यांना प्रतिवादी केले नाही. म्हणून ही तक्रार खारीज होण्यास पात्र ठरते.
17 विरुध्द पक्षाने एकूण 5 पत्रे दस्त म्हणून दाखल केली आहे.
18 मंचाने दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. रेकॉर्डवरील संपूर्ण कागदपत्रे तपासली.
मंचाचे निरीक्षणे व निष्कर्ष
19 दि. 7.2.2011 रोजी तक्रारकर्त्याने रु.1,00,000 चा चेक (पंजाब नॅशनल बँक) विरुध्द पक्षाकडे जमा केला हे विरुध्द पक्ष मान्य करतात. विरुध्द पक्षाने हा चेक क्लिअरन्ससाठी
ड्रॉई बँकेकडे पाठविला असता, तो, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याच्या ऍडव्हाईससह परत आला. ड्रॉई बँकेचा ऍडव्हाईस व परत आलेला चेक विरुध्द पक्षाने साध्या पोस्टाने तक्रारकर्त्याला पाठविला. तो तक्रारकर्त्याला मिळाला नाही. हे दोन्ही पक्ष मान्य करतात.
20 यावरुन हे स्पष्ट होते की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला साध्या पोस्टाने पाठविलेला चेक व त्यासोबतचे ड्रॉई बँकेचे पत्र ट्रान्झीट मध्ये गहाळ झाले. म्हणून तक्रारकर्त्याने वारंवांर मागणी करुनही चेक परत करण्यास विरुध्द पक्ष असमर्थ होते. तसे विरुध्द पक्षाने मान्य ही केले आहे.
21 हरविलेल्या – गहाळ झालेल्या चेक संदर्भात अन्य कोणी त्या चेक अंतर्गत रक्कमेचा अपहार करु नये म्हणून विरुध्द पक्षाने दि. 15.06.2011 रोजी ड्रॉई बँकेला स्टॉप पेमेंन्टची सूचना दिली. त्याची नोंद ड्रॉई बँकेने घेतली असे रेकॉर्डवरुन स्पष्ट होते. तसेच खबरदारीचे उपाय म्हणून विरुध्द पक्षाने चेक हरविल्याचा रिपोर्ट पोलिस स्टेशनला दि. 12.10.2011 रोजी दिला.
22 याप्रमाणे विरुध्द पक्षाने खबरदारीचा उपाय म्हणून तक्रारकर्त्याला, ड्रॉई बँकेला, चेक देणा-या आय.पी.गौतमला, त्याच्या नियोक्त्याला तसेच पोलिस स्टेशनला पत्राने सर्व परिस्थिती अवगत केली व पुढील अनर्थ टाळण्याचा प्रयत्न केला हे त्यांच्या व्यवहारातून स्पष्ट होते.
23 या प्रकरणात प्रत्यक्ष रक्कमेचा अपहार झाला नाही. चेक देणा-या आय.पी.गौतमच्या खात्यातून चेकची रक्कम रुपये 1,00,000 वजा (Debit) झाली नाही, त्यामुळे विरुध्द पक्षावर चेकची रक्कम देण्याची जबाबदारी नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे. या संदर्भात केस लॉ
1) I (2007) CPJ 1 (N C ) नॅशनल कमिशन
कॅनरा बँक विरुध्द सुधिर आहूजा.
2) IV (2011) CPJ 31 ( Oct Issue) वेस्ट बेंगॉल स्टेट कमिशन
बसंत कुमार अग्रवाल विरुध्द सिडींकेट बँक व इतर.
चेक हरविल्यास वि.प. चेकमध्ये नमूद रक्कम देण्यास जबाबदार ठरत नाहीत.
24 परत आलेला चेक व त्या सोबतचा ऍडव्हाईस विरुध्द पक्षाने साध्या पोस्टाने न पाठविता रजिस्टर्ड पोस्टाने पाठविला असता तर तो गहाळ होण्याची शक्यता कमी झाली असती. चेक गहाळ होण्यासाठी विरुध्द पक्षाचा Casual Approach कारणीभूत आहे. एवढया मर्यादित अर्थाने विरुध्द पक्षाच्या सेवेत त्रृटी आहे असा मंचाचा निष्कर्ष आहे. म्हणून विरुध्द पक्ष तक्रारकर्त्याला मर्यादित नुकसान भरपाई देण्यास बाध्य ठरतात.
25 पोस्टाला आवश्यक पार्टी म्हणून जोडण्याची आवश्यकता नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे.
सबब आदेश
अंतिम आदेश
1 तक्रारकर्त्याची तक्रार अत्यंत मर्यादित स्वरुपात अंशतः मंजूर .
2 विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई म्हणून रुपये 2000/- द्यावे.
3 विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याला या तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1000/- द्यावे.
विरुध्द पक्षाने आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत करावे.
(श्रीमती गीता रा. बडवाईक) (श्रीमती रोहिणी दि. कुंडले)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, गोंदिया

17 विरुध्द पक्षाने एकूण 5 पत्रे दस्त म्हणून दाखल केली आहे