आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2 अर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत गैरअर्जदाराकडून खरेदी केलेली
सरीता कंपनीची जुनी पाण्याची टाकी स्वखर्चाने गैरअर्जदाराकडे जमा करावी, व
सदरची टाकी गैरअर्जदाराने जमा करुन घ्यावी.
3 गैरअर्जदाराने अर्जदाराकडून सदरची टाकी मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत
अर्जदारास सरीता कंपनीची 1000 लिटर क्षमतेची नविन पाण्याची टाकी सुस्थितीत
असलेली, अर्जदारास द्यावी. तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास नुकसान भरपाई पोटी
रु. 1,000/- फक्त ( अक्षरी रु. एकहजार फक्त ) आदेश मुदतीत द्यावे.
4 गैरअर्जदाराने तक्रार अर्ज खर्चापोटी अर्जदारास रु. 1000/- फक्त ( अक्षरी रु.
एकहजार फक्त ) आदेश मुदतीत द्यावे.
5 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.एस.एम.आळशी. सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.सदस्या. मा.अध्यक्ष.