जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 166/2021. आदेश दिनांक : 02/12/2022.
सौरभ पिता व्यंकट चलवाड, वय 22 वर्षे,
व्यवसाय : शिक्षण, रा. एरंडी, ता. औसा, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) फ्लिपकार्ट तर्फे सावन रिटेलर्स प्रा.लि.,
सर्व्हे नं. 696, गुंडलपोचमपल्ली, मेदाचल मंडल,
रंगा रेड्डी, जिल्हा सिकंदराबाद (तेलंगणा राज्य).
(2) रेडमी तर्फे व्यवस्थापक, दुकान नं. 4, तळमजला,
स्कील स्पेक्ट्रम चंद्रनगर, हिमायतनगर, हैद्राबाद. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- पी.पी. चलवाड
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) प्रस्तुत प्रकरणामध्ये दोषयुक्त भ्रमणध्वनी बदलून न दिल्यामुळे भ्रमणध्वनीचे मुल्य व्याजासह देण्याचा व अन्य नुकसान भरपाई देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रार दाखल करुन घेण्यात आली आणि विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्याचा आदेश करण्यात आला. मात्र, विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणीसंबंधी तक्रारकर्ता यांनी आवश्यक पूर्तता केलेली नाही. नैसर्गिक न्याय-तत्वानुसार विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणे आवश्यक आहे. तक्रारकर्ता व त्यांचे विधिज्ञ हे अनेक तारखांपासून सातत्याने अनुपस्थित आहेत. तक्रारकर्ता यांना उचित संधी प्राप्त झालेली आहे आणि त्यांना ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने स्वारस्य दिसून येत नाही. ग्राहक तक्रारींचे कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. उक्त अनुषंगाने ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-