जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 99/2021. आदेश दिनांक : 08/02/2023.
रंजना शिवाजी दाताळ, वय 45 वर्षे, व्यवसाय : शेती व :- तक्रारकर्ती
स्वंयरोजगार, रा. बोकनगांव, ता. जि. लातूर.
विरुध्द
(1) मे. जय बालाजी ॲग्रो तर्फे प्रोप्रायटर : विक्रम बालकृष्ण आकरे :- विरुध्द पक्ष
रा. रोरी रोड, तरुना, सिरसा, हरियाणा - 125 201.
(2) धिमन इंजीनिअरींग वर्क्स तर्फे प्रोप्रायटर : गुरुविंदर सिंग,
रा. न्यू अनाज मंडीसमोर, मानसा-सिरसा रोड,
मानसा - 151 504 (पंजाब)
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- जीवन एन्. करडे
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) दि.5/10/2021 रोजी प्रस्तुत ग्राहक तक्रार दाखल करण्याचा व विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्याचा आदेश करण्यात आला. मात्र, त्यानंतर विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र पाठविणे / बजावणी करण्यासंबंधी तक्रारकर्ती यांनी पूर्तता केली नाही. नैसर्गिक न्याय-तत्वानुसार विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणे आवश्यक आहे. तक्रारकर्ती व त्यांचे विधिज्ञ सातत्यपूर्ण अनुपस्थित आहेत. उचित संधी प्राप्त होऊनही आवश्यक पूर्तता केली नाही. त्यामुळे ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारकर्ती यांना स्वारस्य नाही, असे दिसते. ग्राहक तक्रारींचे कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. उक्त अनुषंगाने ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-