Maharashtra

Latur

CC/270/2022

रघुनाथ धर्माण्णा साबणे - Complainant(s)

Versus

प्रो.प्रा. गोपाळ पाडवराव विराजदार, दिपक कृषी सेवा केंद्र - Opp.Party(s)

अ‍ॅड. एस. एम. तांदळे

24 Jan 2024

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/270/2022
( Date of Filing : 28 Sep 2022 )
 
1. रघुनाथ धर्माण्णा साबणे
लातूर
...........Complainant(s)
Versus
1. प्रो.प्रा. गोपाळ पाडवराव विराजदार, दिपक कृषी सेवा केंद्र
लातूर
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Amol B. Giram PRESIDENT
 HON'BLE MRS. Rekha R. Jadhav MEMBER
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 24 Jan 2024
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 270/2022.                           तक्रार दाखल दिनांक : 28/09/2022.                                                                           तक्रार निर्णय दिनांक : 24/01/2024.

                                                                                       कालावधी : 01 वर्षे 03 महिने 27 दिवस

 

रघुनाथ पिता धर्माण्णा साबणे, वय 48 वर्षे,

व्यवसाय : नोकरी, रा. देवणी, ता. देवणी, जि. लातूर.                                             तक्रारकर्ता

 

                        विरुध्द

 

(1) दिपक कृषि सेवा केंद्र, प्रोप्रा. गोपाळ पाडवराव बिराजदार,

     मेन रोड, देवणी, ता. देवणी, जि. लातूर - 413 519.

(2) व्यवस्थापक, ईगल सिडस् ॲन्ड बायोटेक लि., 801,

     अपोलो प्रिमियर, विजयनगर स्क्वेअर, इंदौर - 452 010 (मध्यप्रदेश)                विरुध्द पक्ष

 

गणपूर्ती :          श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष

                        श्रीमती रेखा जाधव, सदस्य

                        श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                                   

तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :-  सुदर्शन एम. तांदळे

विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :-  गणेश पी. शिंदे

 

आदेश 

श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

(1)       तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांची मौजे देवणी (बु.), ता. देवणी येथे गट क्र. 314/400/2 मध्ये एकूण क्षेत्र 82 गुंठे व त्यांचे बंधू अंकुश धर्माण्णा साबणे यांची गट क्र. 323/405/1 मध्ये एकूण क्षेत्र 1 हे. 32 गुंठे शेतजमीन आहे. तक्रारकर्ता हे एकत्र कुटुंबाचा कर्ता नात्याने शेतजमिनीची देखभाल व मशागत करतात. खरीप हंगाम 2022 मध्ये सोयाबीन पीक घेण्याकरिता शेतजमिनीची मशागत केली. दि.25/6/2022 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे 'दिपक कृषि सेवा केंद्र') यांच्याकडून विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "ईगल सिडस्") यांच्याद्वारे उत्पादीत सोयाबीन बियाण्याच्या प्रतिपिशवी रु.3,900/- प्रमाणे 5 पिशव्या रु.19,500/- मुल्य देवून खरेदी केल्या. बियाणे खरेदीचा पावती क्र.1108 व बियाणे लॉट क्रमांक ऑक्टो-2021-12-891-174921 सीआय आहे. तसेच तक्रारकर्ता यांनी हिंगमिरे ॲग्रो एजन्सी, साकोळ येथून रु.6,750/- किंमतीचे खते खरेदी केले.

(2)       तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, शेतजमिनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असल्याची खात्री करुन दि.26/6/2022 रोजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने सोयाबीन बियाणे पेरणी केली. परंतु 8-9 दिवसानंतर सोयाबीन उगवले नसल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत दिपक कृषि सेवा केंद्रास माहिती दिली आणि कृषि अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तक्रार नोंदविली.

(3)       तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, दि.6/7/2022 रोजी कृषि अधिकारी व अन्य प्रतिनिधींनी त्यांच्या शेतजमिनीमध्ये प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल तयार केला. पाठपुराव्याअंती दि.25/8/2022 रोजी उपविभागीय कृषि अधिकारी, उदगीर यांनी तालुका तक्रार निवारण समितीचा क्षेत्रीय भेटचा अहवाल व पंचनामा दिला. नुकसान भरपाईसंबंधी दिपक कृषि सेवा केंद्राकडे चौकशी केली असता ईगल सिडस् यांना संपर्क करुन कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले. सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी तक्रारकर्ता यांना रु.51,250/- खर्च आला. प्रतिएकर 12 क्विंटल याप्रमाणे 5 एकर क्षेत्रातील 60 क्विंटलचे प्रतिक्विंटल रु.6,500/- प्रमाणे रु.3,90,000/- उत्पन्नापासून तक्रारकर्ता यांना वंचित रहावे लागले. उक्त कथनाच्या अनुषंगाने सोयाबीन लागवडीचा खर्च वजावट करता रु.3,38,750/- व्याजासह देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.25,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.7,000/- देण्याचा दिपक कृषि सेवा केंद्र व ईगल सिडस् यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.

(4)       दिपक कृषि सेवा केंद्र यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने त्यांनी अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, नामांकीत कंपनीकडून खरेदी केलेले बियाणे दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवतात. बियाणे सिलबंद स्वरुपात येत असते. त्यांच्याद्वारे बियाणे, खते किंवा किटकनाशकांचे उत्पादन करण्यात येत नाही. तक्रारकर्ता यांना विक्री केलेल्या बियाण्यामुळे नुकसान झालेले नसल्यामुळे ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.

(5)       ईगल सिडस् यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद मजकूर अमान्य केला आहे. त्यांचे कथन असे की, उत्पादीत बी-बियाण्यांची बाजारापेठेत विक्री करण्यापूर्वी भौतिक शुध्दता, बियाण्यातील आद्रता, अनुवंशिक शुध्दता, उगवणक्षमता इ. कंपनीच्या प्रयोगशाळेमध्ये करण्यात येते. त्यांनी उत्पादीत केलेले सोयाबीन JS-335 बियाणे चांगल्या दर्जाचे असून लातूर जिल्ह्यामध्ये विक्री केलेल्या अन्य शेतक-यांकडून त्याबाबत तक्रार नाही. अन्य    शेतक-यांना बियाण्यापासून चांगले उत्पन्न मिळाले आहे. कृषि अधिका-यांनी पंचनामा करण्यापूर्वी त्यांना कळविलेले नाही आणि पंचनाम्याची प्रत दिलेली नाही. शासकीय परिपत्रकानुसार पंचनामा करण्याच्या कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच तक्रारकर्ता यांनी सोयाबीन पिकाची लागवड करताना पीक लागवड पध्दतीचे पालन केलेले नाही. बियाणे नियमन, 1968 चे नियम 23-अ अन्वये बियाणे नमुना प्रयोगशाळेकडे तपासणीकडे पाठविणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने सोयाबीन पिकाच्या उवगणक्षमतेची मर्यादा 60 टक्के केलेली आहे. त्यामुळे  बियाण्याची उगवणक्षमता नव्हती, असे म्हणता येणार नाही.

(6)       ईगल सिडस् यांचे पुढे कथन असे की, बियाणे हाताळणीमध्ये किंवा जोरात आदळल्यानंतर उगवणक्षमतेवर परिणाम होतो. समिती अहवालामध्ये व्यापक स्वरुपात बियाणे बनावट असल्याचा निष्कर्ष नोंदविलेला नाही. बियाण्याच्या नाजूक / नाशवंत बाबी, आकारमान, बियाण्याची थप्पी, जास्त उंचीवर बियाणे ठेवल्यामुळे होणारा विपरीत परिणाम, जमिनीतील आद्रता, खोलीवर पेरणी, बुरशीनाशकांचा बियाण्यावर वापर, अनियमीत पर्जन्यमान, वातावरणातील बदल, पाणी नियोजन, पाऊस इ. घटक उगवणक्षमता कमी होण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि त्याबाबत शासनस्तरावर सूचना दिलेल्या आहेत. अंतिमत: बियाण्यामध्ये दोष नसल्याचे नमूद करुन ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती ईगल सिडस् यांनी केलेली आहे.

(7)       तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, दिपक कृषि सेवा केंद्र व ईगल सिडस यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्‍यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्‍यात येतात आणि त्‍या मुद्दयांची कारणमीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.        

मुद्दे                                                                                          उत्तर

 

1.  तक्रारकर्ता यांना ईगल सिडस् व दिपक कृषि सेवा केंद्र

     यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ?                                       नाही.   

2. तक्रारकर्ता नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत काय ?                             नाही.

3. काय आदेश ?                                                                                   शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

कारणमीमांसा

(8)       मुद्दा क्र. 1 ते 3 :- प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांनी दिपक कृषि सेवा केंद्र यांच्याकडून ईगल सिडस् यांच्याद्वारे उत्पादीत  JS-335 सोयाबीन बियाणे खरेदी केले, याबद्दल उभयतांमध्ये मान्यस्थिती आहे. सोयाबीन बियाण्याची पेरणी केल्यानंतर उगवण न झाल्यामुळे नुकसान झाले, असा तक्रारकर्ता यांचा वाद आहे. उलटपक्षी, ईगल सिडस् यांचा प्रतिवाद असा की, बियाण्याच्या उगवणशक्तीवर अनेक घटकांचा प्रभाव पडतो आणि त्यांनी विक्री केलेले बियाणे दोषयुक्त नाही.

(9)       सकृतदर्शनी असे दिसते की, तक्रारकर्ता यांचे नांवे शेतजमीन असण्यासंबंधी किंवा त्यांनी लाभार्थी असणा-या शेतजमिनीमध्ये वादकथित सोयाबीन बियाणे पेरणी केली, असा स्पष्ट पुरावा नाही. तक्रारकर्ता कथन करतात त्याप्रमाणे एकत्र कुटुंबामध्ये त्यांची शेतजमीन असल्यापृष्ठयर्थ पुरावा नाही. अभिलेखावर दाखल कागदपत्रांनुसार गाव : देवणी (बु.), ता. देवणी, जि. लातूर येथील भूमापन क्रमांक व उपविभाग : 314/400/2 मध्ये खाते क्र. 3413 अन्वये आनशबाई धर्मन्ना साबणे भोगवाटदार असल्याचे निदर्शनास येते. तसेच गाव : देवणी (बु.), ता. देवणी, जि. लातूर येथील भूमापन क्रमांक व उपविभाग : 323/405/1 मध्ये खाते क्र. 1100 अन्वये अंकुश धर्मन्ना साबणे भोगवाटदार असल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ता यांच्या आई आनशबाई व बंधू अंकूश यांच्या नांवे स्वतंत्र शेतजमीन दिसून येते. तक्रारकर्ता हे आनशबाई व अंकुश यांचे 7/12 उतारे दाखल करुन एकत्र कुटुंबाची शेतजमीन असल्याचे नमूद करत आहेत. प्रामुख्याने, आनशबाई व अंकुश हे ग्राहक तक्रारीमध्ये पक्षकार नाहीत आणि त्यांचे शपथपत्र अभिलेखावर दाखल नाहीत. अशा स्थितीत, आनशबाई व अंकुश यांच्या शेतजमिनीमध्ये पेरणी केलेल्या कथित सोयाबीन बियाण्यासंबंधी तक्रारकर्ता यांचा वाद कायदेशीरदृष्टया समर्थनिय ठरत नाही. त्या अनुषंगाने ईगल सिडस् व दिपक कृषि सेवा केंद्र यांनी तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे किंवा दोषयुक्त बियाणे विक्री केल्याचे सिध्द होत नसल्यामुळे तक्रारकर्ता अनुतोषास पात्र राहणार नाहीत आणि ग्राहक तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.2 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

आदेश

 

 

                            (1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्‍यात येते.        

                            (2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.

 

 

(श्री. रविंद्र शे. राठोडकर)             (श्रीमती रेखा  जाधव)                 (श्री. अमोल बा. गिराम)

             सदस्‍य                                         सदस्‍य                                            अध्यक्ष

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MR. Amol B. Giram]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rekha R. Jadhav]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.