Maharashtra

Beed

CC/13/99

जगन बबनराव खेडकर - Complainant(s)

Versus

प्रो.प्रा प्रशांत ट्रेडर्स, - Opp.Party(s)

धांडे

05 Aug 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/13/99
 
1. जगन बबनराव खेडकर
कालीकानगर नगररोड,बीड
बीड
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. प्रो.प्रा प्रशांत ट्रेडर्स,
सावतामाळी चौक,एमआयडीसी रोड,बीड
बीड
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MRS. MANJUSHA CHITALANGE MEMBER
 HON'BLE MR. R.S.Rathodkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                                     निकाल

                       दिनांक- 05.08.2014

                  (द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष)

 

           तक्रारदार जगन खेडकर यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले  यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे  म्‍हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.

 

             तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे,  तक्रारदार हे बीड येथे त्‍यांचे कूटूंबिया सोबत राहतात. सामनेवाले क्र.1 पाण्‍याची टाकी विकणारे  विक्रेते आहेत. सामनेवाले क्र.2 हे पाण्‍याची टाकी बनविणारे उत्‍पादक आहेत.

 

            तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडून स्‍वतःचे घरावर पाणी साठविण्‍याकरिता दि.25.11.2005 रोजी एक हजार लिटरची त्रिधारा कंपनीची सामनेवाले क्र.2 यांनी उत्‍पादीत केलेली निळया रंगाची वॉटर टँक रक्‍कम रु.2300/- खरेदी केली. तक्रारदार यांनी सदरील पाण्‍याची टाकी खरेदी केल्‍यानंतर सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना सदरील टाकीचे टिकाउपणाचे हमी कार्ड दिले. सदरील कार्ड सामनेवाले क्र.2 यांचेमार्फत देण्‍यात आले. सामनेवाले  यांनी तक्रारदार यांना टाकीमध्‍ये कोणताही दोष असल्‍यास सदरील टाकी खरेदी दिनांकापासून 12 वर्षात कधीही बदलून देण्‍याचे कबूल केले. सदरील टाकी तक्रारदार यांनी वापरण्‍यास सूरुवात केली. तक्रारदार यांनी आठ वर्ष कसलीही अडचण आली नाही. परंतु मार्च 2013 मध्‍ये टाकीस छोटे छोटे छिद्रे पडण्‍यास सूरुवात झाली व त्‍यातून पाणी गळती होण्‍यास सूरुवात झाली. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडे तक्रार दिली. सामनेवाले क्र. 1 यांनी टाकी बदलून देण्‍याचे आश्‍वासन दिले. तक्रारदारयांनी वारंवार सामनेवाले क्र.1 व 2 यांचेशी संपर्क  करुन टाकी बदलून देण्‍यास टाळाटाळ केली. तक्रारदार यांना दूस-या कंपनीची टाकी खरेदी करावी लागली. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना सदोष टाकी दिली. ती बदलून देण्‍यास टाळाटाळ केली. सामनेवाले  यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांनी सामनेवाले  यांचेकडून सदोष टाकीची किंमत दयावी, तक्रारदार  यांना झालेल्‍या मानसिक व शारीरिक त्रास व तक्रारीचा खर्च असे एकूण रु.14,300/- दयावेत अशी विनंती केली आहे.

 

            सामनेवाले क्र. 1 हे मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी नि.15 अन्‍वये लेखी म्‍हणणे दाखल केले. सामनेवाले क्र. 1 यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी त्‍यांचे दूकानातून तक्रारीत नमूद केलेली पाण्‍याची टाकी विकत घेतली. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी सदर टाकी खरेदी केल्‍यापासून 12 वर्षापर्यत बदलून देण्‍याची हमी घेतली नव्‍हती. सामनेवाले क्र. 1 हे त्रिधारा कंपनीच्‍या पाण्‍याचे टाकीचे प्रमूख विक्रेते आहेत. सामनेवाले क्र. 2 हे पाण्‍याचे टाकीचे उत्‍पादक आहेत. सदरील पाण्‍याची टाकीची गॅरंटी ही सामनेवाले क्र. 2 यांनी घेतली आहे. सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, सदरील पाण्‍याची टाकी विकत घेतल्‍यानंतर गॅरंटी देताना ग्राहकासाठी काही अटी घातलेल्‍या आहेत.  पाण्‍याची टाकीची ग्ँरटी कोणत्‍याही परिस्थितीमध्‍ये असेल यावर गॅरंटी कार्ड मध्‍ये अटी नमूद केल्‍या आहेत. सदरील अटी व शर्तीचे पालन केल्‍यासच तक्रारदार हे दाद मागण्‍यास पात्र आहेत. सामनेवाले क्र.2 यांनी गॅरंटी देताना खालील अटी स्‍पष्‍ट पणे नमूद केलेल्‍या आहेत.

 

  1. उत्‍पादनात दोष असल्‍यास, पाण्‍याच्‍या टाकीची दूरुस्‍ती किंवा बदलून देण्‍याची खात्री कंपनीने दिलेली आहे.
  2. दोषपुर्ण पाण्‍याची टाकी दूरुस्‍ती न करता, ग्राहकाने विक्रेत्‍याकडे जमा करणे आवश्‍यक आहे.
  3. गॅरंटी कार्ड आणि पाण्‍याची टाकी खरेदीची पावती ग्राहकाने तक्रारी बरोबर विक्रेत्‍याकडे सादरक केली पाहिजे.
  4. पाण्‍याची टाकी एका ठराविक जागेवर बसविलेली असेल तरच, सदर ग्राहक ग्ँरटीस पात्र राहतो. पाण्‍याची टाकी स्‍थलांतरीत केल्‍यास, तो गॅरंटीस पात्र राहत नाही.
  5. पाण्‍याची टाकी बसविणे बाबतची नियमावली गॅरंटी कार्डमध्‍ये दिली आहे. ज्‍यामध्‍ये पाण्‍याची टाकी अनुभवी प्‍लंबरकडून बसविणे आवश्‍यक आहे. टाकी स्‍थीर, अचल, सपाट व समतल पूष्‍ठभागावर बसविणे आवश्‍यक आहे. टाकी टोकदार किंवा धारदार घटकाच्‍या संपर्कात येऊ नये यांची दक्षता घेणे आवश्‍यक आहे. टाकी बसविलेचा फोटो विक्रेत्‍याकडे सादर करणे आावश्‍यक आहे. पांढरी टाकी (लॉफट टँक) असेल तर ती उन्‍हात बसविता कामा नये.

 

सामनेवाले क्र.1 यांनी पूढे असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी

आठ वर्ष पाण्‍याची टाकी वापरली आहे. आठ वर्षात त्‍यांनी कोणतीही तक्रार केली नाही. पाण्‍याच्‍या टाकीचे उत्‍पादकामध्‍ये दोष असेल तर त्‍यासंबंधी तक्रारदार यांनी तक्रार केली असती. तक्रारदार यांनी गॅरंटी कार्ड मध्‍ये दिलेल्‍या शर्ती व अटीचे पालन केले नाही. त्‍यामुळे पाण्‍याची टाकी दूरुस्‍त  करुन देण्‍याचा अथवा बदलून देण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही. तक्रारदार यांनी पाण्‍याच्‍या टाकीमध्‍ये  कोणता दोष आहे या बाबत  कोणताही पुरावा सादर केलेला नाही. सदर टाकीची गॅरेटी सामनेवाले क्र.2 यांनी दिेली आहे. त्‍यामुळे त्‍या बाबत सामनेवाले क्र.1 यांचेवर जबाबदारी येत नाही. सामनेवाले क्र.1 यांनी दयावयाच्‍या सेवेत कोणतीही त्रहूटी ठेवलेली नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद करण्‍यात यावी.

            सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर हजर झाले. त्‍यांनी नि.11 अन्‍वये लेखी म्‍हणणे सादर केले. सामनेवाले क्र. 2 यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी पाण्‍याचे टाकीचे व्‍यवस्‍थापक निट केले नाही. तक्रारदार हे स्‍वतः कसूरदार आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले  यांना कोणतीही लेखी सूचना दिली नाही. तसेच लेखी कळविल्‍या बाबत कोणताही पुरावा सादर केला नाही. सामनेवाले क्र. 2 हे चांगल्‍या प्रतिचा माल वापरुन पाण्‍याची टाकी तयार करतात. टाकी मध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा  उत्‍पादकीय दोष् नाही.  सूर्यप्रकाश सरळ पाण्‍याच्‍या टाकीवर येणार नाही यांची काळजी घ्‍यावी लागते. उन्‍हामध्‍ये पाण्‍याची टाकी ठेवता येत नाही. टाकी नेहमी पाण्‍याचे भरुन ठेवली पाहिजे. पाण्‍याची टाकी बसवण्‍यापूर्वी अनुभवी प्‍लंबर कडून ती व्‍यवस्‍थीत ठेवली पाहिजे. टाकी  बसवताना सपाट जागेचा वापर करावा लागतो. तक्रारदार यांनी सुचनाचे पालन केलेले नाही. तक्रारदार यांनी पाण्‍याच्‍या टाकीची तपासणी एफ.ओ.आर. यांचेकडून  तपासून घेणे  आवश्‍यक आहे. पाण्‍याच्‍या टाकीमध्‍ये कोणता दोष आहे यांची तपासणी अहवाल सादर केलेला नाही. तक्रारदार यांनी पाण्‍याची टाकी सूर्यप्रकाशात रिकामी ठेवल्‍यामुळे टाकीमध्‍ये छोटे छोटे छिद्र पडले आहे.  सदरील बाब ही उत्‍पादकीय दोष नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद करण्‍यात यावी.

            तक्रारदार यांचे वकील श्री.धांडे यांचा यूक्‍तीवाद ऐकला. सामनेवाले क्र.1 यांचे वकील श्री.जगताप यांचा  युक्‍तीवाद ऐकला. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत टाकी खरेदी केल्‍या बाबत पावती व वॉरंटी कार्ड हजर केले आहे. सामनेवाले क्र.1 यांनी स्‍वतःचे शपथपत्र दाखल केले. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

 

           मुददे                                                   उत्‍तर

1.     सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा सदोष पाण्‍याची टाकी विक्री

      करुन सेवेत त्रूटी ठेवली आहे हे तक्रारदार शाबीत करतात काय ?                नाही.

2.    तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत काय ?                   नाही.

3.    काय आदेश ?                                     अंतिम आदेशाप्रमाणे

                                    कारणमिंमासा

मुददा क्र.1 व 2ः-

 

            तक्रारदार  यांचे वकील श्री.धांडे यांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी पाण्‍याची टाकी ठेवताना सामनेवाले यांनी नमूद केलेल्‍या बाबीचे काटेकोरपणे अवलंब केला. पाण्‍याची टाकी योग्‍य प्रकारे ठेवण्‍यात आली होती. तक्रारदार यांनी सदरील टाकी सात ते आठ वर्ष पाणी व्‍यवस्‍थीत वापरले. सदरील टाकीला उत्‍पादकीय दोषामुळे छिद्रे पडली. पाणी गळू लागले. सदरील टाकीची गॅरंटी 12 वर्षाची होती. 12 वर्षामध्‍ये टाकीत दोष आढळल्‍यास ती बदलून देण्‍याची हमी सामनेवाले यांनी घेतली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे टाकी बदलून देण्‍या बाबत वेळोवेळी मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी टाकी बदलून देण्‍यास नकार दिला. तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रास झाला व सदरील तक्रार दाखल करावी लागली. सबब, तक्रारदार यांना तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई देण्‍याचा आदेश व्‍हावा.

 

            सामनेवाले क्र.1 यांचे वकील श्री.जगताप यांनी असा यूक्‍तीवाद केला की,तक्रारदार यांनी सदरील पाण्‍याची टाकी सात ते आठ वर्ष वापरली. तक्रारदारयांनी सदरील टाकी बसवताना वॉरंटी कार्ड मध्‍ये नमूद केलेल्‍या अटीनुसार बसवलेली नाही. तक्रारदार यांनी टाकी बसवल्‍या बाबतचे फोटो सामनेवाले यांना देणे आावश्‍यक होते. तो फोटो दिलेला नाही. तक्रारदार यांनी या मंचासमोर सदरील टाकी हजर केली नाही. सदरील टाकीत उत्‍पादकीय दोष असल्‍या बाबत शास्‍त्रीय प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल या मंचासमोर नाही. तक्रारदार यांनी चूकीच्‍या पध्‍दतीने टाकीत बसवल्‍यामुळे व नमूद केलेल्‍या शर्ती व अटीचे पालन न केल्‍यामुळे टाकीत छिद्रे पडले आहेत. प्रत्‍यक्ष अशी छिद्रे पडले आहेत किंवा काय या बाबत या मंचासमोर कोणताही पुरावा नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना कधीही लेखी कळविले नाही. तसा कोणताही पुरावा या मंचासमोर हजर नाही. सबब, सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली नाही. तक्रारदार यांची तक्रार रदद होण्‍यास पात्र आहे.

 

            सामनेवाले क्र.2 यांचे कथन की, सदरील टाकी मध्‍ये कोणताही उत्‍पादकीय दोश नाही. तक्रारदार यांनी पाण्‍याची टाकीची जी काळजी घ्‍यावयास पाहिजे होती ती घेतली नाही. पाण्‍याची टाकी रिकामी उन्‍हामध्‍ये जास्‍त वेळ ठेवण्‍यात येऊन नये. पाण्‍याची टाकी सपाट जागेवर बसवावी अशा प्रकारच्‍या सूचना दिलेल्‍या  आहेत.  तक्रारदार यांनी त्‍या सुचनाचे पालन केलेले नाही. तसेच तक्रारदार यांनी पाण्‍याची टाकी एफ.ओ.आर. या आधारावर तपासून घेणे आवश्‍यक आहे. ती टाकी तपासून घेतली नाही. तयामुळे टाकीमध्‍ये उत्‍पादकीय दोष आहे किंवा काय हे सिध्‍द होऊ शकत नाही.

 

            तक्रारदार व सामनेवाले यांनी केलेल्‍या यूक्‍तीवाद व पुराव्‍याचे शपथपत्र, दस्‍त यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचे दूकानातून सामनेवाले क्र.2 यांनी उत्‍पादित केलेले पाण्‍याची टाकी विकत घेतली आहे या बाबत वाद नाही. तक्रारदार यांनी ती पाण्‍याची टाकी आठ वर्षापेक्षा जास्‍त कालावधीत वापरली या बाबत ही वाद नाही. तक्रारदार यांचे म्‍हणण्‍यानुसार पाण्‍याच्‍या टाकीस छिद्रे पडून गळती होण्‍यास सूरुवात झाली. सदरील टाकीस कोणत्‍याठिकाणी छिद्रे पडली व गळती सूरु झाली या बाबत स्‍पष्‍ट उल्‍लेख नाही. तक्रारदार यांनी सदरील टाकी विकत घेताना सामनेवाले यांनी वॉरंटी व गॅरंटी दिलेली आहे. टाकी बसवताना काही बाबीचा अवलंब करायचा त्‍या बाबत तक्रारदार  यांनी अवलंब केलेला आहे किंवा नाही हे पाहणे गरजेचे आहे. सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या  गॅरंटी कार्ड यांचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये स्‍पष्‍टपणे नमूद केलेले आहे की, जर टाकीचा उत्‍पादकीय दोष असेल तर ग्राहकाने गॅरंटी कार्डासह खरेदी केल्‍याची पावती व टाकी हजर करणे गरजेचे आहे. तसेच तक्रारदार यांनी ज्‍याठिकाणी टाकी बसवलेली आहे त्‍यांचे फोटोही हजर करणे गरजेचे आहे. सदरील वॉरंटी कार्डमध्‍ये वॉरंटी ही फक्‍त दूरुस्‍त करणे व दोषयूक्‍त टँक असल्‍यास लागू होईल.  तसेच वॉरंटी कार्ड मध्‍ये पाण्‍याच्‍या टाकीचे संरक्षण्‍   सूर्यापासून करायचे तसेच टाकीचा कोणताही भाग धारयूक्‍त, टोकदार वस्‍तूच्‍या संपर्कात येणार नाही यांची काळजी घ्‍यावी. तसेच पाण्‍याची टाकी ही बसवताना पृष्‍ठभागावर बसवावी हया बाबत नमूद केलेले आहेत. तक्रारदार यांनी कोणत्‍या ठिकाणी टाकी बसवली त्‍या जागेची काय परिस्थिती होती या बाबत या मंचासमोर कोणताही पुरावा दिेलेला नाही अगर फोटो हजर केलेले नाहीत.  तसेच तक्रारदार यांनी सदरील पाण्‍याच्‍या टाकीतून पाण्‍याची गळती सूरु झाल्‍यानंतर सदरील टाकी वॉरंटी कार्डसह सामनेवाले यांना दाखवलेली नाही. तसेच कोणत्‍या प्रकारचे लेखी सामनेवाले यांना कळविले नाही. तक्रारदार  यांनी सदरील टाकीस छिद्र कोणत्‍या कारणामुळे पडले या बाबत तपासणी अहवालही सादर केलेला नाही. केवळ टाकीस छोटे छोटे छिद्रे पडले व पाण्‍याची गळती झाली या कारणास्‍तव सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे असा निष्‍कर्ष काढता येणार नाही. ज्‍याठिकाणी टाकी ठेवली आहे त्‍या जागी वाळू अगर दगडाचे कण असल्‍यास व टाकीमध्‍ये पाणी भरलेले असल्‍यास त्‍यामुळे छिद्र पडण्‍याची शक्‍यता आहे. पाण्‍याच्‍या टाकीचा बचाव करण्‍यासाठी सूर्यप्रकाशासाठी कोणती काळजी घेतली  या बाबत तक्रारदार यांनी कोणताही पुरावा सादर केलेला नाही.  त्‍यामुळे सदरील टाकीमध्‍ये उत्‍पादकीय दोष होता असा निष्‍कर्ष काढता येणार नाही.

 

            वर नमूद केलेल्‍या कारणमिमासेवरुन व संपूर्ण पुराव्‍यावरुन या मंचाचे मत की, तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब शाबी केलेली नाही. तसेच सदरील वॉरंटीमध्‍ये दिलेल्‍या अटीचे पालन करुन तक्रारदार यांनी पाण्‍याची टाकीची काळजी घेतली होती ही बाब ही शाबीत केलेली नाही. तसेच सदरील टाकी मध्‍ये उत्‍पादकीय दोष असलया बाबत योग्‍य तो प्रयोगशाळेचा अहवाल सादर केलेला नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार रदद होण्‍यास पात्र आहे.

 

            मुददा क्र..1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देत आहोत.

            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

                            आदेश

 

            1)  तक्रारदाराची  तक्रार  नामंजूर  करण्‍यात  येत  आहे.          

2)

            3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम

               20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत

               करावेत.  

 

 

 

     श्री.रविंद्र राठोडकर        श्रीमती मंजूषा चितलांगे       श्री.विनायक लोंढे,

          सदस्‍य                 सदस्‍या                   अध्‍यक्ष

                    जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 

 

 

 

 

जयंत पारवेकर

लघुलेखक 

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MANJUSHA CHITALANGE]
MEMBER
 
[HON'BLE MR. R.S.Rathodkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.