Maharashtra

Thane

CC/11/424

श्रीमती मुक्‍ता श्रीवास्‍तवा - Complainant(s)

Versus

प्रा. रियल बॅग सेंन्‍टर - Opp.Party(s)

अभिषेक खैरे

08 Oct 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/11/424
 
1. श्रीमती मुक्‍ता श्रीवास्‍तवा
604, Saptagiri, Cosmos Hills, Opp.Upvan Lake, pokhran Road No.1, Thane(w).
...........Complainant(s)
Versus
1. प्रा. रियल बॅग सेंन्‍टर
Shop No.1, Near Gaondevi, Temple Corner, Thane(w)-400601.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 न्‍यायनिर्णय   

               (द्वारा सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे- मा. सदस्‍या)

 

  1.              तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे त्‍यांची जुन्‍या बॅगची चेन बदलून देण्‍याकरीता तसेच जुन्‍या बॅगच्‍या डिझाईनसारखी लेदरची नविन बॅग तयार करण्‍याबाबत ऑर्डर दिली. तक्रारदारांनी याकरीता रक्‍कम रु. 1,000/- अॅडव्‍हान्‍स सामनेवाले यांना दि. 02/08/2010 रोजी दिले. तक्रारदारांनी जुनी व नविन बॅगकरीता अनेकवेळा गैरअर्जदार यांचेकडे चौकशी केली परंतु दोन्‍ही बॅग मिळाल्‍या नाहीत. तक्रारदारांचे पती दि. 10/10/2010 रोजी बाहेरगांवी जाणार होते. त्‍यांना सदर बॅगची अत्‍यंत आवश्‍यकता असूनही सामनेवाले यांनी दोन्‍ही बॅग दिल्‍या नाहीत. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे अखेर दि. 23/11/2010 रोजी लेखी पत्राद्वारे जुनी बॅग तसेच अॅडव्‍हान्‍स रक्‍कम रु. 1,000/- देण्‍याबाबत मागणी केली. परंतु सदरचे पत्र “Not claimed” या शे-यासह परत आले.

  2. सामनेवाले यांना पाठविलेली नोटीस “Not claimed” या शे-यासह परत आली असून तक्रारदारानी दैनिक वृत्‍तपत्रातील नोटीसद्वारे सामनेवाले यांना तक्रारीच्‍या नोटीसची बजावणी केली आहे. सामनेवाले यांचेविरुध्‍द दैनिक वृत्‍तपत्रात नोटीस देऊनही ते न्‍यायमंचात हजर झाले नाही अथवा त्‍यांचेतर्फे लेखी म्‍हणणे दाखल केले नाही. त्‍यामुळे दि. 08/10/2011 रोजी सामनेवाले यांच्‍या लेखी म्‍हणण्‍याशिवाय तक्रार पुढे चालवून गुणवत्‍तेवर निकाली करण्‍यातबाबत न्‍यायमंचाने आदेश पारीत केला.

  3. तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. असता खालीलप्रमाणे बाबी स्‍पष्‍ट होतात

  4. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे रक्‍कम रु. 1,000/- दिल्‍याचे दि. 02/08/2010 रोजीच्‍या पावतीवरुन दिसून येते.

  5. ब. तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे. सामनेवाले यांचेतर्फे कोणताही आक्षेप दाखल नाही.

क. तक्रारदारांनी सामनेवाले यांना रक्‍कम रु. 1,000/- दिल्‍याचे पावतीवरुन स्‍पष्‍ट होत असल्‍यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांना रक्‍कम रु. 1,000/- दि. 02/08/2100 पासून 9% व्‍याजदराने देणे न्‍यायोचित होईल असे न्‍यायमंचाचे मत आहे.

ड.   तक्रारदारांना रक्‍कम रु. 1,000/- अॅडव्‍हान्‍स घेऊनही नविन व जुनी बॅग न दिल्‍यामुळे निश्चितच मानसिक त्रास झाला व सदरची तक्रार दाखल करावी लागली. त्‍यामुळे मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळून रक्‍कम रु.5,000/- सामनेवाले यांनी देणे उचित होईल असे मंचाचे मत आहे.

         सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

 

            आ दे श

  1. तक्रार क्र. 424/2011 मंजूर करण्‍यात येते.

  2. सामनेवाले यांनी नविन बॅग तयार करण्‍यासाठी रु. 1,000/- घेऊनही बॅग दिली नाही. तसेच जुनी बॅग दुरुस्‍तकरुन दिली नाही. सामनेवाले यांची सदरची कृती सेवेमध्‍ये त्रुटी असल्‍याचे जाहिर करण्‍यात येते.

  3. सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की त्‍यांनी तक्रारदारांना रक्‍कम रु. 1,000/- दि. 02/08/2010 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत 9% व्‍याजदराने दयावी.

  4. सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की त्‍यांनी तक्रारदारांना मानसिक त्रास व तक्रारीचे खर्चापोटी रक्‍कम रु. 5,000/- दि. 16/11/2015 पर्यंत दयावी. विहीत मुदतीस रक्‍कम न दिल्‍यास दि. 17/11/2015 पासून 9% व्‍याजदराने दयावी.

  5. सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की तक्रारदारांना त्‍यांची जुनी बॅग दुरुस्‍त करुन दि.16/11/2015 पर्यंत दयावी.

  6. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्‍य पोष्‍टाने पाठविण्‍यात   याव्‍यात.

  7. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.