जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 182/2020. आदेश दिनांक : 11/07/2022.
मुकरम पिता उमराव पठाण, वय 35 वर्षे,
रा. चिंचोलीराव, पो. गंगापूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) प्रादेशिक व्यवस्थापक, हिंदुजा लिलँड फायनान्स लि.,
कॉर्पोरेट ऑफीस नं. 27-ए, डेव्हलप्ड् इंडस्ट्रीयल इस्टेट,
गिंडी, चेन्नई - 600 032.
(2) विभागीय व्यवस्थापक, हिंदुजा लिलँड फायनान्स लि.,
शिवाजी चौक, लातूर, ता. जि. लातूर.
(3) प्रादेशिक अधिकारी, आर.टी.ओ. ऑफीस, लातूर, ता. जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- आर.जी. जाधव
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी सेवेमध्ये त्रुटी केल्यामुळे अनुतोष मिळण्यासाठी तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रार नोंद करुन दाखल करण्यात घेण्यात आली आणि ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्यात आले. वेळोवेळी संधी देऊनही तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणी होण्याकरिता पूर्तता केलेली नाही. तक्रारकर्ता व त्यांचे विधिज्ञ सातत्याने अनुपस्थित राहिले. नैसर्गिक न्याय-तत्वानुसार विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणे आवश्यक आहे. उचित संधी देऊनही विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणी करण्याची पूर्तता न केल्यामुळे तक्रारकर्ता यांना ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने स्वारस्य दिसून येत नाही. ग्राहक तक्रारींचे कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. उक्त अनुषंगाने तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-