Maharashtra

Thane

CC/365/2012

श्री.ज्ञानेश्‍वर रामचंद्र वाघुले - Complainant(s)

Versus

प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय - Opp.Party(s)

14 Dec 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/365/2012
 
1. श्री.ज्ञानेश्‍वर रामचंद्र वाघुले
श्रीपती सदन, दुसरा मजला, रहेजा गार्डन समोर, एव्‍हरी कंपनी मागे, त्रिमुर्ती लेन, ठाणे-400604.
...........Complainant(s)
Versus
1. प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय
मध्‍यवर्ती कारागृहाजवळ, ठाणे.
2. सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी (खाजगी वाहन), व्‍दारा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय
मध्‍यवर्ती कारागृहाजवळ, ठाणे.
3. वरिष्‍ठ लिपिक (खाजगी वाहन), व्‍दारा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय
मध्‍यवर्ती कारागृहाजवळ, ठाणे.
4. कनिष्‍ठ लिपिक (खाजगी वाहन), व्‍दारा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय
मध्‍यवर्ती कारागृहाजवळ, ठाणे.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 14 Dec 2015

(द्वारा मा. अध्‍यक्षा सौ. स्‍नेहा एस. म्‍हात्रे)

 

मा. सदस्‍य रजेवर.

तक्रारदार दोन वेळा पुकारले असता गैरहजर.

प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदारांनी  तक्रार दाखल करणेकामी हजर राहणेबाबत मंचाकडून नोटीस पाठविण्‍यात आली. त्‍यानंतर दि. 05/03/2014 रोजी तक्रारदारांचा युक्‍तीवाद ऐकून तक्रार दाखल करुन घेणेत आली. परंतु त्‍यानंतर तक्रारदार पुन्‍हा दि. 23/03/2015, दि. 10/08/2015 व आज दि. 14/12/2015 रोजी सुनावणीसाठी सातत्‍याने गैरहजर आहेत. तसेच त्‍यांनी सामनेवाले यांचेवर नोटीस बजावणीकामी कार्यवाही करण्‍यासाठी संधी देऊनही अदयापपर्यंत त्‍याबाबत काहीही कार्यवाही केलेली नाही.

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.