Dated the 06 Apr 2015
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.माधुरी विश्वरुपे...................मा.सदस्या.
1. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून ता.12.12.2009 रोजीच्या करारानुसार मौ.वैशाखरे, ता.मुरबाड जिल्हा-ठाणे येथील मिळकतीतील प्लॉट नं.315, नॅशनल हायवे नं.22 च्या समांतर रोडचा रक्कम रु.12,14,179/- एवढया किंमतीचा विकत घेण्याचे ठरले. तक्रारदारांनी करारातील अटी व शर्तीनुसार जानेवारी-2012 पर्यंत प्लॉटची संपुर्ण किंमत अदा करुनही सामनेवाले यांनी प्लॉटचे Allotment केले नाही. तक्रारदारांनी प्लॉटची रक्कम सामनेवाले यांचेकडे चेकव्दारे भरणा केली व सामनेवाले यांनी तक्रारदारांना चेक मिळाल्याबाबतच्या पावत्या दिल्या आहेत. तक्रारदारांनी सामनेवाले यांना ता.14.03.2012 रोजी कायदेशीर नोटीस पाठवुन Allotment देण्याबाबत मागणी केली. सामनेवाले यांनी नोटीसचे उत्तर दिले नाही अथवा करारानुसार प्लॉटचे Allotment दिले नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
2. सामनेवाले यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही गैरहजर, तसेच लेखी म्हणणे दाखल नाही. त्यामुळे प्रस्तुत प्रकरण सामनेवाले यांचे विरुध्द एकतर्फा चालविण्यात आले.
3. तक्रारदारांची तक्रार दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच तोंडी युक्तीवाद ऐकला. यावरुन खालील बाबी स्पष्ट होतात.
अ. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये ता.12.12.2009 रोजी झालेल्या करारानुसार तक्रारदारांनी मौ.वैशाखरे ता.मुरबाड जिल्हा-ठाणे येथील प्लॉट नं.315 रक्कम रु.12,14,179/- एवढया किंमतीचा घेण्याचे ठरले.
ब. सामनेवाले यांना करारापर्यंत रु.7,18,500/- एवढी प्लॉट क्रमांक-315 च्या किंमतीपोटी तक्रारदारांकडून प्राप्त झालेली असुन उर्वरीत रक्कम रु.4,64,179/- हप्त्याने रु.19,340/- प्रमाणे 24 महिन्यात परतफेड करावयाचे ठरले होते, तसेच तीन महिन्याचे हप्ते थकबाकी राहिल्यास करार रद्द होऊन प्राप्त झालेल्या प्लॉटच्या रकमेपैंकी 25 टक्के रक्कम कपात करुन तक्रारदारांना दयावयाचे, करारानुसार उभयपक्षांनी मान्य व कबुल केले होते.
क. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी सामनेवाले यांना एकूण-20 चेक्स व्दारे ता.12.12.2009 रोजीच्या करारानुसार रक्कम अदा केली. तक्रारदारांनी 20 चेक्स सामनेवाले यांना दिल्याबाबतच्या पावत्या मंचात दाखल आहेत. शेवटचा हप्ता तक्रारदारांनी सामनेवाले यांना ता.30.12.2011 रोजी रु.38,680/- चेकव्दारे दिल्याचे पावतीवरुन दिसुन येते.
ड. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार वरील 20 चेक्सव्दारे सामनेवाले यांना प्लॉटची पुर्ण रक्कम अदा करुनही खरेदीखत करुन दिले नाही व प्लॉटचा ताबा दिला नाही. तक्रारदारांनी सामनेवाले यांना चेकव्दारे रक्कम दिल्याबाबत पावत्या मंचात दाखल आहे. सामनेवाले सदर प्रकरणात गैरहजर आहेत. अशा परिस्थितीत तक्रारदारांचे म्हणणे ग्राहय धरणे योग्य आहे असे मंचाचे मत आहे.
इ. तक्रारदारांचा पुरावा अबाधित असल्यामुळे ता.12.12.2009 रोजीच्या तक्रारदार व सामनेवाले यांचे करारानुसार मौजे.वैशाखरे, ता.मुरबाड जिल्हा-ठाणे येथील प्लॉट नं.315 चे खरेदीखत सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या हक्कात करुन प्लॉटचा ताबा देणे न्यायोचित आहे असे मंचाचे मत आहे.
4. तक्रारदारांनी करारानुसार सामनेवाले यांना रक्कम अदा करुनही प्लॉट क्रमांक-315 चे Allotment केले नाही. सामनेवाले यांची सदरची कृती सेवेतील कसुर आहे.
5. सामनेवाले यांनी करारानुसार विहीत मुदतीत तक्रारदारांना प्लॉट नं.315 चे Allotment न केल्यामुळे निश्चितच मानसिक त्रास झाला. प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागली. सबब सामनेवाले यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासा करीता रक्कम रु.5,000/-, तक्रारीचा खर्च रु.5,000/- देणे योग्य आहे असे मंचाचे मत आहे.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-37/2013 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. तक्रारदारांनी करारानुसार प्लॉटची संपुर्ण रक्कम अदा करुनही प्लॉटचे Allotment व ताबा न
देऊन सामनेवाले यांनी त्रुटीची सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येते की, आदेश मिळाल्यापासुन 45 दिवसात म्हणजेच
ता.22.05.2015 पर्यंत मौ.वैशाखरे, ता.मुरबाड जिल्हा-ठाणे येथील प्लॉट नं.315, चे
खरेदीखत तक्रारदारांचे हक्कात करुन कायदेशीर ताबा दयावा तसे न केल्यास
ता.23.05.2015 पासुन रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) प्रत्येक महिन्या करीता
दयावेत.
4. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम
रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार), तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (अक्षरी
रुपये पाच हजार) आदेश मिळाल्यापासुन 45 दिवसात म्हणजेच ता.22.05.2015
पर्यंत द्याव्यात.
5. वरील आदेश क्रमांक-4 मधील रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास ता.23.05.2015
पासुन संपुर्ण रक्कम अदा होईपर्यंत सामनेवाले हे सदर रकमांवर दरसाल दर शेकडा 9
टक्के व्याज देण्यास पात्र राहतील.
6. आदेशाची पुर्ती केल्याबद्दल / न केल्याबद्दल उभयपक्षांनी ता.23.05.2015 रोजी शपथपत्र
मंचामध्ये दाखल करावे.
7. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
ता.06.04.2015
जरवा/