Maharashtra

Nanded

CC/14/138

महानंदा रमाकांत सोनावळे - Complainant(s)

Versus

न्यु इंडीया इंशुरंस कं. लि. - Opp.Party(s)

अँड. अ. व्ही. चौधरी

25 Feb 2015

ORDER

District consumer Disputes Redressal Forum
Nanded
Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
 
Complaint Case No. CC/14/138
 
1. महानंदा रमाकांत सोनावळे
नांदेड लोहा रोड, नांदेड
नांदेड
महाराष्ट्र
...........Complainant(s)
Versus
1. न्यु इंडीया इंशुरंस कं. लि.
लाहोटी कॉम्प्लेक्स, प्रभात टॉकिज जवळ, वजिराबाद, नांदेड
नांदेड
महाराष्ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smita B.Kulkarni PRESIDENT
 HON'ABLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्‍यक्ष)

 

1.           अर्जदार यांनी  गैरअर्जदार यांचेविरुध्‍द सेवेत त्रुटीच्‍या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.

            अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्‍यात खालील प्रमाणेः-

2.          अर्जदार ही वनभुजवाडी,तालुका पालम,  जिल्‍हा परभणी येथील रहिवासी असून शेती करुन आपला उदर्निवाह करते.  अर्जदाराचे पती नामे रमाकांत किशोरराव सोनावळे यांचा मृत्‍यु दिनांक 02.12.2005 रोजी वाहन अपघातामध्‍ये झालेला आहे. घटनेची माहिती पोलीस स्‍टेशन लोहा यांना दिल्‍यानंतर पोलीसांनी तपास करुन एफ.आय.आर. क्र. 102/2005 नुसार गुन्‍हा नोंदविला. अर्जदाराचे मयत पती रमाकांत व इतर लोक दिनांक 02.12.2005 रोजी वाहन क्रमांक एमएच 26/के- 1971 या †òपे रिक्षामधून जात असतांना समोरुन येणा-या टेम्‍पो क्रमांक एमएच 26/एच 1562 ने ऑटो रिक्षाला जोराची धडक दिल्‍याने रिक्षा पलटी होऊन अर्जदाराचे पतीचे निधन झाले.  वाहन क्रमांक एमएच 26/के- 1971 या वाहनाची इंशुरन्‍स पॉलिसी क्रमांक 685104 अंतर्गत गैरअर्जदार यांचेकडे काढलेली होती. तीचा कालावधी दिनांक 30.06.2005 ते दिनांक 29.06.2006 पर्यंत होता. पॉलिसीमध्‍येः-

      1)    Basic third party liability.

            2)         P.A. Cover for unnamed Passengers of Rs.1,00,000/-

                        Unnamed Passengers:-  any person including the insured:- Provided that a person driving and effective driving licence at the time of the accident and is not disqualified from holding and obtaining such as licence.  Provided that the person holding and effective learners may also drive a vehicle that such a person satisfying requirements of rule no.3 of the Central Motor Vehicle Rules,1989.

            ह्या बाबी नमुद आहेत.  त्‍यानुसार अर्जदाराने दिनांक 01.11.2012 रोजी गैरअर्जदार यांना वकीलामार्फत विमा दाव्‍याच्‍या अनुषंगाने आवश्‍यक त्‍या सर्व कागदपत्रे पाठविली.  गैरअर्जदार यांनी दिनांक 05.11.2012 रोजी अर्जदाराचा विमा दावा नामंजूर केलेला आहे.  कारण अर्जदाराने आपला विमा दावा उशीराने दाखल  केलेला असल्‍याने आर.सी.बुक, क्‍लेम फॉर्म व पोलीस पेपर्स साक्षांकीत नसल्‍यामुळे विमा दावा नामंजूर केलेला असल्‍याचे कारण दिलेले आहे.  गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा चुकीच्‍या पध्‍दतीने नाकारलेला आहे.  कारण अपघात घडल्‍यानंतर सन 2005 मध्‍ये मोटार अपघात विमा प्रकरण सत्र न्‍यायालयाने परभणी येथे संबंधीत दावा दाखल केलेला होता.  त्‍यामुळे गैरअर्जदार यांना त्‍यावेळेसच सदरील विमा दाव्‍याची माहिती देण्‍यात आली होती.  तसेच अर्जदाराला व्‍यक्‍तीगत अपघात विम्‍याची माहिती नसल्‍यामुळे अर्जदाराने आपल्‍या वकीलामार्फत व्‍यक्‍तीगत अपघात विम्‍याची  कागदपत्रे  तसेच विलंब माफीचा अर्जासह गैरअर्जदार यांचेकडे पाठविली होती.  त्‍यामुळे अर्जदाराला तक्रार दाखल करणेचे कारण घडलेले आहे.  गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा चुकीच्‍या पध्‍दतीने नामंजूर केलेला आहे. त्‍यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास विमा रक्‍कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 व्‍याजासह द्यावे.  तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.5,000/- व दावा खर्च रु.2,000/- देण्‍याचे आदेश व्‍हावे अशी विनंती अर्जदार यांनी तक्रारीव्‍दारे केलेली आहे.

3.          गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्‍यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र  दाखल केलेले आहे.

            गैरअर्जदार  यांचा लेखी जबाब थोडक्‍यात पुढील प्रमाणेः-

4.          अर्जदाराचा अर्ज पॉलिसीच्‍या अटी व शर्तीच्‍या विरुध्‍द व विसंगत आहे. अर्जदाराचा तक्रार अर्ज मुदतीत नाही. अर्जदाराने तक्रारीमध्‍ये मोटार अपघात न्‍यायीक प्राधिकरण,परभणी यांचे न्‍यायालयात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता व तो निकाली काढण्‍यात आला आहे असे नमूद केलेले आहे. परंतु दाव्‍यातील आदेशाप्रमाणे रक्‍कम मिळाली किंवा नाही यासंबंधीचा खुलासा केलेला नाही.  अर्जदारास एकाच घटनेसंबंधी गैरअर्जदार विरुध्‍द दोन न्‍यायालयात नुकसान भरपाई मागणेसाठी दावा करता येणार नाही.  अपघाताची घटना दिनांक 02.12.2005 रोजी घडली.  सदरील घटनेसंबंधी सुचना दिनांक 01.11.2012 रोजी  गैरअर्जदारास देण्‍यात आली.  सदरील सुचना देणेसाठी 7 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे.  ऑटो रिक्षा क्रमांक एमएच 26/के- 1971 चा विमा गैरअर्जदाराने उतरविलेला आहे ही बाब मान्‍य आहे. अर्जदाराने दिनांक 01.11.2012 रोजी  विमा दाव्‍याच्‍या संदर्भात कागदपत्रे गैरअर्जदार यांचे कार्यालयात पाठविल्‍यानंतर पुर्ण कागदपत्रांची पडताळणी केली असता असे दिसून आले की, अर्जदाराने 7 वर्षानंतर गैरअर्जदारास कथीत अपघातासंबंधी माहिती दिली.  जो †òबनॉर्मल डिले आहे.  त्‍यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराची दावा फाईल बंद केलेली आहे. अर्जदाराचा अर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा अशी विनंती आपल्‍या लेखी जबाबाव्‍दारे केलेली आहे.

5.          अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्‍याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत.  दोन्‍ही बाजूंचा युक्‍तीवाद ऐकला.  दोन्‍ही बाजूंनी दाखल  केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्‍टी स्‍पष्‍ट होतात. 

6.          अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या एफ.आय.आर.वरुन अर्जदाराचे पती यांचा मृत्‍यु हा दिनांक 02.12.2005 रोजी वाहन अपघातात झालेला असल्‍याचे दिसून येते.  अर्जदाराचे मयत पती हे वाहन क्रमांक एमएच 26/के- 1971 या रिक्षामधून जात असतांना सदरील अपघात घडलेला आहे. ऑटो रिक्षा क्रमांक एमएच 26/के- 1971 च्‍या मालकाने सदरील वाहनाचा विमा गैरअर्जदार यांचेकडे काढलेला होता.  त्‍या पॉलिसीची कव्‍हरनोट अर्जदाराने तक्रारीसोबत दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी पॉलिसी काढली असल्‍याचे लेखी जबाबामध्‍ये मान्‍य केलेले आहे.  अर्जदार यांचे म्‍हणणेनुसार सदरील रिक्षाचे पॉलिसीमध्‍ये P.A. Cover for unnamed Passengers of Rs.1,00,000/- अंतर्भूत आहे.  त्‍यानुसार अर्जदाराने पतीच्‍या मृत्‍यु नंतर अर्जदारास पॉलिसीची माहिती मिळाल्‍यानंतर गैरअर्जदार यांचेकडे दिनांक 05.11.2012 रोजीच्‍या पत्रानुसार अर्जदाराचा दावा उशीराने माहिती दिली या कारणावरुन नामंजूर केलेला आहे.  वास्‍तविक पाहता अर्जदारास दावा दाखल करणेस उशीर झालेला आहे. परंतु ऑटो चालकाच्‍या मालकाने वाहनाची पॉलिसी असल्‍यासंबंधीची माहिती अर्जदारास त्‍वरीत देऊन अर्जदाराचे पतीचे मृत्‍यु पश्‍चात अर्जदारास विमा रक्‍कम मिळणेसाठी मदत करणे अपेक्षीत होते.  वाहन मालकाने तसे न केल्‍यामुळे अर्जदारास विमा दावा दाखल करणेस उशीर झाल्‍याची शक्‍यता आहे.  त्‍यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास दावा उशीराने दाखल केला या कारणाने बंद केलेला आहे. ही बाब चुकीची असल्‍याचे मंचाचे मत आहे.  वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.

                       आ दे श

 

1.     अर्जदार यांची  तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.    अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे 30 दिवसाच्‍या आंत विमा दावा व त्‍यासंबंधीची कागदपत्रे दाखल करावी व गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे विमा प्रस्‍तावावरन 15 दिवसाच्‍या आत गुणवत्‍तेवर निर्णय घ्‍यावा.

3.    खर्चाबाबत आदेश नाही.

4.    दोन्‍ही पक्षकारास निकालाच्‍या प्रती मोफत पुरविण्‍यात याव्‍यात. 

5.    वरील आदेशाच्‍या  पुर्ततेचा अहवाल दोन्‍ही पक्षकारांनी निकालाच्‍या तारखेपासून  45 दिवसांच्‍या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर   आदेशाच्‍या पुर्ततेसाठी ठेवण्‍यात यावे. 

 
 
[HON'BLE MRS. Smita B.Kulkarni]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.