Maharashtra

Additional DCF, Nagpur

RBT/CC/13/41

नरेंद्र गुलाबराव बारई - Complainant(s)

Versus

न्यु इंडिया एशुरंस कंपनी लि. - Opp.Party(s)

रमेश नारई

05 Jan 2016

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. RBT/CC/13/41
 
1. नरेंद्र गुलाबराव बारई
रा. प्‍लॉट क्र. 4, रामेश्‍वर नगर, हनुमान मंदीराजवळ, नागपूर
...........Complainant(s)
Versus
1. न्यु इंडिया एशुरंस कंपनी लि.
तर्फे विभागिय व्‍यवस्‍थापक, विभागीय कार्यालय क्र. 160301, राजकमल कमर्शियल कॉम्‍प्‍लेक्‍स, दुसरा माळा, पंचशिल चौक, वर्धा रोड, धंतोली, नागपूर 440012
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
For the Complainant:रमेश नारई , Advocate
For the Opp. Party:
ORDER

      ( आदेश पारित व्दारा -श्री नितीन घरडेमा.सदस्य )

    - आदेश -

(पारित दिनांक05 जानेवारी 16)

 

  1. तक्रारकर्त्याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 खाली दाखल केली असुन तक्रारीचे स्वरुप असे आहे की,तक्रारकर्त्याने आपली उपजिवीका भागविण्‍याकरिता टाटा एस मॅजिक क्रं. एम एस -21-सीबी-8966 विकत घेतली व नियमितपणे वाहनाचा विमा/अपघाती विमा उतरविला.ज्याचा क्रं.1603013111010000850 असा आहे व विमा कालावधी 18/06/2011 ते 17/06/2012 पर्यत होता. सदरचा विमा हा विरुध्‍द पक्षाकडुन घेतलेला होता.तसेच विरुध्‍द पक्ष हा तक्रारकर्त्याचा ग्राहक आहे व विमा उतरविला असल्याने एक अटी व शर्तीची एक प्रत  तक्रारकर्त्यास पुरविली. सदरच्या वाहनाचा दिनांक 21/11/2011 रोजी भोले पेट्रोल पंप चौक अमरावती रोड, नागपूर येथे 9.45 च्या सुमारास अपघात झाला व अपघाताच्या वेळी तक्रारकर्त्याचा वाहन चालक राधेशाम शिवाजी पाटील वाहन चालवित होता. अपघाता नंतर दिनांक 22/11/2011 ला लगेच विरुध्‍द पक्षाला अपघाताची माहिती दिली. तसेच वाहनाची नुकसान भरपाई दाव्याकरिता लागणारे संपूर्ण आवश्‍यक दस्‍तवेज विरुध्‍द पक्षाकडे सादर केले व विरुध्‍द पक्ष यांनी वचन दिल्याप्रमाणे सदर अपघातग्रस्त वाहन दुरुस्‍तीकरिता जायका मोटर्स लि.भंडारा रोड, आसोली, नागपूर येथे पाठविण्‍यात आले.वाहनाचे दुरुस्ती खर्च रुपये 74,154/-आला ही दुरुस्‍ती खर्चाची रक्कम तक्रारकर्त्याने नगदी स्वरुपात अदा केली व वाहनाच्या दुरुस्‍तीचे देयक सत्यप्रतीमधे खर्चाची रक्कम परत मिळण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाकडे सादर केले.
  2. परंतु नियमाप्रमाणे व दिलेल्या वचनानुसार दुरुस्‍तीचा खर्चाची आजपर्यत परतफेड विरुध्‍द पक्षाने केली नाही. आज 11 महिने उलटूनसुध्‍दा विरुध्‍द पक्षाने दाखल खर्चाची परतफेड केली नाही व का केली नाही याचे सुध्‍दा समाधानकारक उत्तर आज पर्यत देण्‍यात आले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या सोबत केलेल्या करारनाम्याचे उल्लंघन केले आहे व ग्राहकाप्रती सेवेकरिता आवश्‍यक व अनुचित व्यापारील प्रथेचा अवलंब केलेला आहे यासर्व कारणामुळे तक्रारकर्त्याला अतिशय मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला म्‍हणुन तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन  अपघातग्रस्त वाहनाच्या दुरुस्‍तीकरिता झालेला एकुण खर्च रुपये 74,154/-,18 टक्के व्याजासह मिळावा तसेच मानसिक व आर्थिक त्रासापोटी रुपये 10,000/- व खर्चापोटी रुपये 10,000/-मिळावे अशी मागणी केली.
  3. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत एकुण 6 दस्‍तऐवज दाखल केले असुन त्यात विमा पत्र, वाहन दुरुस्‍ती खर्चाच्या पावत्या व बॅटरी खर्च, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
  4. मंचामार्फत विरुध्‍द पक्ष यांना नोटीस पाठविण्‍यात आली असता विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष उपस्थित झाले व आपले लेखी उत्तर आक्षेंपासह दाखल केले.
  5. विरुध्‍द पक्ष आपले उत्तरात तक्रारीत नमुद वाहन हे तक्रारक्रर्त्याचे नावे प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणीकृत असल्याची तसेच वाहनाचा विमा उतरविला होता हया बाबी नाकारल्या. तक्रारकर्त्याच्या वाहनाचा दिनंक 21/11/2011 रोजी भोले पेट्रोल पंप अमरावती रोड, नागपूर     येथे अपघात झाला व वाहन पुर्णपणे नुकसानग्रस्‍त झाले व अपघाताच्या वेळी वाहन श्री राधेशाम शिवाजी पाटील हे चालवित होते ही सुध्‍दा बाब नाकारली. तक्रारकर्त्याने अपघातानंतर लगेच दुस-या दिवशी अपघाताची माहिती विरुध्‍द पक्षाला कळविले ही सुध्‍दा बाब नाकारली. विरुध्‍द पक्षाने कोणतेही आश्‍वासन दिलेले नसतांनी तक्रारकर्त्याने स्वतः वाहनाच्या दुरुस्‍तीसाठी अपघातग्रस्त       वाहन जायका मोटर्स ली. भंडारा रोड आसोली, नागपूर येथे दुरुस्‍तीला पाठविले व दुरुस्‍ती खर्च तक्रारकर्त्याने स्वतः भरला त्याकरिता तक्रारकर्ता स्वतः जबाबदार आहे.
  6.    तक्रारकर्त्याने वाहन दुरुस्‍ती खर्च किती झाला हे दाखविण्‍याकरिता कोणतेही संबंधीत दस्‍तऐवज प्रकरणात दाखल केले नाही. तसेच     तक्रारकर्त्याने वाहन दुरुस्ती खर्च मिळण्‍यासाठी विरुध्‍द पक्षाकडे    कोणताही अर्ज अथवा दावा दाखल केलेला नसल्यामुळे विरुध्‍द    पक्षाचे सेवेत कुठलीही त्रुटी सिध्‍द होत नाही व कुठल्याही कराराचा भंग   न केल्यामुळे तक्रारकर्त्याला शारिरिक व मानसिक त्रास होण्‍याचा प्रश्नच    उद्भवत नाही.
  7.    विरुध्‍द पक्ष आपले विशेष कथनात नमुद करतात की तक्रारकर्ता स्वच्छ मनाने मंचासमक्ष आलेला नाही कारण तक्रारकर्त्याने घटनेचे सत्य लपवून ठेवले असल्याने व कायद्याचे दृष्‍टीने चुकीच्या आधारावर    तक्रार दाखल केल्याने तक्रारकर्ता दावा रक्कम मिळण्‍यास पात्र नाही.
  8.    विरुध्‍द पक्ष पुढे सांगतात की, तक्रारकर्ता हा घटनेतील सत्य लपवीत     आहे. तक्रारकर्त्याच्या वाहनचालकाच्या निष्‍काळजीपणे गाडी   चालविण्‍यामुळे वाहन महाराजबाग क्लबच्या कंपाऊड चे भींतीला जाऊन    धडकले. जरी हे वाहन मालवाहक होते व त्यात दोन व्यक्तीना     बसविण्‍याचा परवानगी होती परंतु अपघाताच्या वेळेस त्यात 7 व्यक्ती हजर होते व त्यापैकी दोन व्यक्तींचा अपघातात मृत्यु झाला व इतर    लोकांना जबर दुखापत झाली. तक्रारकर्त्याजवळ वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र व वाहन चालविण्‍याचा परवाना हा एलएमव्ही चा होता जर      चालक हा मालवाहक वाहन चालवित होता म्हणजे चालकाकडे      एलएमव्ही ट्रान्सपोर्ट परवाना आवश्‍यक होता यावरुन तक्रारकर्त्याने    विमा कंपनीशी झालेल्या करारनाम्याप्रमाणे अटी व शर्तीचे उल्लघन      केलेले आहे.तसेच सदरच्या वाहनात फक्त दोन व्यक्तींची बसण्‍याची   मान्यता असतांना तक्रारकर्त्याच्या वाहनात अपघाताचेवेळी 7 व्यक्ती     होत्या. यावरुन तक्रारकर्त्याने विमा कंपनीच्या अटी व शर्तीचा भंग       केलेला आहे व मंचापासून सत्य लपवून मंचाची दिशाभुल करण्‍याचा   प्रयत्न केलेला आहे म्‍हणुन तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली आहे.
  9.    तक्रारीत दाखल उभयपक्षकारांचा लेखी युक्तीवाद, उभयपक्षाचा तोंडी युक्तीवाद एैकण्‍यात आला.तसेच वरिष्‍ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे व     दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचा निष्‍कर्ष पुढील     प्रमाणे देण्‍यात येतो.

        -//- निष्‍कर्ष -//-

  1.    ही तक्रार तक्रारकर्त्याने वाहनाचा अपघात झाल्यावर तक्रारकर्त्याचे       वाहनाचा विमा उतरविला असल्याने वाहन दुरुस्‍तीचा खर्च विरुध्‍द पक्ष    विमा कंपनीकडुन मिळावा याकरिता दाखल केलेली आहे.
  2.    विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने आपल्या उत्तरात ही बाब स्पष्‍ट केली आहे    की, तक्रारकर्त्याने विमाकंपनी कडे दावा दाखल केला नाही परंतु   तक्रारकर्त्याचे म्‍हणण्‍याप्रमाणे विमा कंपनीने तोंडी आश्‍वासन दिले होते.    परंतु अपघाताचे वेळी वाहन चालकाजवळ वाहन चालविण्‍याचा योग्य    परवाना नव्हता. वाहन चालक श्री राधेशाम पाटील यांच्या वाहन   चालविण्‍याचे परवान्याचे वाचन करता त्यावर एलएमव्ही-2610712011 असे नमुद आहे. त्याबाबत तक्रारकर्त्याने मा.सर्वोच्च न्यायालयाचा     निवाडा दाखल केला आहे त्यातील वस्‍तुस्थिती व आमच्या समोरील      तक्रारीतील वस्तुस्थिती भिन्न असल्याने सदर निवाडा येथे लागू होत     नाही. आमच्या समोरील तक्रारीत तक्रारकर्ता हा वाहनाचा मालक असुन   वाहन दुरुस्‍तीचा खर्च मागत आहे.
  3.    तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दुस-या न्यायनिवाडयात मा. सर्वोच्च       न्यायालयाचे  Kulwant Singh and Other  Vs. Orientsl Insurance, या    निवाडयात दोन वाहनांचा धडकेमुळे मृत्यु झालेल्या व्यक्तीच्या पालकांना     विमा दावा रक्कम देण्‍याबाबत आदेशात करण्‍यात आले आहे. यात    अपघाताचेवळी चालकाजवळ वाहन चालविण्‍याचा वैध परवाना होता.      त्यात एलएमव्ही यात light passenger carriage vehicle  and light goods carrage vehicle हे एल एम व्ही मधे मोडतात असे म्‍हटले आहे.     त्यामुळे या प्रकरणातील वस्तुस्थिती आमच्या समोरील तक्रारीतील    वस्‍तुस्थितीशी मिळतीजुळती नाही.  
  4.    विरुध्‍द पक्षाने आपले उत्तराचे पृष्‍ठर्य्थ मा. सर्वोच्य न्यायालयाचा   न्यायनिवाडा दाखल केला आहे.Civil Application 1140 to 1151/2007      National Insurance Vs. Laxmi Narayan Dhut, यात वाहन चालकाचा परवाना खोटा होता वा खरा ही जबाबदारी विरुध्‍द पक्ष विमा कंपनीला    साबीत करायची आहे असे म्‍हटले आहे व यात सुध्‍दा Third Party विमा      दाव्याबाबत चर्चा केली आहे.
  5.    वरील सर्व परिस्थितीवरुन तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाकडे विमा दाव्याचे   शर्ती व अटीनुसार सादर केल्याबाबत कुठलाही पुरावा अभिलेखावर      दाखल केलेला नाही.तसेच वाहनाचा अपघात झाला व त्याबाबत वाहनाच्या दुरुस्‍ती खर्चाबाबतची मागणी केली परंतु खर्चाबाबतचे   कोणतेही देयक तक्रारीत दाखल नाही व विरुध्‍द पक्षाकडे सादर केला    नसल्याने तक्रारकर्त्याची तक्रार पुराव्याअभावी नामंजूर होण्‍यास पात्र     आहे. करिता हे मंच खालील प्रमाणे आदेश पारित करित आहे.

                   

                          अं ती म  आ दे श  -

 

  1. तक्रारकर्त्याची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.
  2. उभयपक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 
  3. आदेशाच्‍या प्रती उभयपक्षकरांना नि:शुल्क पाठविण्‍यात याव्या.

 

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.