( आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा, श्रीमती आर.डी.कुंडले)
-- निकालपत्र --
( पारित दि. 25 मे 2012)
तक्रारकर्त्याने जुने वाहन पूर्वीच्या मालकाकडून विकत घेतले. त्याचे कागदपत्र मिळाले नाहीत म्हणून तक्रार दाखल आहे.
तक्रार थोडक्यात
1 तक्रारकर्त्याने दि. 28.10.2010 रोजी विरुध्द पक्ष 2 नंदकिशोर मिश्रा यांच्याशी स्टॅम्प पेपरवर करारकरुन वाहन विकत घेतले. परंतु हे वाहन प्रत्यक्षात विरुध्द पक्ष 2 च्या नांवावर नाही.
2 विरुध्द पक्ष 1 हे वादातील वाहनाचे नोंदणीकृत मालक आहेत परंतु त्यांचा या व्यवहाराशी संबंध नाही.
3 सदर प्रकरणात हे मंच तक्रारीच्या अन्य तपशीलात न जाता जुन्या वाहनाबद्दलचा वाद हा ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत बसत नाही म्हणून खारीज करीत आहे.
4 या प्रकरणामध्ये वाहनाचे हस्तांतरण एकाकडून - दुस-याकडे , दुस-याकडून-तिस-याकडे व तिस-याकडून तक्रारकर्त्याकडे याप्रमाणे झालेला आहे. परंतु आर.टी.ओ. कडील कागदपत्र मात्र मुळ मालक विरुध्द पक्ष 1 नंदकिशोर मिश्रा यांच्या नांवे आहेत. तक्रारकर्ता व त्यांचा अर्था-अर्थी काहीही संबंध नाही. विरुध्द पक्ष 1 ने हे वाहन मच्छिरके या नांवाच्या व्यक्तिला दि.28.02.2008 रोजी विकले. मच्छिरके या व्यक्तिने ते विरुध्द पक्ष 2 मयूर हत्तीमारे यांना विकले. त्यांनी प्रस्तुत तक्रारकर्त्याला ते विकले असे असले तरी गाडीचे कागदपत्र प्रत्येक वेळी नविन मालकाच्या नांवे झालेले दिसत नाही.
5 विरुध्द पक्ष 1 व 2 स्वतः हजर होते. त्यांचा युक्तिवाद ऐकला.
6 अशा प्रकारे जुन्या वाहनाच्या हस्तांतरणाचा व्यवहार ज्याला कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांचा आधार नाही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत ग्राहक वाद म्हणून येऊ शकत नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते. यासाठी हे मंच मा. आदरणीय महाराष्ट्र राज्य आयोगाच्या या निकालपत्राचा आधार घेत आहे.
2012 (1) CCC 116 (SS)
Mr. Altaf Usman Batliwala Vs. Branch Manager, Maruti Udyog ltd. & others.
First Appeal No. A/11/876
Re- sale transaction- do not come within the purview of ‘Consumer dispute’.
सबब आदेश
आदेश
1 तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.