Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/13/174

श्रीमती गीता वि. विठठल गेडाम - Complainant(s)

Versus

द. न्‍यु इंडिया अॅसुरन्‍स कंपनी लि. तर्फे डिव्‍हीजनल मॅनेजर श्री.मोहन दिगंबर लिमये व इतर - Opp.Party(s)

श्री. उदय क्षीरसागर

07 Mar 2014

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/13/174
 
1. श्रीमती गीता वि. विठठल गेडाम
रा.आग्रा ता.नरखेड
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. द. न्‍यु इंडिया अॅसुरन्‍स कंपनी लि. तर्फे डिव्‍हीजनल मॅनेजर श्री.मोहन दिगंबर लिमये व इतर
डिव्‍हीजनल ऑफीस नं. 130800 न्‍यु इंडिया सेन्‍टर, 7 वा माळा 17-ए कुपरेज रोड, मुंबई - 01
मुंबई
महाराष्‍ट्र
2. कबाल इन्‍सुरंन्‍स ब्रोकिंग सर्व्‍हीसेस लि. तर्फे श्री.संदीप त्रयंबकराव खैरनार
प्‍लॉट न. 375 ,स्‍मृती अपार्टमेंट 2 रा माळा, गांधी नगर ,नॉर्थ अंबाझरी रोड नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
3. तालुका कृषी अधिकारी नरखेड
ता.नरखेड
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Manohar G.Chilbule PRESIDENT
 HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
PRESENT: श्री. उदय क्षीरसागर, Advocate for the Complainant 1
 
ORDER

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा श्री मनोहर गोपाळराव चिलबुले , मा.अध्‍यक्ष )

(पारीत दिनांक 07 मार्च, 2014 )

 

1.     तक्रारकर्तीने, तिचे पती श्री विठ्ठल खेमराज गेडाम यांचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्‍दपक्षा कडून विमा रक्‍कम  मिळणेसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.

2.    तक्रारकर्तीचे कथन थोडक्‍यात येणे प्रमाणे-

       तक्रारकर्तीचे पती श्री विठ्ठल खेमराज गेडाम यांचे मालकीची मौजा आग्रा, तालुका नरखेड, जिल्‍हा नागपूर येथे शेती असून तिचा सर्व्‍हे क्रमांक-232 असा आहे आणि शेतीचे उत्‍पन्‍नावर संपूर्ण कुटूंबियाचा उदरनिर्वाह आहे.

      महाराष्‍ट्र शासनाने शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत   शेतक-यांचा विमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून उतरविला होता. महाराष्‍ट्र शासन विरुध्‍दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, नरखेड यांचे कार्यालया तर्फे संबधित शेतक-याचा विमा क्‍लेम हा, विरुध्‍दपक्ष क्रं-2 यांचे कार्यालयात पाठविल्‍या जातो व वि.प.क्रं 2 चे मार्फतीने प्रस्‍तावाची छाननी करुन पुढे तो विमा प्रस्‍ताव, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे सादर करण्‍यात येतो.

      तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे पती श्री विठ्ठल खेमराज गेडाम हे दि.01.07.2012 रोजी शेतात वखरण करीत असताना जमीनीत असलेल्‍या विद्दुत वायरचा करंट लागून घटनास्‍थळी मृत्‍यू झाला.

     तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे पतीचा महाराष्‍ट्र शासना तर्फे शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत सदरचे कालावधीत             विमा  उतरविलेला  असल्‍याने,  पतीचे अपघाती मृत्‍यूनंतर कायदेशीर वारसदार


 

म्‍हणून विमा रक्‍कम रुपये-1,00,000/- मिळावी म्‍हणून तक्रारकर्तीने, विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, नरखेड यांचे कार्यालयात आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा प्रस्‍ताव दि.30.01.2013 रोजी सादर केला. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, नरखेड यांचे कार्यालया मार्फतीने पुढे सदर विमा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचेकडे पाठविण्‍यात आला व वि.प.क्रं 2 यांनी विमा प्रस्‍तावाची छाननी करुन सदर विमा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे सादर केला तसेच विरुध्‍दपक्षाने वेळोवेळी मागीतलेल्‍या दस्‍तऐवजांची तक्रारकर्तीने  पुर्तता केली. विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने दि.30.05.2013 रोजीचे पत्र पाठवून तक्रारकर्तीचे मृतक पती हे मृत्‍यूचे वेळेस शेतकरी नव्‍हते असे कारण दर्शवून विमा दावा फेटाळला.

      म्‍हणून तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा कडून विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-1,00,000/- विमा दावा प्रस्‍ताव सादर केल्‍याचा दिनांक-30/01/2013 पासून द.सा.द.शे.18% दराने व्‍याजासह मिळावी, तसेच मानसिक, शारिरीक त्रास व आर्थिक नुकसानी पोटी रुपये-20,000/- आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-10,000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे कडून मिळावे इत्‍यादी मागण्‍या केल्‍यात.

 

3.    प्रस्‍तुत न्‍यायमंचा तर्फे यातील विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांना स्‍वतंत्ररित्‍या नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्‍यात आली. सदर न्‍यायमंचाची नोटीस संबधित वि.प.क्रं 1 ते 3 यांना प्राप्‍त झाल्‍या बद्दल रजिस्‍टर पोच अभिलेखावर दाखल आहेत.

 

 

4.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे श्री नरेंद्र डकोटे, विभागीय व्‍यवस्‍थापक, दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी नागपूर शाखा क्रं 160100 यांनी आपले प्रतिज्ञालेखावरील उत्‍तर न्‍यायमंचा समक्ष सादर केले. त्‍यांनी तक्रारकर्तीची तक्रार ही चुकीची असल्‍याने तसेच तक्रारकर्ती ही त्‍यांची ग्राहक नसल्‍याने व त्‍यांनी तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याने खारीज व्‍हावी. तक्रारकर्तीने सत्‍य वस्‍तुस्थिती मंचा पासून लपवून तक्रार दाखल केली आहे. पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार पॉलिसी कालावधी सुरु झाल्‍याचा               दिनांक-15.08.2011 पासूनच शेतक-याचे नावाची नोंद 7/12 उता-यामध्‍ये असणे आवश्‍यक आहे. परंतु तक्रारकर्तीचे पती श्री विठ्ठल खेमराज गेडाम यांचे नावाची 7/12 उता-या मधील नोंद फेरफार क्रं 318 दि.30.10.2012               रोजी घेण्‍यात आली, यावरुन स्‍पष्‍ट होते की, पॉलिसी  कालावधी सुरु झाल्‍याचे


 

दिनांकास तक्रारकर्तीचे पतीचे नावाची नोंद 7/12 उता-यामध्‍ये नव्‍हती व त्‍यामुळे वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा योग्‍य कारणास्‍तव फेटाळलेला आहे. पॉलिसी संपल्‍या पासून म्‍हणजे दि.14.08.2012 पासून 90 दिवसांचे आत म्‍हणजे दि.14.11.2012 पर्यंत विमा दावा सादर करणे आवश्‍यक आहे. परंतु तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचेकडे विमा दावा दि.30.01.2013 रोजी सादर केला आहे आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस सदर विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचे मार्फतीने दि.30.04.2013 रोजी प्राप्‍त झालेला आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा हा विहित मुदतीत प्राप्‍त न झाल्‍यामुळे तो मुदतबाहय असल्‍याचे कारणावरुन खारीज होण्‍यास पात्र आहे. तक्रारकर्तीची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी नुसार मंचा समक्ष चालू शकत नाही. प्रस्‍तुत तक्रार चालविण्‍याचे मंचास अधिकारक्षेत्र येत नाही, त्‍या संबधीचे अधिकारक्षेत्र हे केवळ दिवाणी न्‍यायालयास आहे. उपरोक्‍त नमुद कारणास्‍तव तक्रारकर्तीची तक्रार खारीज व्‍हावी असा उजर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे घेण्‍यात आला.

 

 

5.      वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तर मंचा समक्ष सादर केले. त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, शेतक-यांचा विमा दावा विमा कंपनीकडे छाननी करुन पाठविण्‍यासाठी ते शासनाला विनामोबदला मदत करतात, यासाठी त्‍यांना कोणताही मोबदला मिळत नाही. त्‍यामुळे विमा दाव्‍या संबधाने कोणतीही रक्‍कम देण्‍याची त्‍यांची कोणतीही कायदेशीर जबाबदारी नाही. आपल्‍या म्‍हणण्‍याचे समर्थनार्थ त्‍यांनी मा.महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग खंडपिठ औरंगाबाद यांनी प्रथम अपिल  क्रं-1114/2008 विभाग प्रमूख कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीस प्रायव्‍हेट लिमिटेड विरुध्‍द- श्रीमती सुशिला भीमराव सोनटक्‍के या प्रकरणात दि.16.03.2009 रोजी पारीत केलेल्‍या आदेशाची प्रत दाखल केली आहे. सदर आदेशा मध्‍ये  वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड यांचे विरुध्‍द शेतक-यास अपघात विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍याची कोणतीही जबाबदारी येत नाही असे नमुद केलेले आहे. म्‍हणून वि.प.क्रं 2 विरुध्‍दची तक्रार खारीज करावी, अशी विनंती त्‍यांनी केली आहे.

      वि.प.क्रं 2 यांनी पुढे असे नमुद केले की, मृतक श्री विठ्ठल खेमराज गेडाम, रा.आग्रा, तालुका नरखेड, जिल्‍हा नागपूर यांचा अपघात                      हा दि.01.07.2012 रोजी झाला. त्‍यांचे अपघाती मृत्‍यू संबधिचा विमा दावा हा


 

 

जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांचे मार्फतीने वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस नागपूर यांचे कार्यालयास दि.14.03.2013 रोजी प्राप्‍त झाल्‍या नंतर त्‍यांनी सदर विमा प्रस्‍ताव वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे मुंबई कार्यालयास दि.25.03.2013 रोजी पाठविला. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने त्‍यांचे दि.30.05.2013 रोजीचे पत्रान्‍वये विमा दावा फेटाळला व तसे वारसदारास कळविण्‍यात आले. वि.प.क्रं 2 यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याने त्‍यांना मुक्‍त करण्‍यात यावे अशी विनंती केली.

 

 

6.      विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, नरखेड यांनी आपले प्र‍तिज्ञालेखावरील उत्‍तर मंचा समक्ष सादर केले. त्‍यांचे उत्‍तरा नुसार तक्रारकर्तीचे मृतक पतीचा अपघात हा दि.01.07.2012 रोजीचा आहे. तक्रारकर्तीने सादर केलेल्‍या दस्‍तऐवजा प्रमाणे सर्व्‍हे नं.232 मौजा आग्रा, तहसिल नरखेड जिल्‍हा नागपूर वडीलोपार्जीत शेती असून मृतक विठ्ठल खेमराज गेडाम हे स्‍वतः शेती करीत असल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्तीने विमा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांचे कार्यालयात दि.30.01.2013 रोजी सादर केला. त्‍यानंतर विमा प्रस्‍तावातील त्रृटींची पुर्तता करुन विमा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह वि.प.क्रं 3 यांनी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांचे कार्यालयास दि.02.03.2013 रोजी सादर केला. अशाप्रकारे वि.प.क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍य पार पाडल्‍यामुळे त्‍यांना प्रस्‍तुत तक्रारीतून मुक्‍त करण्‍यात यावे अशी विनंती केली.

 

 

7.      तक्रारकर्तीने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार दस्‍तऐवजाच्‍या प्रती सादर केल्‍यात, ज्‍यामध्‍ये शेतकरी अपघात विमा योजना शासन निर्णय, वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे विमा दावा फेटाळल्‍याचे पत्र,  विमा दावा अर्ज प्रत, तक्रारकर्तीचे पतीचे नावाचा शेतीचा 7/12 उतारा प्रत, गाव नमुना- 6 क फेरफार पत्रक,  तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने घटनास्‍थळ पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा,  शवविच्‍छेदन अहवाल, पतीचे मृत्‍यू प्रमाणपत्र, वयाचा दाखला इत्‍यादीचा समावेश आहे. तसेच तक्रारकर्तीने आपले शपथपत्र तसेच  लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

 

8.      विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तसेच विमा योजने संबधी त्रिपक्षीय कराराची प्रत,  पॉलिसीची प्रत दाखल केली.

 

 

 

 

 

 

9.     वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस तर्फे महाराष्‍ट्र शासनाचे राजपत्र, मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांचे निर्णयाची प्रत अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात.

 

10.     प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्ती तर्फे वकील श्री क्षिरसागर आणि  वि.प.क्रं 1 विमा कंपनी तर्फे  वकील श्री कटारीया यांचा मौखीक  युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

 

11.     तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आणि वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस आणि वि.प.क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, नरखेड यांचे लेखी उत्‍तर आणि प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवज व त.क. व वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे अधिवक्‍ता यांचा युक्‍तीवाद यावरुन न्‍यायमंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे-

                                          

::  निष्‍कर्ष    ::

 

12.   प्रकरणातील उपलब्‍ध पोलीस दस्‍तऐवज घटनास्‍थळ पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा  आणि  डॉक्‍टरांचे शवविच्‍छेदन अहवाल यावरुन मृतक श्री विठ्ठल खेमराज गेडाम यांचा अपघाताने मृत्‍यू   दि.01.07.2012 रोजी आग्रा, तहसिल नरखेड, जिल्‍हा नागपूर येथे झाल्‍याचे सिध्‍द होते.

13.  महाराष्‍ट्र शासन निर्णय दि. 08 ऑगस्‍ट, 2011 अन्‍वये               सन-2011-2012 या वर्षा करीता दि.15 ऑगस्‍ट, 2011 ते 14 ऑगस्‍ट, 2012 या कालावधीमध्‍ये शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्‍वीत असून विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे  (विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी म्‍हणजे दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी असे समजण्‍यात यावे) विमा उतरविण्‍यात आला होता.  थोडक्‍यात मृतकाचा विमा सदरचे कालावधीत काढलेला होता ही बाब सिध्‍द होते.

 

14.   विमाधारकाचा झालेला अपघाती मृत्‍यू तसेच विमा पॉलिसी या बद्दल उभय पक्षांमध्‍ये विवाद नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तरा सोबत खालील प्राथमिक आक्षेप घेतलेले आहेत-

 

      (1)  शेतकरी अपघात विमा योजना-2011-12 या वर्षात योजना सुरु

           झाल्‍याचा दिनांक 15 ऑगस्‍ट, 2011 रोजी मृतक विमाधारकाचे

           नावे शेती नव्‍हती.

 

 

 

 

      (2)  प्रस्‍तुत तक्रारीत मंचास अधिकार क्षेत्र येत नाही.

      (3)  प्रस्‍तुत तक्रार मुदतबाहय असल्‍याचे कारणा वरुन खारीज व्‍हावी

     

 

आक्षेप क्रं-14 (1)- शेतकरी अपघात विमा योजना-2011-12 या वर्षात योजना सुरु झाल्‍याचा दिनांक 15 ऑगस्‍ट, 2011 रोजी विमाधारकाचे नावे शेती नव्‍हती-

 

14(1)    वि.प.क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तरात पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार शेतकरी अपघात विमा योजना-2011-12 या वर्षात योजना सुरु झाल्‍याचा दिनांक-15.08.2011 रोजी शेतक-याचे नावाची नोंद 7/12                 उता-यामध्‍ये असणे आवश्‍यक आहे. परंतु तक्रारकर्तीचे पती श्री विठ्ठल खेमराज गेडाम यांचे नावाची 7/12 उता-या मधील नोंद फेरफार क्रं 318 दि.30.10.2012 रोजी घेण्‍यात आली, यावरुन स्‍पष्‍ट होते की, पॉलिसी सुरु झाल्‍याचे दिनांकास तक्रारकर्तीचे पतीचे नावाची नोंद 7/12 उता-यामध्‍ये नव्‍हती व त्‍यामुळे वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा योग्‍य कारणास्‍तव फेटाळलेला आहे. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने आपले म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ दि.12.08.2011 रोजीचे त्रिपक्षीय करारातील अटीवर ठेवली त्‍यामध्‍ये-

Farmer:          Person registered as farmer in Maharashtra as evidenced

                     7/12 extract

 

Eligibility :       The farmers name should be in the Land Record Register

                      i.e.7/12 on the date of the issuance of policy असे नमुद

            आहे.

 

       या संदर्भात तक्रारकर्तीने आपले लेखी युक्‍तीवादामध्‍ये तक्रारकर्तीचे पती श्री विठ्ठल खेमराज गेडाम यांचे वडील श्री खेमराज पांडूरंगजी गेडाम यांची सर्व्‍हे नं.232 मौजा आग्रा, तहसिल नरखेड, जिल्‍हा नागपूर येथे शेती होती.     श्री खेमराज पांडूरंगजी गेडाम हे दि.14.04.2010 रोजी मृत्‍यू पावले व त्‍यांचे मृत्‍यू नंतर वारसा हक्‍काने त्‍यांचा मुलगा म्‍हणजेच तक्रारकर्तीचे पती श्री विठ्ठल खेमराज गेडाम हे आपोआप सदर शेतीचे मालक झाले फक्‍त तक्रारकर्तीचे पतीचे नावाची कायदेशीर वारसदार म्‍हणून शेतीचे 7/12 उता-यावर उशिराने फेरफार क्रं 318 दि.30.10.2012 रोजी नोंद झाली. तक्रारकर्तीने

 

आपले या म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ तिचे पतीचे वडील आणि तक्रारकर्तीचे सासरे श्री खेमराज पांडूरंगजी गेडाम यांचे महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य विभागाव्‍दारे जारी मृत्‍यू प्रमाणपत्राची प्रत अभिलेखावर दाखल केली असून त्‍यामध्‍ये त्‍यांचा मृत्‍यू दि.14.04.2010 रोजी असल्‍याचे नमुद आहे.

 

      मंचाचे मते, मृतक विमाधारकाचे वडील श्री खेमराज पांडूरंगजी गेडाम हे दि.14.04.2010 रोजी मरण पावल्‍याने मयत विमाधारक श्री विठ्ठल खेमराज गेडाम हा वारस हक्‍काने सदर शेतजमीनीचा मालक त्‍याच दिवशी म्‍हणजे वडीलांचे मृत्‍यू दि.14.04.2010 रोजी झाला म्‍हणून मृतक विमाधारक हा त्‍याचे मृत्‍यूचे दिवशी म्‍हणजे दि.01.07.2012 रोजी शेतकरी होता. त्‍याच्‍या वडीलाच्‍या मृत्‍यूमुळे वारसा हक्‍काचा फेरफार जरी विमाधारकाचे मृत्‍यू                       दिनांक-01.07.2012 नंतर म्‍हणजे दि.30.10.2012 रोजी घेण्‍यात आला तरी त्‍याचे वारसा हक्‍कास कोणतीही बाधा पोहचत नाही व म्‍हणून मृतक विमाधारक श्री विठ्ठल खेमराज गेडाम याची वारस असलेली विधवा पत्‍नी तक्रारकर्ती श्रीमती गिता विठ्ठल गेडाम ही शेतकरी अपघात विमा योजनाचा लाभ मिळण्‍यास पात्र आहे, असे न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

      या संदर्भात तक्रारकर्तीने आदरणीय राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, न्‍यु दिल्‍ली यांनी IV (2012) CPJ 51 (NC) “Reliance General Insurance Co. Ltd.-V/s-Sakorba Hetubha Jadeja & Ors.”  पुर्नयाचीका क्रं 1664/2011 आदेश पारीत दि.27.08.2012 या न्‍यायनिवाडयावर आपली भिस्‍त ठेवली.

 

      सदर आदरणीय राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, न्‍यु दिल्‍ली यांनी पारीत केलेल्‍या आदेशाचे वाचन केले असता, त्‍यामधील वस्‍तुस्थिती खालील प्रमाणे आहे-

       गुजरात शासना तर्फे राज्‍यातील शेतक-यांचा शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविण्‍यात आला होता. विम्‍याचा कालावधी हा दि.26.01.2002 ते 25.01.2003 असा होता. मृतक विमाधारक शेतक-याचे नाव हेतुभा भारमलजी जडेजा असे होते. मृतक विमाधारक हेतूभा भारमल जडेजा यांचा अपघाती मृत्‍यू ईलेक्ट्रिक शॉक बसून दि.13.05.2002 रोजी झाला. मृतक शेतक-याचे अपघाती मृत्‍यू नंतर, वारसदारानीं जिल्‍हा ग्राहक न्‍यायमंचात तक्रार दाखल केली असता, तक्रार मंजूर होऊन मृतकाचे वारसदारास विम्‍याची रक्‍कम रुपये-1,00,000/- देण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला. मंचाचे आदेशा विरुध्‍द राज्‍य ग्राहक आयोग यांचेकडे             अपिल करण्‍यात आले असता, ते खारीज करण्‍यात आले. म्‍हणून संबधित विमा


 

 

कंपनीने आदरणीय राष्‍ट्रीय ग्राहक आयोगा मध्‍ये पुर्नयाचीका दाखल केली. आ.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने आदेशामध्‍ये नमुद केले की, हेतुभा जडेजा, नागुभा, मखूभा आणि विरुभा हे सर्व मृतक भारमलजी यांचे पुत्र आहेत आणि सहशेतकरी व वडीलांचे शेतीचे कायदेशीर वारसदार आहेत. संबधित विमा कंपनीने विमा योजना सुरु झाल्‍याचा दिनांक-26.01.2002 रोजी मृतक हेतूभा भारमल जडेजा हा रजिस्‍टर्ड शेतकरी नव्‍हता, तर तो विमा योजना सुरु झाल्‍या नंतर दि.12.04.2002 रोजी रजिस्‍टर्ड शेतकरी बनला या कारणा वरुन विमा दावा नामंजूर केला होता. संबधित शेतीचे दस्‍तऐवज गाव नमुना 6 आणि 7/12 उता-या वरुन मृतक हा 12.04.2002 रोजी रजिस्‍टर्ड शेतकरी होता. मृतक हेतुभा जडेजा यांचा मृत्‍यू दि.13.05.2002 रोजी झाला, त्‍यामुळे मृत्‍यूचे  दिवशी मृतक हेतुभा जडेजा हे रजिस्‍टर्ड शेतकरी होते, असे नमुद करुन पुर्नयाचीका खारीज केली.

 

     आमचे समोरील प्रकरणात सदर आ.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचा आदेश तंतोतंत लागू पडतो, असे न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

     उपरोक्‍त विवेचना वरुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा विमा योजना सुरु झाल्‍याचा दिनांक-15.08.2011 रोजी मृतक विमाधारक शेतकरी नव्‍हता या आक्षेपात काहीही तथ्‍य नसल्‍याचे दिसून येते.

     

आक्षेप क्रं-14(2)- मंचास अधिकार क्षेत्र नसल्‍या बाबत-

14(2)    यातील मृतक श्री विठ्ठल खेमराज गेडाम यांची वडीलोपार्जीत शेती ही तहसिल नरखेड, जिल्‍हा नागपूर येथे  असल्‍यामुळे व तो सदर शेतीमध्‍ये कायेदशीर वारसदार आहे. तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1 दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनीकडे नागपूर महसूल विभागातील शेतक-यांचा विमा  काढण्‍यात  आला  होता आणि विमाधारक शेतक-याचा मृत्‍यू, अतिरिक्‍त जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नागपूरचे कार्यक्षेत्रात मौजा आग्रा, तालुका नरखेड, जिल्‍हा नागपूरचे हद्दीत झाल्‍यामुळे ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम -11 (2) (a) आणि (c) प्रमाणे या मंचास सदर तक्रार चालविण्‍याची कार्यकक्षा प्राप्‍त झालेली आहे. म्‍हणून अतिरिक्‍त जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नागपूर या मंचास प्रस्‍तुत तक्रारीत पूर्ण अधिकारक्षेत्र येते. त्‍यामुळे वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे या आक्षेपात काहीही तथ्‍य दिसून येत नाही.

 

 

 

 

 

 

आक्षेप क्रं-14(3)- तक्रार मुदतबाहय असल्‍या बाबत-

14(3)    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा नुसार पॉलिसी संपल्‍या पासून म्‍हणजे दि.14.08.2012 पासून 90 दिवसांचे आत म्‍हणजे दि.14.11.2012 पर्यंत विमा दावा सादर करणे आवश्‍यक आहे. परंतु तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचेकडे विमा दावा दि.30.01.2013 रोजी सादर केला आहे आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा           कंपनीस सदर विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचे

मार्फतीने दि.30.04.2013 रोजी प्राप्‍त झालेला आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा हा विहित मुदतीत प्राप्‍त न झाल्‍यामुळे तो मुदतबाहय असल्‍याचे कारणावरुन खारीज होण्‍यास पात्र आहे

       या संदर्भात मंचा तर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, तक्रारकर्तीचे मृतक पती श्री विठ्ठल खेमराज गेडाम यांचा अपघाती मृत्‍यू दि.01.07.2012 रोजी झाला. शेतकरी अपघात विमा योजना ही दि.15 ऑगस्‍ट, 2011 ते                  14 ऑगस्‍ट, 2012 या कालावधीत कार्यान्वित होती. म्‍हणजेच तक्रारकर्तीचे पतीचा मृत्‍यू हा शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या अगदी योजनेचे शेवटचे कालावधीत झालेला आहे. पतीचे मृत्‍यूचे धक्‍क्‍यातून सावरल्‍या नंतर तक्रारकर्तीने विमा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांची जुळवाजुळव करुन                वि.प.क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, नरखेड यांचे कार्यालयात दि.30.01.2013 रोजी सादर केल्‍या नंतर, तालुका कृषी अधिकारी, नरखेड यांनी प्रस्‍तावातील त्रृटींची पुर्तता करुन विमा प्रस्‍ताव त्‍यांचे वरीष्‍ठ कार्यालय जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात दि.02.03.2013 रोजी सादर केला. विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचे लेखी उत्‍तरा नुसार त्‍यांना तक्रारकर्तीचा विमा प्रस्‍ताव हा जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी नागपूर यांचे कार्यालया मार्फतीने दि.14.03.2013 रोजी प्राप्‍त झाल्‍या नंतर त्‍यांनी सदर विमा प्रस्‍ताव वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे कार्यालयास दि.25.03.2013 रोजी सादर केला. वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा नुसार त्‍यांना तक्रारकर्तीचा विमा प्रस्‍ताव, वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचे कडून दि.30.04.2013 रोजी प्राप्‍त झाला. याचाच अर्थ असा होतो की, तक्रारकर्तीने विमा प्रस्‍ताव सादर केल्‍या नंतरही विमा प्रस्‍ताव योग्‍य त्‍या चाकोरीतून         वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे पोहचण्‍यासाठी जवळपास 03 महिन्‍याचा कालावधी लागला. विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारल्‍याचे दि.30 मे, 2013 रोजीचे  पत्र  हे  आयुक्‍त, कृषी पुणे यांचे नावे दिलेले असून सदर पत्राची प्रत


 

 

वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांना दिल्‍याचे दिसून येते परंतु सदर पत्राची प्रत तक्रारकर्तीस दिलेली नसल्‍याचे दिसून येते. म्‍हणजेच वि.प.क्रं 1विमा कंपनीने तक्रारकर्तीस आपली कोणतीही बाजू मांडण्‍यास संधी न देता तिचा विमा दावा फेटाळल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

      या संदर्भात तक्रारकर्तीने खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निकालपत्रावर आपली भिस्‍त ठेवली आहे. 

 

(1)                   I (2009) CPJ 147

           Hon’ble Maharashtra State Commission, Mumbai

           National Insurance Co.Ltd.-V/s- Asha Jamdar Prasad

 

          प्रस्‍तुत अपिलीय प्रकरणात आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग,महाराष्‍ट्र  मुंबई यांनी विमा दावा हा विलंबाचे कारणावरुन फेटाळण्‍यात आला परंतु विमा दावा दाखल करण्‍यास जो विलंब झालेला आहे, तो का झाला? हे विशद करण्‍याची संधी मृतकाचे विधवा पत्‍नीला दिल्‍या गेलेली नाही आणि तसेही मृतकाचे मृत्‍यूचे धक्‍क्‍यातून सावरल्‍या नंतर त्‍याचे विधवा पत्‍नीने विमा दावा सादर केल्‍याचे कारण दर्शवून विमा कंपनीचे अपिल खारीज करुन मंचाचा विमा दावा देण्‍याचा निर्णय कायम ठेवला.

          

 

(2)                               I (2013) CPJ 115

                 Hon’ble Chhattisgarh State Consumer Disputes Redressal   

            Commission Raipur

                 Ramayanvati –V/s- Oriential  Insurance Company Ltd.

 

           उपरोक्‍त नमुद प्रकरणातील विमा क्‍लेम हा ग्रुप जनता पर्सनल अक्‍सीडेंट पॉलिसी अंतर्गत मृत्‍यू दाव्‍या संबधीचा आहे. विमा क्‍लेम हा घटना घडल्‍या पासून पंधरा दिवसाचे आत करणे आवश्‍यक होते. परंतु तो सादर करण्‍यासाठी 03 वर्षाचा उशिर झाल्‍यामुळे पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झाल्‍याने तक्रार खारीज करण्‍यात आली होती म्‍हणून अपिल करण्‍यात आले होते. अपिलीय आदेशात मा.आयोगाने सदर तक्रारकर्ती ही अशिक्षीत स्‍त्री असून, पॉलिसीचे अस्तित्‍वा बद्दल तिला कल्‍पना नव्‍हती. तक्रारकर्तीचे मृतक पती ज्‍या ठिकाणी नौकरीस होते तेथील मालकाने पॉलिसी बद्दल माहिती देणे बंधनकारक होते असे नमुद केलेले आहे.

      आमचे समोरील प्रस्‍तुत तक्रार प्रकरणात उपरोक्‍त नमुद मा.आयोगाचा सदर निर्णय तंतोतंत लागू पडतो. कारण आमचे समोरील प्रकरणातील स्‍त्री     एक ग्रामीण विधवा अशिक्षीत आहे. तक्रारकर्तीचे पतीचा दि.01.07.2012 रोजी


 

 

अपघाती मृत्‍यू झाल्‍यामुळे काही दिवस पतीचे निधनाने ती अतिशय व्‍यथीत होती. महाराष्‍ट्र शासना तर्फे संबधित मृतकाचा शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत विमा काढला होता याची तिला कल्‍पना नव्‍हती. तसेच पॉलिसीतील अटी व शर्तीचीं सुध्‍दा तिला कल्‍पना नव्‍हती. तहसिल कार्यालय/ग्राम पंचायती मध्‍ये सुध्‍दा शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या अटी व शर्ती नमुद केलेले दर्शनी फलक लावलेले नाहीत. पतीचे मृत्‍यू नंतर सावरल्‍या नंतर तक्रारकर्तीस शेतकरी अपघात  विमा  योजनेची  माहिती  मिळाली. कागदपत्रांची माहिती घेणे, त्‍याची जुळवाजुळव करणे, वेळेवर अधिकारी न सापडणे व खेडयातून तालुक्‍याच्‍या ठिकाणी जाण्‍यासाठी सोबत न मिळणे अशा

अनेक अडचणींनां तक्रारकर्तीला सामोरे जावे लागले आणि विमा दाव्‍यासाठी आवश्‍यक दस्‍तऐवज मिळवावे लागले.  त्‍यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा विहित मुदतीत म्‍हणजे विमा पॉलिसी संपल्‍या पासून 90 दिवसाचे आत सादर न केल्‍याचे कारणा वरुन, विमा दावा फेटाळण्‍याची विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची कृती अयोग्‍य असल्‍याचे न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

      

 

15.    उपरोक्‍त नमुद परिस्थितीत तक्रारकर्ती शेतकरी अपघात विमा योजने संबधाने  विमा क्‍लेमची रक्‍कम रुपये-1,00,000/-  वि.प.क्रं 1 दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनीने विमा क्‍लेम नाकारल्‍याचा दिनांक-30.05.2013 पासून द.सा.द.शे.9% दराने व्‍याजासह विरुध्‍दपक्ष  क्रं 1 विमा कंपनी कडून  मिळण्‍यास पात्र आहे, असे न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारकर्तीस झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/-आणि तक्रारीचे खर्चा बद्दल   रुपये-5000/- तक्रारकर्ती,विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून मिळण्‍यास पात्र आहे असे न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 आणि विरुध्‍दपक्ष  क्रं-3  यांना सदर प्रकरणातून मुक्‍त करण्‍यात येते.

 

16.       वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

           

               ::आदेश::

 

1)    तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं 1 दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी

      विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

 

 

 

 

 

 

2)    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस निर्देशित करण्‍यात येते की,  

      तक्रारकर्तीस तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी जनता

      अपघात विमा योजने अंतर्गत रक्‍कम रुपये-1,00,000/-

      (अक्षरी रुपये एक लक्ष फक्‍त ) विमा दावा नाकारल्‍याचा दिनांक-

      30.05.2013 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो

      द.सा.द.शे.9%  दराने व्‍याजासह द्दावी.

3)    तक्रारकर्तीस झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/-

      (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) आणि तक्रारीचे खर्चा बद्दल

      रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने

      तक्रारकर्तीस द्दावेत.

3)    विरुध्‍दपक्ष क्रं- 2 व क्रं-3 यांना सदर तक्रारीतून मुक्‍त करण्‍यात येते.

4)    सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदर

      निकालपत्राची प्रत प्राप्‍त झाल्‍या पासून 30 दिवसाचे आत करावे..

5)    निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व  पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

      देण्‍यात यावी.

               

 

 
 
[HON'ABLE MR. Manohar G.Chilbule]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.