Complaint Case No. CC/11/447 |
| | 1. मे. रामदेव सिझर्स, | Through its Partner, Mr.Mansukhbhai Bavjibhai Patel,303, Arihant Kripa, Arihant Nagar, Bhiwandi-421302, | Thane. |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. द मॅनेजर, द ओरियंन्टल इंशुरन्स कं.लि. | Divisional Off.No.124500, Oriental House, 4th floor, 7,J.Tata Road, Chruchgate, Mumbai-400020. | 2. The Manager, The Oriental Insurance Co.Ltd. | Near Prabhat Talkies, Station Road, Thane(w). |
| ............Opp.Party(s) |
|
|
ORDER | Dated the 20 Aug 2015 तक्रारदारातर्फे अँड. अविनाश मोरे सामनेवालेतर्फे अॅड. संजय म्हात्रे न्यायनिर्णय (द्वारा सौ. माधुरी एस. विश्वरुपे- मा. सदस्या) तक्रारदारांनी त्यांची रामदेव सिझर्स फर्मकरीता सामनेवाले यांचेकडून दि. 30/08/2009 ते दि. 29/08/2010 या कालावधीची “Standard Fire & Special Perils Policy” रक्कम रु. 3,05,00,000/- घेतली होती. दुर्दैवाने दि. 20/12/2009 रोजी शॉर्ट सर्कीटमुळे आग लागून फर्मचे रु. 44,55,654/- एवढया रकमेचे नुकसान झाले. सामनेवाले यांचे सर्व्हेअर यांनी नुकसानीची रक्कम रु. 17,50,000/- निश्चित केली. सर्व्हेअर यांनी दिलेल्या अहवालानुसार तक्रारदारांनी Stock Record दाखवले नसल्यामुळे तसेच बिले बोगस ठरविल्यामुळे अहवालामध्ये मशिनच्या नुकसानीबाबत निश्चित केले नाही असे नमूद केले आहे. तक्रारदारांनी पॉलिसी घेतांना प्रपोजल फॉर्ममध्ये प्लान्ट व मशिनरीकरीता 1 करोड रकमेची रिस्क घेतल्याचे नमूद आहे. परंतु सामनेवाले यांनी पॉलिसीमध्ये मशिनरीचा समावेश केला नाही. तक्रारदारांनी दि. 26/05/2010 रोजी सामनेवाले यांना यासंदर्भात पत्रान्वये माहिती दिली. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी दि. 31/05/2010 रोजी मशिनरी पॉलिसीप्रमाणे समाविष्ट असल्याबाबत नोंद करुन चुकीची दुरुस्ती केली. अशा परिस्थितीत प्लन्ट व मशिनरीची रिस्क सदर पॉलिसीमध्ये दि. 30/08/2009 पासून समाविष्ट आहे. तक्रारदारांच्या मशिनरीचे रु. 2,81,3114/- एवढे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचे साल्व्हेजचा विचार केला असता रु. 94,193/- मुल्य निश्चित करणे योग्य आहे. त्यामुळे तक्रारदारांना सामनेवाले यांनी रु. 18,44,193/- नुकसान भरपाईची रक्कम अदा करणे आवश्यक आहे. परंतु सामनेवाले यांनी दि. 05/04/2011 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदारांचा विमा प्रस्ताव (Fraudulent) असल्यामुळे पॉलिसीच्या क्लॉज नं. 8 प्रमाणे नामंजूर केला. सामनेवाले यांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांची विमा पॉलिसी मान्य आहे. तक्रारदारांनी दि. 20/12/2009 रोजी फर्ममध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची माहिती दि. 21/12/009 रोजी सामनेवाले यांना दिली.सामनेवाले यांनी मेसर्स प्रभा असोसिएटस् यांची सर्व्हेअर म्हणून सदर प्रकरणात नेमणूक केली. सर्व्हेअर यांनी घटनास्थळाला भेट दिली. परंतु तक्रारदारांनी स्टॉकचे रेकॉर्ड वेळोवेळी मागणी करुनही उपलब्ध केले नाही. त्यानंतर तक्रारदारांनी स्टॉक स्टेटमेंट सर्व्हेअर यांना दिले. सर्व्हेअर यांनी स्टॉक स्टेटमेंटची तपासणी केली असता 14 invoices बोगस असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यामुळे तक्रारदारांना सदर 14 पार्टींचे invoices मागे घेण्यास सांगितले. तक्रारदारांनी सामनेवाले विमा कंपनीकडे खोटी बिले सादर करुन रक्कम घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे सामनेवाले यांनी योग्यरित्या व योग्य कारणास्तव दि. 05/04/2011 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदारांचा विमा प्रस्ताव सर्व्हेअर यांच्या अहवालानुसार पॉलिसीच्या clause 8 प्रमाणे नामंजूर केला आहे. तसेच तक्रारदारांनी 14 बिलांचा प्रस्ताव मागे घेण्याबाबत सामनेवाले यांना दिलेल्या पत्राची प्रत मंचात दाखल आहे. तक्रारदारांनी अयोग्य पध्दतीने कंपनीच्या व्यवस्थापकांना सदर प्रकरणात समाविष्ट केले आहे. ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(m) मधील तरतुदीनुसार कंपनीचे व्यवस्थापक व कंपनी यांचे कायदेशीर अस्तित्व (Legal entity) भिन्न आहेत. तक्रारदारांनी विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसहीत दाखल केला नाह तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, शपथपत्र, सामनेवाले यांची लेखी कैफियत, शपथपत्रयांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. यावरुन खालीलप्रमाणे बाबी स्पष्ट होतातः तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून स्टँडर्ड फायर अँड पेरील पॉलिसी दि. 30/08/2009 ते 29/09/2010 या कालावधीची रक्कम रु. 3,05,00,000/- एवढया रकमेची रु. 41,633/- प्रिमियमचा भरणा करुन घेतल्याची बाब सामनेवाले यांना मान्य आहे. तक्रारदारांच्या पॉलिसीमध्ये
1. | बांधकामाकरीता | 50,00,000/- | 2. | प्लींथ,फाऊंडेशन,कंपाऊंड वॉल वायरींग, फिटींग, बिल्डींग शेड | 1,00,00,000/- | 3. | स्टॉक | 1,50,00,000/- | 4. | फर्निचर | 5,00,000/- |
असे नमूद केले आहे. परंतु तक्रारदारांनी सदर पॉलिसी घेतांना सामनेवाले यांचेकडे दिलेल्या प्रपोजन फॉर्ममध्ये बांधकाम | 50,00,000/- | प्लान्ट व मशिनरीकरीता | 1,00,00,000/- | स्टॉक | 1,50,00,000/- | फर्निचर | 5,00,000/- |
असे नमूद केले आहे. तक्रारदारांच्या रामदेव सिझरस् मध्ये दि. 20/12/2009 रोजी विदयुत कनेक्शनचे शॉर्ट शर्कीट होऊन आग लागल्यामुळे मालाचे व मशिनरीचे नुकसान झाले. तक्रारदारांनी सदर नुकसानीबाबतचा विमा प्रस्ताव सामनेवाले यांचेकडे पाठवला. त्यावेळी तक्रारदारांना सदर विमा पॉलिसीमध्ये प्लान्ट व मशिनरीचा समावेश केला नसल्याचे लक्षात आले. तक्रारदारांनी दि. 26/05/2010 रोजी सामनेवाले यांना यासंदर्भात पत्र पाठवले व त्याप्रमाणे सामनेवाले यांनी पॉलिसीमध्ये चुकीची दुरुस्ती (Rectify) करुन प्लान्ट व मशिनरी यांचा समावेश असल्याचे दि. 31/05/2010 रोजी नमूद (endorsement) केले आहे. तक्रारदारांनी प्रपोजल फॉर्म, चुकीची विमा पॉलिसी व त्यानंतर दि. 31/05/2010 रोजी endorsement करुन सामनेवाले यांनी दुरुस्त केलेली विमा पॉलिसी मंचात दाखल केली आहे. सदर कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी 3 करोड 5 लाख एवढया रकमेवर दि. 30/08/2009 ते दि. 29/08/2010 या कालावधीकरीता प्रिमियमचा भरणा केला आहे. प्लॉट व मशिनरीचा उल्लेख फक्त दि. 31/05/2010 रोजी केला आहे. तक्रारदारांनी दि. 31/05/2010 रोजी प्लान्ट व मशिनरी नव्याने समाविष्ट करुन त्यावर प्रिमियम भरलेला नाही. प्लान्ट व मशिनरीचा उल्लेख प्रपोजल फॉर्ममध्ये असल्यामुळे सामनेवाले यांनी पॉलिसी Rectify दि. 31/05/2010 रोजी केली. यावरुन प्लांट व मशिनरीकरीता तक्रारदारांनी दि. 30/08/2009 ते दि. 29/08/2010 या कालावधीकरीता प्रिमियमचा भरणा केलेला होता. अशा परिस्थितीत प्लान्ट व मशिनरी विमा पॉलिसीमध्ये सुरुवातीपासून समाविष्ट असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदारांना सामनेवाले यांनी प्लान्ट व मशिनरीच्या नुकसान भरपाईची रक्कम देणे बंधनकारक आहे असे मंचाचे मत आहे. सामनेवाले यांच्या सर्व्हेअर अहवालानुसार तक्रारदारांनी 14 बोगस बिले (stock) स्टॉकच्या नुकसान भरपार्इची दाखल केली आहेत. सामनेवाले यांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांनी सदर 14 बिलांकरीता प्रस्ताव मागे घेण्याबाबत त्यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. सर्व्हेअर यांनी सदर 14 बिलांची रक्कम रु. अहवालामध्ये वगळून रु. 13,72,737/- एवढी (Stock) ची नुकसान भरपाई रक्कम (सॉल्व्हेज रु. 32,737/- वजा जाता) रु. 13,40,000/- निश्चित केली आहे. सर्व्हेअर अहवालानुसार खालीलप्रमाणे नमूद केले आहे.
Assessed Loss of Stocks | 13,40,000/- | - ‘’- of Building | 4,20,000/- | Total | 17,60,000/- | -Less (Excess policy) | - 10,000/- | Total Loss Assessed | 17,50,000/- |
अशाप्रकारे एकूण नुकसान भरपाईची रक्कम रु. 17,50,000/- निश्चित केली आहे. परंतु प्लान्ट व मशिनरीचा पॉलिसीमध्ये समावेश नसल्यामुळे मशिनरीच्या नुकसानीबाबतचा सर्व्हे केला नाही असे अहवालामध्ये नमूद केले आहे. तक्रारीतील दाखल पुराव्यावरुन तक्रारदारांनी तीन कोटी पाच लाख एवढया रकमेवर प्रिमियमचा भरणा पॉलिसी घेतांना केला आहे. परंतु सामनेवाले यांचे चुकीमुळे प्लान्ट व मशिनरीचा उल्लेख पॉलिसीमध्ये केला नाही. सदरची बाब सामनेवाले यांना माहिती झाल्यानंतर चुकीची दुरुस्ती केली आहे. सर्व्हेअर यांनी सदरची बाब लक्षात न घेता अयोग्य पध्दतीने प्लान्ट व मशिनरी पॉलिसीमध्ये समाविष्ट नसल्याबाबत नमूद करुन त्याबाबतची तपासणी केली नाही ही बाब स्पष्ट होते. तक्रारदारांनी सदर घटनेमध्ये मशिनरीचे (salvage वगळून) रु. 94,193/- एवढया रकमेचे नुकसान झाल्याबाबत शपथपत्राद्वारे नमूद केले आहे. तक्रारदारांचा पुरावा ग्राहय धरणे अशा परिस्थितीत योग्य होईल असे मंचाला वाटते. सबब सामनेवाले यांनी तक्रारदारांना मशिनरीच्या नुकसान भरपाईपोटी रु. 94,193/- देणे उचित आहे असे मंचाचे मत आहे. सर्व्हेअर अहवालामध्ये तक्रारदारांनी स्टॉकबाबतची 14 बोगस बिले दाखल केल्यामुळे पॉलिसीच्या clause 8 नुसार नुकसान भरपार्इची रक्कम देता येत नाही असे नमूद केले आहे. परंतु सदर बिले “बोगस” कशी आहेत? याबाबत खुलासा केलेला नाही. तक्रारदारांनी सदर 14 बिले मंचात दाखल केली आहेत. सदर बिलांचे एकत्रितरित्या अवलोकन केले असता वस्तू (stock) पुरवठादार यांनी सामनेवाले यांना विक्री केल्याबाबतचे शपथपत्राद्वारे नमूद केले आहे. प्रत्यक्षात “Tax Invoice” खरेदी केल्याबाबतचे दाखल नाही. सर्व्हेअर यांनी संबंधीत पुरवठादार यांचेकडे “Tax Invoice” बाबत विचारणा केली किंवा काय? याबाबत खुलासा होत नाही. त्यामुळे सदर बिले बोगस आहेत हे पुराव्यानिशी सिध्द होत नाही. तसेच तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे सदर 14 बिलांबाबतचा प्रस्ताव मागे घेण्याबाबत अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सर्व्हेअर यांनी (Stock) बाबतची निश्चित केलेली नुकसान भरपाईची रक्कम रु. 13,40,000/- तक्रारदारांना अदा करणे योग्य आहे. परंतु सामनेवाले यांनी बिले बोगस असल्याबाबत सिध्द केलेले नसल्यामुळे पॉलिसीच्या clause 8 प्रमाणे तक्रारदारांचा विमा प्रस्ताव नामंजूर करणे अयोग्य आहे. सामनेवाले यांची सदरची कृती सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांना खालीलप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम देणे बंधनकारक आहे असे मंचाचे मत आहे.
1. | Loss of Stocks (As per report of surveyor) | 13,40,000/- | 2. | Loss of Building (As per report of surveyor) | 4,20,000/- | 3. | Loss of Plant & Machinery (claimed by Complainant but Not included in survey Report) | 94,193/- | | Total | 1854193/- |
तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्कम रु. 18,54,193/- सामनेवाले यांनी विहीत मुदतीत अदा न केल्यामुळे निश्चितच मानसिक त्रास झाला व तक्रार दाखल करावी लागली. सबब सामनेवाले यांनी मानसिक त्रासाची रक्कम रु. 25,000/- (पंचवीस हजार) व तक्रारीचा खर्च रु. 10,000/- (दहा हजार) तक्रारदारांना देणे न्यायोचित आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतोः आ दे श त क्र. 447/2011 अंशतः मंजूर करण्यात येते. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या विमा पॉलिसीमध्ये प्लान्ट व मशिनरी समाविष्ट असूनही नुकसान भरपाईची रक्कम दिली नाही, तसेच अयोग्य कारणास्तव तक्रारदारांचा विमा प्रस्ताव नामंजूर करुन त्रुटीची सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की तक्रारदारांना “Standard Fire & Special Peril Policy” अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम रु. 18,54,193/- तक्रार दाखल तारखेपासून म्हणजेच दि. 07/09/2011 पासून दि. 03/10/2015 पर्यंत 6% व्याज दराने दयावी. दि. 03/10/2015 पर्यंत न दिल्यास दि. 04/10/2015 पासून 9% व्याजदरासहीत दयावी. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु. 25,000/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार) व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु. 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) दि. 03/10/2015 पर्यंत दयावी. सदर रकमा विहीत मुदतीत अदा न केल्यास दि. 04/10/2015 पासून द.सा.द.शे. 9% व्याजदराने दयाव्यात. संचिकेच्या अतिरिक्त प्रती तक्रारदारांना परत करण्यात याव्यात. आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात. उभय पक्षांनीआदेशाची पूर्तता झाली/न झालेबाबतचे शपथपत्र दि. 03/10/2015 रोजी मंचात दाखल करावे.
| |