Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/13/123

श्रीमती सरला वि.काशीनाथ बांडबुचे - Complainant(s)

Versus

द न्‍यु इडिया अशुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे डिव्‍हीजनल मॅनेजर श्री.मोहन दिगंबर लिमये व इतर 2 - Opp.Party(s)

उदय क्षिरसागर

25 Feb 2014

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/13/123
 
1. श्रीमती सरला वि.काशीनाथ बांडबुचे
रा.प्‍लॉट नं. 30 श्रीकृष्‍ण नगर, वाठोडा ले आऊट, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. द न्‍यु इडिया अशुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे डिव्‍हीजनल मॅनेजर श्री.मोहन दिगंबर लिमये व इतर 2
डिव्‍हीजनल ऑफीस न. 130800,न्‍यु इंडिया सेंटर, 7 वा माळा 17/ए कुपरेज रोड, मुंबई - 40039
मुंबई
महाराष्‍ट्र
2. कबाल इन्‍शुरंन्‍स ब्रोकिंग सर्व्‍हीसेस लिमीटेड तर्फे श्री.संदीप विष्‍णुपंत खैरनार
स्‍मृती बिल्‍डींग,दुसरा माळा ,प्‍लॉट नं. 375,गांधीनगर नॉर्थ अंबाझरी रोड, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
3. मा.कृषी अधिकारी भिवापुर
ता.भिवापूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Manohar G.Chilbule PRESIDENT
 HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
PRESENT:उदय क्षिरसागर, Advocate for the Complainant 1
 
ORDER

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्‍य  )

(पारीत दिनांक 25 फेब्रुवारी, 2014)

 

1.     तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्‍वये तिचे पती मृतक विमाधारक शेतकरी श्री काशीनाथ नारायणराव बांडबुचे याचे अपघाती मृत्‍यू संबधाने विधवा पत्‍नी या नात्‍याने शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्‍दपक्षा कडून विमा रक्‍कम  मिळण्‍यासाठी दाखल केली आहे.

2.    तक्रारकर्तीचे कथन थोडक्‍यात येणे प्रमाणे-

      तक्रारकर्तीचे मृतक पती श्री काशीनाथ नारायणराव बांडबुचे यांचे मालकीची मौजा मोखाळा, तालुका भिवापूर, जिल्‍हा नागपूर येथे सर्व्‍हे                    क्रं-121/3 शेती आहे आणि शेतीतील उत्‍पन्‍नावर तक्रारकर्तीचे पती कुटूंबाचे पालनपोषण करीत होते.

      तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, यातील विरुध्‍दपक्ष क्रं-1             दि न्‍यु इंडीया एश्‍युरन्‍स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीकडे, महाराष्‍ट्र शासना तर्फे विरुध्‍दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, भिवापूर तालुका भिवापूर, जिल्‍हा नागपूर यांचे मार्फतीने शेतक-यांचा अपघाती विमा उतरविलेला आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-2 कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड ही शेतक-यांचे अपघात विमा दाव्‍यांची छाननी करुन विमा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीकडे सादर करण्‍यासाठी नियुक्‍त केलेली सल्‍लागार कंपनी आहे.

      तक्रारकर्तीचे पती श्री काशीनाथ नारायणराव बांडबुचे हे ऑल्‍टो या चारचाकी गाडीने नागपूर-भिवापूर रोडवर जात असताना समोरुन   बसने धडक दिल्‍याने जख्‍मी होऊन जागीच मृत्‍यू पावले.

 

 

      तक्रारकर्तीने तिचे पती  श्री काशीनाथ नारायणराव बांडबुचे यांचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीकडे दि.26.11.2012 रोजी, विरुध्‍दपक्ष  क्रं-3 तालुका कृषी अधिका-या मार्फत विमा प्रस्‍ताव सादर केला. सदर प्रस्‍तावा सोबत आवश्‍यक सर्व दस्‍तऐवज जोडले असताना देखील विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दि.27.05.2013 रोजीचे पत्राव्‍दारे  गाव नमुना-6-ड पुरविला नसल्‍याचे कारण दर्शवून विमा दावा फेटाळला व तक्रारकर्तीस दोषपूर्ण सेवा दिली.

      म्‍हणून तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली असून त्‍याव्‍दारे शेतकरी अपघात विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-1,00,000/- विरुध्‍दपक्षाकडे विमा प्रस्‍ताव दाखल दिनांक-26.11.2012 पासून द.सा.द.शे.18% दराने व्‍याजासह मिळावी तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-20,000/- आणि तक्रारखर्च म्‍हणून           रुपये-10,000/- विरुध्‍दपक्षा कडून मिळावे अशा मागण्‍या केल्‍यात.

 

 

03.   विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने मंचा समक्ष दि.13.11.2013 रोजी लेखी उत्‍तर दाखल करुन, तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे. तक्रारकर्तीचे पती हे ऑल्‍टो या चारचाकी गाडीने नागपूर भिवापूर रोडवर जात असताना समोरुन बसने धडक दिल्‍याने जख्‍मी होऊन मरण पावले आहेत.  अशास्थितीत तक्रारकर्तीने तिचे पतीचा वाहन परवाना दाखल केला नसल्‍यामुळे तक्रार मंजूर होण्‍यास पात्र नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 3  च्‍या मार्फतीने तक्रारकर्तीचा विमा दावा  वि.प.क्रं 1 विमा कंपनीस प्राप्‍त झाल्‍या नंतर विमा दाव्‍या संबधीचे प्रस्‍तावाची छाननी केली असता गाव नमुना-6-ड दस्‍तऐवजाची पुर्तता केली नसल्‍याचे आढळून आले, त्‍यानुसार  पुर्तता करण्‍यास सुचित करुनही पुर्तता केली नसल्‍याने तक्रारकर्तीचा विमा दावा खारीज करण्‍यात आला. तसेच तक्रारकर्तीने मृतक पतीचे जन्‍माचा दाखला सुध्‍दा सादर केलेला नाही. सदर दस्‍तऐवज विमा दाव्‍यासाठी आवश्‍यक असताना सुध्‍दा तक्रारकर्तीने दखल घेतली नाही म्‍हणून तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दि.12.02.2013 रोजीचे पत्र पाठवून दस्‍तऐवजाची पुर्तता करण्‍यास सुचित केले परंतु तक्रारकर्तीस पुरेसा वेळ देऊनही तिने दस्‍तऐवजांची पुर्तता केली नसल्‍याने विमा दावा फेटाळण्‍यात आला. शेतकरी अपघात विमा योजनेतील पॉलिसीचा कालावधी हा दि.15.08.2011 ते 14.08.2012 असा होता आणि पॉलिसी संपल्‍या पासून 90 दिवसांचे आत म्‍हणजे दि.14.11.2012 पर्यंत दावा दाखल करणे  आवश्‍यक  होते  परंतु  विहित  मुदतीत  विमा  दावा  दाखल केलेला

 

 

 

नसल्‍यामुळे तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. वस्‍तुतः विमा दाव्‍या प्रमाणे आवश्‍यक दस्‍तऐवजांची पुर्तता झालेली आहे किंवा नाही हे बघण्‍याचे काम विरुध्‍दपक्ष क्रं 2 आणि विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांचे असताना त्‍यांनी त्‍यांची कर्तव्‍ये योग्‍य रितीने पार पाडलेली नाहीत. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दावा मिळाल्‍या पासून 60 दिवसात कार्यवाही करणे बंधनकारक आहे, त्‍यांनी त्‍यांचे कार्य चोखपणे बजावलेले आहे. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीस दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. वि.प.क्रं 1 विमा कंपनी विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी.

 

 

04.   वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तर सादर केले. त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, शेतक-यांचा विमा दावा विमा कंपनीकडे छाननी करुन पाठविण्‍यासाठी ते शासनाला विनामोबदला मदत करतात, यासाठी त्‍यांना कोणताही मोबदला मिळत नाही. त्‍यामुळे विमा दाव्‍या संबधाने कोणतीही रक्‍कम देण्‍याची त्‍यांची कोणतीही कायदेशीर जबाबदारी नाही. आपल्‍या म्‍हणण्‍याचे समर्थनार्थ त्‍यांनी मा.महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग खंडपिठ औरंगाबाद यांनी प्रथम अपिल क्रं-1114/2008 विभाग प्रमूख कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीस प्रायव्‍हेट लिमिटेड विरुध्‍द- श्रीमती सुशिला भीमराव सोनटक्‍के या प्रकरणात दि.16.03.2009 रोजी पारीत केलेल्‍या आदेशाची प्रत दाखल केली आहे. सदर आदेशा मध्‍ये  वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड यांचे विरुध्‍द शेतक-यास अपघात विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍याची कोणतीही जबाबदारी येत नाही असे नमुद केलेले आहे. म्‍हणून वि.प.क्रं 2 विरुध्‍दची तक्रार खारीज करावी, अशी विनंती त्‍यांनी केली आहे.

      विरुध्‍दपक्ष क्रं-2 यांनी पुढे असे नमुद केले की, मृतक विमाधारक शेतकरी श्री  काशिनाथ नारायणराव बांडबुचे, गाव प्‍लॉट नं.30, श्रीकृष्‍ण नगर, वाठोडा ले आऊट, नागपूर  यांचा अपघाती मृत्‍यू दि.25.05.2012 रोजी झाला. त्‍याचे अपघाती  मृत्‍यू  संबधाने  विमा  दावा  प्रस्‍ताव  हा  जिल्‍हा  अधिक्षक, कृषी अधिकारी, नागपूर मार्फत वि.प.क्रं 2 कबाल नागपूर कार्यालयास दि.18.12.2012 रोजी अपूर्ण प्राप्‍त झाला. सदर विमा प्रस्‍ताव पुढे त्‍यांनी वि.प.क्रं 1 न्‍यु इंडीया इन्‍शुरन्‍स कंपनीला दि.27.12.2012 रोजी पाठविला असता सदर विमा प्रस्‍ताव वि.प.क्रं 1 विमा कंपनीने दि.27.05.2013 रोजीचे पत्रान्‍वये आवश्‍यक दस्‍तऐवजाची पुर्तता न झाल्‍याचे कारणावरुन नामंजूर केला व तसे वारसदारास कळविले.

 

 

 

 

05.  विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, भिवापूर यांनी                   लेखी उत्‍तर न्‍यायमंचा समक्ष दाखल केले. त्‍यांचे लेखी उत्‍तरा नुसार सदर तक्रार सन-2011-12 मधील असून मृतक विमाधारक शेतक-याचा अपघात दि.25.05.2012 रोजीचा आहे. मृतक विमाधारकाचे अपघाती मृत्‍यू संबधाने विमा प्रस्‍ताव वि.प.क्रं 3 कार्यालयाने जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांचेकडे  त्‍यांचे कार्यालयीन पत्र क्रं-2103 अन्‍वये दि.07.12.2012 रोजी सादर केला. वि.प.क्रं 3 यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍यरितीने पार पाडलेले आहे त्‍यामुळे त्‍यांनी तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही म्‍हणून त्‍यांना मुक्‍त करण्‍यात यावे, अशी विनंती विरुध्‍दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, भिवापूर, जिल्‍हा नागपूर यांनी केली.

 

 

06    तक्रारकर्तीने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार दस्‍तऐवजाच्‍या               प्रती   सादर केल्‍यात, ज्‍यामध्‍ये शेतकरी अपघात विमा योजना शासन निर्णय,

वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळल्‍याचे पत्र, विमा दावा प्रस्‍ताव,  तक्रारकर्तीचे मृतक पतीचे नावाचा शेतीचा 7/12 उतारा प्रत,  फेरफार पत्रक, , गाव नमुना-6-क, गावनमुना-8-अ, तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने एफ.आय.आर., घटनास्‍थळ पंचनामा,इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र तसेच तक्रारकर्तीचे पतीचा वाहन परवाना, तक्रारकर्तीचे पतीचे शेताचे खरेदीपत्र , पतीचे निवडणूक ओळखपत्र, अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती सादर केल्‍यात. तक्रारकर्तीने आपले शपथपत्र सादर केले. तसेच लेखी युक्‍तीवाद सादर केला.

 

 

07.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने  आपले प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्‍तर मंचा समक्ष सादर केले. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने लेखी युक्‍तीवाद सादर केला. तसेच विमा योजने संबधी त्रिपक्षीय कराराची प्रत सादर केली.

 

08.   वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस तर्फे महाराष्‍ट्र शासनाचे राजपत्र, मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांचे निर्णयाची प्रत, वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे दावा फेटाळल्‍याचे पत्र अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात.

 

09.   विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांनी लेखी उत्‍तरा सोबत कोणतेही दस्‍तऐवज दाखल केले नाहीत.

 

 

 

 

 

 

10.   प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्ती तर्फे वकील श्री क्षिरसागर आणि            वि.प.क्रं 1 विमा कंपनी तर्फे  वकील श्री लिमये यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

11.   तक्रारकर्ती आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी यांचे परस्‍पर विरोधी कथना वरुन खालील मुद्दे मंचाचे विचारार्थ घेण्‍यात आले.

 

           मुद्दा                                 उत्‍तर

(1)   वि.प.क्रं 1 विमा कंपनीने,

      तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर

      करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे काय?................... होय.

(2)   काय आदेश?......................................................तक्रार अंशतः मंजूर.

 

 

 

::  कारण मिमांसा व निष्‍कर्ष    ::

मुद्दा क्रं-1 व 2-

12.    तक्रारकर्तीचे मृतक पती व विमाधारक शेतकरी श्री काशीनाथ नारायणराव बांडबुचे यांचा दि.25.05.2012 रोजी उमरेड वरुन भिवापूर येथे येत असताना ट्रॅव्‍हल्‍सने धडक दिल्‍याने जख्‍मी होऊन मृत्‍यू झाला. तक्रारकर्तीने तिचे मृतक पती श्री काशीनाथ नारायणराव बांडबुचे   यांचे  अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीकडे दि.26.11.2012 रोजी, विरुध्‍दपक्ष  क्रं-3 तालुका कृषी अधिका-या मार्फत विमा प्रस्‍ताव सादर केला. तक्रारकर्तीने विमा प्रस्‍तावा सोबत तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने शपथत्र, मृतकाचे नावाचा 7/12 उतारा प्रत, गाव नमुना-6-क, फेरफार पत्रक, गाव नमुना-8-अ, पतीचे खरेदी खत, निवडणूक ओळखपत्र तसेच पोलीस दस्‍तऐवज ज्‍यामध्‍ये एफ.आय.आर., घटनास्‍थळ पंचनामा, मरणान्‍वेषण प्रतिवृत्‍त, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र  सादर केलेले आहेत, ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने (विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनी" म्‍हणजे               दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे डिव्‍हीजनल मॅनेजर, डिव्‍हीजनल ऑफीस मुंबई असे समजण्‍यात यावे) नाकारलेली नाही.

 

13.    प्रकरणातील उपलब्‍ध एफ.आय.आर. व घटनास्‍थळ पंचनाम्‍या वरुन मृतक विमाधारक शेतकरी श्री काशीनाथ नारायणराव बांडबुचे हे त्‍यांचे मित्र


 

 

श्री किशोर उगदे सोबत दि.25.05.2012 रोजी त्‍यांचे ऑल्‍टो गाडी क्रं-MH-31-CN-566 ने नागपूर वरुन भिवापूर येथे येत असताना भिवापूर कडून येणारी ट्रॅव्‍हल्‍स क्रं-MH-34-A/8413 ने समोरुन धडक दिल्‍याने ग्रामीण रुग्‍णालय भिवापूर येथे उपचारा दरम्‍यान दोघांचा मृत्‍यू झाल्‍याचे नमुद आहे. वैद्दकीय अधिकारी, भिवापूर, जिल्‍हा नागपूर यांचे दि.25.05.2012 रोजीचे शवविच्‍छेदन अहवालामध्‍ये सुध्‍दा मृतकाचा मृत्‍यू हा अपघातामुळे डोक्‍यास लागलेल्‍या दुखापतीमुळे  (Head Injury due to Road Traffic Accident) झाल्‍याचे नमुद आहे. थोडक्‍यात मृतक विमाधारकाचा विमा, विम्‍याचे कालावधीत त्‍याचा झालेला अपघाती मृत्‍यू या बाबी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस मान्‍य आहेत व त्‍या संबधाने विवाद नाही.

 

14.    प्रस्‍तुत प्रकरणामधील विवाद अत्‍यंत संक्षीप्‍त स्‍वरुपाचा आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा नुसार तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष            क्रं 3 मार्फतीने विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह सादर केला व तो त्‍यांना प्राप्‍त झाल्‍याची बाब  मान्‍य आहे. परंतु विमा दाव्‍या संबधी प्रस्‍तावाची छाननी केली असता त्‍या संबधाने आवश्‍यक दस्‍तऐवजांची पुर्तता तक्रारकर्तीने केली नसल्‍याचे आढळून आले. त्‍यावरुन वि.प.क्रं 1 विमा कंपनीने दि.12.02.2013 रोजी पत्र कृषी आयुक्‍त कार्यालयास पाठवून त्‍याव्‍दारे फॉर्म-6-ड ची मागणी विमा दावा निश्‍चीतीसाठी केली. परंतु अशी विनंती करुनही कृषी आयुक्‍त कार्यालयाने दस्‍तऐवजाची पुर्तता केली नसल्‍याने वि.प.क्रं 1 विमा कंपनीने कृषी आयुक्‍त कार्यालय पुणे यांना दि.27.05.2013 रोजीचे पत्रान्‍वये विमा दावा नामंजूर केल्‍या बाबत कळविले.

 

   

15.      या संदर्भात मंचा तर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, मृतक विमाधारक             श्री काशीनाथ नारायणराव बांडबुचे यांचा अपघाती मृत्‍यू दि.25.05.2012 रोजीचा आहे. तक्रारकर्तीने तिचा मृतक पतीचे अपघाती संबधाने आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा दावा वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे सादर करण्‍यासाठी, वि.प.क्रं 3 यांचेकडे दि.26.11.2012 रोजी सादर केल्‍याचे नमुद केले आहे.  तक्रारकर्तीने पतीचे मृत्‍यू नंतर जवळपास 06 महिन्‍या नंतर वि.प.क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचेकडे विमा दावा सादर केला. 

 

 

 

 

 

 

 

 

       विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी भिवापूर तालुका भिवापूर जिल्‍हा नागपूर  यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तरामध्‍ये त्‍यांचे  कार्यालयीन पत्र            जा.क्रं-ता.क.अ./शे.ज.अ.वि.-2103 दि.07.12.2012 अन्‍वये जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांचेकडे मृतक विमाधारक शेतकरी श्री काशीनाथ नारायणराव बांडबुचे यांचे अपघाती मृत्‍यू विमा सादर केल्‍याचे नमुद केले आहे.

       विरुध्‍दपक्ष क्रं-2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस नागपूर तर्फे लेखी उत्‍तरामध्‍ये  मृतक विमाधारक शेतकरी श्री  काशिनाथ नारायणराव बांडबुचे, यांचा अपघाती मृत्‍यू दि.25.05.2012 रोजी झाला. त्‍याचे अपघाती   मृत्‍यू  संबधाने  विमा  दावा  प्रस्‍ताव  हा  जिल्‍हा  अधिक्षक, कृषी अधिकारी, नागपूर मार्फत वि.प.क्रं 2 कबाल नागपूर कार्यालयास दि. 18.12.2012 रोजी अपूर्ण प्राप्‍त झाला. सदर विमा प्रस्‍ताव पुढे त्‍यांनी वि.प.क्रं 1 न्‍यु इंडीया इन्‍शुरन्‍स कंपनीला दि.27.12.2012 रोजी पाठविला असता सदर विमा प्रस्‍ताव वि.प.क्रं 1 विमा कंपनीने दि.27.05.2013 रोजीचे पत्रान्‍वये आवश्‍यक दस्‍तऐवजाची पुर्तता न झाल्‍याचे कारणावरुन नामंजूर केला व तसे वारसदारास कळविले.

      विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा नुसार शेतकरी अपघात विमा योजनेतील पॉलिसीचा कालावधी हा दि.15.08.2011 ते 14.08.2012 असा होता आणि पॉलिसी संपल्‍या पासून 90 दिवसांचे आत म्‍हणजे दि.14.11.2012 पर्यंत दावा दाखल करणे आवश्‍यक होते. त्‍यांनी  दि.12.02.2013 रोजीचे पत्र कृषी आयुक्‍तालय, पुणे यांना पाठवून दस्‍तऐवजाची पुर्तता करण्‍यास सुचित केले परंतु पुरेसा वेळ देऊनही दस्‍तऐवजांची पुर्तता केली नसल्‍याने वि.प.क्रं 1 विमा कंपनीने कृषी आयुक्‍त कार्यालय पुणे यांना दि.27.05.2013 रोजीचे पत्रान्‍वये विमा दावा नामंजूर केल्‍या बाबत कळविले.

 

16.     मंचा तर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, दि.25.05.2012 रोजी झालेला अपघाती मृत्‍यू हा शेतकरी अपघात योजनेचे अगदी शेवटचे कालावधीत झालेला असल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्तीने आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा दावा   वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे सादर करण्‍यासाठी, वि.प.क्रं 3 यांचेकडे दि.26.11.2012 रोजी सादर केल्‍याचे नमुद केले आहे. अपघाती मृत्‍यू झाल्‍या नंतर पॉलिसी संपल्‍याचे म्‍हणजे दि.14.08.2012 पासून 90 दिवसांचे आत म्‍हणजे दि.14.11.2012 पर्यंत संपूर्ण दस्‍तऐवजांसह विमा दावा विरुध्‍दपक्ष            क्रं 1 विमा कंपनीचे कार्यालयात सादर करणे अशक्‍यप्राय आहे कारण एक तर अपघाती मृत्‍यू मधून सावरल्‍या नंतर योजनेची माहिती झाल्‍या नंतर आवश्‍यक दस्‍तऐवज गोळा करुन विमा दावा प्रस्‍ताव प्रथमतः तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सादर करणे व त्‍यानंतर अधिक्षक कृषी अधिकारी यांचे मार्फतीने कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचेकडे सादर करणे व त्‍यानंतर आवश्‍यक दस्‍तऐवजांची पुर्तता कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचे तर्फे संबधित शेतक-यांकडून करवून घेऊन नंतर सदर विमा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे पाठविणे यात बराच कालावधी खर्ची होत असतो.

        या संदर्भात तक्रारकर्तीने आपले प्रतिज्ञालेखावरील तक्रारीमध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नामंजूर करण्‍यापूर्वी तक्रारकर्तीकडे गाव नमुना-6-ड ची मागणी केली असती व अशी मागणी तिच्‍याकडे करुनही तिने त्‍याची पुर्तता केली नसती तर विमा दावा नामंजूर करणे योग्‍य होते. मंचा तर्फे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे तक्रारकर्तीचे विमा दावा फेटाळल्‍याचे पत्राच्‍या प्रतीचे अवलोकन केले असता, वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे विमा दावा फेटाळल्‍याचे पत्र दि.27 मे, 2013 रोजीचे असून ते आयुक्‍त कृषी, महाराष्‍ट्र शासन, पुणे यांना लिहिलेले असून पत्राची प्रत विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस मुंबई यांना दिलेली आहे.  यावरुन तक्रारकर्तीचे म्‍हणणे की, तिचे कडे गाव नमुना-6-ड ची मागणीच करण्‍यात आली नाही या विधानास बळकटी प्राप्‍त होते. विरुध्‍दपक्ष क्रं-2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस नागपूर यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तरात श्री काशीनाथ नारायणराव बांडबुचे यांचे अपघाती   मृत्‍यू  संबधाने  विमा  दावा  प्रस्‍ताव  हा  जिल्‍हा  अधिक्षक, कृषी अधिकारी, नागपूर मार्फत वि.प.क्रं 2 कबाल नागपूर कार्यालयास               दि. 18.12.2012 रोजी अपूर्ण प्राप्‍त झाला. सदर विमा प्रस्‍ताव पुढे त्‍यांनी वि.प.क्रं 1 न्‍यु इंडीया इन्‍शुरन्‍स कंपनीला दि.27.12.2012 रोजी पाठविला. वस्‍तुतः अपूर्ण प्रस्‍तावातील त्रृटी काढून योग्‍य प्रस्‍ताव सादर करण्‍याचे कार्य विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स यांचे आहे.

 

17.     उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थिती असताना विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने  विमा दाव्‍याचे निश्‍चीती संबधाने आवश्‍यक दस्‍तऐवजाचे मागणी बाबत  तक्रारकर्तीशी कोणताही पत्रव्‍यवहार न करता मृतक विमाधारक  श्री काशीनाथ नारायणराव बांडबुचे यांचा फॉर्म-6-ड सादर न केल्‍याचे कारणावरुन विमा दावा नामंजूर केल्‍या बाबत कृषी आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासन, पुणे यांना                     त्‍यांचे दि.27 मे, 2013 रोजीचे पत्रान्‍वये कळविले. सदर पत्राची प्रत सुध्‍दा तक्रारकर्तीस दिली नसल्‍याचे त्‍यावरुन दिसून येते. विमाधारक श्री काशीनाथ नारायणराव बांडबुचे यांचे अपघाती मृत्‍यू संबधीचा विमा दावा वि.प.क्रं 1 विमा कंपनीने नामंजूर करुन तक्रारकर्तीस दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब पूर्णतः           सिध्‍द होते. मंचा तर्फे विशेषत्‍वाने नमुद करण्‍यात येते की, मृतकाचे शेती

 

संबधीचे दस्‍तऐवज 7/12 उतारा, गाव नमुना-6-क, फेरफार पत्रक इत्‍यादी दस्‍तऐवज सादर केले असताना केवळ गाव नमुना-6-ड सादर न केल्‍यामुळे संपूर्ण विमा दावा खारीज करणे ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची कृती योग्‍य वाटत नाही कारण गाव नमुना-6-ड दस्‍तऐवज हा एक शेतीची मालकी दर्शविणारा एक सहाय्यकारी दस्‍तऐवज आहे.

 

 

18.   सन-2011-12 या वर्षासाठी शेतकरी अपघात विमा योजना                 ही दि.15 ऑगस्‍ट, 2011 ते 14 ऑगस्‍ट, 2012 या 01 वर्षाचे कालावधीसाठी

होती. प्रकरणातील उपलब्‍ध शेती /पोलीस विभागाचे दस्‍तऐवजां वरुन मृतक विमाधारक श्री काशीनाथ नारायणराव बांडबुचे हे शेतकरी होते व त्‍याचा विमा कालावधीत दि.25.05.2012 रोजी अपघाती मृत्‍यू झाल्‍याची बाब पूर्णतः           सिध्‍द होते. त्‍यामुळे  मृतकाचे  वारसदार  म्‍हणून तक्रारकर्ती विधवा पत्‍नी या नात्‍याने विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र असल्‍याने वि.प.क्रं-1 विमा कंपनी कडून शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रुपये-1,00,000/- नुकसान भरपाई आणि त्‍यावर विमा प्रस्‍ताव नाकारल्‍याचे दिनांका पासून म्‍हणजे दि.27.05.2013 पासून द.सा.द.शे.9% दराने व्‍याज यासह मिळण्‍यास पात्र आहे. या शिवाय विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा दस्‍तऐवज नमुना-6-ड ची  पुर्तते संबधाने तक्रारकर्तीशी कोणताही पत्रव्‍यवहार न करता नामंजूर केला. विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीस निश्‍चीतच शारीरीक व मानसिक त्रास झाल्‍याची बाब सिध्‍द होत असल्‍यामुळे तक्रारकर्ती विरुध्‍दपक्ष  क्रं 1 विमा कंपनी कडून शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि आणि तक्रारखर्च म्‍हणून               रुपये-5000/- मिळण्‍यास पात्र आहे. म्‍हणून मुद्दा  क्रं 1 व 2 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविलेले असून मंचा तर्फे प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो.

                                             

           

                   ::आदेश::

तक्रारकर्तीची तक्रार खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

1)    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी  

      तक्रारकर्तीस तिचे मृतक पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी

      व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्‍कम रुपये-1,00,000/-

      (अक्षरी रुपये एक लक्ष फक्‍त ) दिनांक-27.05.2013 पासून रकमेच्‍या

      प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9%  दराने व्‍याजासह द्दावी.

 

 

 

 

2)    तक्रारकर्तीस झालेल्‍या  शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल

      रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) आणि तक्रारीचे खर्चा

      बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) वि.प.क्रं 1 विमा

      कंपनीने तक्रारकर्तीस द्दावेत.

3)    विरुध्‍दपक्ष क्रं- 2 व क्रं-3 यांना सदर तक्रारीतून मुक्‍त करण्‍यात येते.

4)    सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदर

      निकालपत्राची प्रत प्राप्‍त झाल्‍या पासून 30 दिवसाचे आत करावे..

5)    निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व  पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

      देण्‍यात यावी.

             

 

 
 
[HON'ABLE MR. Manohar G.Chilbule]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.