Maharashtra

Thane

CC/11/354

श्री राघवेन्‍द्र रंगनाथ गलगली - Complainant(s)

Versus

द चेअरमन, ओम तिरूती दर्शन कॉ ऑप हौ सो लि. - Opp.Party(s)

ए बि जहागिरदार

09 Oct 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/11/354
 
1. श्री राघवेन्‍द्र रंगनाथ गलगली
C-3, Om Trimurti Darshan CHS Ltd., Thakurwadi, Dombivli(w), Thane-421202.
...........Complainant(s)
Versus
1. द चेअरमन, ओम तिरूती दर्शन कॉ ऑप हौ सो लि.
Flat No.A-26, Thakurwadi, Dombivli(w), Thane-421202.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 न्‍यायनिर्णय   

               (द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्‍य)

 

  1. सामनेवाले ही डोंबिवली येथील सहकारी गृहनिर्माण संस्‍था आहे. तक्रारदार सदर संस्‍थेचे सदस्‍य आहेत. तक्रारदारांनी सामनेवालेकडून मागितलेली माहिती सामनेवाले यांनी न दिल्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.

  2. तक्रारदारांच्‍या तक्रारीमधील कथनानुसार त्‍यांनी सामनेवाले यांजकडून 1992 ते 1996 या कालावधीमध्‍ये सामनेवाले सोसायटीच्‍या नांवे सिंकिंग फंड खात्‍यामध्‍येकिती रक्‍कम जमा आहे याबाबतची माहिती मागितली असता इतक्‍या जुन्‍या कालावधीची माहिती प्राप्त होण्‍यामध्‍ये अडचण असल्‍याने सदर प्रकरण पुढील अतिरिक्‍त सर्वसाधारण सभेमध्‍ये याबाबत योग्‍य निर्णय घेण्‍यासाठी ठेवण्‍यात आले. परंतु पुढील सभेमध्‍ये निर्णय घेण्‍याऐवजी तक्रारदारांनी मागितलेली माहिती ही सामनेवाले यांच्‍या अंतर्गत कारभारामध्‍ये हस्‍तक्षेप करण्‍यासारखी असल्‍याने ती नाकारली, शिवाय सामनेवाले यांनी स्‍ट्रक्‍चरल रिपेअर या नांवाखाली रु. 500/- प्रमाणे 24 महिने अवैधपणे वसूल केलेली रक्‍कम रु. 12,000- पर‍त मिळावी अशी मागणी केली. याबाबत सामनेवाले यांनी कोणतीही कार्यवाही न केल्‍याने त्‍यांना कायदेशीर नोटीस देण्‍यात आली. परंतु सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्‍याने, प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन 1992 ते 1996 दरम्‍यान सिंकिंग फंडमध्‍ये किती रक्‍कम जमा होती याबाबत माहिती मिळावी, तसेच, तक्रारदाराकडून वसूल केलेली रु. 12,000/- ही रक्‍कम परत मिळावी व न्‍यायिक खर्चाबद्दल रु. 30,000/- मिळावेत अशा मागण्‍या केल्‍या आहेत.

  3. सामनेवाले यांनी लेखी कैफियत दाखल करुन तक्रारदाराचे आक्षेप फेटाळतांना असे नमूद केले की, 1992 ते 1996 दरम्‍यान सिंकिंग फंडामध्‍ये जमा केल्‍या जाणा-या रकमेबाबत 1992 ते 1996 या कालावधीदरम्‍यान तक्रारदारांची कोणतीही तक्रार नव्‍हती. तथापि अचानक 2011 मध्‍ये तक्रार दाखल केली, शिवाय 2006 ते दि. 2009 दरम्‍यान तक्रारदारांचा मुलगा संस्‍थेचे सचिव असतांना दरमहा रु. 500/- प्रमाणे इमारत दुरुस्‍तीसाठी 2 वर्षे रक्‍कम रु. 12,000/- प्रत्‍येक सदस्‍याकडून वसूल केली. तथापि याबाबत तक्रार 2011 मध्‍ये दाखल करण्‍यात आली. कारण वर्ष 2011 मध्‍ये तक्रारदार व त्‍यांच्‍या मुलाने सर्व सदनिका धारकांकडून खरेदीखत करुन देण्‍याच्‍या सबबीखाली वसूल केलेली रक्‍कम सामनेवाले यांनी परत मागितली असता, तक्रारदारांनी ही प्रति तक्रार दाखल केली आहे. यानंतरही तक्रारदारांनी सामनेवालेविरुध्‍द जाहिर पत्रके काढून त्‍यांना बदनाम करणे चालूच ठेवले. शिवाय, तक्रारदार व त्‍यांच्‍या मुलाने सर्वसाधारण मिटींगचे व्हिडीओ रेकॉर्डींग करणे व सामनेवाले यांना बदनाम करणे चालूच ठेवले. सामनेवाले यांचे संस्‍थेमध्‍ये एकूण 95 सदस्‍य असून सर्व सदस्‍यांकडून रु. 500/- प्रमाणे सर्वसाधारण मिटींगमध्‍ये मंजूर केलेल्‍या ठरावानुसार 24 महिने रु. 11.40 लाख जमा केले. इमारतीच्‍या रुफिंग रिपेअरसाठी रु. 8,97,536/- इतका व स्‍ट्रक्‍चरल रिपेअरसाठी रु. 12,92,634/- म्‍हणजे एकूण रु. 21,10,170/- इतका खर्च झाला. सर्व सदस्‍यांकडून प्रतिमाह रु. 500/- प्रमाणे वसूल केलेली रक्‍कम रु. 11.40 लाख ही अपुरी पडल्‍याने सिंकिंग फंडामधून उर्वरीत खर्च भागविण्‍यात आला. त्‍यासाठी आवश्‍यक ती संमती घेण्‍यास आली होती. तक्रारदार हे सर्व सदस्‍यांकडून हस्‍तांतरणपत्र करुन देण्‍याच्‍या आमिषाखाली प्रत्‍येकी रु. 3500/- प्रमाणे वसुली करण्‍याचा प्रयत्‍न करीत असून त्‍या बाबीस सामनेवाले यांनी विरोध केल्‍याने वसुल केलेली रक्‍कम सामनेवालेकडे जमा करण्‍यास फर्मावले असता तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार म्‍हणून दाखल केली असल्‍याने तक्रारदारांनी रु. 25,000/- कॉस्‍ट सामनेवाले यांना देण्‍याचे आदेश होऊन तक्रार फेटाळण्‍यात यावी.

  4. तक्रारदार व सामनेवाले यांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे वाचन मंचाने केले. शिवाय तोंडी युक्‍तीवादाचेवेळी सामनेवाले गैरहजर असल्‍याने तक्रारदारांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. त्‍यावरुन प्रकरणामध्‍ये खालीलप्रमाणे निष्‍कर्ष निघतातः

    1. तक्रारदार हे सामनेवाले संस्‍थेचे सदस्‍य असल्‍याबाबत व सदर सदस्‍याने सामनेवाले संस्‍थेच्‍या सिंकिंग फंडाची माहिती मागितल्‍याची बाब, तसेच रु. 500/- प्रतिमहिना प्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून रु. 12,000/- वसूल केलेली रक्‍कम सामनेवालेकडून परत मागितल्‍याची बाब सामनेवाले यांनी मान्‍य केली आहे.

      1. सामनेवाले यांचेनुसार, 1992 ते 1996 दरम्‍यान सिंकींग फंडामध्‍ये जमा असलेली रक्‍कम किती आहे ही माहिती प्रत्येक वर्षीच्‍या ताळेबंदपत्रकामध्ये दर्शविण्‍यात आलेली असते. तक्रारदार हे या कालावधीमध्‍ये काही काळ व्‍हाईस चेअरमन होते. त्‍यामुळे सिंकिंग फंडामध्‍ये किती रक्‍कम होती ही बाब त्‍यांना ज्ञात असतांना सामनेवाले यांना हेतुपरस्‍सर त्रास देण्‍यासाठी तक्रार दाखल केली आहे. सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदार हे 1995 मध्‍ये ऑन. व्‍हाईस चेअरमन या पदावर कार्यरत होते ही बाब स्‍पष्‍ट होते. सदर कालावधीमधील हिशोबाचे लेखा परिक्षण हे सहकारी कायदयातील तरतुदीनुसार करुन घेणे ही कमिटी मेंबर या नात्‍याने तत्‍कालीन जबाबदारी होती. सबब, तक्रारदार यांनी तत्‍कालीन हिशोबांचे लेखा परिक्षणाअंती सिंकींग फंडामध्‍ये किती रक्‍कम होती ही बाब तक्रारदारांना ज्ञात असणे ही त्‍यांची जबाबदारी होती.त्‍याच 16 वर्षांपूर्वीच्‍या माहितीसाठी तक्रारदारांनी या मंचापुढे तक्रार वर्ष 2011 मध्‍ये दाखल केली आहे ही बाब निश्चितच अस्‍पृहणीय आहे.

            यासंदर्भात सामनेवाले यांनी असेही कथन केले आहे की तक्रारदारांनी संस्‍थेच्‍या सर्व सदस्‍यांकडून भूखंड व इमारतीचे अभिहस्‍तांतरण करुन देण्‍याचे अमिष दाखवून बरीचशी रक्‍कम जमा केली होती. परंतु अभिहस्‍तांतरणपत्र करण्‍यासाठी त्‍यांनी कोणतीही कार्यवाही न केल्‍याने सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून सदरील रक्‍कम परत मागितली व त्‍याबाबीतून प्रस्‍तुत काऊंटर कम्‍प्‍लेट दाखल केली आहे. सामनेवाले यांच्‍या सदरील कथनासंदर्भात सामनेवाले यांनी दि. 08/02/2011 रोजी तक्रारदाराचा मुलगा प्रदीप गलगली यांना लिहिलेल्‍या पत्रामधील तपशिलानुसार, तक्रारदार व त्‍यांचा मुलगा यांनी अभिहस्‍तांरण पत्राच्‍या सबबीखाली सदस्‍यांकडून जमा केलेली रक्‍कम विशेष सर्वसाधारण सभा दि. 09/10/2010 मध्‍ये पारीत ठरावानुसार सामनेवाले यांनी दि. 08/02/2011 रोजीच्‍या पत्रानुसार परत मागितल्‍यानंतर 4 महिन्‍यांत म्‍हणजे दि. 28/06/2011 रोजी तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे. सदरील घटनाक्रमाचा सुसंगतपणे विचार केल्‍यास, तक्रारदारांनी सदरील तक्रार ही सामनेवाले यांनी मागणी केलेल्‍या रकमेस शह देण्‍यासाठी दाखल केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तथापि, तक्रारदारांना सिंकींग फंडामधील रकमेबाबत अजूनही कांही माहिती आवश्‍यक असल्‍यास, महाराष्‍ट्र सहकारी कायदयानुसार नेमलेल्‍या न्‍यायिक संस्‍थेकडे याबाबत दाद मागणे उचित होईल असे मंचाचे मत आहे.

         

  5. तक्रारदारांकडून माहे सप्‍टेंबर, 2008 पासून 24 महिने, रु. 500/- प्रतिमहिनाप्रमाणे इमारत दुरुस्‍तीसाठी वसुल केलेली रक्‍कम रु. 12,000/- तक्रारदारांनी परत करण्‍याची मागणी केली आहे.

  6. सामनेवाले यांनी यासंदर्भात दाखल केलेल्‍या दि. 24/08/2008 रोजीच्‍या विशेष सर्वसाधारण सभेच्‍या इतिवृत्‍ताच्‍या तपशिलाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की सिंकींग फंड रक्‍कमरु. 4.50 लाख ही गुंतवणूक मुदतीअंती, टेरेसचे छत दुरुस्‍ती करण्‍यासाठी तातडीची बाब असल्‍याने वापरण्‍यात आली व सिंकींग फंडाची रक्‍कम भरुन काढण्‍यासाठी प्रत्‍येक सदस्‍याकडून रु. 500/- प्रमाणे 24 महिने वसुली करण्‍यात आली. सदर ठराव हा तक्रारदाराचा मुलगा पी.आर. गलगली सचिव असतांना पारित केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. सदर वसुलीची बाब ही कायदयाने प्रस्‍थापित करावयाच्‍यासिंकींग फंडामध्‍येच जमा करण्‍यासाठी/पुर्नभरणा करण्‍यासाठी वापरण्‍यात आल्‍याने त्‍यामागे काही लेखा विषयक किंवा कायदेशीर त्रुटी असतील तर तक्रारदारांनी याबाबत महाराष्‍ट्र को.ऑप. सोसायटी अॅक्‍टनुसार नेमण्‍यात आलेल्‍या योग्‍य त्‍या न्‍यायिक संस्‍थेकडे दाद मागणे उचित व अधिक परिणामकारक होईल असे मंचाचे मत आहे

           उपरोक्‍त चर्चेनुरुप निष्‍कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

            आ दे श

 

  1. तक्रार क्र. 354/2011 खारीज करण्‍यात येत आहे.

  2. खर्चाबाबत आदेश नाही.

  3. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब/विनाशुल्‍क देण्‍यात याव्‍यात.

  4. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती असल्‍यास तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.           

     

    
 
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.