Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/13/34

सुरेश मारोती रोगे - Complainant(s)

Versus

दि.बँच मॅनेजर, दि नॅशनल इन्‍शुरंन्‍स कंपनी लि. - Opp.Party(s)

श्रीमती एन.जी. कोटगिरे

05 Mar 2014

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/13/34
 
1. सुरेश मारोती रोगे
रा. आलागोंडी पोस्‍ट- रामा बुटीबोरी
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. दि.बँच मॅनेजर, दि नॅशनल इन्‍शुरंन्‍स कंपनी लि.
बुटीबोरी ब्रँन्‍च तह.नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Manohar G.Chilbule PRESIDENT
 HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्‍य. )

(पारीत दिनांक-05 मार्च, 2014 )

01.   तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडून चोरीस गेलेल्‍या विमाकृत वाहनाची विमित रक्‍कम मिळावी व इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी  प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली मंचा समक्ष दाखल केली.

02.     तक्रारकर्त्‍याचे तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

        तक्रारकर्त्‍याने त्‍याचे मालकीची हिरो होंडा सी.डी.डिलक्‍स नोंदणी            क्रं-MH-40/H-1452 चा विमा विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी शाखा बुटीबोरी, नागपूर यांचे कडून कॉम्‍प्रेव्‍हेन्‍सीव्‍ह पॉलिसी क्रं-281106/31/09/6200000835 अन्‍वये दि.19.06.2009 ते 18.06.2010 या कालावधी करीता काढला होता. तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहन हिरो होंडा सी.डी.डिलक्‍स नोंदणी क्रं-MH-40/ H-1452 ची दि.15.09.2009 रोजी अज्ञात ईसमानी चोरी केली. या संबधाने पोलीस स्‍टेशन बोरी, नागपूर येथे दि.16.02.2010 रोजी एफ.आय.आर. नोंदविण्‍यात आला. परंतु तक्रारकर्त्‍याचे चोरी गेलेले विमाकृत वाहन आज पर्यंत मिळाले नाही. पोलीसांनी सुध्‍दा विमाकृत वाहना शोधूनही सापडले नसल्‍या बद्दल अंतिम अहवाल न्‍यायालयात सादर केला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडे दि.25.09.2009 रोजी विमा दावा प्रपत्र (MOTOR CLAIM FORM) सादर केले परंतु त्‍यावर वि.प.विमा कंपनीने कोणतीही कार्यवाही केली नाही म्‍हणून तक्रारकर्त्‍याने दि.18.02.2012 रोजी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस कायदेशीर नोटीस पाठविली परंतु उपयोग झाला नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनी विरुध्‍द मंचात प्रस्‍तुत तक्रार दाखल केली.

तक्रारकर्त्‍याची प्रार्थना-

1)     विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने कॉम्‍प्रेव्‍हेन्‍सीव्‍ह पॉलिसी नुसार

       मोटरसायकलची विमित रक्‍कम रुपये-23,100/- आणि त्‍यावर मोटर

       सायकल  चोरी गेल्‍याचा दिनांक-15.09.2009 पासून प्रत्‍यक्ष्‍य अदाई

       पावेतो व्‍याज  वि.प.विमा कंपनीने त.क.ला देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

 

 

 

2)    तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या मानसिक, शारिरीक त्रासा बद्दल रुपये-5000/-

       आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-5000/- विरुध्‍दपक्ष विमा

       कंपनीने त.क.ला देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

03.    विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने प्रतिज्ञालेखावरील उत्‍तर मंचा समक्ष सादर केले. वि.प.विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तरात नमुद केले की, तक्रारकर्त्‍याची विमाकृत मोटर सायकल क्रं- MH-40/H-1452 दि.15.09.2009 रोजी चोरीस गेल्‍याची बाब त्‍यांना मान्‍य नाही.  पोलीस दस्‍तऐवज एफ.आय.आर.मध्‍ये वाहन चोरीस गेल्‍याची दर्शविलेली तारीख चुकीची आहे आणि त्‍यासाठी तक्रारकर्ता जबाबदार नाही हे तक्रारकर्त्‍याचे विधान विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस मान्‍य नाही. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे मोटरसायकलचा विमा दि.19.06.2009 ते 18.06.2010 या कालावधी करीता वि.प.विमा कंपनीकडून काढला होता ही बाब त्‍यांना मान्‍य आहे.  तक्रारकर्त्‍याने दि.28.09.2010 रोजी जे विमा दावा प्रपत्र (MOTOR CLAIM FORM) विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे भरुन दिलेले आहे त्‍यामध्‍ये विमाकृत मोटरसायकल चोरीस गेल्‍याची घटना दि.15.09.2009 अशी नमुद केली आहे तर दुसरीकडे पोलीस दस्‍तऐवज एफ.आय.आर.मध्‍ये मोटरसायकल चोरीस गेल्‍याची घटना दि.01.02.2010 रोजी नमुद केलेली आहे.  यावरुन तक्रारकर्त्‍यास आपली मोटर सायकल नेमकी कोणत्‍या तारखेस चोरीस गेली? याची माहिती नाही.  यावरुन असा निष्‍कर्ष निघतो की, तक्रारकर्त्‍याची विमाकृत मोटर सायकल चोरीसच गेलेली नाही. म्‍हणून विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दि.24.11.2011 रोजीचे पत्रान्‍वये चुकीची माहिती दिल्‍या कारणा वरुन विमा दावा नाकारला. सदरचा विमा दावा नाकारण्‍यापूर्वी त्‍यांनी इन्‍व्‍हेस्‍टीगेटर मार्फत पूर्ण चौकशी केलेली आहे. सबब तक्रारकर्त्‍याचा विमा दावा खारीज करण्‍यात यावा अशी विनंती विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने केली.

 

04.      तक्रारकर्त्‍याने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत यादी नुसार दस्‍तऐवज दाखल केले, ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने एफ.आय.आर. दि.16.02.2010, घटनास्‍थळ पंचनामा दि.16.02.2010, अंतिम अहवाल नमुना, विमा पॉलिसी प्रत, रजिस्‍ट्रेशन पर्टीक्‍युलर्स, मोटर क्‍लेम फॉर्म दि.25.09.2009, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारल्‍याचे पत्र दि.24.11.2011, तक्रारकर्त्‍याने वि.प.विमा कंपनीस  पाठविलेली कायदेशीर नोटीस                    दि.28.02.2012 अशा दस्‍तऐवजांचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने शपथपत्र दाखल केले तसेच लेखी युक्‍तीवाद सादर केला.

 

 

 

05.      विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्‍तर सादर करण्‍यात आले. तसेच लेखी युक्‍तीवाद सादर करण्‍यात आला व मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निकालपत्राची प्रत सादर करण्‍यात आली.

 

06.     प्रस्‍तुत प्रकरणात विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे वकील श्री रायपुरे यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

07.      तक्रारकर्त्‍याची तक्रार, वि.प.विमा कंपनीचे लेखी उत्‍तर, प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले असता, न्‍यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्‍यावरील निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहेत-

              मुद्दा                             उत्‍तर

(1)      विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचे

         चोरीस गेलेल्‍या विमाकृत वाहनाचा दावा

         नाकारुन सेवेत त्रृटी ठेवली आहे काय?.............होय.

   (2)   अंतिम  आदेश काय ?................................ तक्रार अंशतः मंजूर

 

::कारण मिमांसा::

मु्द्दा क्रं 1 व 2 बाबत-

08.   तक्रारकर्त्‍याने त्‍याचे मालकीची हिरो होंडा सी.डी.डिलक्‍स नोंदणी              क्रं-MH-40/H-1452 चा विमा विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी शाखा बुटीबोरी, नागपूर यांचे कडे  पॉलिसी क्रं-281106/31/09/6200000835 अन्‍वये दि.19.06.2009 ते 18.06.2010 या कालावधीसाठी काढला होता, ही बाब विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस मान्‍य आहे.

09.     विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचा संक्षीप्‍त विवाद असा आहे की, तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे त्‍याची विमाकृत मोटर सायकल दि.15.09.2009 रोजी चोरीस गेल्‍याचे नमुद आहे व तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा  कंपनीकडे


 

 

जो विमा क्‍लेम फॉर्म (MOTOR CLAIM FORM) भरुन दिला त्‍यामध्‍ये सुध्‍दा चोरीचा दि.15.09.2009 असा नमुद केलेला आहे. याउलट पोलीस दस्‍तऐवज एफ.आय.आर.मध्‍ये गुन्‍हा नोंदविल्‍याचा दिनांक-16.02.2010 असून चोरीची घटना घडल्‍याचा दि.01.02.2010 नमुद केलेला आहे. यावर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहन नेमके कोणत्‍या तारखेस चोरीला गेले? ही बाब तक्रारकर्त्‍यास माहिती नाही. यावरुन असा निष्‍कर्ष निघतो की, तक्रारकर्त्‍याच्‍या विमाकृत वाहनाची चोरी झालेली नाही.

10.     विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे त्‍यांचे अधिवक्‍ता यांनी आपले म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ आदरणीय राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, नवी दिल्‍ली यांनी प्रथम अपिल क्रं 321/2005 मध्‍ये NEW INDIA ASSURANCE COMPANY LIMITED-V/S-TRILOCHAN JANE या प्रकरणात दि.09.12.2009 रोजी पारीत केलेल्‍या आदेशावर आपली भिस्‍त ठेवली. सदर अपिलीय प्रकरणात विमा कंपनीस वाहन चोरीस गेल्‍याची सूचना 09 दिवस उशिराने दिल्‍याने  विमा पॉलिसीतील अट क्रं 1 चा भंग झाल्‍याचे नमुद केले असून सदर अट क्रं 1 नुसार चोरीस गेल्‍याची लेखी सुचना त्‍वरीत (immediately) विमा कंपनीस द्दावी आणि त्‍यानंतर वेळोवेळी विमा कंपनीस सहकार्य करावे  असे नमुद असल्‍यामुळे विमा कंपनीचे अपिल मान्‍य करण्‍यात आले. प्रस्‍तुत अपिलीय आदेशात मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने  immediately या शब्‍दाची खालील प्रमाणे नमुद केली आहे-

As per Oxford Advanced Learner’s Dictionary means ‘at once

As per Stroud’s Dictionary, Fifth Edition, word ‘immediately’ is defined as under:-

                 “The word “immediately” although in strictness it excludes all mean times, yet to make good the deeds and intents of parties it shall be construed such convenient time as is reasonable requisite for doing the thing”

As per Black’s Law Dictionary, Sixth Edition, word ‘immediately’ means:-

                  “Immediately. Without interval of time, without delay, straightway, or without any delay or lapse of time.  When used in contract is usually construed to mean “within a reasonable time having due regard to the nature of the circumstances of the case”, although strictly, it means, “not deferred by any period of time. The words “immediately” and “forthwith” have generally the same meaning.  They are stronger than the expression “within a reasonable time” and imply prompt, vigorous action without any delay.”

 

 

 

11.      मंचाचे मते विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे या म्‍हणण्‍यात काहीही तथ्‍य दिसून येत नाही. याचे कारण असे आहे की, तक्रारकर्त्‍याने त्‍याचे विमाकृत वाहन चोरीस गेल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयात जे मोटर दावा प्रपत्र (MOTOR CLAIM FORM) सादर केलेले आहे, त्‍यावर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे शाखा कार्यालय बुटीबोरी यांचा ते दि.25.09.2009 रोजी प्राप्‍त झाल्‍या बाबत शिक्‍का आहे. याउलट, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने आपल्‍या उत्‍तरात तक्रारकर्त्‍याने विमा दावा प्रपत्र (MOTOR CLAIM FORM) त्‍यांचे कार्यालयात दि.28.09.2010 रोजी सादर केल्‍याचे नमुद केले आहे परंतु उपरोक्‍त नमुद पुराव्‍या नुसार तक्रारकर्त्‍याने त्‍याचे विमाकृत वाहन दि.15.09.2009 रोजी चोरीस गेल्‍या नंतर 10 दिवसाचे अंतराने विमा दावा प्रपत्र (MOTOR CLAIM FORM)  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयात दि.25.09.2009 रोजी सादर केल्‍याची बाब पूर्णतः पुराव्‍यानिशी मंचा समक्ष सिध्‍द झालेली आहे. तक्रारकर्त्‍याने विमाकृत वाहन दि.15.09.2009 रोजी चोरीस गेल्‍या नंतर लगेच दहा दिवसाचे अंतराने म्‍हणजे दि.25.09.2009 रोजी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयात विमा दावा प्रपत्र (MOTOR CLAIM FORM) सादर केलेला आहे, यावरुन असा निष्‍कर्ष निघतो की, तक्रारकर्त्‍याने त्‍याचे विमाकृत वाहन चोरीस गेल्‍यानंतर त्‍वरीत (“immediately”) विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयात विमाकृत वाहन चोरीस गेल्‍याची सूचना दिलेली असली पाहिजे आणि त्‍यावरुन वि.प.विमा कंपनीचे सुचने नुसार तक्रारकर्त्‍याने विमा दावा प्रपत्र  चोरीचे घटने नंतर दहा दिवसाचे अंतराने वि.प.विमा कंपनीकडे सादर केल्‍याचे  दिसून येते.  तसेच विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दि.24.11.2011 रोजीचे तक्रारकर्त्‍याचा विमा दावा फेटाळल्‍याचे जे पत्र तक्रारकर्त्‍यास पाठविलेले आहे, त्‍यामध्‍ये सुध्‍दा विमाकृत वाहन चोरीस गेल्‍याची सुचना विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस उशिराने दिली या बद्दल आक्षेप (Objection ) घेतल्‍याचे नमुद नाही, सदरचे पत्रात विमाकृत वाहन चोरीचा तक्रारकर्त्‍याने नमुद केलेला दिनांक आणि एफ.आय.आर.मध्‍ये नमुद केलेला दिनांक हा भिन्‍न असल्‍याचे कारणा वरुन तक्रारकर्त्‍याचा विमा दावा फेटाळल्‍याचे नमुद केले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विमाकृत वाहन चोरीस गेल्‍या नंतर त्‍वरीत (“immediately”) विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस सुचना दिली होती ही बाब सिध्‍द होते.

 

12.     मंचाचे मते पोलीस विभागाव्‍दारे दस्‍तऐवज  एफ.आय.आर. मध्‍ये विमाकृत वाहन चोरीस गेल्‍याची घटना तारीख 01.02.2010 ही जर             चुकीची नोंदविण्‍यात आली असेल तर त्‍यास तक्रारकर्ता हा निश्‍चीतच जबाबदार             

 

 

 

राहू शकत नाही. सर्वसाधारण व्‍यवहारात असाही अनुभव आहे की, वाहन चोरीस गेल्‍या नंतर त्‍वरीत एफ.आय.आर.पोलीस विभागाव्‍दारे नोंदविल्‍या जात नाही आणि संबधित वाहनमालकास आजूबाजूस चोरीस गेलेल्‍या वाहनाचा शोध घेण्‍यास पोलीस विभागाव्‍दारे सुचित केल्‍या जाते. तक्रारकर्त्‍याने आपल्‍या तक्रारी सोबत अंतिम अहवाल नमुना (FINAL REPORT FORM) जो ज्‍युडिशियल मॅजिस्‍ट्रेट वर्ग-1 कोर्ट क्रं 10, नागपूर यांचे न्‍यायालयात पोलीस स्‍टेशन अधिकारी, बोरी, तालुका जिल्‍हा नागपूर यांनी सादर केलेला आहे त्‍यामध्‍ये आरोपी व वाहनाचा शोध लागला नाही असे नमुद केलेले आहे.

13.      मंचाचे मते तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहन दि.15.09.2009 रोजी चोरीस गेले आणि पुढे ते पोलीसांना शोधूनही मिळून आले नाही या बाबी पूर्णतः सिध्‍द होतात. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून विमाकृत वाहनाची विमित रक्‍कम (Insurance Declared Value)                   रुपये-23,100/- विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा दावा नाकारल्‍याचे पत्र   दिनांक-24.11.2011 पासून द.सा.द.शे.9% दराने व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहे तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि तक्रारखर्च म्‍हणून रुपये-2000/- विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.

 

14.   उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे प्रकरणात आदेश पारीत करीत आहे-

                     ::आदेश::

 

1)      तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2)      विरुध्‍दपक्ष  विमा कंपनीस निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी

        तक्रारकर्त्‍यास त्‍याचे विमाकृत वाहनाची विमित (Insurance

               Declared Value) रक्‍कम रुपये-23,100/-(अक्षरी रुपये- तेवीस-

        हजार शंभर फक्‍त) विमा दावा नाकारल्‍याचा दि.-24.11.2011पासून

        द.सा.द.शे.9% दराने व्‍याजासह द्दावी.

3)      विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या

        शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच-

        हजार फक्‍त)आणि तक्रारखर्च म्‍हणून रु.-2000 /-(अक्षरी रुपये दोन-

        हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने त.क.ला द्दावेत.

 

 

 

 

4)      सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने सदर

        निकालपत्राची प्रत प्राप्‍त  झाल्‍या पासून 30 दिवसांचे आत करावे..

5)      निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

        देण्‍यात यावी.

              

 

 
 
[HON'ABLE MR. Manohar G.Chilbule]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.