Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/13/115

श्रीमती मिना वि. नागोराव सोनटक्‍के - Complainant(s)

Versus

दि.न्‍यु इंडिया ऐंश्‍युरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे विभागीय व्‍यवस्‍थापक व इतर 2 - Opp.Party(s)

प्रकाश नौकरकर

24 Feb 2014

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/13/115
 
1. श्रीमती मिना वि. नागोराव सोनटक्‍के
रा. मेंढेपठार (बा) तह.काटोल
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. दि.न्‍यु इंडिया ऐंश्‍युरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे विभागीय व्‍यवस्‍थापक व इतर 2
न्‍यु इंडिया सेंटर, 7 वा मजला 17 -अे. कोओपरेज रोड, मुंबई - 400 039
मुंबई
महाराष्‍ट्र
2. कबाल इन्‍शुरंन्‍स ब्रोकिंग सर्व्‍हीसेस प्रा लि. तर्फे व्‍यवस्‍थापक
प्‍लॉट न. 375 दुसरा माळा,गांधी नगर, नार्थ अंबाझरी नागपूर- 01
नागपूर
महाराष्‍ट्र
3. जिल्‍हा अधिक्षक ,कृषी अधिकारी
सी.पी. क्‍लब जवळ, सिव्‍हील लाईन नागपूर -1
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Manohar G.Chilbule PRESIDENT
 HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा श्री मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्‍यक्ष )

(पारीत दिनांक 24 फेब्रुवारी, 2014)

1.    तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे   कलम-12 अन्‍वये तिचे पती मृतक विमाधारक शेतकरी श्री नागोराव दादुजी सोनटक्‍के यांचे अपघाती मृत्‍यू संबधाने विधवा पत्‍नी या नात्‍याने शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्‍दपक्षा कडून विमा रक्‍कम  मिळण्‍यासाठी दाखल केली आहे.

2.    तक्रारकर्तीचे कथन थोडक्‍यात येणे प्रमाणे-

       तक्रारकर्ती ही मृतक विमाधारक शेतकरी श्री नागोराव दादुजी सोनटक्‍के यांची विधवा पत्‍नी आहे. मृतक विमाधारक शेतकरी श्री नागोराव दादुजी सोनटक्‍के यांचे मालकीची मौजा मेंढेपठार, तालुका काटोल जिल्‍हा नागपूर येथे वडीलोपार्जीत शेती असून तिचा सर्व्‍हे क्रं-224 व क्षेत्रफळ 0.95 हेक्‍टर आर आहे. श्री नागोराव दादुजी सोनटक्‍के हे व्‍यवसायाने शेतकरी होते व सदर शेतीतील उत्‍पन्‍नावर ते कुटूंबाचे पालनपोषण करीत होते.

      तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, यातील विरुध्‍दपक्ष क्रं-1 दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीकडे, महाराष्‍ट्र शासना तर्फे विरुध्‍दपक्ष क्रं-3 चे अधिपत्‍या खालील तालुका कृषी अधिकारी, काटोल, तालुका काटोल, जिल्‍हा नागपूर यांचे मार्फतीने शेतक-यांचा अपघाती विमा उतरविलेला आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-2 कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड ही             शेतक-यांचे अपघात विमा दाव्‍यांची छाननी करुन विमा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष  क्रं-1 विमा कंपनीकडे सादर करण्‍यासाठी नियुक्‍त केलेली सल्‍लागार कंपनी आहे.

       तक्रारकर्तीचे पती श्री नागोराव सोनटक्‍के हे दि.11.08.2012 रोजी हातला बस थांब्‍या वरुन आपल्‍या गावाकडे पायी रस्‍ता ओलांडत असताना नागपूर मोर्शी एस.टी.बस क्रं-8192 चे चालकाने बस निष्‍काळजीपणे भरधाव वेगाने चालवून श्री नागोराव सोनटक्‍के यांना धडक मारली त्‍यात ते जख्‍मी झाले व त्‍यांना वैद्दकीय उपचारासाठी मेडीकल कॉलेज येथे भरती करण्‍यात असता तेथे उपचारा दरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झाला.

 

      तक्रारकर्तीने तिचे मृतक पती श्री नागोराव सोनटक्‍के यांचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीकडे दि.29.12.2012 रोजी, विरुध्‍दपक्ष  क्रं-3 चे अधिपत्‍या खालील तालुका कृषी अधिकारी, काटोल यांचे मार्फत विमा प्रस्‍ताव सादर केला. सदर प्रस्‍तावा सोबत आवश्‍यक सर्व दस्‍तऐवज जोडले असताना देखील विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दि.30.05.2013 रोजीचे पत्राव्‍दारे  विमा कंपनीस विमा दावा उशिरा प्राप्‍त झाल्‍याचे  कारण दर्शवून फेटाळला व तक्रारकर्तीस दोषपूर्ण सेवा दिली.

      म्‍हणून तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे शेतकरी अपघात विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-1,00,000/- अपघात झाल्‍याचे दिनांका पासून द.सा.द.शे.15% दराने व्‍याजासह मिळावी तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-20,000/- आणि तक्रारखर्च म्‍हणून  रुपये-5000/- विरुध्‍दपक्षा कडून मिळावे अशा मागण्‍या केल्‍यात.

 

03.   विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने मंचा समक्ष लेखी उत्‍तर दाखल करुन, तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे आहे की, तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रं 3 मार्फतीने विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह सादर केल्‍याची बाब मान्‍य आहे तसेच विमाप्रस्‍ताव दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस  दि.30.04.2012 रोजी ( सदर दि.30.04.2012 हा चुकीचा नमुद केला असून तो दि.30.04.2013 असल्‍याचे दिसून येते) मिळाल्‍याची बाब सुध्‍दा  मान्‍य आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने सदरचा विमा दावा उशिरा प्राप्‍त झाल्‍याचे कारणा वरुन त्‍यांचे दि.30.05.2013 रोजीचे पत्राव्‍दारे नाकारला.

       वि.प.क्रं 1 विमा कंपनीने पुढे असे नमुद केले की, त्रिपक्षीय करारा प्रमाणे तक्रारकर्तीने वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे आवश्‍यक सर्व दस्‍तऐवजांसह विमा दावा विमा पॉलिसी संपल्‍याचे म्‍हणजे दि.14.08.2012 पासून                90 दिवसांचे आत म्‍हणजे दि.14 नोव्‍हेंबर 2012 पूर्वी सादर करावयास हवा होता. त्‍यामुळे सदरचा विमा दावा मुदतबाहय असल्‍याचे कारणा वरुन नामंजूर केला ही त्‍यांची कृती कायदेशीर आहे. विमा कंपनीकडून सेवेत कोणताही न्‍युनतापूर्ण व्‍यवहार घडला नसल्‍याने तक्रार खारीज करावी, अशी विनंती वि.प.क्रं 1 विमा कंपनीने केली.

 

04.    वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तर निशाणी क्रं 8 प्रमाणे दाखल केले आहे. त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, शेतक-यांचा विमा दावा विमा कंपनीकडे छाननी करुन पाठविण्‍यासाठी ते

 

 

शासनाला विनामोबदला मदत करतात, यासाठी त्‍यांना कोणताही मोबदला मिळत नाही. त्‍यामुळे विमा दाव्‍या संबधाने कोणतीही रक्‍कम देण्‍याची त्‍यांची कोणतीही कायदेशीर जबाबदारी नाही. आपल्‍या म्‍हणण्‍याचे समर्थनार्थ त्‍यांनी मा.महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग खंडपिठ औरंगाबाद यांनी प्रथम अपिल क्रं-1114/2008 विभाग प्रमूख कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीस प्रायव्‍हेट लिमिटेड विरुध्‍द- श्रीमती सुशिला भीमराव सोनटक्‍के या प्रकरणात दि.16.03.2009 रोजी पारीत केलेल्‍या आदेशाची प्रत दाखल केली आहे. सदर आदेशा मध्‍ये  वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड यांचे विरुध्‍द शेतक-यास अपघात विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍याची कोणतीही जबाबदारी येत नाही असे नमुद केलेले आहे. म्‍हणून वि.प.क्रं 2 विरुध्‍दची तक्रार खारीज करावी, अशी विनंती त्‍यांनी केली आहे.

      विरुध्‍दपक्ष क्रं-2 यांनी पुढे असे नमुद केले की, मृतक विमाधारक शेतकरी श्री नागारोव दादुजी सोनटक्‍के यांचा अपघाती मृत्‍यू दि.11.08.2012 रोजी झाला. त्‍याचे अपघाती मृत्‍यू संबधाने विमा दावा प्रस्‍ताव हा जिल्‍हा अधिक्षक, कृषी अधिकारी, नागपूर मार्फत वि.प.क्रं 2 कबाल नागपूर कार्यालयास दि.01.02.2013 रोजी उशिराने  प्राप्‍त झाला. सदर विमा प्रस्‍ताव पुढे त्‍यांनी वि.प.क्रं 1 न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनीला दि.11.02.2013 रोजी पाठविला असता सदर विमा प्रस्‍ताव वि.प.क्रं 1 विमा कंपनीने त्‍यांचे दि.30.05.2013 रोजीचे पत्रान्‍वये उशिरा प्राप्‍त झाल्‍याचे कारणावरुन नामंजूर केला व तसे वारसदारास कळविले.

 

05.   विरुध्‍दपक्ष क्रं 3 जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांनी                   लेखी उत्‍तर न्‍यायमंचा समक्ष दाखल केले. विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांनी आपल्‍या लेखी उत्‍तरामध्‍ये सदर तक्रार सन-2011-12 मधील असून, पॉलिसीचा कालावधी दि.15 ऑगस्‍ट, 2011 ते 14 ऑगस्‍ट, 2012 असा आहे.  मृतक विमाधारक शेतक-याचा मृत्‍यू दि.11.08.2012 रोजीचा आहे. तक्रारकर्तीचा विमा दावा तालुका कृषी अधिकारी काटोल यांचे कार्यालयास दि.29.12.2012 रोजी प्राप्‍त झाला.  मृतक विमाधारकाचे अपघाती मृत्‍यू संबधाने विमा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह तालुका कृषी अधिकारी, काटोल यांचे कडून त्‍यांचे पत्र जाक्रं-ताकृअ/अपघात विमा/96/2013, दि.17.01.2013 अन्‍वये वि.प.क्रं 3 जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांना दि.21.01.2013 रोजी प्राप्‍त झाला व पुढे सदर विमा प्रस्‍ताव जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांनी दि.01.02.2013 रोजी कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीसेस लिमिटेड, नागपूर यांचेकडे सादर केला. वि.प.क्रं 3 यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍यरितीने पार पाडलेले आहे त्‍यामुळे त्‍यांनी तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही

 

 

 

 

 

म्‍हणून त्‍यांना मुक्‍त करण्‍यात यावे, अशी विनंती विरुध्‍दपक्ष क्रं-3 जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांनी केली.

 

06      तक्रारकर्तीने निशाणी क्रं 03 वरील यादी नुसार दस्‍तऐवजाच्‍या               प्रती   सादर केल्‍यात, ज्‍यामध्‍ये वि.प. विमा कंपनीचे विमा दावा फेटाळल्‍याचे पत्र, विमा दावा प्रस्‍ताव,  तक्रारकर्तीचे मृतक पतीचे नावाचा शेतीचा 7/12 उतारा प्रत, गाव नमुना-6-क, फेरफार पत्रक, गावनमुना-8-अ, तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने एफ.आय.आर., घटनास्‍थळ पंचनामा,मरणान्‍वेषण प्रतिवृत्‍त, शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र  शाळा सोडल्‍याचा दाखला, मृतकाचे ओळखपत्र, आधारकॉर्ड, शेतकरी अपघात विमा योजने संबधीचे शासन परिपत्रक इत्‍यादीचा समावेश आहे.

 

07.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने  आपले प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्‍तर मंचा समक्ष सादर केले. या व्‍यतिरिक्‍त अन्‍य कोणतेही दस्‍तऐवज सादर केले नाहीत.

 

08.    वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस तर्फे महाराष्‍ट्र शासनाचे राजपत्र, मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांचे निर्णयाची प्रत, वि.प. विमा कंपनीचे दावा फेटाळल्‍याचे पत्र अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात.

 

09.   विरुध्‍दपक्ष क्रं 3 जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी आपल लेखी उत्‍तरा सोबत तालुका कृषी अधिकारी काटोल यांनी तक्रारकर्तीचा विमा प्रस्‍ताव त्‍यांचे कार्यालयीन पत्र जाक्रं-ताकृअ/अपघातविमा/96/2013 दि.17.01.2013 अन्‍वये  वि.प.क्रं 3  यांचेकडे  सादर केल्‍याचे  पत्राची प्रत दाखल केली. तसेच

जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात सदर प्रस्‍ताव दि.21.01.2013 रोजी प्राप्‍त झाल्‍या बद्दल आवक रजिस्‍टर उतारा प्रत सादर केली.

 

10.   प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्ती तर्फे वकील श्री नौकरकर यांचे सहकारी वकील श्री चौधरी  आणि  वि.प. क्रं 1 विमा कंपनी तर्फे  वकील                    श्री पाळधीकर यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

11.   तक्रारकर्ती आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी यांचे परस्‍पर विरोधी कथना वरुन खालील मुद्दे मंचाचे विचारार्थ घेण्‍यात आले.

 

           मुद्दा                                 उत्‍तर

(1)   वि.प.क्रं 1 विमा कंपनीने,

      तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर

      करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे काय?................... होय.

(2) काय आदेश?.....................................................तक्रार अंशतः मंजूर.

 

::  कारण मिमांसा व निष्‍कर्ष    ::

मुद्दा क्रं-1 व 2-

12.    तक्रारकर्तीचे पती विमाधारक शेतकरी श्री नागोराव दादुजी सोनटक्‍के यांचा दि.11.08.2012 रोजी  हातला बस थांब्‍या वरुन गावाकडे पायी रस्‍ता ओलांडताना नागपूर मोर्शी बस क्रं 8192 चे चालकाने निष्‍काळजी आणि वेगाने बस चालवून धडक दिल्‍याने त्‍याच दिवशी जख्‍मी होऊन मृत्‍यू झाला ही बाब प्रकरणातील पोलीस दस्‍तऐवज एफ.आय.आर., घटनास्‍थळ पंचनामा,मरणान्‍वेषण प्रतिवृत्‍त, शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र यावरुन सिध्‍द होते.  तसेच प्रकरणातील  मृतकाचे नावे उपलब्‍ध शेतीचे दस्‍तऐवज 7/12 उतारा प्रत, गाव नमुना-6-क, फेरफार पत्रक, गावनमुना-8-अ यावरुन मृतक शेतकरी होता हे ही सिध्‍द होते.  मृतकाचा विरुध्‍दपक्ष क्रं-3 चे मार्फतीने शेतकरी अपघात विमा योजना सन-2011-12 कालावधी दि.15 ऑगस्‍ट, 2011 ते 14 ऑगस्‍ट, 2012 अंतर्गत विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विमा काढला होता या बाबी प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजां वरुन सिध्‍द होतात आणि या बाबी प्रकरणातील उभय पक्षांना मान्‍य आहेत, त्‍या बाबत विवाद नाही.

 

13.    प्रस्‍तुत प्रकरणातील विवाद हा अत्‍यंत संक्षीप्‍त स्‍वरुपाचा आहे, यातील विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्‍तरा नुसार त्रिपक्षीय करारा प्रमाणे तक्रारकर्तीने वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे आवश्‍यक सर्व दस्‍तऐवजांसह विमा दावा विमा पॉलिसी संपल्‍याचे म्‍हणजे दि.14.08.2012 पासून 90 दिवसांचे आत म्‍हणजे दि.14 नोव्‍हेंबर 2012 पूर्वी सादर करावयास हवा होता. परंतु तक्रारकर्तीने तालुका कृषी अधिका-यां मार्फतीने सादर केलेला विमा दावा  त्‍यांना दि.30.04.2013 रोजी प्राप्‍त झाला आणि त्‍यामुळे त्‍यांनी त्‍यांचे दि.30.05.2013 रोजीचे कार्यालयीन पत्रान्‍वये तक्रारकर्तीचा विमा दावा मुदतबाहय असल्‍याचे कारणा वरुन नामंजूर केला ही त्‍यांची कृती कायदेशीर आहे.

 

 

 

     या संदर्भात मंचातर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, विरुध्‍दपक्ष क्रं-3 जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तरा सोबत तक्रारकर्तीचे विम्‍या दाव्‍या संबधीचा पत्रव्‍यवहाराच्‍या प्रती मंचा समक्ष सादर केल्‍यात.  वि.प.क्रं 3 यांचे लेखी उत्‍तरा नुसार तक्रारकर्तीचा विमा दावा तालुका कृषी अधिकारी काटोल यांचे कार्यालयास दि.29.12.2012 रोजी प्राप्‍त झाला. तालुका कृषी अधिकारी, काटोल यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्‍ताव तपासणीसाठी त्‍यांचे कार्यालयीन पत्र जाक्रं-ताकृअ/अपघात विमा/1759/2012, दि.31.12.2012 अन्‍वये मंडळ कृषी अधिकारी, मेटपांजरा यांचेकडे पाठविला. विमा प्रस्‍ताव तपासून मंडळ कृषी अधिकारी, मेटपांजरा यांनी त्‍यांचे कार्यालयीन पत्र जाक्रं-शे.व्‍य.विमा./म.कृ.अ./23/13, दि.16.01.2013 अन्‍वये तालुका कृषी अधिकारी, काटोल यांचेकडे सादर केला. तालुका कृषी अधिकारी काटोल यांनी विमा प्रस्‍ताव त्‍यांचे कार्यालयीन पत्र जाक्रं-ताकृअ/अपघातविमा/96/2013, दि.17.01.2013 अन्‍वये वि.प.क्रं 3 जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात सादर केला व सदर प्रस्‍ताव वि.प.क्रं 3 यांचे कार्यालयास दि.21.01.2013 रोजी प्राप्‍त झाल्‍याचे आवक रजिस्‍टरचे  (Inward Register) प्रतीवरुन स्‍पष्‍ट होते. पुढे तक्रारकर्तीचा विमा प्रस्‍ताव वि.प.क्रं 3 जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांनी दि.01.02.2013 रोजी  वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीसेस लिमिटेड, नागपूर यांचेकडे सादर केला व ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांना मान्‍य असल्‍याचे त्‍यांचे  लेखी उत्‍तरात नमुद आहे.

      वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचे लेखी उत्‍तरा नुसार पुढे त्‍यांनी तक्रारकर्तीचा विमा प्रस्‍ताव वि.प.क्रं 1 न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनीकडे  दि.11.02.2013 रोजी सादर केला असता, वि.प.क्रं 1 विमा कंपनीने त्‍यांचे कार्यालयीन दि.30.05.2013 रोजीचे पत्रान्‍वये विमा प्रस्‍ताव उशिरा सादर केल्‍याचे कारणावरुन  नाकारला.

       मंचाचे मते उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे तक्रारकर्तीचे विमा प्रस्‍तावा संबधीचा संपूर्ण घटनाक्रम आहे. तक्रारकर्तीचे पती विमाधारक शेतकरी              श्री नागोराव दादुजी सोनटक्‍के यांचा दि.11.08.2012 रोजी अपघाती मृत्‍यू झाल्‍या नंतर, तक्रारकर्तीने आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष   क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, काटोल यांचे कार्यालयात दि.29.12.2012 रोजी सादर केला ही बाब पूर्णतः सिध्‍द होते आणि त्‍यानंतर ठरवून दिलेल्‍या प्रणाली मार्फतीने तक्रारकर्तीचा विमा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस दि.30.04.2013 रोजी प्राप्‍त झाला. तक्रारकर्तीचे पतीचा मृत्‍यू दि.11.08.2012 रोजी झाल्‍या नंतर प्रथम विमा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी, काटोल यांचे कार्यालयात दि.29.12.2012 रोजी सादर केला. वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे म्‍हणण्‍या नुसार सदर विमा प्रस्‍ताव पॉलिसी संपल्‍या पासून 90 दिवसांचे आत म्‍हणजे दि.14 नोव्‍हेंबर, 2012 पूर्वी सादर करणे आवश्‍यक होते. तक्रारकर्तीने प्रथम विमा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिका-यांकडे दि.29.12.2012 रोजी सादर केला म्‍हणजेच तक्रारकर्तीने जवळपास 01 महिना 15 दिवस उशिराने विमा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिका-यांकडे सादर केला.

 

 

14.     मंचाचे मते शेतकरी अपघात विमा योजने संबधिचा प्रस्‍ताव, आवश्‍यक सर्व दस्‍तऐवज शासकीय यंत्रणेकडून प्राप्‍त करुन विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे सादर करावयाची कार्यपध्‍दती बघता प्रथम विमा प्रस्‍ताव आवश्‍यक सर्व दस्‍तऐवजांसह तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सादर करणे त्‍यानंतर  तालुका कृषी अधिका-यां मार्फतीने कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस कडे तपासणीसाठी पाठविणे आणि कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीने प्रस्‍तावातील त्रृटीची पुर्तता संबधितां कडून करवून घेऊन त्‍यानंतर विमा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे निश्‍चीतीसाठी सादर करणे ही सर्व ठरवून दिलेली कार्यपध्‍दती बघता पॉलिसी संपल्‍या पासून 90 दिवसांचे आत एवढया कमी कालावधीत संबधित मृतक शेतक-याचे वारसदार यांनी प्रत्‍यक्ष विमा कंपनीकडे आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा प्रस्‍ताव सादर करणे ही कृती प्रत्‍यक्ष व्‍यवहारात पार पडणे अतिशय कठीण व गुंतागुंतीची आहे.

 

15.   या संदर्भात तक्रारकर्तीने महाराष्‍ट्र शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग शासन निर्णय क्रं शेअवि-2011/प्र.क्रं 94/11-ए मंत्रालय विस्‍तार, मुंबई -400032 दि.08 ऑगस्‍ट, 2011 रोजीचे शासन निर्णयावर आपली भिस्‍त ठेवली. सदर शासन निर्णयातील परिच्‍छेद क्रं 8 मध्‍ये खालील प्रमाणे नमुद आहे-

        विमा प्रस्‍ताव विहित कागदपत्रांसह योजनेच्‍या कालावधीत कधीही प्राप्‍त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्‍या अखेरच्‍या दिवसात झालेल्‍या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्‍या नंतर 90 दिवसा पर्यंत तालुका कृषी अधिका-यांकडे प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक रा‍हील तसेच समर्थनीय कारणांसह 90 दिवसा नंतर प्राप्‍त होणारे विमा प्रस्‍ताव विमा कंपनीने स्विकारावेत. प्रस्‍ताव विहित मुदतीत सादर केले नाहीत या कारणास्‍तव विमा कंपन्‍यांना प्रस्‍ताव नाकारता येणार नाहीत.

 

16.        मंचाचे मते उपरोक्‍त नमुद शासन निर्णया वरुन स्‍वयंस्‍पष्‍ट होते की, विहित मुदतीत प्रस्‍ताव सादर केले नाही या कारणावरुन विमा कंपन्‍यांना प्रस्‍ताव नाकारता येणार नाहीत. मृतक हा अपघाताचे दिवशी शेतकरी होता आणि शेतकरी अपघात विमा योजना कालावधीमध्‍ये त्‍याचा अपघाती मृत्‍यू झाला होता या बाबी पुराव्‍यानिशी सिध्‍द होत असताना वि.प.क्रं 1 विमा कंपनीने विमा प्रस्‍ताव उशिरा सादर केल्‍याचे कारणा वरुन विमा दावा नाकारणे ही विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची सेवेतील त्रृटी आहे. सदर प्रकरणातील अपघाती मृत्‍यू हा दि. 11.08.2012 रोजीचा आहे आणि ठरवून दिलेल्‍या चाकोरी मार्फतीने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस विमा प्रस्‍ताव हा त्‍यांचेच पत्रा नुसार दि.30.04.2013 रोजी प्राप्‍त झाला. वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे म्‍हणण्‍या नुसार पॉलिसी संपल्‍या पासून 90 दिवसांचे आत दि.14 नोव्‍हेंबर, 2012 पूर्वी विमा प्रस्‍ताव सादर करणे आवश्‍यक होते म्‍हणजेच दि.14 नोव्‍हेंबर, 2012 पासून विमा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस जवळपास 05 महिने 16 दिवस उशिराने प्राप्‍त झाला परंतु तक्रारकर्तीने प्रथम विमा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिका-यांकडे दि.29.12.2012 रोजी सादर केला म्‍हणजेच तक्रारकर्तीने जवळपास 01 महिना 15 दिवस उशिराने विमा प्रस्‍ताव तालुका कृषी             अधिका-यांकडे सादर केला. सदरचा कालावधी हा खूप मोठा विलंब आहे असे म्‍हणता येणार नाही.

 

17.    या संदर्भात तक्रारकर्तीने खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निकालपत्रावर आपली भिस्‍त ठेवली आहे. 

 

(1)                   I (2009) CPJ 147

           Hon’ble Maharashtra State Commission, Mumbai

           National Insurance Co.Ltd.-V/s- Asha Jamdar Prasad

 

        प्रस्‍तुत अपिलीय प्रकरणात आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग,महाराष्‍ट्र  मुंबई यांनी विमा दावा हा विलंबाचे कारणावरुन फेटाळण्‍यात आला परंतु विमा दावा दाखल करण्‍यास जो विलंब झालेला आहे, तो का झाला? हे विशद करण्‍याची  संधी  मृतकाचे विधवा  पत्‍नीला दिल्‍या गेलेली नाही आणि तसेही

मृतकाचे मृत्‍यूचे धक्‍क्‍यातून सावरल्‍या नंतर त्‍याचे विधवा पत्‍नीने विमा दावा सादर केल्‍याचे कारण दर्शवून विमा कंपनीचे अपिल खारीज करुन मंचाचा विमा दावा देण्‍याचा निर्णय कायम ठेवला.

 

(2)                               I (2013) CPJ 115

                 Hon’ble Chhattisgarh State Consumer Disputes Redressal   

            Commission Raipur

                 Ramayanvati –V/s- Oriential  Insurance Company Ltd.

 

           उपरोक्‍त नमुद प्रकरणातील विमा क्‍लेम हा ग्रुप जनता पर्सनल अक्‍सीडेंट पॉलिसी अंतर्गत मृत्‍यू दाव्‍या संबधीचा आहे. विमा क्‍लेम हा घटना घडल्‍या पासून पंधरा दिवसाचे आत करणे आवश्‍यक होते. परंतु तो सादर करण्‍यासाठी 03 वर्षाचा उशिर झाल्‍यामुळे पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झाल्‍याने तक्रार खारीज करण्‍यात आली होती म्‍हणून अपिल करण्‍यात आले होते. अपिलीय आदेशात मा.आयोगाने सदर तक्रारकर्ती ही अशिक्षीत स्‍त्री असून, पॉलिसीचे अस्तित्‍वा बद्दल तिला कल्‍पना नव्‍हती. तक्रारकर्तीचे मृतक पती ज्‍या ठिकाणी नौकरीस होते तेथील मालकाने पॉलिसी बद्दल माहिती देणे बंधनकारक होते असे नमुद केलेले आहे.

       आमचे समोरील प्रस्‍तुत तक्रार प्रकरणात उपरोक्‍त नमुद मा.आयोगाचा सदर निर्णय तंतोतंत लागू पडतो. कारण आमचे समोरील प्रकरणातील स्‍त्री एक ग्रामीण विधवा आहे. तक्रारकर्तीचे पतीचा दि.11.08.2012 रोजी अपघाती मृत्‍यू झाल्‍यामुळे काही दिवस पतीचे निधनाने ती अतिशय व्‍यथीत होती. महाराष्‍ट्र शासना तर्फे संबधित मृतकाचा शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत विमा काढला होता याची तिला कल्‍पना नव्‍हती. तसेच पॉलिसीतील अटी व शर्तीचीं सुध्‍दा तिला कल्‍पना नव्‍हती. पतीचे मृत्‍यू नंतर सावरल्‍या नंतर तक्रारकर्तीस शेतकरी अपघात  विमा  योजनेची  माहिती  मिळाली. कागदपत्रांची माहिती घेणे, त्‍याची जुळवाजुळव करणे, खेडयातून तालुक्‍याच्‍या ठिकाणी जाणे अशा अनेक अडचणींनां तक्रारकर्तीला सामोरे जावे लागले आणि विमा दाव्‍यासाठी आवश्‍यक दस्‍तऐवज मिळवावे लागले.  त्‍यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा विहित मुदतीत म्‍हणजे विमा पॉलिसी संपल्‍या पासून 90 दिवसाचे आत सादर न केल्‍याचे कारणा वरुन, विमा दावा फेटाळण्‍याची विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची कृती अयोग्‍य असल्‍याचे न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

      

18.    प्रकरणातील उपलब्‍ध शेती /पोलीस विभागाचे दस्‍तऐवजां वरुन मृतक विमाधारक श्री नागोराव दादुजी सानटक्‍के हे शेतकरी होता व त्‍यांचा शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या दि.11.08.2012 रोजी अपघाती मृत्‍यू झाल्‍याची बाब पूर्णतः  सिध्‍द होते. त्‍यामुळे  मृतकाचे  वारसदार  म्‍हणून तक्रारकर्ती विधवा पत्‍नी या नात्‍याने वि.प.क्रं-1 विमा कंपनी कडून विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-1,00,000/- आणि त्‍यावर विमा प्रस्‍ताव नाकारल्‍याचे दिनांका पासून म्‍हणजे दि.30.05.2013 पासून द.सा.द.शे.9% दराने व्‍याज यासह मिळण्‍यास पात्र आहे. या शिवाय विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीस निश्‍चीतच शारीरीक व मानसिक त्रास झाल्‍याची बाब सिध्‍द होत असल्‍यामुळे तक्रारकर्ती विरुध्‍दपक्ष   क्रं 1 विमा कंपनी कडून शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि आणि तक्रारखर्च म्‍हणून रुपये-5000/- मिळण्‍यास पात्र आहे. म्‍हणून मुद्दा  क्रं 1 व 2 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविलेले असून मंचा तर्फे प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो.

                                             

           

                   ::आदेश::

तक्रारकर्तीची तक्रार खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात

येते.

 

 

 

 

1)    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी  

      तक्रारकर्तीस तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी

      व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्‍कम रुपये-1,00,000/-

      (अक्षरी रुपये एक लक्ष फक्‍त ) दिनांक-30.05.2013 पासून रकमेच्‍या

      प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9%  दराने व्‍याजासह द्दावी.

2)    तक्रारकर्तीस झालेल्‍या  शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल

      रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) आणि तक्रारीचे खर्चा

      बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) वि.प.क्रं 1 विमा

      कंपनीने तक्रारकर्तीस द्दावेत.

3)    विरुध्‍दपक्ष क्रं- 2 व क्रं-3 यांना सदर तक्रारीतून मुक्‍त करण्‍यात येते.

4)    सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदर

      निकालपत्राची प्रत प्राप्‍त झाल्‍या पासून 30 दिवसाचे आत करावे..

5)    निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व  पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

      देण्‍यात यावी.

             

 

 
 
[HON'ABLE MR. Manohar G.Chilbule]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.