Maharashtra

Aurangabad

CC/14/139

वसंत पिता गोपीनाथ मतसादर - Complainant(s)

Versus

दि प्रेसिडेंट, सेठ नंदलाल धुत हॉस्‍पीटल, मराडवाडा मेडीकल अॅण्‍ड रिचर्स डिर्पाटमेंट - Opp.Party(s)

अॅड एस एन लुटे

27 Feb 2015

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद

________________________________________________________________________________________________

ग्राहक तक्रार क्रमांक :-139/2014          

तक्रार दाखल तारीख :-27/03/2014

निकाल तारीख :- 27/02/2015

________________________________________________________________________________________________

श्री.के.एन.तुंगार, अध्‍यक्ष

श्रीमती संध्‍या बारलिंगे,सदस्‍या                        श्री.के.आर.ठोले,सदस्‍य.

________________________________________________________________________________________________                                                                                                                                 

वसंत गोपीनाथ मतसागर,

रा. लिऑनस क्‍लब कॉलनी, मुकुंदवाडी,

औरंगाबाद                                        ……..  तक्रारदार          

            

              विरुध्‍द

 

1.  दि प्रेसिडेंट,

    सेठ नंदलाल धूत हॉस्‍पीटल मराठवाड मेडीकल अॅण्‍ड

    रिसर्च डेव्‍हल्‍पमेंट इंस्‍टीटयूशन, एमआयडीसी,

    चिकलठाणा, औरंगाबाद

2.  डॉ. सुवर्णा व्‍ही. बेलापूरकर,

    सेठ नंदलाल धूत हॉस्‍पीटल मराठवाड मेडीकल अॅण्‍ड

    रिसर्च डेव्‍हल्‍पमेंट इंस्‍टीटयूशन, एमआयडीसी,

    चिकलठाणा, औरंगाबाद                        ........ गैरअर्जदार 

_______________________________________________________________________________________________

तक्रारदारातर्फे  – अॅड. संदीप एन लुटे

गैरअर्जदार 1 तर्फे  – अॅड. भुषण कुलकर्णी

गैरअर्जदर 2 तर्फे – अॅड.शेखर अग्रवाल

________________________________________________________________________________________________

निकाल

(घोषित द्वारा – श्रीमती. संध्‍या बारलिंगे, सदस्‍या)

 

          तक्रारदार यांनी कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार ग्राहक मंचामध्‍ये दाखल केली आहे.

 

          तक्रारदारास डाव्या डोळ्यास मोतीबिंदूचा त्रास होता असल्यामुळे तो गैरअर्जदाराच्या हॉस्पिटल मध्ये तपासणीकरिता गेला. गैरअर्जदार क्रं 2 यांनी त्याच्या डाव्या डोळ्याची तपासणी केली आणि ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. दि.14/12/09 रोजी तक्रारदाराने त्याकरिता रु.3500/- भरले. दि.14/12/09 रोजी मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले व त्याच दिवशी त्याला डिस्चार्ज मिळाला. दि.15/12/09 रोजी तक्रारदार जेंव्हा त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढण्याकरिता हॉस्पिटल मध्ये गेले तेंव्हा त्याचा लक्षात आले की, त्याची  दृष्टी गेली आहे. त्यानंतर गैरअर्जदार क्रं 2 यांनी चश्मा बनवण्याकरिता नंबर दिला. त्यानंतर तक्रारदार अनेक वेळा तपासणी करिता हॉस्पिटलला गेला परंतु त्याची दृष्टी गेली असल्यामुळे त्याला काहीही दिसत नव्हते. गैरअर्जदार क्रं 2 यांनी डॉ संतोष अग्रवाल यांना दाखवण्याचा सल्ला दिला. दि.23/8/10 रोजी तक्रारदार त्या डॉक्टरांना भेटला. त्यांनी देखील दृष्टी परत येण्याची काहीही  शाश्वती नाही, असे सांगितले. तक्रारदाराने शेवटची तपासणी गैरअर्जदार क्रं 2 यांच्याकडे दि.26/8/11 रोजी केली.  त्यावेळेस गैरअर्जदारांनी तक्रारदारास सांगितले की, तक्रारदाराची दृष्टी पुर्णपणे गेली आहे. गैरअर्जदाराने चुकीचे ऑपरेशन केले म्हणून तक्रारदाराला त्याची दृष्टी गमवावी लागली. तक्रारदार हा मेट्रो कंपनी मध्ये वॉचमनचे काम करत होता. त्याची दृष्टी गमावल्यामुळे तो रात्रपाळीचे काम करू शकत नाही, याकरिता त्याला कामावरून काढले आहे. सध्या तो भाजी विकण्याचे काम करतो. तक्रारदार प्रति महिना रु.7000/- कमावत होता. त्याने आणखी 10 वर्ष काम केले असते तर रु.8,40,000/- कमावले असते. तक्रादाराने त्या रकमेसोबत त्याच्या पत्नीला रु.5,00,000/- भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. तसेच नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

 

          गैरअर्जदार क्रं 1 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सदर तक्रार मुदत बाह्य आहे. दि.10/10/11 रोजी तक्रारीचे कारण घडले असताना दि.20/3/14 रोजी तक्रार दाखल केली आहे. दि.25/2/08 रोजी तक्रारदाराच्या उजव्या डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन गैरअर्जदार हॉस्पिटल मध्येच झाले होते. त्याचा फायदा झाल्यामुळे तो दि.7/12/09 रोजी गैर अर्जदाराकडे डाव्या डोळ्याच्या तपासणीकरिता आला. त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी CF = 2-3 feet होती. तक्रारदाराच्या डाव्या डोळ्याचे ऑपरेशन दि.14/12/09 रोजी केले. दि.15/12/09 रोजी डिस्चार्ज मिळाल्यानंतर तक्रारदार दि.21/12/09, दि.18/1/09, दि.22/2/10, दि.17/3/10 आणि दि. 21/4/10 रोजी  नियमितपणे तपासणीस आला होता. त्यावेळेस त्याने कोणतेही तक्रार केली नाही. त्यानंतर तो दि. 18/3/11 रोजी आला. त्यावेळेस त्याने  डोळ्यातुन पाणी येण्याचा व दृष्टी धूसर  झाल्याची तक्रार केली. गैरअर्जदार क्रं 2 यांनी त्याला तपासले व त्याला coreneal edema झाल्याचे निदान करून तशी औषधे दिली. पुढील तपासणीकरिता त्याला डॉ संतोष अग्रवाल यांना दाखवण्याचा सल्ला दिला. डॉ संतोष अग्रवाल यांनी तेच निदान केले आणि corneal transplant करण्याचा सल्ला दिला. गैरअर्जदार क्रं 2 यांनी सदर रिपोर्ट्स पहिले आणि तक्रारदारास government hospital ला जाण्याचा सल्ला दिला. तक्रारदाराने पाठवलेल्या नोटिसचे उत्तर गैरअर्जदाराने दिलेले आहे. गैर अर्जदार क्रं 2 ही अनुभवी डॉक्टर आहे. तिचे qualification M.S. D. N. B. (OPHTHALMOLOGY) असून तिला 14 वर्षाचा अनुभव आहे. ती मागील 7 वर्षापासून गैरअर्जदार क्रं 1 यांच्या हॉस्पिटल मध्ये consultant ophthalmic surgeon म्हणून कार्यरत आहे. तिने आतापर्यंत अनेक वेळा मोतीबिंदूचे ऑपरेशन केले आहे. तक्रारदाराचे ऑपरेशन universal method ने अतिशय काळजी घेऊन केलेले आहे. तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केली आहे त्यामुळे तक्रारदारची तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.

 

          गैरअर्जदार क्रं 2 यांनी पुराव्याकामी शपथ पत्र दाखल केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, दि. 7/12/09 रोजी त्यांनी तक्रारदाराच्या डाव्या डोळ्यांची तपासणी करून त्याला मोती बिंदूचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. ऑपरेशन पूर्वी करण्यात येणार्‍या सर्व तपासण्या दि.9/12/09 रोजी गैरअर्जदार क्रं 1 यांच्या हॉस्पिटल मध्ये केल्या. ऑपरेशनच्या दिवशी ऑपरेशन मुळे होणार्‍या फायदा व नुकसान याची कल्पना तक्रारदार व त्याच्या पत्नीस  दिली. त्याच्या पत्नीची लेखी संमती घेतली. ऑपरेशन नंतर डोळ्यावरील पट्टी काढण्याकरिता तक्रारदार दि.15/12/09 रोजी आलेला असताना त्याला हाताची बोटे मोजता येण्याइतपत दिसत होते. दि.21/12/09 रोजी त्याची दृष्टी 6/60 होती. दि.22/2/10 रोजी 6/24 होती. तेंव्हा तो 3 ओळी वाचू शकत होता. त्यानंतर तो चश्मा घेण्याकरिता दि.17/3/10 व दि.21/4/10 रोजी आला होता. नंतर बरेच दिवस तो आला नाही. दि.18/3/11 रोजी डोळ्यातुन पाणी येण्याची व धूसर  दिसत असल्याची तक्रार घेऊन तो आला होता. गैरअर्जदार क्रं 2 यांनी त्याला तपासले व त्याला coreneal edema झाल्याचे निदान करून तशी औषधे दिली. पुढील तपासणीकरिता त्याला डॉ संतोष अग्रवाल यांना दाखवण्याचा सल्ला दिला. डॉ संतोष अग्रवाल यांनी तेच निदान केले आणि corneal transplant करण्याचा सल्ला दिला. गैरअर्जदार क्रं 2 यांनी सदर रिपोर्ट्स पहिले आणि तक्रारदारास second opinion घेण्यासाठी government hospital ला जाण्याचा सल्ला दिला. गैरअर्जदाराने पूर्ण काळजी घेऊन तक्रारदाराचे ऑपरेशन केलेले  आहे. तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केली असल्यामुळे ती खारीज करण्याची विनंती केली आहे.

 

          आम्ही दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराची तक्रार, गैरअर्जदाराची लेखी जवाब आणि दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले.

 

गैरअर्जदाराने दाखल  केलेल्या  clinical notes चे निरीक्षण केले. त्यानुसार तक्रारदाराच्या डाव्या डोळ्याचे ऑपरेशन दि.14/12/09 रोजी झाले. त्या आधी दि.7/12/09 रोजी तक्रारदाराच्या डाव्या डोळ्याची तपासणी केली असता त्याची दृष्टी CF 2-3 FEET (i.e. counting fingers up tp 2-3 feet, not improving further) अशी होती. ऑपरेशन झाल्यानंतर दि. 15/12/09 रोजी डाव्या डोळ्याची दृष्टी 6/36, दि.22/2/10 रोजी दृष्टी 6/36 आणि दि.17/3/10 रोजी तक्रारदाराची दृष्टी 6/24 पर्यन्त सुधारलेली होती. याचा अर्थ ऑपरेशन झाल्यानंतर तक्रारदाराच्या डोळ्यामध्ये हळूहळू सुधारणा होत होती. त्यानंतर 11 महिन्यानी म्हणजे दि.18/3/11 रोजी तपासणी केली असता डाव्या डोळ्याची दृष्टी पुन्हा 6/60 झाल्याचे आले. त्यावेळी  तक्रारदारास होणारी त्रासाची लक्षणे पाहिल्यानंतर त्याला संबधित डॉक्टरांकडे पाठवले. त्या डॉक्टरांनी तक्रारदारास corneal surgery ( i. e. penetrating keratoplasty ) करण्याचा सल्ला दिला गैरअर्जदार क्रं 2 यांच्या मते सदर ऑपरेशन नंतर तक्रारदारास त्याची  दृष्टी परत मिळू शकते. corneal edema हा आजार साधारणतः वयाच्या 50 किंवा 60 व्या वर्षी होऊ शकतो. जर गैरअर्जदारांनी केलेल्या ऑपरेशनमुळे हा आजार झाला असता तर लगेच 2 ते 3 महिन्यात तक्रारदारास त्रास झाले असते, 11 महिन्यांनी नव्हे. गैरअर्जदार क्रं 2 यांनी दिलेली माहिती समर्पक आहे, असे आमचे मत आहे.

 

           वरील निरीक्षणावरून असे दिसून येते की, तक्रारदाराची दृष्टी नाहीशी होण्याकरिता गैरअर्जदाराने केलेले ऑपरेशन कारणीभूत नाही. गैरअर्जदाराने सेवेमध्ये त्रुटी दिल्याचे दिसून येत नाही.

 

          वरील कारणामुळे हा मंच खालील आदेश पारित करत आहे.

 

आदेश

 

  1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
  2. खर्चाबद्दल आदेश नाही.         

                                

(श्रीमती संध्‍या बारलिंगे)        (श्री.किरण.आर.ठोले)       (श्री.के.एन.तुंगार)

 सदस्‍या                           सदस्‍य                         अध्‍यक्ष

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.