निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार श्रीराम पि. दत्ता डाकोरे, हा हिप्परगा (माळ) पो. किनाळा ता. बिलोली जि. नांदेड येथील रहिवाशी असून तो मयत संभाजी श्रीराम डाकोरे यांचा पिता आहे. दिनांक 20/07/2012 रोजी अर्जदाराचा मयत मुलगा संभाजी पेठसांगवी येथील शेतातील काम आटोपून त्याचे नातेवाईकासोबत मोटारसायकलवर परत येत असतांना जोगन चिंचोली गावाजवळ किल्लारी लामजना रोडवर समोरुन येणारी मोटार सायकल क्र. एमएच-24/जी-3892 च्या चालकाने त्याची मोटारसायकल हयगय व निष्काळजीपणे चालवून अर्जदाराच्या मुलाच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यात अर्जदाराचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्यास सरकारी दवाखाना लातूर येथे उपचाराकामी शरीक केले तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शि. हॉस्पीटल, सोलापूर येथे शरीक केले असता उपचारादरम्यान तारीख 28/07/2012 रोजी त्याचा मृत्यु झाला. पोलीस स्टेशन किल्लारी जि. लातूर यांनी गुन्हाह क्रं. 42/2012 मोटारसायकल क्र. एमएच-24/जी 3892 च्या चालकाविरुध्द नोंदवला तसेच पुढील तपास केला. अर्जदाराचा मुलगा संभाजी हा व्यवसायाने शेतकरी होता. त्याच्या नावे मौजे हिप्परगा ता. बिलोली जि. नांदेड येथे गट क्र. 153 मध्ये 0 हेक्टर 30 आर व गट क्र. 137 मध्ये 0 हे 22 आर एवढी शेती होती. अर्जदार शेतकरी विमा संरक्षण योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी दिनांक 31/08/22012 रोजी आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह तालुका कृषी अधिकारी बिलोली जि. नांदेड यांच्याकडे क्लेम दाखल करुन विमा रक्कम देण्याची विनंती केली. परंतू गैरअर्जदार यांनी विमा रक्कम दिली नाही. शेवटी दिनांक 20/10/2014 रोजी विमा रक्कम देण्यास नकार दिला म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे व मंचस विनंती केली आहे की, अर्जदारास शेतकरी अपघात विम्याची रक्कम रु. 1,00,000/- त्यावर दिनांक 20/07/2012 पासून रक्कम वसूल होईपर्यंत 18 टक्के व्याजासह अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व दावा खर्च रक्कम रु. 5,000/- देण्याचा आदेश करावा.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 2 यांना मंचाची नोटीस प्राप्त होवूनही ते मंचासमोर हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केलेले नाही.
गैरअर्जदार क्र. 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. सदर दाव्याची मुळ कागदपत्रे जिल्हा अधिक्षक,कृषी अधिकारी,नांदेड यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर ती कागदपत्रे संबंधीत विमा कंपनीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवून दिली होती. सदर दाव्यातील कागदपत्रांची पडताळणी करुन न्यु इंडिया एशुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीकडून अर्जदाराकडे दिनांक 07/03/2013 व 07/08/2013 रोजीच्या पत्राद्वारे दयावयाची मुळ कागदपत्रे, गाव नमुना 6-ड आणि अपघातग्रस्ताचे मोटार सायकल चालविण्याचे ड्रायव्हींग लायसन्स या कागदपत्रांची मागणी केली. सोबत विमा कंपनीची पत्रे जोडत आहोत. गैरअर्जदार 2 यांची सदर प्रकरणात मर्यादित स्वरुपाची भुमिका आहे त्यामुळे गैरअर्जदार 2 यांना जबाबदार धरण्यात येवू नये.
गैरअर्जदार 3 व 4 यांचे म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे.
5. अर्जदाराने दाखल केलेला तक्रार अर्ज खोटा आहे. तसेच अर्जदाराने दिनांक 31/08/2012 रोजी गैरअर्जदार 1 यांच्याकडून विमा दावा दाखल केल्याचे खोटे कथन केलेले आहे. गैरअर्जदारास प्राप्त दावा अर्जासोबत पान क्र. 2 वर फेरफार रजिस्टरची दाखल नक्कल दिनांक 10/10/2012 रोजीची आहे. याशिवाय दावा फार्म व सहपत्र आणि तालुका कृषी अधिकारी यांचे पत्रावर दिनांकाचा उल्लेख नाही. म्हणून सदर अर्ज फेटाळण्यायोग्य आहे. मयत संभाजीकडे वाहन चालविण्याचा वैध व परिनाम कारक (Valid and effective driving license ) नव्हते त्यामुळे विमा कराराची अट क्र. Vi A.2 प्रमाणे अर्जदार कुठलाच लाभ मिळण्यास पात्र नाही. अर्जदाराचा तक्रार अर्ज विमा अट क्र. X प्रमाणे सक्षम नाही. गैरअर्जदार 2 यांनी गैरअर्जदार 3 कडे दिनांक 12/11/2012 रोजी पत्र पाठवून वाहन चालविण्याचा परवाना, गाव नमुना 6-ड, व सर्व मुळ कागदपत्रे पाठविण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे गैरअर्जदार 3 यांनी अर्जदारास कळविले. त्याप्रमाणे अर्जदाराने त्याची पूर्तता केली नाही म्हणून दिनांक 07/08/2013 रोजी स्मरणपत्र सुध्दा पाठविण्यात आले परंतू तक्रारदाराने त्याची पूर्तता करण्याऐवजी न्याय मंचात धाव घेतली आहे. म्हणून तक्रारदाराचा तक्रार अर्ज अपरिपक्व असून फेटाळण्या योग्य आहे. मयत संभाजी श्रीराम डाकोरे बद्दल सोलापूर महानगर पालीकेने दिलेला मृत्यु
अहवाल तसेच पी.एम. रिपोर्ट, मरणोत्तर पंचनामा, गुन्हा तपशील नमुना, व एफ.आय. आर. मधील माहिती प्रमाणे मयत व्यक्ती मौजे जावळी ता. औसा जि. लातूर येथील होती आणि व्यवसायाने शेत मजूर होती. संभाजीच्या नावे शेतजमीन होती हे दाखविणारा फार्म डी अभिलेखावर नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे बहुतांश म्हणणे अमान्य केलेले आहे व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा तक्रार अर्ज रक्कम रु. 5,000/- च्या दंडासह फेटाळण्यात यावा.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
7. अर्जदार श्रीराम दत्ता डाकोरे यांचा मुलगा संभाजी श्रीराम डाकोरे हयाचा दिनांक 20/07/2012 रोजी झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान दिनांक 28/07/2012 रोजी मृत्यु झालेला आहे हे अर्जदाराने दाखल केलेल्या पोलीस पेपर्स व मरणोत्तर पंचनाम्यावरुन स्पष्ट आहे. मयत संभाजी श्रीराम डाकोरे हा शेतकरी होता हे अर्जदाराने दाखल केलेल्या 7/12 च्या उता-यावरुन स्पष्ट आहे. अर्जदाराचा मयत मुलगा हा शेतकरी असल्यामुळे अर्जदार हा शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभार्थी होता. अर्जदाराने सदर योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी विमा दावा तालुका कृषी अधिकारी बिलोली यांच्याकडे दाखल केलेला होता. तालुका कृषी अधिकारी बिलोली यांनी सदर दावा दिनांक 16/10/2012 रोजी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविला. हे अर्जदाराने दाखल केलेल्या दिनांक 16/10/2012 च्या सदर पत्राच्या प्रतीवरुन स्पष्ट आहे. गैरअर्जदार विमा कंपनी यांनी अर्जदाराचा मयत मुलगा संभाजी श्रीराम डाकोरे हा गाडी चालवत असतांना त्याच्या जवळ Valid and effective driving license नसल्यामुळे शेतकरी अपघात विमा योजनेच्या अटीचे उल्लंघन झालेले आहे व त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनी विमा रक्कम देण्यास जबाबदार नाही असे कथन केलेले आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्या मयत संभाजी डाकोरे यांच्या ड्रायव्हींग लायसन्सचे अवलोकन केले असता सदर ड्रायव्हींग लायसन्स हे Learning license असून त्याचा कालावधी हा दिनांक 29/7/2010 ते 28/01/2011 असा आहे. अपघात हा दिनांक 20/7/2012 रोजी झालेला आहे. त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे हे योग्य आहे, असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.