Maharashtra

Bhandara

CC/21/4

मुन्‍ना सयसराम बोंद्रे - Complainant(s)

Versus

डॉ.शेखर एम.चोपकर - Opp.Party(s)

श्री. एस. एस.चव्‍हान

30 Sep 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/21/4
( Date of Filing : 11 Jan 2021 )
 
1. मुन्‍ना सयसराम बोंद्रे
रा.सुकळी. ता.तुमसर.जि.भंडारा
भंंडारा
महाराष्‍ट्र
2. पार्थ मुन्‍ना बोंद्रे
रा.सुकळी. ता.तुमसर.जि.भंडारा
भंंडारा
महाराष्‍ट्र
3. रिया मुन्‍ना बोंद्रे
रा.सुकळी. ता.तुमसर.जि.भंडारा
भंंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. डॉ.शेखर एम.चोपकर
रा.चोपकर हॉस्‍पीटल. साई कॉलनी. गोवर्ध नगर. तुमसर. ता.तुमसर. ि‍जि.भंडारा. ४४१९१२
भंंडारा
महाराष्‍ट्र
2. डॉ.सचिन व्‍ही. बाळबुथे
रा.सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्‍णालय, ता.तुमसर.जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
3. डॉ.इंद्रायनी हटवार
आयकॉन हॉस्‍पीटल. के.१२. भारत नगर. अमरावती रोड. ता.ि‍जि.नागपूर. ४४००३३
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 30 Sep 2022
Final Order / Judgement

(पारित दिनांक-30 सप्‍टेंबर, 2022)

(पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी. योगी, मा.अध्‍यक्ष)

 

01.  उपरोक्‍त नमुद तक्रारदार क्रं 1 व ईतर यांनी  विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते क्रं 4 डॉक्‍टर यांचे विरुध्‍द तक्रारकर्ता क्रं 1 यांचेपत्‍नीवर  वैद्दकीय उपचारा करताना निषकाळजीपणा केला आणि दोषपूर्ण सेवा दिल्‍याने नुकसान भरपाई मिळण्‍या बाबत प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम 35 अंतर्गत दाखल केली आहे.

 

02.   तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

       तक्रारदारांचे तक्रारी प्रमाणे ते उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहतात. यातील विरुध्‍दपक्ष    क्रं 1 डॉक्‍टर श्री  शेखर एम. चोपकर यांचे तुमसर, जिल्‍हा भंडारा येथे स्‍वतःचे  हॉस्‍पीटल असून ते सुभाष चंद्र बोस शासकीय रुग्‍णालय तुमसर, जिल्‍हा भंडारा येथे  वैद्दकीय अधिकारी म्‍हणून कार्यरत आहेत. विरुध्‍दपक्ष क्रं 2 डॉ.सचिन व्‍ही. बाळबुधे  हे सुभाष चंद्र बोस शासकीय रुग्‍णालय तुमसर, जिल्‍हा भंडारा  येथे  वैद्दकीय अधिकारी  म्‍हणून कार्यरत आहेत.  विरुध्‍दपक्ष क्रं 3 डॉ. सुश्रृत एम. सावरकर यांचे नागपूर येथे मल्‍टीस्‍पेशॉलिटी हॉस्‍पीटल अॅन्‍ड क्रिटीकल केअर सेंटर  आहे  तर विरुध्‍दपक्ष क्रं 4  डॉ. इंद्रायणी हटवार यांचे नागपूर येथे आयकॉन नावाचे हॉस्‍पीटल  आहे.

   तक्रारकर्ता क्रं 1 यांनी  तक्रारी मध्‍ये पुढे असे नमुद केले की, त्‍यांची पत्‍नी मृतक श्रीमती कोमल मुन्‍ना  बोंद्रे हिला दुस-यांदा  बाळांतपणा करीता  सुभाषचंद्र बोस शासकीय  रुग्‍णालय तुमसर येथे  दिनांक-28.08.2020 रोजी भरती केले होते. त्‍यापूर्वी ती दुस-यांदा  गर्भवती झाल्‍या पासून ते शासकीय  रुग्‍णालयात भरती करे पर्यंतचे कालावधी करीता तिचेवर वैद्दकीय उपचार डॉ. सौ. सुधा नि. भुरे, अश्‍वीनी प्रसुती आणि शुश्रुषागृह तुमसर यांचे कडे सुरु होते. तक्रारकर्ता क्रं 1 यांचे  असे म्‍हणणे आहे की, त्‍याची पत्‍नी कोमल हिचे प्रसुतीपूर्व सर्व वैद्दकीय चाचण्‍यांचे अहवाल हे चांगले व सामान्‍य होते, तिला कुठल्‍याही प्रकारचा  किडनी, लिव्‍हर तसेच रक्‍ताचे इन्‍फेक्‍शन असा कुठलाही त्रास नव्‍हता. दिनांक-31 ऑगस्‍ट, 2020 रोजी सुभाष चंद्र बोस शासकीय रुग्‍णालय,तुमसर जिल्‍हा भंडारा  येथे तक्रारकर्ता क्रं 1 याची पत्‍नी कोमल हिचेवर शस्‍त्रक्रिया विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर   श्री शेखर चोपकर यांनी करुन बाळांतपण केले होते आणि तिचे वर  दिनांक-06 सप्‍टेंबर,2020 पर्यंत वैद्दकीय उपचार  विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री  शेखर  चोपकर  यांनी  केलेत.

      तक्रारकर्ता क्रं 1 यांचा असा आरोप आहे की,  त्‍याची पत्‍नी कोमल हिचेवर  सुभाष चंद्र बोस शासकीय रुग्‍णालय  तुमसर येथे  विरुध्‍दपक्ष  क्रं 1 डॉक्‍टर  श्री शेखर  चोपकर  यांनी दिनांक-31 ऑगस्‍ट, 2020 रोजी शसत्रक्रिया करुन बाळांतपण  करते वेळी योग्‍य  वैद्दकीय उपचार केले नसल्‍यामुळे शस्‍त्रक्रियेच्‍या  दरम्‍यान  तिचे शरिरातून जास्‍त प्रमाणात रक्‍तस्‍त्राव झाल्‍यामुळे तसेच तिचे शरिराचे आतील भागात गंभीर  दुखापत झाल्‍यामुळे शरिरामध्‍ये इन्‍फेक्‍शन झाले होते परंतु शासकीय रुग्‍णालय तुमसर येथील कार्यरत विरुध्‍दपक्ष  क्रं 1  डॉक्‍टर श्री शेखर चोपकर आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 डॉक्‍टर श्री सचिन  व्‍ही.बाळबुधे यांनी संगनमत करुन कोमल हिला तशाच परिस्थिती मध्‍ये   दिनांक-06 सप्‍टेंबर,2020 रोजी  शासकीय रुग्‍णालयातून सुटटी दिली, यावरुन  विरुध्‍दपक्ष  क्रं 1  व 2 डॉक्‍टरांनी  वैद्दकीय सेवेत त्रृटी दिल्‍याची बाब सिध्‍द  होते.  तक्रारकर्ता  क्रं 1 यांनी असे नमुद केले की दिनांक-06 सप्‍टेंबर, 2020 रोजीचे रात्री कोमल हिचे पोटातील त्रास वाढल्‍यामुळे पुन्‍हा दिनांक-07 सप्‍टेंबर, 2020  रोजी शासकीय रुग्‍णालय तुमसर येथे तिला भरती  करण्‍यात आले, त्‍यावेळी विरध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री चोपकर  आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2  डॉक्‍टर श्री सचिन बाळबुधे यांनी तक्रारकर्ता क्रं 1 यांना असे सांगितले की, श्रीमती कोमल हिचे शरीरात मोठया  प्रमाणावर  इन्‍फेक्‍शन झालेले असून शरिरा मध्‍ये दुषीत पाणी जमा झालेले आहे करीता शासकीय रुग्‍णालया मध्‍ये पुढील वैद्दकीय उपचार होऊ शकत नसल्‍याने तिला शासकीय रुग्‍णालय भंडारा येथे नेण्‍याचा  सल्‍ला दिला, त्‍यानुसार शासकीय रुग्‍णालय भंडारा येथे श्रीमती  कोमल  हिला आणून  तिची  वैद्दकीय तपासणी केली असता तेथील डॉक्‍टर यांनी श्रीमती कोमल हिची प्रकृती अतिशय गंभीर  व चिंताजनक असून तिला  नागपूर  येथे  वैद्दकीय  उपचारासाठी नेण्‍याचा सल्‍ला दिला. परंतु नागपूर येथे नेण्‍यापूर्वी भंडारा येथे अष्‍टविनायक हॉस्‍पीटलचे   डॉ. अरुणकुमार डांगे येथे श्रीमती कोमल हिला  नेले असता त्‍यांनी त्‍वरीत तिची सोनोग्राफी व रक्‍ताच्‍या  तपासण्‍या केल्‍या असता डॉ. श्री अरुणकुमार डांगे  यांनी तक्रारकर्ता  क्रं 1 यांना सांगितले की, श्रीमती कोमल हिचे बाळांतपणाचे वेळी शस्‍त्रक्रिया करताना  डॉक्‍टरांनी योग्‍य काळजी घेतली नसल्‍यामुळे  तिचे शरिरात इन्‍फेक्‍शन झालेले आहे आणि त्‍यामुळे तिच्‍या किडन्‍या जवळपास फेल झालेल्‍या आहेत करीता लवकरात लवकर  नागपूर येथे चांगल्‍या दवाखान्‍यात घेऊन जावे. त्‍यामुळे दिनांक-07 सप्‍टेंबर, 2020 रोजीच श्रीमती कोमल  हिला  नागपूर येथील विरुध्‍दपक्ष क्रं 3 डॉक्‍टर श्री सावरकर यांच्‍या मल्‍टी स्‍पेशालिटी हॉस्‍पीटल मध्‍ये आणले असता त्‍यांनी त्‍वरीत श्रीमती कोमल हिचे सिटीस्‍कॅन केले तसेच रक्‍ताच्‍या चाचण्‍या केल्‍यात, वैद्दकीय चाचण्‍यांचेअहवाल  आल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष क्रं 3 डॉक्‍टर  श्री  सावरकर  यांनी  तक्रारकर्ता  क्रं 1 यांना  असे कळविले की,   श्रीमती कोमल हिची शस्‍त्रक्रिया करते वेळी निष्‍काळजीपणा झालेला आहे तसेच शस्‍त्रक्रिया  झाल्‍या नंतर योग्‍य औषधोपचार न मिळाल्‍यामुळे तिचे शरिरातील सर्व  ऑर्गन्‍स मध्‍ये इन्‍फेक्‍शन  झालेले आहे आणि त्‍यामुळे तिची प्रकती अतिशय  चिंताजनक आहे त्‍यामुळे श्रीमती  कोमलवर पुन्‍हा शस्‍त्रक्रिया करुन तिची प्रकृती बरी  करावी  लागेल. तक्रारकर्ता क्रं 1 यांचे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांची पत्‍नी श्रीमती कोमल ही दिनांक-07सप्‍टेंबर, 2020 ते  दिनांक-09 सप्‍टेंबर,2020 रोजीचे रात्री पर्यंत  विरुध्‍दपक्ष क्रं 3 डॉक्‍टर  श्री सावरकर यांचे हॉस्‍पीटल मध्‍ये भरती होती परंतु विरुध्‍दपक्ष  क्रं 3  डॉक्‍टर यांनी  तिचे वर पुन्‍हा शस्‍त्रक्रिया केली नाही, परिणामी तिच्‍या शरिरातील इन्‍फेक्‍शन वाढत गेल्‍यामुळे तिला असहाय्य  वेदना सुरु झाल्‍यात करीता श्रीमती कोमल हिला दिनांक-09 सप्‍टेंबर,2020 चे रात्री विरुध्‍दपक्ष क्रं 3 डॉक्‍टर श्री सावरकर  यांचे हॉस्‍पीटल मधून सुटटी करुन विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टर इंद्रायणी हटवार यांचे आयकॉन हॉस्‍पीटल नागपूर  येथे हलविण्‍यात आले.  विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टर इंद्रायणी हटवार यांचे हॉस्‍पीटल मधील डॉक्‍टरांनी श्रीमती कोमल हिच्‍या पुन्‍हा वैद्दकिय तपासण्‍या केल्‍यात व कळविले की,  तिचेवर पुन्‍हा शस्‍त्रक्रिया करावी लागेल त्‍यासाठी लागणारे पैसे जमा करा त्‍यानुसार लगेच दुसरे दिवशी   दिनांक-10 सप्‍टेंबर,2020 रोजी  तक्रारकर्ता क्रं 1 यांनी पैसे जमा केलेत व लगेच विरुध्‍दपक्ष  क्रं 4 डॉक्‍टर यांनी  श्रीमती  कोमलवर  पुन्‍हा शस्‍त्रक्रिया केली व पुढील वैद्दकीय उपचार सुरु ठेवलेत  परंतु  दिनांक-12 सप्‍टेंबर, 2020  रोजी  तक्रारकर्ता  क्रं 1 यांची पत्‍नी श्रीमती कोमल हिचे शरिरातील इन्‍फेक्‍शन जास्‍तच वाढल्‍याने तिचे प्रकृती मध्‍ये बिघाड  झाला व  त्‍याच दिवशी सकाळी 09.30 वाजता तिचा मृत्‍यू झाला परंतु विरुध्‍दपक्ष  क्रं 4 डॉक्‍टर इंद्रायणी हटवार  यांनी  तक्रारकर्ता  क्रं 1 यांना श्रीमती कोमलवर  केलेल्‍या वैद्दकीय  उपचाराचे तसेच शस्‍त्रक्रियेचे दस्‍तऐवज  पुरविले नाहीत.  तसेच विरुध्‍दपक्ष  क्रं 4 यांनी मृतक कोमल हिचे शरिर शवविच्‍छेदना करीता नागपूर येथील मेयो हॉस्‍पीटल मध्‍ये यासाठी पाठविले नाही की, विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांना विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 डॉक्‍टरांना  मदत  करावयाची होती. जर मृतक कोमल हिचे शवविच्‍छेदन झाले असते तर विरुध्‍दपक्ष  क्रं 1 ते 4 डॉक्‍टरांनी केलेल्‍या  शस्‍त्रक्रिये मधील व औषधोपचारा मध्‍ये केलेल्‍या त्रृटया उघड झाल्‍या असत्‍या यावरुन विरुध्‍दपक्ष क्रं 1  ते 4 यांनी वैद्दकीय सेवेत पूर्णतः त्रृटी केल्‍याचे निश्‍चीत होते.

 

       तक्रारकर्ता  क्रं 1  यांनी  पुढे  असे नमुद  केले की,  दिनांक-12.09.2020 रोजी त्‍यांची पत्‍नी श्रीमती  कोमल हिचे मृत शरिर तुमसर येथे परत आणले. तक्रारकर्ता आणि त्‍यांचे लहान मुलांना न्‍याय मिळावा म्‍हणून  तक्रारकर्ता क्रं 1 हे  त्‍यांचे नातेवाईकां सोबत  कोमल हिचे मृत शरिर पोलीस स्‍टेशन तुमसर येथे नेऊन मृतक कोमल हिचे शवविच्‍छेदन करुन विरुध्‍दपक्ष क्रं1 ते 4 यांचे विरुध्‍द कठोर कारवाई करण्‍यात यावी तसेच  मृतक  हिचे शवविच्‍छेदन  करुन  दोषींच्‍या विरुध्‍द उचित कार्यवाही  करावी या  करीता आंदोलन केले असता पोलीस निरिक्षकांनी तक्रारकर्ता क्रं 1 यांना लवकरात लवकर दोषीं विरुध्‍द उचित कारवाई करु असे आश्‍वासन दिले परंतु कोणतीही कार्यवाही आज पर्यंत केली नाही म्‍हणून  तक्रारकर्ता  क्रं1  यांनी पुन्‍हा  दिनांक-30 ऑक्‍टोंबर,2020 रोजी पोलीस स्‍टेशन तुमसर येथे विरुध्‍दपक्ष क्रं1  ते 4 यांचे  विरोधात लेखी तक्रार नोंदविली. विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टर इंद्रायणी हटवार यांना दिनांक-30 ऑक्‍टोंबर,2020 रोजीच्‍या लेखी तक्रारीची प्रत प्राप्‍त झाल्‍या नंतर मृतक कोमल हिचे दिनांक-12 सप्‍टेंबर, 2020 रोजीचे डेथ  समरी संबधीचे दस्‍तऐवज पुरविलेत, त्‍यामुळे  तक्रारकर्ता  क्रं1 यांनी सदर डेथ समरीचे दस्‍तऐवजाचे आधारावर पुन्‍हा दिनांक-27 नोव्‍हेंबर,2020 रोजी  पोलीस स्‍टेशन तुमसर  येथे  विरुध्‍दपक्ष  क्रं 1 ते 4 डॉक्‍टरांचे  विरोधात  तक्रार  नोंदविली होती.

  

        तक्रारकर्ता   क्रं 1 यांनी पुढे असे नमुद केले की,  विरुध्‍दपक्ष  क्रं 1 ते 4  डॉक्‍टरांचे वैद्दकीय उपचारातील त्रृटीमुळे अगदी कमी वयात त्‍यांची पत्‍नी श्रीमती कोमल हिला आपला जीव गमवावा लागला.  तक्रारकर्ता  क्रं 1 यांची पत्‍नी  ही तिचे  म्‍हाता-या आई  वडीलांची एकमेव मुलगी व त्‍यांचा आधार होती.  श्रीमती कोमल हिचे मृत्‍यूमुळे तिची लहान मुले अनुक्रमे अज्ञान तक्रारकर्ता क्रं 2 व क्रं 3 यांचा आधार गेला.  तिचे मृत्‍यूमुळे तक्रारदार   क्रं 1 ते 3 आणि तिचे म्‍हातारे आई वडील यांना तिव्र स्‍वरुपात दुःख झालेले आहे. मृतक  कोमल हिचेवर वैद्दकीय उपचार करते वेळी फार मोठा आर्थिक खर्च लागल्‍यामुळे तक्रारकर्ता क्रं 1  यांचेवर आर्थिक  बोझा वाढलेला आहे म्‍हणून  तक्रारकर्ता क्रं 1 यांनी  अधिवक्‍ता    श्री एस.एस. चौहान यांचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 4 डॉक्‍टरांना कायदेशीर नोटीस पाठवून त्‍याव्‍दारे रुपये-50,00,00/- रकमेची नुकसान भरपाई  मिळावी अशी मागणी केली होती परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 4 यांना नोटीस मिळूनही त्‍यांनी आज पर्यंत कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही तसेच नोटीसला उत्‍तर सुध्‍दा  दिले नाही म्‍हणून शेवटी  तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षां विरुध्‍द खालील  प्रमाणे  मागण्‍या केल्‍यात-

 

1.     विरुध्‍दपक्ष  क्रं 1 ते 4 डॉक्‍टरांनी केलेल्‍या वैद्दकीय उपचारातील त्रृटीमुळे तक्रारकर्ता  क्रं 1 यांची पत्‍नी श्रीमती कोमल मुन्‍ना बोंद्रे हिचा मृत्‍यू झालेला असल्‍याने  नुकसान भरपाई व आर्थिक सहाय्य म्‍हणून रुपये-50,00,000/- विरुध्‍दपक्ष  क्रं 1  ते 4 डॉक्‍टरां कडून मिळावेत आणि सदर रकमेवर श्रीमती कोमल हिचे मृत्‍यू दिनांका पासून ते रकमेच्‍या  प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18 टक्‍के दराने व्‍याज विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 4 डॉक्‍टरां कडून  तक्रारदारांना देण्‍यात यावे असे आदेशित व्‍हावे.

 

2.   तक्रारकर्ता  क्रं 1 यांची मृतक पत्‍नी कोमल बोंद्रे हिचेवर दिनांक-07.09.2020 पासून  ते दिनांक-12.09.2020 पर्यंत लागलेला संपूर्ण वैद्दकीय खर्च द.सा.द.शे.-18 टक्‍के दराने  व्‍याजासह विरुध्‍दपक्ष  क्रं 1  ते 4 डॉक्‍टरांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

3.   विरुध्‍दपक्ष  क्रं 1 ते 4 डॉक्‍टरांनी  तक्रारकर्ता  क्रं 1 यांची पत्‍नी श्रीमती कोमल  बोंद्रे  हिचेवर  केलेल्‍या वैद्दकीय उपचारातील त्रृटी व निष्‍काळजीपणा मुळे  तक्रारदारांना झालेल्‍या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये-5,00,000/- दयावेत असे आदेशित व्‍हावे.

 

4.   सदर तक्रारीचा खर्च व अधिवक्‍ता यांची फी म्‍हणून  रुपये-1,00,000/- विरुध्‍दपक्षां कडून तक्रारदारांना देण्‍याचे  आदेशित व्‍हावे.

 

5.   याशिवाय योग्‍य ती दाद तक्रारदारांचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

03.     विरुध्‍दपक्ष क्रं 1  डॉक्‍टर श्री शेखर मधुकर चोपकर यांनी आपले लेखी उत्‍तर  जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्‍यांनी  लेखी उत्‍तरा मध्‍ये मृतक कोमल  हिचेवर त्‍यांनी वैद्दकीय अधिकारी या नात्‍याने  सुषाषचंद्र बोस शासकीय  रुग्‍णालय, तुमसर  येथे बाळांतपणाची शस्‍त्रक्रिया केली होती  व मृतक  कोमल  ही शासकीय  रुग्‍णालयात दिनांक-06 सप्‍टेंबर, 2020 पर्यंत भरती होती या बाबी मान्‍य  केल्‍यात. त्‍यांनी  तक्रारदारांनी   तक्रारी मधून  केलेले सर्व आरोप नामंजूर  केलेत.  मृतक  कोमल  हिला दिनांक-28 ऑगस्‍ट, 2020 रोजी शासकीय रुग्‍णालय तुमसर  येथे भरती करण्‍यात आले होते त्‍यावेळी  खालील प्रमाणे  नोंदी  घेण्‍यात आल्‍यात-

  Date of Admission on 28/08/2020 time 4.15 PM

28/08/2020

General Condition

Fair

 

Pulse

80 B/M

 

Blood Pressure

110/70 mm Hg

 

 

 

29/08/2020

General Condition

Moderate (साधारण)

 

Blood Pressure

110/70 mm Hg

 

 

 

30/08/2020

General Condition

Fair

 

Pulse

88 BPM

 

Blood Pressure

110/70 mm Hg

 

Date of Operation on 31/08/2020 Time 12:02 PM

 

31/08/2022.

2.00 PM

General Condition

Fair

 

 

Pulse

80 BPM

 

 

Blood Pressure

110/60 mm Hg

 

 

No bleeding

 

 

31/08/2022.

7.00 PM

General Condition

Fair

 

 

Pulse

96/ m

 

 

Blood Pressure

110/60 mm Hg

 

 

Urine Out pur

300 ml

 

31/08/2022.

9.00 PM

General Condition

Moderate

 

 

Blood Pressure

110/70

 

 

No bleeding

 

     विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री शेखर चोपकर यांनी शासकीय रुगणालय तुमसर येथे मृतक कोमल  हिचेवर बाळांतपणाचे वेळी शस्‍त्रक्रिया करताना व त्‍यानंतर सुध्‍दा कोणताही निष्‍काळजीपणा केलेला नाही तसेच तक्रारकर्ता  क्रं 1 यांनी आपले तक्रारीचे समर्थनार्थ  वैद्दकीय मंडळ (Medical Borad) किंवा वैद्दकीय तज्ञांचे  मत (Medical Expert Opinion) पुरावा  म्‍हणून दाखल केलेले नाही.  विरुध्‍दपक्ष  क्रं 1 यांनी  शासकीय रुग्‍णालया मध्‍ये वैद्दकीय अधिकारी म्‍हणून शस्‍त्रक्रिया केली याबाबत त्‍यांनी तक्रारकर्ता यांचे  कडून कोणतीही फी घेतलेली नाही, त्‍यामुळे  ग्राहक संरक्षण अधिनियम लागू होत नाही  करीता तक्रारदारांची मागणी बेकायदेशीर आहे म्‍हणून विरुध्‍दपक्ष  क्रं 1  डॉक्‍टरां विरुध्‍दची  तक्रार खारीज करण्‍यात यावी असे  नमुद  केले.

 

 

04.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 डॉक्‍टर श्री सचिन व्‍ही. बाळबुधे, सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्‍णालय, तुमसर, तालुका तुमसर जिल्‍हा भंडारा यांना जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मार्फतीने  रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली नोटीस तामील झाल्‍या बाबत रजि. पोच अभिलेखावर उपलब्‍ध आहे  परंतु  अशी नोटीस  मिळाल्‍या नंतरही ते  जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाहीत तसेच त्‍यांनी कोणतेही  लेखी निवेदन  दाखल  केले नाही म्‍हणून  विरुध्‍दपक्ष क्रं 2 डॉक्‍टर श्री सचिन व्‍ही. बाळबुधे, सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्‍णालय, तुमसर, तालुका तुमसर जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍द प्रस्‍तुत  तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा  आदेश जिल्‍हा ग्राहक  आयोग यांचे व्‍दारा दिनांक- 27.09.2021 रोजी पारीत करण्‍यात आला.

 

05.   विरुध्‍दपक्ष क्रं 3  डॉक्‍टर सुश्रृत महेंद्र सावरकर यांनी आपले लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. तक्रारकर्ता यांनी तक्रारीतील परिच्‍छेद क्रं 2 मध्‍ये नमुद केलेल्‍या विधानांशी विरुध्‍दपक्ष क्रं 3 डॉक्‍टरांचा कोणताही संबध नाही व त्‍याचे विषयी त्‍यांना कोणतीही माहिती नसल्‍याने ते नाकारण्‍यात येते असे नमुद केले. तक्रारीतील परिच्‍छेद क्रं 3 ला उत्‍तर देताना असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष  क्रं 3 डॉक्‍टर हे शिक्षीत डॉक्‍टर असून त्‍यांनी एम.बी.बी.एस. एम.डी. (मेडीसीन) M.B.B.S. M.D. (Medicine)  मध्‍ये पदवी घेतलेली आहे आणि वैद्दकीय सल्‍लागार (Consulting Physican) (Intensivist) म्‍हणून ‘PRESTOS MADAN’S HOSPITAL, NAGPUR येथे काम पाहत आहेत.  तक्रारकर्ता क्रं 1 हे त्‍यांचे हॉस्‍पीटल मध्‍ये दिनांक-08.09.2020 चे मध्‍यरात्री 01:30 वाजता एक स्‍त्री सोबत आले, त्‍यावेळी  तक्रारकर्ता व त्‍यांचे नातेवाईकांनी तिची ओळख तक्रारकर्ता क्रं 1 यांची पत्‍नी कोमल बोंद्रे असल्‍याचे सांगून करुन दिली.  तक्रारकर्ता व त्‍यांची पत्‍नी यांनी प्रथमच त्‍यांचे हॉस्‍पीटलला भेट दिली होती, त्‍यापूर्वी त्‍यांनी सदर हॉस्‍पीटल मधून   कोणताही वैद्दकीय सल्‍ला घेतला नव्‍हता तसेच औषधोपचार घेतले नव्‍हते त्‍याच बरोबर  सदर हॉस्‍पीटल मधून वैद्दकीय उपचार घेतल्‍याचा कोणताही ईतिहास नव्‍हता.  तक्रारकर्ता व त्‍यांची पत्‍नी हे पहिल्‍यांदा दवाखान्‍यात आले होते, त्‍यावेळी रुग्‍णाची परिस्थिती गंभीर दिसत होती.  कोवीड-19 ची कोणतीही चाचणी न करता दवाखान्‍यात भरती कसे करावे अशी स्थिती असताना तक्रारकर्ता क्रं 1 यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 3  डॉक्‍टरांना रुग्‍णाची  प्रकृती गंभीर असल्‍यामुळे आणि प्रकृती विषयी उच्‍च जोखीम असल्‍यामुळे तिला त्‍वरीत भरती करुन घ्‍यावे अशी  विनंती केली होती.   तक्रारकर्ता व त्‍यांचे नातेवाईकांनी  लेखी समती पत्र (HAND WRITTEN HIGH RISK CONSENT LETTER)  लिहून  दिल्‍या  नंतर रुग्‍णास  हॉस्‍पीटल मध्‍ये (IV fluids & antibiotics for initial stabilization of the patient) प्रकृती पूर्ववत स्थिर राहण्‍यासाठी रात्री सलाईन व प्रतीजैवक औषधी देण्‍यात आलीत.  दिनांक-08 सप्‍टेंबर,2020 रोजी दिवसा मध्‍ये रुग्‍णास संबधित स्‍त्री रोग तज्ञ यांनी तपासले असता त्‍यांनी तिचे पोटाचा सी.टी.स्‍कॅन रिपोर्ट करावा असे सुचविले, त्‍यानुसार  त्‍याच दिवशी सायंकाळी विरुध्‍दपक्ष  क्रं 3 डॉक्‍टरांना  तिचा सी.टी.स्‍कॅन  रिपोर्ट मिळाला असता त्‍यांनी सदर अहवाला वरुन त्‍वरीत  तक्रारकर्ता क्रं 1 यांना बोलावून  त्‍वरीत रुग्‍णाला स्‍त्री रोग शस्‍त्रक्रिया तज्ञ डॉक्‍टर (Non Applicant No. 3 received the CT Scan report in the evening and on the bais of the Said CT Scan Report,  the Non Applicant No. 3 accordingly advised the Complainant No. 1 to immediately and on priority basis shift the patient to higher center where critical  care gynecology surgical work is being done without wasting any further time duration)  तक्रारकर्ता क्रं 1 हे आर्थिक अडचणी मुळे रुग्‍णास हलविण्‍यास तयार नव्‍हते त्‍यावेळी विरुध्‍दपक्ष  क्रं 3 डॉक्‍टरांनी  त्‍यांना लंता मंगेशकर हॉस्‍पीटल, हिंगणा दिनांक-09 सप्‍टेंबर,2020 रोजीचे 16.00 वाजता त्‍यांचे हॉस्‍पीटल मधून रुग्‍णाचा  डिसचॉर्ज घेतला आणि तक्रारकर्ता यांनी स्‍वतः अॅम्‍बुलन्‍स व्‍यवस्‍था करुन रुग्‍णाला दुसरी कडे हलविले. दिनांक-09 सप्‍टेंबर, 2020 रोजी दुपारी 04.00 वाजता डिसचॉर्ज दिल्‍या नंतर पुढे काय झाले याची विरुध्‍दपक्ष क्रं 3 डॉक्‍टरांना  माहिती नाही. तक्रारी मधील अन्‍य विधाने   त्‍यांनी माहिती अभावी नामंजूर  केलेत. तक्रारकर्ता यांनी पैसे उकळण्‍यासाठी खोटी  तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्ता यांनी सत्‍य वस्‍तुस्थिती लपवून त्‍यांचेवर  खोटे व चुकीचे आरोप केलेले  आहेत. तक्रारकर्ता यांनी विरुध्‍दपक्ष  क्रं 3 डॉक्‍टरांना त्रास देण्‍याचे उद्देश्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली आहे आणि जिल्‍हा ग्राहक आयोगाचा अमूल्‍य वेळ वाया घालविलेला आहे सबब  तक्रारकर्ता यांची तक्रार जास्‍तीत जास्‍त खर्च बसवून  खारीज करावी आणि विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांना नैसर्गिक न्‍याय  मिळवून  दयावा  असे विरुध्‍दपक्ष क्रं 3 डॉक्‍टरांनी  लेखी  उत्‍तरात नमुद केले.

 

 

06.   विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉ. इंद्रायणी संदिप हटवार यांनी  आपले लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष  दाखल केले.  विरुध्‍दपक्ष  क्रं 4 डॉक्‍टरांनी तक्रारीतील परिच्‍छेद क्रं 2 ला उत्‍तर देताना सर्व विधाने माहिती अभावी नामंजूर केलीत.  थोडक्‍यात मृतक कोमल हिचे दुसरे गरोदरपण, तिचेवर शासकीय रुग्‍णालय, तुमसर येथे बाळांतपणाची झालेली शस्‍त्रक्रिया, शासकीय रुग्‍णालया मध्‍ये शस्‍त्रक्रिया होण्‍यापूर्वी  तिचे चांगले असलेले आरोग्‍य या बाबी माहिती अभावी नामंजूर केल्‍यात. मात्र मृतक कोमल हिचे शरीरात अतिशय मोठया प्रमाणावर इन्‍फेक्‍शन होते व जास्‍त प्रमाणात रक्‍तस्‍त्राव झाला होता या बाबत दुमत नसल्‍याचे नमुद केले. तक्रारीतील परिच्‍छेद क्रं 4 ला उत्‍तर  देताना असे नमुद  केले की, अष्‍टविनायक हॉस्‍पीटल भंडारा येथील डॉ. अरुणकुमार डांगे यांनी तक्रारकर्ता  क्रं 1 यांना कोमलच्‍या प्रकृती बाबत स्‍पष्‍ट कल्‍पना दिली होती असे  तक्रारीत नमुद  केलेले असल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 4 ज्‍या नागपूर  येथील प्रख्‍यात स्‍त्रीरोग तज्ञ आहेत त्‍यांनी  वैद्दकीय उपचारा मध्‍ये निष्‍काळजीपणा केल्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही असे नमुद केले. वस्‍तुतः कोमलला नागपूर येथे त्‍यांचे  हॉस्‍पीटल मध्‍ये  भरती करण्‍यापूर्वीच तिचे शरीरात इन्‍फेक्‍शन वाढलेले  होते. कोमल हिला दिनांक-07.09.2020 रोजी विरुध्‍दपक्ष कं 3 डॉक्‍टरांचे दवाखान्‍यात भरती केले होते या बाबत वाद नाही असे नमुद केले. तक्रारकर्ता यांचे म्‍हणणे की, दिनांक-09 सप्‍टेंबर, 2020  रोजीचे रात्री कोमलला विरुध्‍दपक्ष क्रं 4 यांचे  दवाखान्‍यात भरती केले होते हे विधान चुकीचे असून तिला दिनांक-10 सप्‍टेंबर,2020 रोजी पहाटे 2.00 वाजता विरुध्‍दपक्ष क्रं 4 यांचे आयकॉन हॉस्‍पीटल, भरत नगर,अमरावती रोड,नागपूर येथे  भरती करण्‍यात आले होते.  विरुध्‍दपक्ष क्रं 4 यांनी त्‍वरीत पैसे जमा करायला सांगितले होते ही बाब चुकीची आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांनी कोमलवर शस्‍त्रक्रिया केली व पुढील  वैद्दकीय उपचार केले ही बाब मान्‍य केली. दिनांक-12 सप्‍टेंबर,2020 रोजी कोमल हिचे शरिरात संसर्ग वाढल्‍यामुळे तिचा दिनांक-12 सप्‍टेंबर,2020 रोजी सकाळी 09.30 वाजता मृत्‍यू झाला होता ही बाब मान्‍य केली. विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांनी  कोमल हिचे वर केलेल्‍या वैद्दकीय उपचाराचे च शस्‍त्रक्रियेचे  दस्‍तऐवज पुरविले नाहीत ही बाब नामंजूर असल्‍याचे नमुद केले.  विरुध्‍दपक्ष कं 4 डॉक्‍टरांनी मृतक कोमल हिचे शरीर शवविच्‍छेदना करीता शासकीय महाविद्दालयात पाठविले नाही हे तक्रारकर्ता  क्रं 1 यांचे  म्‍हणणे नामंजूर  केले. त्‍यांनी  कोमल हिचे  वैद्दकीय उपचार  करताना  कोणतीही  त्रृटी केलेली नाही, उलटपक्षी तक्रारकर्ता यानी तक्रारीत नमुद केलेले आहे की, कोमल हिचा मृत्‍यू शरिरात संसर्ग वाढल्‍यामुळे झाला. तक्रारकर्ता यांनी पोलीस स्‍टेशन तुमसर येथे दिलेल्‍या  दिनांक-27.11.2020 रोजीचे तक्रारीतील मजकूरा वरुन विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांनी मृत्‍यू सारांश  पुरविला  होता  ही बाब सिध्‍द होते.  तक्रारीतील परिच्‍छेद क्रं 5  ते 8 मधील विध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरां विरुध्‍द केलेले आरोप नामंजूर केलेत.  तक्रारकर्ता यांनी दिनांक-04.12.2020 रोजीची दिलेली  नोटीस अमान्‍य करण्‍यात येते. विरुध्‍दपक्ष  क्रं 4  डॉक्‍टरां  विरुध्‍द  केलेल्‍या मागण्‍या या नामंजूर करण्‍यात येत असल्‍याचे  नमुद केले.

 

     विरुध्‍दपक्ष क्रं 4  डॉक्‍टरांनी  आपल्‍या विशेष कथनात असे  नमुद केले की,  कोमल हिचे  पूर्वीचे आजारापणा  बाबत व केलेल्‍या वैद्दकीय  उपचाराबाबत त्‍यांना  माहिती नाही. कोमल हिला दिनांक-10.09.2020 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांच्‍या  हॉस्‍पीटलमध्‍ये रात्री 02.00 वाजता भरती केले होते, त्‍यावेळी रात्री उपलब्‍ध असलेल्‍या निष्‍णात डॉक्‍टरां कडून  तिची  वैद्दकीय तपासणी करण्‍यात आली  होती,त्‍यावेळी तिची तब्‍येत अतिशय खालावलेली असलयामुळे  ती  बेशुध्‍दावस्‍थेत होती. वैद्दकीय परिक्षणा मध्‍ये असे दिसून आले की, तिला जंतू  संसर्गा मुळे 101 डिग्री ताप असून तिची नाडी तब्‍बल 145 प्रती मिनिट या गतीची होती. तिचा वरचा रक्‍तदाब  केवळ 80 होता जेंव्‍हा की, सामान्‍यतः तो 110 ते 120 च्‍या दरम्‍यान असावयास हवा. तसेच खालच्‍या पातळीतील रक्‍तदाब  जो सामान्‍यतः 70 ते 80  पर्यंत असावयास हवा होता परंतु तो इतका खाली  गेला होता की, त्‍याचे मोजमाप देखील यंत्रा मध्‍ये येऊ शकत नव्‍हते. त्‍याच प्रमाणे तिचे पोट भंयकर फुगलेले होते आणि ते अतिशय दुखत  होते. ही अवस्‍था जंतूचा अतिशय जास्‍त संसर्ग झाल्‍याने झाली असे प्राथमिक निदान झाल्‍याने तेथील उपलब्‍ध डॉक्‍टरांनी कोमल हिच्‍या चाचण्‍या केल्‍या.  त्‍या शिवाय कोमल हिला  मदन  हॉस्‍पीटल मध्‍ये भरती केल्‍या नंतर  ज्‍या चाचण्‍या  केल्‍या होत्‍या त्‍यामध्‍ये शरिरातील  संसर्गामुळे  पुढील घटकद्रव्‍ये विषमतोल  प्रमाणात आढळून आलीत-

 

घटक द्रव्‍य

सामान्‍य प्रमाण

आढळलेले  प्रमाण

युरीया

10 ते 40 एम.जी./डी.एल.

53 एम.जी./डी.एल.

क्रियेटीनीन

0.6 ते 1.2

1.2 एम.जी./डी.एल.

सोडीयम

135 ते 149

137 एम.जी./डी.एल.

पोटॅशियम

3.5 ते 9.5

4.2 एम.जी./डी.एल.

मॅग्‍नशियम

1.7 ते 2.2

1.98 एम.जी./डी.एल.

कॅलशियम

8.8 ते 10.8

8.9 एम.जी./डी.एल.

त्‍या शिवाय कोमल हिचेवर डॉ. दिनेश सिंग यांचे कडे पूर्वी करण्‍यात आलेल्‍या सिटी स्‍कॅनच्‍या रिपोट मध्‍ये असे आढळून आले की, कोमल हिचे पोटातील गर्भाशयाची  पिशवी आणि लघवीच्‍या पिशवी जवळ तिचे पोटामध्‍ये रक्‍तमिश्रीत पाणी अतिशय मोठया प्रमाणात पसरले असून त्‍यामध्‍ये घाण, रक्‍ताच्‍या गुठळया आणि धातू सदृश्‍य वस्‍तु देखील  (कॉपर टी) आल्‍याचे नमुद आहे. यामुळे कोमल हिच्‍या रक्‍ता मध्‍ये संपूर्ण जंतू पसरले  असल्‍यामुळे तिला सेप्‍टीक शॉक झालेला आहे असे निदर्शनास आल्‍यामुळे कोमल  हिच्‍या नाजूक प्रकृतीची कल्‍पना  तक्रारकर्ता कं 1  यांना देण्‍यात आली होती, या बाबी समजावून  घेऊन तक्रारकर्ता  क्रं 1 यांनी दिनांक-10 सप्‍टेंबर, 2020 रोजी रात्री 2.40 वाजता अॅडमीशन  फॉर्मवर सही केली होती.  दिनांक-10 सप्‍टेंबर, 2020 रोजीचे पहाटे 03.30 वाजता विरुध्‍दपक्ष क्रं  4 डॉक्‍टरांनी तातडीने डॉक्‍टर राणी लाखे, गंभीर आजार तज्ञ यांना बोलावून घेतले होते आणि त्‍यांचेशी सविस्‍तर चर्चा करुन  कोमल  हिची शस्‍त्रक्रिया  करण्‍यापूर्वी तिची प्रकृती काही  अंशी स्थिर करण्‍या करीता काय करावे लागेल हे निश्‍चीत करुन तिच्‍या पुन्‍हा एकदा चाचण्‍या  करण्‍यात आल्‍या होत्‍या, त्‍या वैद्दकीय चाचण्‍याचे निष्‍कर्ष पुढील प्रमाणे आहेत-

घटक द्रव्‍य

सामान्‍य प्रमाण

आढळलेले  प्रमाण

युरीया

10 ते 40 एम.जी./डी.एल.

53.94 एम.जी./डी.एल.

क्रियेटीनीन

0.6 ते 1.2

1.2  3.96 एम.जी./डी.एल.

सोडीयम

135 ते 149

138.3  एम.जी./डी.एल.

पोटॅशियम

3.5 ते 9.5

4.2  4.33 एम.जी./डी.एल.

सी.आर.पी.

6 पर्यंत एम.जी./डी.एल.

444.9 एम.जी./डी.एल.

एस.जी.पी.टी.

10 ते 40

120 यु./एल

पी.टी.

13

29.1 सेकंद

आय.एन.आर.

1

2.65

 या चाचण्‍यांचे आधारे विरुध्‍दपक्ष क्रं 4 यांचे हॉस्‍पीटल मधील डॉक्‍टरांना हे कळले की, प्रेस्‍टोस मदन हॉस्‍पीटलमध्‍ये कोमल असताना आणि  विरुध्‍दपक्ष क्रं 4 यांचे हॉस्‍पीटल मध्‍ये कोमलला आणल्‍यावर तिची तब्‍येत किती खालावली होती. या चाचण्‍यांचे आधारे विरुध्‍दपक्ष क्रं 4 आणि  ईतर डॉक्‍टरांचे चमूला कोमल  हिचे वर शस्‍त्रक्रिया  करण्‍या पूर्वी  चांगल्‍यात चांगले उपचार करुन तिची प्रकृती  शस्‍त्रक्रिये करीता झेपेल इतपत स्थिर करणे. तसेच सदर वैद्दकीय चाचण्‍याचे आधारे असेही  डॉक्‍टरांना  दिसून आले की,  कोमल हिच्‍या शरिरातील जंतूचा  प्रार्दुभाव आणखी वाढला  असून तिला हदयघात होण्‍याचा तसेच मुत्रपिंड आणि यकृता मध्‍ये बिघाड होण्‍याचा धोका आहे.  जंतु संसर्ग वाढल्‍यामुळे तिची प्रकृती खालावेलेली होती आणि तिच्‍या शरिरा मध्‍ये रक्‍त गोठण्‍याची क्षमता अतिशय कमी झाली होती त्‍यामुळे कोमल हिला लगेच आय.सी.यु. मध्‍ये हलविण्‍यात आले आणि तिचेवर प्रभावी अॅन्‍टीबायोटीक्‍स  व ईतर औषधोपचार  सुरु  करण्‍यात आले होते.  दिनांक-10.09.2020 चे सकाळी 10.00 वाजता जंतू संसर्गामुळ कोमल हिची अवस्‍था अतिशय नाजूक झाली होती,  तिचेवर शस्‍त्रक्रिया करणे अवघड बनले होते परंतु त्‍याच बरोबर  तिचे पोटातील दुषीत पाणी रक्‍त काढणे जरुरीचे होते, या बाबीची कल्‍पना तक्रारकर्ता  क्रं 1 यांना दिली होती, त्‍यांनी शस्‍त्रक्रिया करा असे स्‍पष्‍टपणे सांगितल्‍या मुळे विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांनी  मुत्रपिंड विशेषज्ञ  डॉक्‍टर विशाल रामटेके यांना बोलाविले होते, त्‍यांनी वैद्दकीय तपासणी केली असता त्‍यांचे असे निदर्शनास आले की,  औषधोपचार सुरु  असून देखील कोमल हिला लघवी न  झाल्‍यामुळे तिच्‍या पोटाचा फुगारा वाढला असून त्‍यामुळे आणखी  इजा होण्‍याची किंवा रक्‍तस्‍त्राव होण्‍याची  शक्‍यता होती या  बाबीची पुन्‍हा तक्रारकर्ता कं 1 यांना कल्‍पना दिली होती आणि त्‍यांनी कोमल हिच्‍या शस्‍त्रक्रियेस पुन्‍हा होकार दर्शविल्‍यामुळे  विरुध्‍दपक्ष क्रं 4 यांनी कोमल हिची शस्‍त्रक्रिया करण्‍याचे पूर्वीची प्रक्रिया सुरु केली. दिनांक-10 सप्‍टेंबर,2020 रोजी दुपारी 12.30 वाजता कोमल हिच्‍या मूत्रपिंड, यकृत आणि मेंदूचे कार्य सुरळीतपणे नसल्‍या मुळे जर शस्‍त्रक्रिया  केली तर तिच्‍या या  अवयांवर  तसेच ह्रदयावर  परिणाम होईल किंवा  कसे याची चाचणी करण्‍या करीता विरुध्‍दपक्ष  क्रं 4 डॉक्‍टरांनी डॉक्‍टर राणी लाखे क्रिटीकल केअर फीजीशियन आणि डॉक्‍टर राजेश कल्‍याणकर  ह्रदयरोग तज्ञ आणि डॉक्‍टर रसिका तिमाने (भूल तज्ञ) यांचेशी चर्चा  केली आणि त्‍या अनुषंगाने कोमलची ईसीजी, छातीचा एक्‍स रे आणि ईको या चाचण्‍या केल्‍यात. या चाचण्‍यांचे आधारे सर्व डॉक्‍टर या निष्‍कर्षा प्रत पोहचले की, कोमलच्‍या ह्रदयाचही स्थिती जरी शस्‍त्रक्रिया झेलू शकेल अशी असली तरी देखील शस्‍त्रक्रियेत जोखीम आहे, ही बाब तक्रारकर्ता क्रं1 यांना पुन्‍हा समजावून सांगून जोखीम अतिशय जास्‍त असल्‍यामुळे शस्‍त्रक्रिये करीता त्‍यांची समती घेण्‍यात आली. कोमल हिची गंभिर स्थिती पाहता तिची प्रकृती शस्‍त्रक्रिया झेपेल इतपत प्रथमतः दुरुस्‍त करणे आवश्‍यक होते त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष  क्रं 4 डॉक्‍टरांनी   त्‍या पध्‍दतीने कोमलवर औषधोपचार सुरु केले. तिची प्रकृती शस्‍त्रक्रिये करीता पुरेशी  समाधान कारक झाल्‍यावर दिनांक-10.09.2020 रोजी 2.30 वाजता कोमलच्‍या पोटातील  संक्रमीत पाणी आणि रक्‍त काढण्‍यासाठी तातडीने पोटावर शस्‍त्रक्रिया  करणे आवश्‍यक असल्‍याने  विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टर आणि त्‍यांच्‍यासह इतर तज्ञ डॉक्‍टरांनी कोमलची शस्‍त्रक्रिया केली.  सदर शस्‍त्रक्रियेचे छायाचित्रण देखील करण्‍यात आले होते.  या शस्‍त्रक्रिये दरम्‍यान कोमलचे पोट उघडून तिच्‍या गर्भाशयात साठलेले रक्‍त मिश्रीत घाण पाणी, लघवी, रक्‍ताच्‍या गुठळया आणि कॉपरटी काढून तिच्‍या जखमा साफ करण्‍यात आल्‍या आणि तिच्‍या  गर्भाशय आणि मूत्राशयाच्‍या पिशव्‍या देखील योग्‍यरित्‍या शिवण्‍यात आल्‍यात. या बाबी करताना  याची योग्‍य ती काळजी घेण्‍यात आली होती की, पुनःश्‍च कोमल हिच्‍या पोटाच्‍या आतल्‍या अवयवांना इजा होऊ नये. तक्रारकर्ता क्रं 1 यांना कोमलवर विरुध्‍दपक्ष  क्रं 4 यांनी  केलेल्‍या शस्‍त्रक्रियेच्‍या जोखीमेची जाणीव असताना देखील तसेच शस्‍त्रक्रियेचे  व्‍हीडीओ शूटींग न बघता तसेच वैद्दकीय तज्ञांचा सल्‍ला न घेता विरुध्‍दपक्ष  क्रं 4 यांचे विरुध्‍द खोटे आरोप केलेले आहेत. दिनांक-11.09.2020 रोजी कोमलवर शस्‍त्रक्रिये नंतर असलेली जोखीम लक्षात घेता तिला व्‍हेटींलेटर वर ठेवण्‍यात आले होते.  तिच्‍या शरिराची  नैसर्गिकरित्‍या  रक्‍त गोठण्‍याची क्षमता अतिशय कमी झाल्‍यामुळे  कोमल हिच्‍या रक्‍ताचे वेगवेगळे घटक शस्‍त्रक्रिये पूर्वी आणि  नंतर घेण्‍यात आले होते आणि  तिला आय.सी.यू. मध्‍ये ठेवण्‍यात आले  होते.

 

     विरुध्‍दपक्ष  क्रं 4 डॉक्‍टरांनी असे नमुद केले की, या सर्व वैद्दकीय उपचार आणि औषधोपचारामुळे तिचे शरिरातील संसर्गाचे प्रमाण कमी  झाले होते ही  बाब शस्‍त्रक्रिये नंतर  दुसरे दिवशी कोमल हिच्‍या ज्‍या वैद्दकीय चाचण्‍या  केल्‍या होत्‍या त्‍यावरुन दिसून आली,  वैद्दकीय चाचण्‍यांचे परिणाम पुढील प्रमाणे आहेत-

घटक द्रव्‍य

सामान्‍य प्रमाण

आढळलेले  प्रमाण

युरीया

10 ते 40 एम.जी./डी.एल.

50 एम.जी./डी.एल.

क्रियेटीनीन

0.6 ते 1.2

1.2  1.38 एम.जी./डी.एल.

सोडीयम

135 ते 149

149.8  एम.जी./डी.एल.

पोटॅशियम

3.5 ते 9.5

3.27 एम.जी./डी.एल.

सी.आर.पी.

6 पर्यंत एम.जी./डी.एल.

300.1 एम.जी./डी.एल.

एस.जी.पी.टी.

10 ते 40

13 एम.जी./डी.एल.

पी.टी.

13

21.8 सेकंद

आय.एन.आर.

1

1.93

    यावरुन ही बाब दिसून येते की, कोमल हिचे मुत्रपिंडाचे कार्य काही प्रमाणात सुरळीत झाल होते परंतु तिचे यकृत, रक्‍त गोठण्‍याची क्षमता, मेंदू आणि ह्रदय यांच्‍या कार्यपध्‍दती मध्‍ये म्‍हणावे तसे चांगले बदल झालेले नव्‍हते, याचे कारण शस्‍त्रक्रिये दरम्‍यान जरी तिचे पोटातील घाण बाहेर काढली असली तरी शरिरात जंतु संसर्ग पसरलेला असल्‍यामुळे शरिरातील ईतर अवयांचे कार्य पूर्वी प्रमाणे सुरळीत होण्‍यास अडथळा निर्माण होत होता.  विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टर आणि त्‍यांची चमू ही कोमलवर लक्ष ठेऊन होती आणि तिचेवर औषधोपचार सुरु होते.  दिनांक-12 सप्‍टेंबर, 2020 रोजी पहाटे दोन वाजता कोमल हिचा रक्‍तदाब अचानकपणे कमी झाल्‍याचे आणि तिचे ह्रदयाची गती अचानकपणे वाढल्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांच्‍या लक्षात आले, ही लक्षणे अचानक ह्रदयघात  (Acute Coronary Syndrome) होण्‍याची शक्‍यता असल्‍याचे लक्षात आल्‍या नंतर तातडीने विरुध्‍दपक्ष क्रं 4 आणि डॉक्‍टर राणी लाखे यांनी कोमल हिला इंजेक्‍शन  दिले  व इतर औषधोपचार केला. तिचे चाचण्‍या केल्‍या नंतर असे लक्षात आले की, तिच्‍या ह्रदयाची कार्यपध्‍दती मंदावली असून तिला धोका आहे,  तिच्‍या  गंभीर प्रकृतीची माहिती  तक्रारकर्ता क्रं 1 यांना देण्‍यात आली होती.  सकाळी 07.00 वाजता कोमल हिच्‍या  सर्व महत्‍वाच्‍या अवयवांनी काम  करणे बंद  केले  तरी देखील शेवटचा  प्रयत्‍न म्‍हणून  कोमल हिला  सुमारे दोन   तासा  पर्यंत सी.पी.आर. देण्‍यात आले, तथापी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, सकाळी-09.30  वाजता कोमल हिचा  मृत्‍यू झाल्‍याचे घोषीत करण्‍यात  आले.

 

     उपरोक्‍त नमुद घटनाक्रम पाहता, विरुध्‍दपक्ष क्रं 4 यांनी कोमल हिचेवर वैद्दकीय उपचार आणि औषधोपचार  करताना कोणताही निष्‍काळजीपणा  केला नाही. सदरचे कालावधी मध्‍ये कोवीड रोगाचा प्रार्दुभाव असताना आणि शासनाने लॉकडाऊन घोषीत केलेला असतानाही विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांनी कोमलला सर्व प्रकारची वैद्दकीय मदत उपलब्‍ध करुन दिली तसेच स्‍वतःचे हॉस्‍पीटल मधीलऔषधी उपलब्‍ध करुन दिली त्‍यामुळे तक्रारकर्ता क्रं 1 यांनी तक्रारीतून त्‍यांचे विरुध्‍द केलेले सर्व आरोप हे खोटे व चुकीचे आहेत. कोमलच्‍या मृत्‍यू नंतर तिचे वैद्दकीय उपचाराचे  सर्व दस्‍तऐवज आणि मृतदेह  जबाबदार व्‍यक्‍तीचे ताब्‍यात देण्‍यात आला होता. त्‍यावेळी तक्रारकर्ता क्रं 1 यांची मनःस्थिती योग्‍य नसल्‍यामुळे त्‍यांचे सोबत असलेले श्री अश्‍वीन अंकुश मटरे यांना स्‍पष्‍टपणे समजावून सांगितले होते की, कोमल हिचे शवविच्‍छेदन  करणे जरुरीचे आहे तथापि कोमल हिचा मृत्‍यू  कशामुळे झाला  हे तिचे नातेवाईकांना माहिती असल्‍यामुळे त्‍यांनी शवविच्‍छेदना करीता कोमलचा मृतदेह शासकीय वैद्दकीय महाविद्दालयात पाठविण्‍यास नकार दिला. एवढेच नव्‍हे तर  सर्व कागदपत्र आणि मृतदेह मिळाल्‍याचे आणि  कोमल हिचे  पोस्‍टमार्टम करीता  तयार नसल्‍यामुळे कोमलचे पती मुन्‍ना बोंद्रे यांनी लिहून दिल्‍या मुळे विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांचा नाईलाज झाला, या सर्व बाबी तक्रारकर्ता यांनी लपवून उलट मृतक कोमलचे  शवविच्‍छेदन केले नसल्‍याचा चुकीचा आरोप विरुध्‍दपक्ष  क्रं 4 डॉक्‍टरांवर लावला.   कोमल हिचे  पूर्वीचे  वैद्दकीय  दस्‍तऐवजा वरुन  सुध्‍दा  तिचे  मृत्‍यूचे कारण स्‍पष्‍ट होते त्‍यामुळे शव विच्‍छेदन झाले नाही म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांनी  निषकाळजीपणा केला असे म्‍हणता येणार नाही. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्‍या वृत्‍तपत्रातील  बातम्‍याचे कात्रणावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, कोमल हिचा  मृतदेह तिचे नातेवाईकांनी पोलीस स्‍टेशन तुमसर येथे  ठेवला होता तथापी त्‍याही वेळेस  तक्रारकर्ता यांनी  मृतकाचे शवविच्‍छेदन करण्‍याची  तयारी  दर्शविली नाही. कोमल हिचे मृत्‍यू बाबत तक्रारकर्ता  क्रं 1 हे कोणत्‍या आधारावर विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरां कडून नुकसान भरपाई मागीत आहेत याचे कोणतेही  स्‍पष्‍टीकरण तक्रारी मध्‍ये दिलेले नाही. आधी पासूनच गंभीर प्रकृती असलेल्‍या कोमलवर वैद्दकीय उपचार  करताना विरुध्‍दपक्ष  क्रं 4 डॉक्‍टरांनी त्‍यांचे संपूर्ण  वैद्दकीय ज्ञान  वापरुन तिची प्रकृती स्थिर करण्‍यासाठी आटोकाट प्रयत्‍न केला. कोणत्‍याही सक्षम पुराव्‍या शिवाय तसेच वैद्दकीय तज्ञांचे सल्‍ल्‍या शिवाय तक्रारकर्ता यांनी विरुध्‍दपक्ष  क्रं 4 डॉक्‍टरां विरुध्‍द प्रस्‍तुत  खोटी तक्रार दाखल केलेली असून चुकीच्‍या पध्‍दतीने नुकसान  भरपाई मागितलेली आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांनी कोमल हिचेवर  वैद्दकीय उपचार करताना त्‍यांचे सर्व कौशल्‍यापणाला लावले  परंतु  त्‍याची जाणीव न ठेवता तक्रारकर्ता यांनी त्‍यांचेवर खोटे आरोप केल्‍यामुळे त्‍यांना कुंचबणा व त्रास  सहन करावा लागत आहे यास्‍तव  प्रस्‍तुत तक्रार  रुपये-1,00,000/- खर्चासह  विरुध्‍दपक्ष  क्रं 4 डॉक्‍टरां विरुध्‍द खारीज करण्‍यात यावी अशी  विनंती  केली.

 

 

07    तक्रारदारांची  तक्रार आणि  तक्रारकर्ता क्रं 1 यांचा  शपथे वरील पुरावा, तक्रारकर्ता यांनी अधिवक्‍ता श्री एस. एस. चौहान यांचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने दिनांक-04.12.2020 रोजीची विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 4 डॉक्‍टरांना पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत, रजिस्‍टर पोस्‍टाच्‍या पावत्‍या, रजि.पोच, पोलीस स्‍टेशन तुमसर येथे दिलेली तक्रार,विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांनी दिलेली डेथ समरी, लोकमत मधील वृत्‍तपत्राचे कात्रण, विरुध्‍दपक्ष क्रं 3  डॉक्‍टरांकडे रुपे-5000/- जमा केल्‍या बाबत पावती प्रत, विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांकडे अनुक्रमे रुपये-30,000/- आणि रुपये-30,000/- जमा केल्‍या बाबत पावत्‍यांच्‍या प्रती, सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्‍णालय तुमसर येथील डिसचॉर्ज  कॉर्ड,  मृत्‍यू प्रमाणपत्र अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात.

 

 

08.  विरुध्‍दपक्ष क्रं 1  डॉक्‍टर श्री शेखर एम. चोपकर  यांनी  आपले लेखी उत्‍तर दाखल केले. तसेच शपथेवरील पुरावा दाखल केला. त्‍याच बरोबर विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टरांनी  आपले पुरवणी शपथपत्र दाखल केले. विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टरांनी साक्षीदार डॉ. कार्तीक वासुदेव लांजे यांचा शपथे वरील पुरावा दाखल केला तसेच पुराव्‍या सोबत डॉ. लांजेवार यांचे वैद्दकीय  प्रमाणपत्र दाखल केले. विरुध्‍दपक्ष  क्रं 1  डॉक्‍टर श्री चोपकर यांनी मृतक कोमल  हिचा सुभाषचंद्र बोस  शासकीय रुग्‍णालय  तुमसर येथील दिनांक-31.08.2020 ते दिनांक-06.09.2020 या कालावधीचा केस रेकॉर्ड दाखल केला तसेच शासकीय  रुग्‍णालय तुमसर येथील मृतक कोमल हिचा तापाचा तक्‍ता, अॅनेस्‍थेशिया नोटीस,एल.एस.सी.एस. ऑपरेटीव्‍ह नोटस, रुग्‍ण  कार्डची प्रत अशा  दस्‍तऐवजांच्‍या प्रती दाखल केल्‍यात.  तसेच मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे  न्‍यायनिवाडयांच्‍या प्रती  दाखल केल्‍यात.

 

 

09.  विरुध्‍दपक्ष क्रं 3  डॉक्‍टरांनी  लेखी उत्‍तरा सोबत स्‍वतःचा शपथे वरील पुरावा आणि लेखी युक्‍तीवाद  दाखल केला.

 

10.  विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टर इंद्रायणी संदिप हटवार यांनी लेखी उत्‍तर दाखल केले. तसेच स्‍वतःचा शपथे वर पुरावा दाखल केला.  कोमलच्‍या मृत्‍यू नंतर तिचे शव विच्‍छेदन अहवाल करण्‍या बाबत दिलेली सुचना, कोमल हिचा अॅडमीशन फार्म,  मृतक कोमल  हिचे दिनांक-10.09.2020 रोजीचे विविध वैद्दकीय चाचण्‍यांचे अहवाल, Special Informed Consent for Surgery,  उच्‍च जोखीम शल्‍यक्रिया सहमती पत्र, डेथ रिपोर्ट, डेथ समरी, डॉ. प्रोग्रेसनोटस,  पेन ड्राईव्‍ह व्‍दारे शस्‍त्रक्रियेचे व्‍हीडीओ शुटींग, व्‍हीडीओ शुटींग बाबत विरुध्‍दपक्ष क्रं 4 यांचा  पुरावा, मृतक कोमल हिचेवर तारीख निहाय केलेले वैद्दकीय उपचारा बाबत विशेषज्ञ डॉक्‍टरांची नावे, रुग्‍णाची स्थिती, वैद्दकीय चाचण्‍यांचे अहवाल, शेरा, अॅनेक्‍सर नमुद दस्‍तऐवजाची प्रत दाखल केली.

 

 

11.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री शेखर एम. चोपकर यांनी आपली भिस्‍त खालील नमुद    मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवाडयांवर ठेवली-

I        Hon’ble Supreme Court of Indai- Civil Appeal No. 7380of 2009- “Dr. Harksh Kumar Khurna-Versus- Joginder Singh and others” Judgement date- 7th September 2021

 

II    Hon’ble Supreme Court of Indai- Civil Appeal No. 6507of 2009- “Dr. (Mrs) Chanda Rani Akhouri and others-Versus-Dr. M.A. Methusethupathi and others” Judgement date- 20th April, 2022

 

        आम्‍ही सदर मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवाडयांचे वाचन केले, त्‍यामधील  वस्‍तुस्थिती आणि आमचे हातातील प्रकरणातील वस्‍तुस्थिती भिन्‍न भिन्‍न असल्‍याने या निवाडयांचा लाभ विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री चोपकर यांना होणार नाही असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

12.   विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टर  इंद्रायणी हटवार यांनी आपली भिस्‍त खालील मा. सर्वोच्‍च   न्‍यायालयाचे निवाडयावर ठेवली-

 

.     Hon’ble Supreme Court of Indai- Civil Appeal No. 1658of 2010- “Bombay Hispital & Medical Research Center-Versus-Asha Jaiswal and others” Judgement date- 30th November, 2021

        सदर मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवाडयाचे आम्‍ही वाचन  केले,  सदर निवाडया  प्रमाणे रुग्‍णाची स्थिती गंभीर होती आणि डॉक्‍टरांनी केलेल्‍या वैद्दकीय उपचाराच्‍या सर्व नोंदी  होत्‍या परंतु शस्‍त्रक्रिये नंतर  रुग्‍ण वाचू शकला नाही यासाठी डॉक्‍टरांना दोषी धरता येणार नाही असे नमुद  केलेले आहे. हातातील प्रकरणात रुग्‍ण  कोमल हिला जेंव्‍हा विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांचे दवाखान्‍यात भरती  केले होते, त्‍याच वेळी तिची  प्रकृती अतिशय गंभीर होती आणि विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांनी वेळोवेळी केलेल्‍या उपचाराच्‍या नोंदी  ठेवलेल्‍या आहेत त्‍यामुळे सदर न्‍यायनिवाडा हा हातातील प्रकरणात लागू होतो असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

13.  प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये तक्रारदारां तर्फे वकील श्री एस.एस. चौहान यांचा  तर विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री चोपकर यांचे तर्फे वकीलश्री तलमले तर  विरुध्‍दपक्ष क्रं 3 डॉक्‍टर सुश्रुत एम. सावरकर यांचे तर्फे वकील श्रीअग्रवाल यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. उभय पक्षांचे कथन, उभय पक्षां तर्फे दाखल दस्‍तऐवज, शपथे वरील पुरावे याचे अवलोकन करण्‍यात आले तसेच उभय पक्षांचे विदवान अधिवक्‍ता यांचा मौखीक युक्‍तीवाद यावरुन   जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष खालील मुद्दे न्‍यायनिवारणार्थ  उपस्थित होतात-

 

अक्रं 

मुद्दा

उत्‍तर

1

सुभाषचंद्र बोस  शासकीय  रुग्‍णालय,  तुमसर, जिल्‍हा भंडारा  येथील कार्यरत विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री शेखर एम. चोपकर यांनी तक्रारकर्ता क्रं 1 याची पत्‍नी कोमल हिचेवर बाळांतपणाची  शस्‍त्रक्रिया करताना वैद्दकीय उपचारा मध्‍ये हयगय (Medical Negligence)  करुन  दोषपूर्ण सेवा (Deficiency in Service) दिल्‍याची बाब पुराव्‍यानिशी सिध्‍द होते काय?

-होय-

 

 

 

 

2

सुभाषचंद्र बोस  शासकीय  रुग्‍णालय,  तुमसर, जिल्‍हा भंडारा  येथील कार्यरत विरुध्‍दपक्ष क्रं 2 डॉक्‍टर श्री सचीन व्‍ही. बाळबुधे यांनी तक्रारकर्ता क्रं 1 याची पत्‍नी कोमल हिचेवर बाळांतपणाची  शस्‍त्रक्रिया झाल्‍या नंतर तब्‍येत बरी नसतानाही डिसचॉर्ज दिल्‍या बाबत  दोषपूर्ण सेवा (Deficiency in Service) दिल्‍याची बाब पुराव्‍यानिशी सिध्‍द होते काय?

-नाही-

3.

विरुध्‍दपक्ष क्रं 3 डॉक्‍टर श्री सुश्रुत एम. सावरकर यांनी तक्रारकर्ता क्रं 1 याची पत्‍नी कोमल हिचेवर वैद्दकीय उपचार करताना दोषपूर्ण  सेवा (Deficiency in Service) दिल्‍याची बाब पुराव्‍यानिशी सिध्‍द होते काय?

-नाही-

4

विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टर इंद्रायणी हटवार यांनी तक्रारकर्ता क्रं 1 याची पत्‍नी कोमल हिचेवर वैद्दकीय उपचार करताना दोषपूर्ण  सेवा (Deficiency in Service) दिल्‍याची बाब पुराव्‍यानिशी सिध्‍द होते काय?

-नाही-

5

काय आदेश?

अंतीम आदेशा नुसार

                                                                                  :::    कारणे व मिमांसा ::

          

14.   सदर प्रकरणात निकाल पारीत  करण्‍यापूर्वी  सुभाषचंद्र बोस शासकीय  रुग्‍णालय,तुमसर, जिल्‍हा भंडारा येथील कार्यरत शस्‍त्रक्रिया तज्ञ वैद्दकीय अधिकारी विरुध्‍दपक्ष  क्रं 1 डॉ. शेखर एम. चोपकर यांनी आपले लेखी उत्‍तरामध्‍ये  तक्रारकर्ता  क्रं 1 यांनी त्‍यांची पत्‍नी कोमल हिचेवर शासकीय रुग्‍णालयात बाळांतपण शस्‍त्रक्रिया केली परंतु त्‍याबाबत कोणतेही शुल्‍क  न दिल्‍यामुळे तक्रारदार हे विरुध्‍दपक्षांचे  ग्राहक होत नाहीत आणि त्‍यामुळे  तक्रार ही खारीज  होण्‍यास पात्र आहे असा आक्षेप नोंदविला त्‍यामुळे तक्रारीतील विवादीत  मुद्दांवर  विचार  करण्‍यापूर्वी  सदर आक्षेपावर सर्वप्रथम  विचार करणे आवश्‍यक आहे.

       या संदर्भात  जिल्‍हा ग्राहक आयोग, भंडारा यांचे तर्फे  मा. राज्‍य ग्राहक आयोग,,खंडपिठ नागपूर यांनी त्‍यांचे समोरील  प्रथम अपिल क्रं-A/14/33 मध्‍ये  दिनांक-17 एप्रिल, 2018 रोजी “Arsiya Shaid Qureshi-Versus- Civil Surgeon, Govt. General Hospital, Bhandara & others”  या प्रकरणात दिलेल्‍या अपिलीय आदेशा मध्‍ये  नमुद केले की, अपिलार्थी अर्शीया  कुरेशी यांनी जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाचे कार्ड काढताना रुपये-5/- विहित शुल्‍क प्रदान केलेले आहे आणि त्‍यामुळे अपिलार्थी  ही  उत्‍तरवादी शासकीय रुग्‍णालय आणि तेथील कार्यरत डॉक्‍टरांची ग्राहक आहे.  आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा मृतक कोमल हिचे कार्ड सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्‍णालय,  तुमसर जिल्‍हा भंडारा येथून  विहित  शुल्‍क भरुन काढलेले आहे त्‍यामुळे तक्रारदार हे शासकीय रुग्‍णालय, तुमसर जिल्‍हा भंडारा  येथील कार्यरत डॉक्‍टर विरुध्‍दपक्ष क्रं 1  व क्रं 2 यांचे  ग्राहक होतात, त्‍यामुळे  विरुध्‍दपक्ष  क्रं 1  डॉक्‍टरांचे  सदरचे आक्षेपात  जिल्‍हा ग्राहक आयोगास कोणतेही तथ्‍य दिसून येत नाही.

 

  तक्रारदार हे शासकीय रुग्‍णालय,तुमसर, जिल्‍हा भंडारा येथील कार्यरत वैद्दकीय अधिकारी विरुध्‍दपक्ष क्रं 1  डॉक्‍टर श्री चोपकर यांचे ग्राहक होतात या संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे खालील नमुद मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निवाडयाचा आधार घेण्‍यात येतो-

 

Hon’ble Supreme Court of India-SC-1996 AIR 550,   1995 SCC (6) 651

 

“Indian Medical Association-Versus- V.P. Shantha and others”

 

Hon’ble Supreme Court Conclusions-

(10) Services rendered at a Govt. Hospital/dispensary where services are rendered on payment of charges and also rendered free of charge to other persons availing such services would fall within the ambit of the expression “Service” as defined in Section 2 (1) (o) of the Act. Irrespective of the fact that the Service is rendered free of charge to persons who do not pay for such service.  Free Service would also be “Service” and the receipient a “Consumer” under the Act.

 

   आमचे समोरील हातातील प्रकरणात तक्रारकर्ता एक मजूरी करणारा व्‍यक्‍ती असून त्‍याने आपल्‍या पत्‍नीला बाळांतपणासाठी  शासकीय रुग्‍णालय,  तुमसर येथे भरती करुन मोफत  वैद्दकीय उपचार घेतले असले तरी उपरोक्‍त मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवाडया  प्रमाणे शासकीय रुग्‍णालयातून  घेतलेली मोफत सेवा सुध्‍दा ग्राहक संरक्षण कायदयाचे  सेवेच्‍या परिभाषेत मोडते त्‍यामुळे तक्रारदार हे शासकीय रुग्‍णालय तुमसर येथील वैद्दकीय अधिकारी  विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे ग्राहक होतात असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

      तक्रारकर्ता क्रं 1 यांनी  विरुध्‍दपक्ष  क्रं 1  ते 4 डॉक्‍टरां  विरुध्‍द  प्रस्‍तुत  तक्रार  दाखल केलेली असून विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 4 डॉक्‍टरां  कडून त्‍याची  पत्‍नी  कोमल  हिचे मृत्‍यू  संबधात  नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे.

                       

 मुद्दा क्रं- 1 बाबत-

15.    विरुध्‍दपक्ष  क्रं 1 सुभाष चंद्र बोस शासकीय रुग्‍णालय, तुमसर जिल्‍हा भंडारा येथील कार्यरत डॉक्‍टर श्री शेखर एम. चोपकर यांनी शासकीय रुग्‍णालय तुमसर येथील  मृतक कोमल  हिची  रुग्‍णपत्रीका दाखल केली, त्‍यानुसार तिचे वर शासकीय रुग्‍णालय तुमसर येथे दिनांक-31.08.2020 पासून  ते दिनांक-06.09.2020 पर्यंत वैद्दकीय उपचार सुरु  होते असे दिसून येते.  दिनांक-06.09.2020 रोजी  तिला शासकीय  रुग्‍णालय तुमसर येथून  डिसचॉर्ज  दिल्‍याचे  नमुद  आहे. दिनांक-31.08.2020 रोजी रुग्‍णपत्रीके मध्‍ये  Red Colour inform to Dr. Chopkar advice to empty the urine bag and wait for second urine. 460ml redish. Cathetor remove, new Cathetor inserted. Fresh urine असे नमुद आहे,याचाच अर्थ  दिनांक-31.08.2020 रोजी मृतक कोमल हिचेवर शासकीय रुगणालय तुमसर येथे बाळांतपणाची शस्‍त्रक्रिया केल्‍या नंतर तिचे लघवीचा रंग हा लाल होता आणि त्‍यामुळे न्‍यु कॅथेटर तिला बसविण्‍यात आले होते ही बाब सिध्‍द होते. ज्‍याअर्थी बाळांतपणाचे दिवशीच लघवीचा रंग लाल आला होता त्‍याअर्थी तिचे वर झालेली बाळांतपणाची शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झालेली नव्‍हती.

 

16.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री चोपकर  यांनी आपले लेखी उत्‍तरा मध्‍ये मृतक कोमल हिला  दिनांक-28.08.2020 रोजी आणण्‍यात आले, त्‍यावेळी तपासणी मध्‍ये  Pulse-80 B/M आणि  Blood Pressure 110/70 mm Hg नमुद केलेले आहे. तर शस्‍त्रक्रिया दिनांक-31.08.2020 रोजी केलेल्‍या तपासणी मध्‍ये  Pulse-80 BPM Blood Pressure 110/60 mm Hg & No bleeding  असे नमुद केलेले आहे.

 

17    तक्रारकर्ता यांनी आपल्‍या तक्रारी मध्‍ये असा आरोप केलेला आहे की, दिनांक-06.09.2020 रोजी त्‍याची पत्‍नी कोमल  हिचे पोटातील त्रास वाढल्‍याने  दिनांक-07.09.2020 रोजी शासकीय रुग्‍णालय  तुमसर येथे भरती केले असता विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 डॉक्‍टरांनी तिचे शरिरा मध्‍ये भरपूर संसर्ग झालेला असून दुषीत पाणी जमा झालेले आहे त्‍यामुळे येथे उपचार  होऊ शकत नाही असे सांगितले  होते व शासकीय रुग्‍णालय भंडारा येथे नेण्‍यास सांगितले  होते.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री चोपकर यांनी आपले लेखीउत्‍तरा मध्‍ये तसेच पुराव्‍या मध्‍ये तक्रारकर्ता यांचे आरोपा संबधात काहीही विधान केलेले नाही.  ज्‍याअर्थी  कोमल  हिला दिनांक-06.09.2020 रोजी शासकीय रुग्‍णालय तुमसर येथून सुटटी देण्‍यात आली होती, त्‍याअर्थी  दिनांक-06.09.2020 रोजीचे रात्रीच तिचे पोट दुखायला सुरुवात झाली, याचाच  अर्थ असा हातो की, तिचेवर बाळांतपणाची झालेली शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झालेली  नव्‍हती. शासकीय रुग्‍णालय भंडारा येथून  तिला पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेण्‍याचा सल्‍ला देण्‍यात आला होता असे तक्रारकर्ता यांचे म्‍हणणे आहे.  त्‍यापूर्वी  भंडारा येथील अष्‍टविनायक हॉस्‍पीटल मधील  डॉ. अरुणकुमार डांगे यांनी त्‍वरीत कोमल हिची सोनोग्राफी व रक्‍ताच्‍या तपासण्‍या केल्‍या असता त्‍यांनी शस्‍त्रक्रिया करताना योग्‍य ती काळजी न घेतल्‍याने  जंतूचा संसर्ग संपूर्ण शरिरामध्‍ये पसरलेला असल्‍याचे  सांगितले. या आरोपा बाबत सुध्‍दा  विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री चोपकर यांनी आपले लेखी उत्‍तरा मध्‍ये व पुराव्‍या मध्‍ये मौन बाळगलेले आहे, वस्‍तुतः ते डॉक्‍टर अरुणकुमार  डांगे यांना तपासण्‍यासाठी जिल्‍हा ग्राहक  आयोगा समक्ष बोलावू शकले असते  परंतु त्‍यांनी  तसे  केलेले नाही,  त्‍यामुळे तक्रारकर्ता यांनी केलेल्‍या आरोपा मध्‍ये तथ्‍य दिसून येते.

 

18.   विरुध्‍दपक्ष क्रं 3 डॉक्‍टर श्री सावरकर यांचे लेखी उत्‍तरा नुसार तक्रारकर्ता क्रं 1 हे  त्‍यांची पत्‍नी कोमल  हिला घेऊन त्‍यांचे हॉस्‍पीटल मध्‍ये  दिनांक-08.09.2020 चे मध्‍यरात्री 01:30 वाजता आले, त्‍यावेळी  रुग्‍णाची  प्रकृती गंभीर असल्‍या मुळे आणि प्रकृती विषयी उच्‍च जोखीम असल्‍यामुळे  तक्रारकर्ता व त्‍यांचे नातेवाईकांनी लेखी समती पत्र (HAND WRITTEN HIGH RISK CONSENT LETTER)  लिहून दिल्‍या नंतर रुग्‍णास हॉस्‍पीटल मध्‍ये (IV fluids & antibiotics for initial stabilization of the patient)  प्रकृती पूर्ववत स्थिर राहण्‍यासाठी रात्री सलाईन व प्रतीजैवक औषधी देण्‍यात आलीत.  दिनांक-08 सप्‍टेंबर,2020 रोजी दिवसा मध्‍ये रुग्‍णास संबधित स्‍त्रीरोग तज्ञ यांनी तपासले असता त्‍यांनी तिचे पोटाचा सी.टी.स्‍कॅन रिपोर्ट करावा  असे सुचविले, त्‍यानुसार त्‍याच दिवशी सायंकाळी विरुध्‍दपक्ष  क्रं 3 डॉक्‍टरांना  तिचा  सी.टी.स्‍कॅन  रिपोर्ट  मिळाला असता त्‍यांनी सदर अहवाला वरुन त्‍वरीत तक्रारकर्ता क्रं 1 यांना बोलावून रुग्‍णाला स्‍त्री रोग शस्‍त्रक्रिया तज्ञ डॉक्‍टर नेण्‍यास सुचविले. तक्रारकर्ता  क्रं 1 यांनी  दुसरे दिवशी दिनांक-09 सप्‍टेंबर,2020 रोजीचे 16.00 वाजता त्‍यांचे हॉस्‍पीटल मधून रुगणाचा  डिसचॉर्ज घेतला आणि रुग्‍णाला दुसरी कडे हलविले. तक्रारकर्ता यांनी स्‍वतः अॅम्‍बुलन्‍सची व्‍यवस्‍था केली होती. दिनांक-09 सप्‍टेंबर, 2020 रोजी दुपारी 04.00 वाजता डिसचॉर्ज दिल्‍यानंतर पुढे काय झाले याची विरुध्‍दपक्ष क्रं 3 डॉक्‍टरांना  माहिती नाही असे नमुद केले. विरुध्‍दपक्ष क्रं 3 डॉक्‍टर हे वैद्दकीय शास्‍त्रात एम.डी. झालेले असून  त्‍यांनी आपले लेखी उत्‍तरा मध्‍ये  कोमल  हिची  प्रकृती  गंभीर असल्‍याचे  नमुद केलेले आहे, यावरुन  ही बाब सिध्‍द होतेकी, तिचेवर विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री चोपकर यांनी बाळांतपणाची शस्‍त्रक्रिया  शासकीय रुगणालय तुमसर येथे दिनांक-31 ऑगस्‍ट, 2020 रोजी केल्‍या नंतर आठच दिवसा मध्‍ये तिची प्रकृती गंभीर झाली होती ही बाब सिध्‍द होते.

 

 

19.    विरुध्‍दपक्ष  क्रं 3 डॉक्‍टर  श्री सावरकर यांचे  सांगण्‍या वरुन  मृतक कोमल हिचे पोटाचे सिटीस्‍कॅन Dr. Dinesh Singh MD FIAMS SPIRAL CT SCAN & DIAGNOSTIC CENTER NAGPUR  येथे  NECT SCAN EXAMINATION OF ABDOMEN करण्‍यात आली, त्‍यांनी आपल्‍या  दिनांक-08 सप्‍टेंबर, 2020 रोजीच्‍या रिपोर्ट मध्‍ये खालील  प्रमाणे नमुद  केले-

 

BLADDER: Distended, shows normal wall thickness.

UTERUS: Uterus is BULKY (Post Partum) Evidence of a central hyperedense lesion of haemorrhagic. Calcific attenuation noted in the central uterine cavity could be suggestive of RETAINED CLOTS.  Although Uterine contour is well preserved however area of altered attenuation and heterogenosity noted in the lower anterior abdominal wall represents recent Surgical Scar.

 

  सदर अहवाला वरुन विरुध्‍दपक्ष क्रं 3 डॉक्‍टर श्री सावरकर यांनी त्‍वरीत  स्‍त्री शस्‍त्रक्रिया तज्ञ यांचेकडे  तक्रारकर्ता यांना  दिलेला सल्‍ला हा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दिलेला आहे, त्‍यांनी  रात्रीचे वेळी तक्रारकर्ता यांची पत्‍नी  कोमलला दवाखान्‍यात घेऊन  व रात्री तिचेवर वैद्दकीय
उपचार केलेत आणि दुसरे दिवशी मृतक कोमलचे पोटाचा डॉ. दिनेश सिंग यांचा अहवाल आल्‍या नंतर त्‍वरीत तिला स्‍त्रीरोग तज्ञा कडे  हलविण्‍याचा सल्‍ला दिला यावरुन विरुध्‍दपक्ष क्रं 3 डॉक्‍टर श्री सावरकर यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍य  प्रकारे पार पाडल्‍याचे दिसून येते. 

 

20.   डॉ. दिनेश सिंग यांचे दिनांक 08 सप्‍टेंबर, 2020 रोजीचे  मृतक कोमल  हिचे पोटाचे सिटी स्‍कॅन रिपोर्ट वरुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री चोपकर यांनी मृतक कोमल हिचेवर  बाळांतपणाची शस्‍त्रक्रिया केल्‍यानंतर तिची प्रकृती गंभीर झाली होती ही बाब डॉ. दिनेश सिंग यांचे  सिटी स्‍कॅन  अहवाला वरुन सिध्‍द होते.

 

 

21.  विरुध्‍दपक्ष क्रं 4  डॉक्‍टर इंद्रायणी हटवार यांचे लेखी उत्‍तरा प्रमाणे दिनांक-10 सप्‍टेंबर,2020 रोजी पहाटे 2.00 वाजता त्‍यांचे भरत नगर,अमरावती रोड,नागपूर येथील आयकॉन हॉस्‍पीटल मध्‍ये कोमल हिला भरती करण्‍यात आले होते, त्‍यावेळी रात्री उपलब्‍ध असलेल्‍या निष्‍णात डॉक्‍टरां कडून तिची वैद्दकीय तपासणी केली होती, त्‍यावेळी तिची तब्‍येत  अतिशय खालावलेली असून ती  बेशुध्‍दावस्‍थेत होती. वैद्दकीय परिक्षणा मध्‍ये असे दिसून आले की, तिला जंतू संसर्गामुळे 101 डिग्री ताप असून तिची नाडी तब्‍बल 145  प्रती मिनिट या गतीची होती. तिचा वरचा रक्‍तदाब  केवळ 80 होता जेंव्‍हा की, सामान्‍यतः तो 110 ते 120 च्‍या दरम्‍यान असावयास हवा. तसेच खालच्‍या पातळीतील रक्‍तदाब जो सामान्‍यतः 70 ते 80 पर्यंत असावयास हवा होता परंतु तो इतका खाली  गेला होता की, त्‍याचे मोजमाप देखील यंत्रामध्‍ये येऊ शकत नव्‍हते. त्‍याच प्रमाणे तिचे पोट  भंयकर फुगलेले होते आणि ते अतिशय दुखत होते. ही अवस्‍था जंतूचा अतिशय जास्‍त संसर्ग झाल्‍याने  झाली असे प्राथमिक निदान झाले. कोमल  हिचेवर  डॉ. दिनेश सिंग यांचे कडे पूर्वी करण्‍यात आलेल्‍या सिटी स्‍कॅनच्‍या रिपोर्ट वरुन कोमल हिचे पोटातील गर्भाशयाची  पिशवी  आणि लघवीच्‍या पिशवी जवळ रक्‍तमिश्रीत पाणी अतिशय मोठया प्रमाणात पसरले असून त्‍यामध्‍ये  घाण, रक्‍ताच्‍या गुठळया आणि धातू सदृश्‍य वस्‍तु देखील  (कॉपर टी) आल्‍याचे नमुद आहे. यामुळे कोमल  हिच्‍या रक्‍ता मध्‍ये संपूर्ण जंतू पसरले  असल्‍यामुळे तिला सेप्‍टीक शॉक झालेला आहे  असे निदर्शनास आले.कोमल  हिची शस्‍त्रक्रिया करण्‍या पूर्वी प्रकृती काही  अंशी स्थिर करण्‍या करीता  काय करावे लागेल हे निश्‍चीत करुनतिच्‍या पुन्‍हा एकदा चाचण्‍या करण्‍यात आल्‍या होत्‍या, सदर वैद्दकीय चाचण्‍याचे आधारे असेही  डॉक्‍टरांना  दिसून आले की,  कोमल हिच्‍या शरिरातील जंतूचा प्रार्दुभाव आणखी वाढला  असून तिला हदयघात होण्‍याचा तसेच मुत्रपिंड आणि यकृता मध्‍ये बिघाड होण्‍याचा धोका आहे.  त्‍यामुळे कोमल हिला लगेच आय.सी.यु. मध्‍ये हलविण्‍यात आले आणि तिचेवर प्रभावी अॅन्‍टी बायोटीक्‍स  व ईतर औषधोपचार सुरु  करण्‍यात आले होते.  या सर्व  बाबीची  कल्‍पना तक्रारकर्ता  क्रं 1 यांना दिली होती, त्‍यांनी शस्‍त्रक्रिया करा असे स्‍पष्‍टपणे सांगितल्‍या मुळे विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांनी  मुत्रपिंड विशेषज्ञ डॉक्‍टर विशाल रामटेके यांना बोलाविले होते, त्‍यांनी वैद्दकीय तपासणी केली असता औषधोपचार सुरु असून देखील कोमल हिला लघवी न  झाल्‍यामुळे तिच्‍या  पोटाचा  फुगारा वाढला असल्‍याचे निदान केले. विरुध्‍दपक्ष  क्रं 4 डॉक्‍टरांनी डॉक्‍टर राणी लाखे क्रिटीकल केअर फीजीशियन आणि डॉक्‍टर राजेश कल्‍याणकर  ह्रदयरोग तज्ञ  डॉक्‍टर रसिका तिमाने (भूलतज्ञ) यांचेशी चर्चा  केली आणि त्‍या अनुषंगाने कोमलची ईसीजी, छातीचा एक्‍स रे आणि ईको या चाचण्‍या केल्‍यात. जोखीम जास्‍त असल्‍याने शस्‍त्रक्रिये करीता तक्रारकर्ता क्रं 1 यांची लेखी समती घेण्‍यात आली. कोमल हिची प्रकृती शस्‍त्रक्रिये करीता पुरेशी समाधानकारक झाल्‍यावर  दिनांक-10.09.2020 रोजी 2.30 वाजता कोमलच्‍या पोटातील संक्रमीत पाणी आणि रक्‍त काढण्‍यासाठी तातडीने विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टर आणि त्‍यांच्‍यासह इतर तज्ञ  डॉक्‍टरांनी कोमलचे पोटावर  शस्‍त्रक्रिया  केली.  सदर शस्‍त्रक्रियेचे छायाचित्रण देखील करण्‍यात आले होते. या शस्‍त्रक्रिये दरम्‍यान कोमलचे पोट उघडून तिच्‍या गर्भाशयात साठलेले रक्‍त मिश्रीत घाण पाणी, लघवी, रक्‍ताच्‍या गुठळया आणि कॉपर टी काढून तिच्‍या जखमा साफ करण्‍यात आल्‍या आणि तिच्‍या  गर्भाशय आणि मूत्राशयाच्‍या पिशव्‍या देखील योग्‍यरित्‍या शिवण्‍यात आल्‍यात. या बाबी करताना  याची योग्‍य  ती काळजी  घेण्‍यात आली होती.  दिनांक-11.09.2020 रोजी कोमलवर शस्‍त्रक्रिये नंतर असलेली जोखीम लक्षात घेता तिला व्‍हेटींलेटर वर  ठेवण्‍यात आले  होते.  या सर्व वैद्दकीय उपचार आणि औषधोपचारा मुळे तिचे शरिरातील संसर्गाचे प्रमाण कमी झाले होते ही बाब शस्‍त्रक्रिये नंतर दुसरे दिवशी कोमल हिच्‍या ज्‍या वैद्दकीय चाचण्‍या केल्‍या होत्‍या त्‍यावरुन दिसून आली,  विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांनी शस्‍त्रक्रिया केल्‍यानंतर कोमल  हिचे मुत्रपिंडाचे कार्य काही प्रमाणात सुरळीत झाले होते परंतु तिचे यकृत, मेंदू आणि ह्रदय यांच्‍या कार्यपध्‍दती मध्‍ये म्‍हणावे तसे चांगले बदल झालेले नव्‍हते, याचे कारण तिचे शरिरात जंतु संसर्ग पसरलेला असल्‍यामुळे शरिरातील ईतर अवयांचे  कार्य पूर्वी प्रमाणे  सुरळीत  होण्‍यास अडथळा निर्माण होत होता.  दिनांक-12 सप्‍टेंबर, 2020 रोजी पहाटे दोन वाजता कोमल हिचा रक्‍तदाब अचानकपणे  कमी झाल्‍याचे आणि तिचे ह्रदयाची गती अचानकपणे वाढल्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं 4  डॉक्‍टरांच्‍या लक्षात आले, ही लक्षणे अचानक ह्रदयघात  (Acute Coronary Syndrome) होण्‍याची शक्‍यता असल्‍याचे  लक्षात आल्‍या नंतर तातडीने विरुध्‍दपक्ष क्रं4 आणि डॉक्‍टर राणी लाखे यांनी कोमल हिला इंजेक्‍शन  दिले व इतर औषधोपचार केला. तिचे चाचण्‍या केल्‍या नंतर असे लक्षात आले की, तिच्‍या ह्रदयाची कार्यपध्‍दती मंदावली. सकाळी 07.00 वाजता कोमल हिच्‍या सर्व महत्‍वाच्‍या अवयवांनी काम करणे बंद केले तरी देखील शेवटचा  प्रयत्‍न म्‍हणून  कोमल हिला  सुमारे दोन  तासा पर्यंत सी.पी.आर. देण्‍यात आले, तथापी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, सकाळी 09.30  वाजता कोमल हिचा मृत्‍यू झाल्‍याचे घोषीत करण्‍यात  आले.

 

 

22.    विरुध्‍दपक्ष क्रं 4  डॉक्‍टर  इंद्रायणी हटवार यांनी आपले लेखी उत्‍तरातील कथनाचे पुराव्‍यार्थ  त्‍यांनी केलेले वैद्दकीय उपचार, मृतक कोमल हिचे वेळोवेळी केलेल्‍या प्रयोगशाळेतील चाचण्‍यांचे अहवाल दाखल केलेले आहेत. यावरुन ही बाब सिध्‍द होते की, मृतक कोमल हिला 
विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टर  इंद्रायणी हटवार यांचे हॉस्‍पीटल मध्‍ये भरती करण्‍यापूर्वी पासूनच तिची प्रकृती  गंभीर होती
.  विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांनी  कोमल हिला लघवी न झाल्‍यामुळे  मुत्रपिंड विशेषज्ञांचा  सुध्‍दा सल्‍ला घेतला आणि त्‍यानंतर क्रिटीकल तज्ञ आणि भूलतज्ञ डॉक्‍टरांशी विचार विनीमय करुन पोटावर शस्‍त्रक्रिया करण्‍याचे  ठरविले. अशी शस्‍त्रक्रिया जास्‍त जोखीमची असल्‍याने तक्रारकर्ता क्रं 1 यांची लेखी समती सुध्‍दा घेण्‍यात आली. या शस्‍त्रक्रिये दरम्‍यान कोमलचे पोट उघडून तिच्‍या गर्भाशयात साठलेले रक्‍त मिश्रीत घाण पाणी, लघवी, रक्‍ताच्‍या गुठळया आणि कॉपरटी काढून तिच्‍या जखमा साफ करण्‍यात आल्‍या आणि तिच्‍या गर्भाशय आणि मूत्राशयाच्‍या पिशव्‍या देखील योग्‍यरित्‍या शिवण्‍यात आल्‍यात परंतु कोमलचे शरिरात जंतु संसर्ग खूप मोठया  प्रमाणावर  वाढल्‍याने  शरिरातील अवयवांनी काम  करणे बंद  केले. सदर घटनाक्रम आणि विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टर  इंद्रायणी हटवार यांनी केलेले वैद्दकीय उपचार पाहता त्‍यांनी  तक्रारकर्ता  क्रं 1 यांची पत्‍नी कोमलवर वैद्दकीय उपचार करताना कोणताही  निष्‍काळजी पणा  केल्‍याची  बाब सिध्‍द  होत नाही. उलटपक्षी विरुध्‍दपक्ष क्रं 4  डॉक्‍टर  यांचे कडे  कोमलला भरती करण्‍या पूर्वीच तिचे  शरिरामध्‍ये खूप  मोठया  प्रमाणावर  जंतु  संसर्ग पसरलेला होता,  तिचे मुत्राशय  व्‍यवस्‍थीत काम  करीत नव्‍हते, तिचे पोटात  रक्‍त मिश्रीत घाण पाणी साचले  होते  या बाबी  सिध्‍द  झालेल्‍या आहेत त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री शेखर एम. चोपकर यांनी बाळांतपणाची शस्‍त्रक्रिया  करते वेळी  योग्‍य प्रकारे  काळजी न घेतल्‍यामुळे आणि योग्‍य प्रकारे औषधोपचार न केल्‍यामुळे तक्रारकर्ता क्रं  1 यांची पत्‍नी कोमल हिचे शरिरात जंतु संसर्ग वाढतच गेला आणि त्‍यातच तिचा मृत्‍यू झाला ही बाब  वैद्दकीय क्षेत्रातील तज्ञ  डॉक्‍टर श्री दिनेश सिंग, सिटी स्‍कॅन तज्ञ तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 4 स्‍त्री रोग शस्‍त्रक्रिया तज्ञ डॉक्‍टर इंद्रायणी हटवार यांचे वैद्दकीय चाचण्‍यांचे अहवाल,  वैद्दकीय दस्‍तऐवजा वरुन सिध्‍द झालेली आहे त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं1 चे उत्‍तर  होकारार्थी  नोंदवित आहोत.

 

मुद्दा क्रं 2 बाबत-

 

23.    विरुध्‍दपक्ष क्रं 2 डॉ. सचिन व्‍ही.बाळबुधे, वैद्दकीय अधिकारी, सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्‍णालय तुमसर यांना जिल्‍हा ग्राहक आयोगाची नोटीस मिळूनही ते  जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाहीत  व त्‍यांनी आपले लेखी उत्‍तर  दाखल केलेले नाही. तक्रारकर्ता यांनी आपल्‍या  तक्रारी मध्‍ये विरुध्‍दपक्ष  क्रं 1 डॉक्‍टर  श्री शेखर  चोपकर  यांनी दिनांक-31 ऑगस्‍ट, 2020 रोजी शसत्रक्रिया  करुन बाळांतपण  करते वेळी योग्‍य  वैद्दकीय उपचार केले नसल्‍यामुळे  शस्‍त्रक्रियेच्‍या  दरम्‍यान  तिचे शरिरातून जास्‍त प्रमाणात रक्‍तस्‍त्राव झाल्‍यामुळे तसेच तिचे शरिराचे आतील भागात गंभीर दुखापत झाल्‍यामुळे तिचे शरिरामध्‍ये इन्‍फेक्‍शन झाले होते परंतु शासकीय  रुग्‍णालय तुमसर येथील कार्यरत विरुध्‍दपक्ष  क्रं 1 डॉक्‍टर श्री शेखर चोपकर आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 डॉक्‍टर श्री सचिन व्‍ही.बाळबुधे यांनी संगनमत करुन कोमल हिला तशाच परिस्थिती मध्‍ये दिनांक-06 सप्‍टेंबर,2020 रोजी शासकीय रुग्‍णालयातून सुटटी दिली. तक्रारकर्ता यांचे आरोपा वरुन विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचा मृतक कोमलवर बाळांतपणाची शस्‍त्रक्रिया करताना कोणताही  सहभाग नव्‍हता असे दिसून येते.  तक्रारकर्ता यांचे अधिवक्‍ता श्री एस.एस. चौहान यांनी  विरुध्‍दपक्षांना दिनांक-04.12.2020 रोजीची नोटीस पाठविली त्‍यामध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 2  डॉ. सचिन व्‍ही.बाळबुधे यांचे नावा समोर सिव्‍हील सर्जन, सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्‍णालय  तुमसर असे नमुद केलेले  आहे.  यावरुन  जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे  असा निष्‍कर्ष काढण्‍यात  येतो की,  विरुध्‍दपक्ष  क्रं 1 डॉक्‍टर श्री चोपकर हे वैद्दकीय अधिकारी आहेत तर विरुध्‍दपक्ष क्रं 2 हे सिव्‍हील सर्जन असल्‍यामुळे त्‍यांचे वरिष्‍ठ अधिकारी  आहेत. असे असताना विरुध्‍दपक्ष क्रं 2 डॉ. सचिन  बाळबुधे  यांचा उपचाराशी  कोणताही संबध नव्‍हता आणि तक्रारकर्ता यांचे आरोपा प्रमाणे  विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री चोपकर यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 2 डॉ. श्री बाळबुधे यांचेशी संगनमत करुन रुग्‍णाचे आरोग्‍या संबधी कोणतीही शहानिशा न करता तशीच सुटटी दिली या आरोपा संबधात कोणताही सक्षम पुरावा आलेला नसल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी दोषपूर्ण सेवा दिली ही बाब सिध्‍द होत नाही  आणि म्‍हणून मुद्दा  क्रं 2 चे उत्‍तर नकारार्थी  नोंदवित आहोत.

 

मुद्दा क्रं 3 व क्रं 4 बाबत

 

24.    विरुध्‍दपक्ष क्रं 3 डॉ. श्री सावरकर आणि विरुध्‍दपक्ष क्रं 4 स्‍त्रीरोग शस्‍त्रक्रिया तज्ञ डॉक्‍टर इंद्रायणी हटवार यांनी वर  नमुद केल्‍या  प्रमाणे  त्‍यांचे कर्तव्‍य  योग्‍य रितीने पार पाडल्‍यामुळे तसेच त्‍यांनी मृतक  कोमल हिचेवर वैद्दकीय उपचार करताना विविध वैद्दकीय चाचण्‍या करुन तसेच वैद्दकीय विशेषज्ञांचे मत नोंदवून त्‍यांचे कडून सर्वोतोपरीत प्रयत्‍न  केल्‍याची बाब  सिध्‍द होते त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 3  व क्रं 4 चे उत्‍तर नकारार्थी नोंदवित आहोत.

 

 

25.    तक्रारकर्ता  क्रं 1 यांचा असाही आरोप आहे की,  विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टर इंद्रायणी हटवार यांचे दवाखान्‍यात त्‍याची पत्‍नी कोमल हिचा मृत्‍यू झाल्‍या नंतरही त्‍यांनी शवविच्‍छेदन केलेले नाही, या तक्रारकर्ता याने केलेल्‍या आरोपाचे अनुषंगाने विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांनी दिनांक-12.09.2020 रोजी कोमल हिचे मृत्‍यू नंतर ते शवविच्‍छेदन  करण्‍यास तयार नसल्‍या बाबत तक्रारकर्ता यांचे नातेवाईक श्री अश्‍वीन अंकुश मटरे यांची सही असलेले लेखी  निवेदन पुराव्‍यार्थ दाखल  केले. यावरुन  मृतक कोमल  हिचे शवविच्‍छेदन न होण्‍या मागे विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टर  इंद्रायणी हटवार यांचा कोणताही  दोष नाही. परंतु  विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉक्‍टरांनी दिलेल्‍या मता प्रमाणे जरी मृतक कोमल हिचे शवविच्‍छेदन  झालेले नसले तरी तिचा मृत्‍यू  वैद्दकीय चाचण्‍यांचे आधारे तिचे शरिरात जंतु संसर्गाचे प्रमाण जास्‍त वाढल्‍यामुळे झाल्‍याची बाब पुराव्‍यानिशी सिध्‍द होते. यावरुन विरुध्‍दपक्ष  क्रं1 डॉक्‍टर श्री शेखर एम. चोपकर,वैद्दकीय अधिकारी, सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्‍णालय, तुमसर, जिल्‍हा भंडारा यांनी कोमलवर बाळांतपणाची शस्‍त्रक्रिया करताना योग्‍य ती  काळजी घेतली नाही आणि पुढे योग्‍य ते औषधोपचार न करता  शासकीय  दवाखान्‍यातून  सुटटी दिली या बाबी सिध्‍द  होतात.

 

नुकसान भरपाईचे रकमे बाबत-

 

 26.    प्रकरणातील वस्‍तुस्थितीजन्‍य पुरावे पाहता विरुध्‍दपक्ष  क्रं 1 डॉक्‍टर श्री शेखर एम. चोपकर, तत्‍कालीन वैद्दकीय अधिकारी, सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्‍णालय, तुमसर, जिल्‍हा भंडारा यांचे वर नुकसान भरपाईची रक्‍कम बसविताना हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, त्‍यांनी ज्‍या वेळी मृतक कोमल वर बाळांतपणाची शस्‍त्रक्रिया केली होती त्‍यावेळी मृतक कोमल ही अत्‍यंत कमी वयाची होती आणि तिला चिरंजीव पार्थ वय-03 वर्ष आणि कु. रिया वय-04 महिने अशी मुले  आहेत.  तिचे मृत्‍यूमुळे  तिची लहान मुले आईच्‍या प्रेमा पासून वंचीत झालेली आहेत. अशा परिस्थितीत विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री शेखर एम. चोपकर यांनी रुग्‍णावर केलेल्‍या वैद्दकीय उपचारातील निषकाळजीपणामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री शेखर चोपकर यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-10,00,000/- दयावेत आणि सदर रकमेवर कोमल हिचा मृत्‍यू दिनांक-12.09.2020 पासून ते रकमेच्‍या  प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे. 7 टक्‍के दराने व्‍याज दयावे तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री चोपकर यांनी तक्रारीचा व नोटीस खर्च म्‍हणून रुपये-10,000/- तक्रारदारांना मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.  तक्रारदारांना मंजूर झालेली एकूण नुकसान भरपाईच्‍या रकमे पैकी तक्रारकर्ता क्रं 1 श्री मुन्‍ना सयसराम बोंद्रे याने स्‍वतः जवळ रुपये-3,00,000/- अधिक आदेशित व्‍याजाची रक्‍कम ठेवावी  आणि दोन्‍ही अज्ञान मुलांचे नावे प्रत्‍येकी रुपये-3,50,000/- प्रमाणे राष्‍ट्रीयकृत बॅंकेत मुदत ठेवी मध्‍ये सज्ञान होई पर्यंत गुंतवणूक करावी आणि त्‍यामध्‍ये तक्रारकर्ता  क्रं 1 यांनी नॉमीनी म्‍हणून रहावे आणि मुदती ठेवीवर मिळणारी व्‍याजाची रक्‍कम तक्रारकर्ता हे मुलांचे शिक्षणासाठी खर्च करु शकतील. दोन्‍ही मुले ही  सज्ञान  झाल्‍या नंतर ते सदरची रक्‍कम काढू शकतील  असे तक्रारकर्ता क्रं 1 यास आदेशित करण्‍यात येते व अशी रक्‍कम गुंतवणूक केल्‍या बाबत अहवाल जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करावा.

          

27.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा  विचार करुन आम्‍ही  प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे  अंतीम आदेश पारीत  करीत  आहोत.

 

                                                                                           :: अंतीम आदेश ::   

 

  1.  तक्रारदार क्रं 1 श्री मुन्‍ना सयसराम बोंद्रे आणि अज्ञान तक्रारदार क्रं 2 चि. पार्थ मुन्‍ना बोंद्रे आणि तकारदार क्रं 3 कु. रिया मुन्‍ना बोंद्रे  (अज्ञान तक्रादार क्रं 2 व क्रं 3  तर्फे वडील तक्रारकर्ता  क्रं 1) यांची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉ. शेखर एम. चोपकर तत्‍कालीन वैद्दकीय अधिकारी, सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्‍णालय, तुमसर, जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍द खालील प्रमाणे  अंशतः मंजूर  करण्‍यात येते.

 

 

  1.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉ. शेखर एम. चोपकर तत्‍कालीन वैद्दकीय अधिकारी, सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्‍णालय,तुमसर, जिल्‍हा भंडारा यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्ता क्रं 1 यांची मृतक पत्‍नी कोमल हिचेवर बाळांतपणाची शस्‍त्रक्रिया करताना केलेल्‍या वैद्दकीय उपचारातील दोषपूर्ण सेवेमुळे नुकसान भरपाई दाखल रुपये-10,00,000/- (अक्षरी रुपये दहा लक्ष फक्‍त) तक्रारदारांना दयावेत आणि सदर रकमेवर कोमलचा मृत्‍यू दिनांक-12.09.2020 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-7 टक्‍के दराने व्‍याज तक्रारदारांना दयावे.

 

 

  1.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 श्री चोपकर, तत्‍कालीन वैद्दकीय अधिकारी, सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्‍णालय, तुमसर, जिल्‍हा भंडारा यांनी प्रस्‍तुत तक्रारीचा व नोटीसचा खर्च म्‍हणून रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त)  तक्रारदारांना दयावेत.

 

 

  1.  तक्रारकर्ता क्रं 1 श्री मुन्‍ना सयसराम बोंद्रे यास आदेशित करण्‍यात येते की, त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 डॉक्‍टर श्री चोपकर यांचे कडून प्राप्‍त नुकसान भरपाईची रकमे पैकी स्‍वतः जवळ रुपये-3,00,000/- (अक्षरी रुपये तीन लक्ष फक्‍त)  अधिक आदेशित व्‍याजाची रक्‍कम ठेवावी आणि दोन्‍ही अज्ञान मुले अज्ञान तक्रारदार  क्रं 2 व क्रं 3  यांचे नावे  प्रत्‍येकी रुपये-3,50,000/- (अक्षरी प्रत्‍येकी रुपये तीन लक्ष पन्‍नास हजार फक्‍त) प्रमाणे राष्‍ट्रीयकृत बॅंकेत मुदत ठेवी मध्‍ये सज्ञान होई पर्यंत गुंतवणूक करावी आणि त्‍यामध्‍ये तक्रारकर्ता  क्रं 1 यांना नॉमीनी म्‍हणून रहावे आणि सदर मुदती ठेवीवर मिळणारी व्‍याजाची रक्‍कम तक्रारकर्ता हे मुलांचे शिक्षणासाठी खर्च करु शकतील. दोन्‍ही मुले ही  सज्ञान  झाल्‍या नंतर ते सदरची रक्‍कम काढू शकतील  आणि अशा रकमा गुंतवणूक केल्‍याचा अहवाल जिल्‍हा ग्राहक आयोग, भंडारा यांचे समोर तक्रारकर्ता यांनी दाखल करावा.

 

 

  1.  सदर अंतीम आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष  क्रं 1  डॉक्‍टर श्री शेखर एम.  चोपकर, तत्‍कालीन वैद्दकीय अधिकारी, सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्‍णालय,तुमसर, जिल्‍हा भंडारा यांनी व्‍यक्‍तीशः सदर अंतीम आदेशाची  प्रथम प्रमाणित प्रत मिळाल्‍याचे  दिनांका पासून  30 दिवसांचे आत करावे.

 

 

  1.  विरुध्‍दपक्ष क्रं 2   डॉ. सचिन व्‍ही. बाळबुधे, तत्‍कालीन वैद्दकीय अधिकारी,  सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्‍णालय,तुमसर, जिल्‍हा भंडारा यांनी तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होत नसल्‍याने त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

 

  1.  विरुध्‍दपक्ष क्रं 3 डॉ. सुश्रत एम. सावरकर, प्रेस्‍टॉस मदन्‍स मल्‍टीस्‍पेशालीटी हॉस्‍पीटल अॅन्‍ड क्रिटीकल केअर सेंटर, नागपूर आणि विरुध्‍दपक्ष क्रं 4 डॉ.इंद्रायणी हटवार, आयकॉन हॉस्‍पीटल,नागपूर यांनी त्‍यांचे कर्तव्‍य  योग्‍य  प्रकारे पार पाडून  मृतक श्रीमती कोमलवर योग्‍य  ते वैद्दकीय उपचार  केल्‍या  बाबतची बाब पुराव्‍यानिशी सिध्‍द  झालेली असल्‍याने  त्‍यांचे  विरुध्‍दची  तक्रार खारीज  करण्‍यात येते.

 

 

  1.  सर्व पक्षकारांना निकालपत्राची  प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्‍ध करुन दयावी.

 

  1.  सर्व  पक्षकार व त्‍यांचे अधिवक्‍ता यांना निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष प्रकरणात दाखल केलेले अतिरिक्‍त संच जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.  
 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.