Maharashtra

Beed

CC/13/72

वशिष्‍ट आनंदराव साळुंके - Complainant(s)

Versus

डॉ.प्रशांत एन सानप - Opp.Party(s)

घोडके

01 Sep 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/13/72
 
1. वशिष्‍ट आनंदराव साळुंके
रा.इमामपुर ता.जि.बीड
बीड
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. डॉ.प्रशांत एन सानप
रा.मल्‍टभ्‍ स्‍पेशालिटी हॉस्‍पीटल क्रिटीकल केअर सेंटर एसपी ऑफीस समोर बीड,
बीड
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकाल

                       दिनांक- 01.09.2014

               (द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्‍य)

            तक्रारदार वचिष्‍ठ आनंदराव साळुंके यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांनी सेवा देण्‍यात कसूर केल्‍यामुळे नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.

 

            तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे मौजे इमामपूर जिल्‍हा बीड येथील रहिवाशी आहे. ते मोलमजूरी करुन उपजिवीका भागवितात. दि.07.07.2012रोजी तक्रारदाराचा मोटार सायकलवर अपघात झाला त्‍या अपघातामध्‍ये तक्रारदाराच्‍या उजव्‍या पायाच्‍या  मांडीचे हाड तूटले. त्‍यामुळे तक्रारदारास सरकारी दवाखाना बीड येथे शरीक केले. सामनेवाला क्र.1 व 2 हे सरकारी दवाखाना बीड येथे कामगिरी बजावत असताना तक्रारदारासोबत सामनेवाला क्र.1 व 2 ची ओळख झाली. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास सांगितले की, तुमचे मांडीचे हाड तूटले आहे, तुटलेल्‍या हाडाचे ऑपरेशन करावे लागेल. सदर ऑपरेशनची मशीन सरकारी दवाखान्‍यामध्‍ये उपलब्‍ध नसल्‍याने  आपण सामनेवाला क्र.1 व 2 यांचे खाजगी दवाखान्‍यात उपचार घेण्‍यास सांगितले. सामनेवाला यांचेवर विश्‍वास ठेवूनतक्रारदार व त्‍यांचे कुटूंबियांनी तक्रारदारास सामनेवाला क्र.1 व 2 यांचे खाजगी दवाखान्‍यात दि.07.07.2012 रोजी शरीक केले. तदनंतर सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास औषधोपचार करुन व तक्रारदाराचे उजव्‍या मांडीचे तुटलेले हाड ऑपरेशन करुन बसविले, त्‍यामध्‍ये एका बाजूने रॉड टाकला व दुसरी बाजू तशीच ठेवली. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांच्‍या दवाखान्‍यात दि.07.07.2012 पासून ते 23.07.2012 पर्यंत उपचार घेतला. तदनंतर सामनेवाला क्र.1 व 2 यांनी प्रत्‍येक आठवडयात एकदा तपासणीस बोलावून गोळया व औषधे देत असत. प्रत्‍येक वेळेस सामनेवाला  क्र.1 व 2 यांनी त्‍यासाठी फीस म्‍हणून रक्‍कम रु.3,000/- घेतले. सामनेवाला क्र.1 व 2 यांना बिलाच्‍या पावतीची मागणी केली असता बिले देत नसत. तक्रारदार यांनी दि.07.07.2012 पासून सामनेवाला क्र.1 व 2 यांच्‍या दवाखान्‍यात ऑपरेशन, गोळया औषधी व सामनेवाला यांचे फीस पोटी रक्‍कम रु.1,25,000/- खर्च केले. एवढा खर्च करुन सुध्‍दा तक्रारदाराच्‍या उजव्‍या मांडीचे हाड जूळले नाही. त्‍यामुळे तक्रारदारास चालण्‍यास खूप त्रास जाणवू लागला. तुटलेल्‍या हाडाच्‍या ठिकाणी त्रास होत आहे असे तक्रारदारास जाणवू लागले. तदनंतर तक्रारदार हे दि.05.03.2013 रोजी संचेती हॉस्पिटल पूणे येथे शरीक झाले. पुन्‍हा त्‍यांच्‍या मांडीच्‍या तुटलेल्‍या  हाडाचा दि.05.03.2013 रोजी एक्‍स रे फोटो काढला असता तेथील डॉक्‍टरांनी उजव्‍या मांडीचे  तुटलेले हाड न जुळल्‍याने तक्रारदारास त्रास होत आहे व पुन्‍हा  ऑपरेशन करुन तुटलेले हाड जुडून घ्‍यावे लागेल असा सल्‍ला दिला. तेथील डॉक्‍टरांनी दि.05.03.2013 रोजी काढलेले एक्‍स रे तक्रारदारास दाखविले, त्‍यामध्‍ये तुटलेल्‍या हाडाच्‍या दोन्‍ही बाजूने रॉड न बसविल्‍यामुळे हाड जोडले गेले नाही. जर सामनेवाला यांनी तुटलेच्‍या हाडाचा दोन्‍ही बाजूने रॉड बसविला असता तर तक्रारदारास पुन्‍हा  ऑपरेशन करण्‍याची गरज पडली नसती. तक्रारदार यांनी संचेती हॉस्पिटल पूणे येथे पुन्‍हा उजव्‍या पायाच्‍या मांडीवर दुस-यांदा ऑपरेशन केले त्‍यासाठी तक्रारदारास रक्‍कम रु.1,10,000/- एवढा खर्च आला. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी काळजीपूर्वक ऑपरेशन न केल्‍यामुळे तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. तसेच सामनेवाला क्र.1 व 2 यांनी ऑपरेशन करतेवेळेस सेवेत हेतुपूर्वक जाणुनबूजून कसूर, निष्‍काळजीपणा केला आहे. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍या दवाखान्‍यातील एकूण खर्च रु.1,30,000/- संचेती हॉस्पिटल पूणे येथील एकूण खर्च रु.1,10,000/- व मानसिक, शारिरिक त्रासापोटी रक्‍कम रु.7,000/- असे एकूण रक्‍कम रु.3,00,000/- सामनेवाला क्र.1 व 2 यांच्‍याकडून मिळावे अशी मागणी केलेली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात यावी व नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.3,00,000/- देण्‍याचे आदेश व्‍हावे.

 

            सामनेवाला क्र.1 व 2 हे मंचासमोर हजर झाले. त्‍यांनी निशाणी क्र.7 अन्‍वये आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी लेखी म्‍हणण्‍यासोबत  निशाणी क्र.6 वर प्राथमिक आक्षेप अर्ज दाखल केला आहे. तसेच निशाणी क्र.8 वर डॉ.प्रशांत एन.सानप यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला यांचे कथनानुसार तक्रारदाराचा अपघात झाला व त्‍याला बीड येथे सरकारी दवाखान्‍यात शरीक केले ही बाब मान्‍य आहे. उर्वरीत तक्रारीतील मजकूर सामनेवाला क्र.1 व 2 यांनी स्‍पष्‍टपणे नाकारलेला आहे. तसेच सामनेवाला क्र.1 व 2 हे सरकारी दवाखाना बीड येथे काम करत होते ही बाब मान्‍य नाही. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास त्‍यांचे खाजगी दवाखान्‍यात शरीक होऊन उपचार घेण्‍यास सांगितले ही बाब सुध्‍दा सामनेवाला यांना मान्‍य नाही. तक्रारदार हे दि.07.07.2012 रोजी सामनेवाला क्र.1 व 2 यांच्‍या दवाखान्‍यात उपचारासाठी शरीक झाले ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचेवर योग्‍य औषधोपचार सुरु केले. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांचेवर तुटलेल्‍या मांडीचे हाडाचे ऑपरेशन करताना त्‍यामध्‍ये रॉड बसविला आहे. तक्रारदार याला आधीपासूनच Osteopetrosis या नावाचा हाडाचा आजार आहे. सदर आजारामुळे रुग्‍णाचे ऑपरेशनमध्‍ये बसविलेले मेटल रॉडचे हाड हे पूर्णपणे जुळण्‍याची शक्‍यता नसते, सदर आजारामुळे तक्रारदाराचे बीएमबी कमी होऊ शकते. त्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारास देणा-या वैद्यकीय सेवेत योग्‍य सेवा किंवा सुविधा दिली नाही असे म्‍हणता येणार नाही. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून रक्‍कम रु.3,000/- ची फीस स्विकारलेली नाही. तक्रारदार यांनी  संचेती हॉस्पिटल पूणे येथे केलेल्‍या खर्चाबाबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाही. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास दिलेल्‍या सेवेत कोणताही निष्‍काळजीपणा किंवा हलगर्जीपणा केलेला नाही. सबब तक्रारदाराची तक्रार ही खर्चासहीत खारीज करण्‍यात यावी.

 

            तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सामनेवाला क्र.1 व 2 यांचे डिस्‍चार्ज कार्ड, तसेच संचेती हॉस्पिटल पूणे येथील कागदपत्र, सामनेवाला यांना दिलेली नोटीस इत्‍यादी कागदपत्र दाखल केलेले आहे. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांच्‍याकडे उपचार घेतलेले कागदपत्राच्‍या छायांकित प्रती दाखल केलेल्‍या  आहेत. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांनी घेतलेल्‍या उपचाराचे कागदपत्र दाखल केले आहे. तसेच सामनेवाला यांनी, तक्रारदार यांनी दिलेल्‍या नोटीसचे उत्‍तर दाखल केलेले आहे. वर नमुद केलेल्‍या कागदपत्राचे अवलोकन केले. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

 

           मुददे                                       उत्‍तर

1) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास

   वैद्यकीय सेवा देण्‍यात निष्‍काळजीपणा करुन

   सेवा देण्‍यात कसूर केला आहे, ही बाब तक्रारदार

   यांनी सिध्‍द केली काय ?                               नाही.                                                 2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्‍यास

   पात्र आहे काय ?                                      नाही.

3) आदेश काय ?                                  अंतिम आदेशाप्रमाणे.

 

 

                        कारणमिंमासा

मुददा क्र.1 व 2 ः- तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या पुराव्‍याचे  शपथपत्र व कागदपत्र याचे बारकाईने अवलोकन केले. यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेल्‍या वैद्यकीय सेवेत निष्‍काळजीपणा केला आहे किंवा नाही हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांच्‍या पुराव्‍याच्‍या शपथपत्रावरुन व दाखल केलेल्‍या  कागदपत्रावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार याने दि.07.07.2012 ते 23.07.2012 पर्यंत सामनेवाला क्र.1 व 2 यांच्‍याकडे मांडीच्‍या तुटलेल्‍या हाडावर उपचार केला ही बाब तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या सामनेवाला यांच्‍या डिस्‍चार्ज कार्ड वरुन सिध्‍द होते. तदनंतर तक्रारदारास जोडलेल्‍या हाडाच्‍या ठिकाणी त्रास होत असल्‍यास त्‍यांनी परत दि.05.03.2013 ते 11.03.2013 पर्यंत संचेती हॉस्पिटल पूणे येथे उपचार घेतले असे निदर्शनास येते. तक्रारदार यांनी दि.24.07.2012 ते 04.03.2013 पर्यंत तुटलेल्‍या हाडावर त्रास होत असल्‍यास त्‍यावर कोणता उपचार घेतला याबाबत स्‍पष्‍ट असा उल्‍लेख केला नाही. तसेच तक्रारदार यांनी हाडाचे ऑपरेशन व गोळया औषध व सामनेवाला यांची फीस याबाबत मागणी केलेल्‍या  खर्चाबाबत कोणतीही वैद्यकीय पावती दाखल केली नाही, किंवा कोणताही ठोस पुरावा मंचासमोर दाखल केला नाही, जेणेकरुन ही बाब सिध्‍द होऊ शकली असती. तक्रारदार यांनी संचेती हॉस्पिटल पूणे येथे उपचार घेतले होते हे सिध्‍द  करण्‍यासाठी संचेती हॉस्पिटल पूणे यांना सदर तक्रारीत सामनेवाला म्‍हणून सामिल केले नाही असे निदर्शनास येते. सामनेवाला यांनी तक्रारीतील प्राथमिक आक्षेप अर्ज दाखल केले आहे. त्‍यानुसार सामनेवाला यांचे कथन की, Martin D’Souza v/s Mohd. Ishfaq (MANU/SC/0225/2009); the Hon’ble Supreme Court has given specific directions that:

“whenever a complaint is received against a doctor or hospital by the Consumer Fora, then it should first refer the matter to a competent doctor or committee of doctors, specialized in the field and only on their report a prima facie case of medical negligence can be made out and a notice can be issued to the concerned doctor/hospital”. या केसच्‍या न्‍यायनिर्णयानुसार सामनेवाला यांनी सदर तक्रार ही कमिटी ऑफ डॉक्‍टर्सकडे पाठवून अहवाल मागणीचा अर्ज केला होता त्‍यावर तक्रारदार यांनी आपले म्‍हणणे दाखल केले होते. सदर अर्जावर दोन्‍ही पक्षाचे युक्‍तीवाद ऐकला. मा.मंचाच्‍या आदेशानुसार सदर प्रकरण हे कमिटी डॉक्‍टर्सचे अहवाल निशाणी क्र.13 अन्‍वये मागविण्‍यात आले. त्‍यासाठी सदर प्रकरण हे स्‍वामी रामानंद तिर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई येथे पाठविण्‍यात आले. स्‍वामी रामनंदतिर्थ ग्रामीण वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्‍णालय अंबाजोगाई यांचे अहवाल प्राप्‍त झाले त्‍यांचे अवलोकन केले. सदर अहवाल निशाणी क्र.20 वर दाखल केले आहे. सदर अहवालावर तक्रारदार व सामनेवाला यांनी आपले म्‍हणणे दाखल केले नाही. सदर अहवालाचे निष्‍कर्ष यांचे काळजीपूर्वक लक्षात घेतले त्‍या अन्‍वये तक्रारदाराचे उजव्‍या मांडीचे हाड मोडलेले होते. तदनंतर डॉक्‍टरांनी ऑपरेशन केले परंतू ऑपरेशन केल्‍यानंतर रॉड टाकला. हाड जुडणे किंवा न जुडणे हे प्रत्‍येक रुग्‍णात वेगवेगळे असते, काही वेळेस ते जुळत नाही. सदरील तक्रारदाराचे हाड पहिल्‍या ऑपरेशन नंतर जुडले नाही त्‍यासाठी दुसरे ऑपरेशन करणे गरजेचे होते, ते संचेती रुग्‍णालय पूणे येथे करण्‍यात आले आहे. दि.25.06.2014 रोजी स्‍वामी रामनंदतिर्थ ग्रामीण वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्‍णालय अंबाजोगाई येथे काढण्‍यात आले असून त्‍यामध्‍ये हाड जुडलेले दिसून आले. या प्रकरणात डॉक्‍टरांच्‍या  उपचारात चूक किंवा हलगर्जीपणा झाला असावा असे आम्‍हाला वाटत नाही असा निष्‍कर्ष डॉ.धानीवाला एन.के.प्राध्‍यापक अस्थिव्‍यंग विभाग अध्‍यक्ष कमिटी ऑफ तज्ञ डॉक्‍टर्सचे आहेत. सदरील अहवाल याचे अवलोकन केले. यावरुन मंचाचे असे मत आहे की, सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेल्‍या उपचाराबाबत कोणतेही चूक किंवा हलगर्जीपणा केला नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारास वैद्यकीय सेवा देण्‍यात कसूर केला असे म्‍हणता येणार नाही. सबब तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्‍यास पात्र नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रदद होणेस पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.

 

            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

                   आदेश

      1) तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्‍यात येत आहे.

      2) खर्चाबददल आदेश नाही.

      3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील  कलम 20

                   (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.

 

 

 

               

                       श्रीमती मंजूषा चितलांगे,    श्री.विनायक लोंढे,

                              सदस्‍य               अध्‍यक्ष

                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 

 

 

 

 

  

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.