Maharashtra

Thane

cc/06/554

श्री. निलेश नारायण लाडे - Complainant(s)

Versus

डिव्‍हीजनल मॅनेजर - Opp.Party(s)

आर.एस. चहल

31 Oct 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. cc/06/554
 
1. श्री. निलेश नारायण लाडे
रिजेन्‍ट ऑईल सेल कंपाऊंड, नायगांव, रमाकांत देसाई हॉस्पिटलसमोर, शिवाजीनगर, बेलापूर, बेलापूर रोड,कळवा, ठाणे.
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. डिव्‍हीजनल मॅनेजर
दि युनायटेड इंडिया इन्‍श्‍युरन्‍स कं.लि., कॅनरा बँकेसमोर,गोखले रोड, नौपाडा, ठाणे.
ठाणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated The 31 Oct 2015

          न्‍यायनिर्णय   

               (द्वारा सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे- मा. सदस्‍या)

 

  1.              तक्रारदारांच्‍या मालकीचे वाहन सामनेवाले यांचेकडे कॉम्‍प्रेहेन्सिव्‍ह विमा पॉलिसी दि. 14/02/2005 ते दि. 13/02/2006 या कालावधीची रक्‍कम रु. 3,00,000/- ची घेतली होती.
  2.       तक्रारदारांच्‍या वाहनाचे दि. 18/06/2005 रोजी रात्री 11.00 वाजता मुंबई अहमदाबाद रस्‍त्‍यावर झालेल्‍या अपघातात पूर्णपणे नुकसान झाले. तलासरी पोलिस स्‍टेशनला अपघाताची माहिती दिली. तसेच सामनेवाले क्र. 1 यांचेकडे रु. 3,00,000/- रकमेकरीता वाहनाच्‍या पूर्णतः नुकसानीबाबतचा विमा प्रस्‍ताव दाखल केला.
  3.    तक्रारदारांनी विमा प्रस्‍ताव दाखल केल्‍यानंतर नुकसानीची तपासणी करण्‍यासाठी सर्व्‍हेअरची नेमणूक केली.सर्व्‍हेअर यांनी अपघातग्रस्‍त वाहनाचे फोटो घेतले व वाहनाची पूर्णतः नुकसानी झाल्‍याबाबतचा अहवाल सामनेवाले यांचेकडे दाखल केला. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना वाहनाच्‍या नुकसान भरपाईची रक्‍कम दिली नाही.
  4.          सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांचे वाहनाची प्रायव्‍हेट कार या नांवाने आर.टी.ओ. कार्यालयात नोंदणी झालेली असून सामनेवाले यांनी तक्रारदारांना प्रायव्‍हेट कार विमा पॉलिसी दिली आहे. तक्रारदारांनी अपघातग्रस्‍त वाहन अश्विनभाई मगनभाई पुरोहित यांना बरडोली ते वसई येथे प्रवास करण्‍यासाठी भाडेतत्‍त्‍वावर देऊन विमा पॉलिसीतील “Limitation as to use” या अटींना भंग केला आहे. त्‍यामुळे सामनेवाले यांनी योग्‍य कारणास्‍तव तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव नामंजूर केला आहे.
  5.           तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद,  सामनेवाले यांची लेखी कैफियत, लेखी युक्‍तीवाद, पुरावा शपथपत्र व दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदार व सामनेवाले तोंडी युक्‍तीवादासाठी सातत्‍याने गैरहजर असल्‍यामुळे सदर प्रकरण गुणवत्‍तेवर निकाली करण्‍याबाबत निर्णय मंचाने घेतला.

 

      तक्रारीतील दाखल पुराव्‍यावरुन खालीलप्रमाणे बाबी स्‍पष्‍ट होतातः

 

  1.     तक्रारदारांना सामनेवाले यांनी अपघातग्रस्‍त वाहनाची प्रायव्‍हेट कार विमा पॉलिसी या कालावधीची दिली आहे.

ब.        तक्रारदारांच्‍या वाहनाला दि.18/06/2005 रोजी झालेल्‍या अपघातासंदर्भातील FIR ची प्रत व इतर पोलिस पेपर्सचे अवलोकन केले असता श्री. अश्विनभाई मगनभाई पुरोहित यांनी वसई ते बरोडीली येथे कार्यक्रमासाठी जाण्‍याकरीता अपघातग्रस्‍त वाहन किरायाने घेतले होते, असे त्‍यांच्‍या जबाबामध्‍ये नमूद केले आहे. तसेच अपघाताच्‍यावेळी वाहनामध्‍ये प्रवास करत असलेल्‍या इतर सहा प्रवासी, अश्विनभाई यांनी तक्रारदार अथवा ड्रायव्‍हर यांच्‍याशी संबंधित असल्‍याचे नमूद नाही. सदर अपघातात एक प्रवासी मरण पावले असून इतर 6 प्रवासी व ड्रायव्‍हर जखमी झाल्‍याचे दिसते.

 

  1.      सामनेवाले यांचे इनव्‍हे्स्टिगेटर यांनी दि. 12/08/2006 रोजी दिलेल्‍या अहवालानुसार सामनेवाले यांनी तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव “Limitation to use” या अटींचा भंग केल्‍याचे कारणास्‍तव (breach of condition) वाहनाचे नुसार भरपार्इचा प्रस्‍ताव योग्‍य कारणास्‍तव नामंजूर केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. सबब सामनेवाले यांनी सेवेमध्‍ये कसूर केल्‍याचे स्‍पष्‍ट होत नाही असे मंचाचे मत आहे

       सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

            आ दे श

  1. तक्रार क्र. 554/2006 नामंजूर करण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत आदेश नाही.
  3. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती असल्‍यास तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.
  4. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्‍य पोष्‍टाने पाठविण्‍यात   याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.