Maharashtra

Ahmednagar

CC/18/290

श्री. अमोल कैलास ठोंबे - Complainant(s)

Versus

जिल्‍हा शल्‍यि‍चिकित्‍सक - Opp.Party(s)

एम.डी.खरात

05 Feb 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/18/290
( Date of Filing : 27 Sep 2018 )
 
1. श्री. अमोल कैलास ठोंबे
रा. खांडके, ता.नगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. जिल्‍हा शल्‍यि‍चिकित्‍सक
अहमदनगर जिल्‍हा सरकारी रुग्‍णालय, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:एम.डी.खरात , Advocate
For the Opp. Party:
Dated : 05 Feb 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्‍यक्ष)

1.   तक्रारकर्ताने सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्‍वये दाखल केली आहे.

2.   तक्रारकर्ताने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताची पत्‍नी नामे पल्‍लवी अमोल ठोंबे ही गरोदर असल्‍याने व तिचे बाळंतपणासाठी तक्रारकर्ता यांनी सामनेवालाचे दवाखान्‍यात दिनांक 24.05.2018 रोजी 11.30 वाजेचे सुमारास दाखल केले. सामनेवालाचे वैद्यकिय अधिकारी यांनी तक्रारकर्ताचे पत्‍नीचे सिझर ऑपरेशन करुन तक्रारकर्ताचे पत्‍नीचे पोट कापून तक्रारकर्ताचे पत्‍नीचे पोटातील बाळास बाहेर काढले. त्‍या ऑपरेशन करीता 18 टाके टाकलेले होते. सदर सिझर ऑपरेशन झाल्‍यानंतर चौथ्‍या दिवसापर्यंत तक्रारदाराची पत्‍नी पल्‍लवी ही सामनेवाला यांचे वैद्यकिय अधिकारी यांचे देखरेखीखाली अॅडमिट केलेली होती. चौथ्‍या दिवशी सामनेवाले यांचे वैद्यकिय अधिकारी यांनी तक्रारदाराचे पत्‍नीचे सिझर ऑपरेशनची तपासणी केली असता, सदर ऑपरेशनकरीता टाकलेले टाके हे ओले असल्‍याने निघाले नाही. म्‍हणून सदरहू वैद्यकिय अधिकारी यांनी पुन्‍हा सदर टाके ड्रेसींग करुन आणखी 4 दिवस देखरेखीखाली दाखल राहण्‍यास सांगितले. सदर तक्रारकर्ता यांनी त्‍याची पत्‍नीस पुढील चार दिवसाकरीता अॅडमिट ठेवल्‍यानंतर सिझर ऑपरेशनची पट्टी पुन्‍हा उघडली असता, सदरची ऑपरेशनची जखम भरुन आलेली नव्‍हती. तक्रारदार हिचे पत्‍नीचे पोटात पॉईझन झाले असल्‍याने तक्रारकर्ताचे पत्‍नीस डॉ.काशिद हॉस्‍पीटल, अहमदनगर यांचेकडे अॅ‍डमिट करावे लागले व त्‍याकरता पुढील उपचारासाठी नोबेल हॉस्‍पीटल, अहमदनगर येथे दिनांक 9.6.2018 रोजी दाखल करावे लागले. त्‍याकरीता 12 दिवसाचे कालावधीकरीता अतिदक्षता विभागात अॅडमिट राहून उपचार घ्‍यावे लागले. त्‍याकरीता अतिरिक्‍त खर्च आला. सामनेवालेचे वैद्यकिय अधिकारी यांनी निष्‍काळजीपणामुळे तक्रारदाराचे पत्‍नीचे सिझर ऑपरेशन करावे लागले. तक्रारकर्ताचे पत्‍नीस मानसिक व शारीरीक त्रास सहन करावा लागला. मंचाकडून तक्रारकर्ताचे वकीलांना तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 2 (1) (डी) प्रमाणे ग्राहक कसा होतो यावर विचारणा केली असता, त्‍यांनी मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या Mahantap v/s. Suman Kumar यांचे न्‍याय निवाडयाचा हवाला घेतला. तक्रारकर्ता यांनी शासकीय जिल्‍हा शल्‍यचिकीत्‍सक कडून उपचार घेतले असून ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (1) (डी) (ओ) प्रमाणे सामनेवालाकडून सेवा घेतली आहे. म्‍हणून तक्रारकर्ता हे सामनेवालाचे ग्राहक आहेत असा तोंडी युक्‍तीवाद करण्‍यात आला आहे. मा.सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी V. Krishnakumar V/s. State of Tamil Nadu & Ors. यात दिलेल्‍या न्‍याय निवाडयाची पडताळणी करतांना मंचाचे असे निदर्शनास आले आहे की, “ एखादा इसम जिल्‍हा शल्‍यचिकीत्‍सक किंवा शासकीय रुगणालय, सहकारी रुग्‍णालय यांचेकडे उपचार घेतला असल्‍यास त्‍यांनी त्‍या संदर्भात सेवा घेतली आहे. म्‍हणून ते ग्राहक या संज्ञेत बसत आहे. परंतु सदर प्रकरणात तक्रारकर्ताचे पत्‍नीने जिल्‍हा सहकारी रुग्‍णालयात उपचार घेतले असल्‍याने व ती तक्रारकर्ताची पत्‍नी असल्‍याने तक्रारकर्ताची पत्‍नी ग्राहक होत आहे. ”  असे मंचाचे मत ठरले आहे. तक्रारकर्ता यांचे सामनेवाला सोबत ग्राहक नाते होत नसल्‍याने, खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारकर्ताची तक्रार अस्विकृत करण्‍यात येते.

2.   तक्रारकर्ता यांनी या तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

3.   या आदेशाची प्रथम प्रत तक्रारकर्ता यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

4.   तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

5.   सदर आदेश आज रोजी डायसवर पारीत करण्‍यात आला.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.