निकाल
दिनांक- 13.11.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष )
तक्रारदार व सामनेवाले क्र.2 विमा कंपनी मंचासमोर हजर झाले. तक्रारदार यांनी सदरील तकार सामनेवाले यांचे विरुध्द शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत लाभ न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून दाखल केली आहे.
तक्रारदार व सामनेवाले यांनी या मंचासमोर आज दि.13.11.2014 रोजी नि.18 वर सदरील तक्रार बोर्डावर घेण्यासाठी अर्ज दिला. तो मंजूर करण्यात आला. नि.19 वर तक्रारदार व सामनेवाले क्र.2 विमा कंपनी यांचेमध्ये झालेले तडजोडपत्र दाखल केले. सदरील तडजोड पत्रात तक्रारदार यांनी यापूर्वी तक्रार क्र.138/2011 दाखल केली होती व त्या निकालाचे अनुषंगाने व दिलेल्या निर्देशाप्रमाणे सदरील तक्रार दाखल केली आहे. सामनेवाले क्र.2 विमा कंपनी यांनी आज रोजी चेक क्रमांक 396829 रक्कम रु.1,00,000/- या मंचासमोर तक्रारदार यांना सूर्पूद केला आहे. सदरील तडजोडीची या मंचाने पडताळणी केली आहे. तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले तडजोउ स्विकारली आहे. सबब, सदरील तक्रारदार यांना संपूर्ण रक्कम मिळाल्यामूळे तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार तडजोड पत्राप्रमाणे बंद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे श्री.विनायक लोंढे,
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक