:: (पारीत व्दारा – श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य. ) (पारीत दिनांक– 23 एप्रिल, 2014) 01. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांचे विरुध्द सेवेतील कमतरते बद्दल ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 अंतर्गत मंचा समक्ष तक्रार दाखल केली.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे - तक्रारकर्ता नागपूर येथील रहिवासी असून एका पायाने अपंग आहे व मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय आहे. विरुध्दपक्षाचा वेबसाईट वरुन इंटरनेटचे माध्यमातून वर-वधू शोधून देण्याचा व्यवसाय आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 ने दि.09.01.2013 रोजी त्यांच्या सेल क्रं 02265661710 वरुन तक्रारकर्त्याचे भ्रमणध्वनी क्रं 8087777143 वर संपर्क साधून विरुध्दपक्षाचे वेबसाईटवर जैस्वाल मॅट्रीमोनी कॉम अंतर्गत गोल्ड सेवा रुपये-1500/- मध्ये नोंदणीखर्चासह तीन महिन्या पर्यंत सिमीत राहिल असे सांगितले तसेच वि.प.क्रं 2 ने तक्रारकर्त्यास असेही आश्वासन दिले की, तीन महिने संपल्या नंतर सुध्दा तक्रारकर्त्याचे नावाने वेबसाईटवर असलेली फ्रोफाईल जिवनभर अस्तित्वात राहिल. दि.14.01.2013 रोजी पुन्हा वि.प.क्रं 2 ने दुरध्वनीवरुन योजनेची तक्रारकर्त्यास माहिती दिली. त्यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 3 नागपूर शाखेचे कर्मचारी सचिन चुटे यांचे जवळ गोल्ड सेवे संबधाने रुपये-1500/- दिलेत व पावती प्राप्त केली. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी तक्रारकर्त्याची जैस्वाल मॅट्रीमोनी कॉम या वेबसाईटवर प्रोफाईल
निर्माण केली परंतु सदर प्रोफाईल सक्रीय करण्यासाठी आवश्यक असलेला पासवर्ड तक्रारकर्त्यास उपलब्ध करुन दिला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.17.01.2013 रोजी विरुध्दपक्षाचे या ईमेल आय.डी.वर तक्रारकर्त्याचे नावाची प्रोफाईल सक्रीय करण्यासाठी मेल पाठविला. दि.18.01.2013 रोजी वि.प.चे Krishna.koli @ community matrimony.com या ईमेल आय.डी.वर “No login” संदर्भात ईमेल पाठवून प्रोफाईल सक्रीय करण्यासाठी नविन “ login” व नविन पासवर्ड उपलब्ध करुन देण्याची विनंती केली परंतु वि.प.क्रं 2 ने उत्तर दिले नाही. तक्रारकर्त्याचे प्रोफाईलचे नाव JAS119342 असे आहे. तक्रारकर्त्याचे असेही म्हणणे आहे की, या संदर्भात त्याने वि.प.क्रं 1 ते 3 चे कर्मचा-यांशी दुरध्वनी वरुन संपर्क साधला असता ते दुरध्वनी बंद करीत होते तसेच वि.प.क्रं 3 चे कर्मचारी धमक्या देत होते. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास ईमेल पाठवून योग्य सेवा मिळत नसेल तर जमा केलेली रक्कम परत मागितली होती. परंतु प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तक्रारकर्त्याने दि.14.02.2013 रोजी वि.प.क्रं 1 ते 3 यांना वकीला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. त.क.ची कायदेशीर नोटीस वि.प.क्रं 1 ला दि.18.02.2013 तर वि.प.क्रं 2 ला दि.16.03.2013 रोजी मिळाली. वि.प.क्रं 3 ची नोटीस नॉट क्लेम्ड या शे-यासह परत आली. त्यानंतर वि.प.क्रं 2 ने दि.19.03.2013 रोजी तक्रारकर्त्यास ई मेल पाठवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. पुन्हा वि.प.क्रं 2 ने दि.20.03.2013 रोजी पुन्हा ईमेल पाठवून त.क.ला आश्वासन दिले. परंतु योग्य ती कार्यवाही केली नाही वा रक्कम परत केली नाही. तक्रारकर्त्याने पोलीस स्टेशन वाडी येथे दि.11.04.2013 रोजी विरुध्दपक्षा विरुध्द अपराधीक तक्रार केली परंतु वाद दिवाणी स्वरुपाचा असल्याचे पोलीसांनी सांगितले. विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली. तक्रारकर्त्याची प्रार्थना- 1) विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्या कडून जैस्वाल मॅट्रीमोनी अंतर्गत गोल्ड सेवे करीता स्विकारलेली रक्कम रुपये-1500/- 17 टक्के व्याज दराने त.क.ला परत करण्याचे आदेशित व्हावे. 2) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासा बद्दल व आर्थिक नुकसानी बद्दल विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांनी एकूण रुपये-83,000/- देण्याचे आदेशित व्हावे. 3) प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-12,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांनी त.क.ला देण्याचे आदेशित व्हावे. 03. विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांना मंचाचे मार्फतीने नोंदणीकृत डाकेने स्वतंत्ररित्या नोटीस पाठविण्यात आली. विरुध्दपक्ष क्रं 1 यांना नोटीस मिळाल्या बद्दल पोस्टाची पोच नि.क्रं 10 वर दाखल आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 व क्रं 3 यांना नोंदणीकृत डाकेव्दारे पाठविलेली नोटीस प्राप्त झाल्या बद्दल पोस्टाचा अहवाल अनुक्रमे नि.क्रं 12 व 13 वर दाखल आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही ते मंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत वा लेखी उत्तरही सादर केले नाही म्हणून वि.प.क्रं 1 ते 3 विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दि.27.12.2013 रोजी प्रकरणात पारीत केला. 04. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले असता, न्यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत-
मुद्दे उत्तर (1) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास सेवेत कमतरता देऊन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय?.............................................होय. (2) काय आदेश?...............................................तक्रार अंशतः मंजूर ::कारण मिमांसा ::
मु्द्दा क्रं 1 व 2 बाबत- 05. तक्रारकर्त्याचे तक्रारी नुसार त्याने दि.14.01.2013 रोजी विरुध्दपक्ष क्रं 3 नागपूर शाखेचे कर्मचारी सचिन चुटे यांचे जवळ मॅट्रीमोनी अंतर्गत गोल्ड सेवे संबधाने रुपये-1500/- अदा केल्या नंतर विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी तक्रारकर्त्याचे नावाची मॅट्रीमोनी कॉम या वेबसाईटवर प्रोफाईल निर्माण केली परंतु सदर प्रोफाईल सक्रीय करण्यासाठी आवश्यक असलेला पासवर्ड तक्रारकर्त्यास उपलब्ध करुन दिला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.17.01.2013 रोजी विरुध्दपक्षाचे या ईमेल आय.डी.वर प्रोफाईल सक्रीय करण्यासाठी मेल पाठविला. त्यानंतर पुन्हा दि.18.01.2013 रोजी विरुध्दपक्षाचे Krishna.koli@communitymatrimony.com या ईमेल आय.डी.वर “No login” संदर्भात ईमेल पाठवून प्रोफाईल सक्रीय करण्यासाठी नविन “ login” व नविन पासवर्ड उपलब्ध करुन देण्याची विनंती केली परंतु वि.प.क्रं 2 ने उत्तर दिले नाही. तक्रारकर्त्याचे प्रोफाईलचे नाव JAS119342 असे आहे. तक्रारकर्त्याचे असेही म्हणणे आहे की, या संदर्भात त्याने वि.प.क्रं 1 ते 3 चे कर्मचा-यांशी दुरध्वनी वरुन संपर्क साधला असता ते दुरध्वनी बंद करीत होते तसेच वि.प.क्रं 3 चे कर्मचारी धमक्या देत होते. तक्रारकर्त्याने ईमेल वरुन योग्य सेवा मिळत नसेल तर जमा केलेली रक्कम परत मागितली होती. परंतु प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तक्रारकर्त्याने वि.प.क्रं 1 ते 3 यांना कायदेशीर नोटीस दि.14.02.2013 रोजी पाठविली. त.क.ची कायदेशीर नोटीस मिळाल्या नंतर वि.प.क्रं 2 ने दि.19.03.2013 रोजी तक्रारकर्त्यास ई मेल पाठवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पुन्हा वि.प.क्रं 2 ने दि.20.03.2013 रोजी पुन्हा ईमेल पाठवून आश्वासन दिले. परंतु योग्य ती कार्यवाही केली नाही वा रक्कम परत केली नाही. विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्यास शारिरीक मानसिक त्रास सहन करावा लागला.
06. तक्रारकर्त्याने आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ पुराव्या दाखल कॉम्युनिटी मॅट्रीमोनी कॉम अंतर्गत विरुध्दपक्ष क्रं 3 यांनी दि.15.01.2013 रोजी पावती क्रं 840 व्दारे रुपये-1500/- मिळाल्या बद्दल तक्रारकर्त्यास निर्गमित केलेली पावती प्रत दाखल केली. तक्रारकर्त्याची प्रोफाईल तयार झाल्याचा दस्तऐवज दाखल केला. तक्रारकर्त्याने दि.17.01.2013 रोजी विरुध्दपक्षाचे या ईमेल आय.डी.वर प्रोफाईल सक्रीय करण्यासाठी पाठविलेल्या ईमेल चा दस्तऐवज तसेच दि.18.01.2013 रोजी विरुध्दपक्षाचे Krishna.koli@communitymatrimony.com या ईमेल आय.डी.वर “No login” संदर्भात पाठविलेल्या ईमेलचा दस्तऐवज अभिलेखावर सादर केला. परंतु उत्तर प्राप्त झाले नाही वा योग्य कार्यवाही केली नाही म्हणून तक्रारकर्त्याने वि.प.क्रं 1 ते 3 यांना वकीला मार्फत कायदेशीर नोटीस दि.14.02.2013 रोजी पाठविली. त.क.ची कायदेशीर नोटीस वि.प. क्रं 1 ला दि.18.02.2013 तर वि.प.क्रं 2 ला दि.16.03.2013 रोजी मिळाली. वि.प.क्रं 3 ची नोटीस नॉट क्लेम्ड या शे-यासह परत आली. नोटीस पाठविल्या नंतर वि.प.क्रं 2 ने दि.19.03.2013 रोजी तक्रारकर्त्यास ई मेल पाठवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पुन्हा
वि.प.क्रं 2 ने दि.20.03.2013 रोजी पुन्हा ईमेल पाठवून आश्वासन दिल्याचा दस्तऐवज अभिलेखावर दाखल केला. परंतु योग्य ती कार्यवाही केली नाही वा रक्कम परत केली नाही म्हणून शेवटी कंटाळून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष सादर केली. 07. मंचाचे मते दाखल दस्तऐवजां वरुन सिध्द होते की, तक्रारकर्त्याचे नावाचे प्रोफाईल विरुध्दपक्षाने जैस्वाल मॅट्रीमोनी अंतर्गत रुपये-1500/- स्विकारुन तयार केले होते परंतु सदर प्रोफाईल प्रोफाईल सक्रीय करण्यासाठी नविन “ login” व नविन पासवर्ड उपलब्ध करुन देण्यासाठी तक्रारकर्त्याने वारंवार विरुध्दपक्षाकडे ई-मेल व्दारे संपर्क साधूनही त्यास मंचात तक्रार दाखल करे पर्यंत नविन लॉगईन व पासवर्ड पुरविला नव्हता. विरुध्दपक्षानां तक्रारकर्त्याचे तक्रारी संबधाने मंचाची नोटीस प्राप्त होऊनही मंचा समक्ष ते उपस्थित झाले नाहीत वा आपले लेखी उत्तर सादर करुन तक्रारकर्त्याची वि धाने खोडून काढलेली नाहीत. तक्रारकर्त्याची तक्रार प्रतिज्ञालेखावर सादर आहे तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाशी केलेला ई-मेल पत्रव्यवहार, विरुध्दपक्षाचे उत्तर अभिलेखावर दाखल आहे. वरील सर्व घटनाक्रम, उपलब्ध दस्तऐवज पाहता विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास शेवट पर्यंत प्रोफाईल सक्रीय करण्यासाठी नविन “ login” व नविन पासवर्ड उपलब्ध करुन दिला नाही. म्हणून तक्रारकर्ता विरुध्दपक्षाकडे भरलेली रक्कम रुपये-1500/- तक्रार दाखल दिनांका पासून द.सा.द.शे.9% दराने व्याजासह परत मिळण्यास पात्र आहे तसेच विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-1000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-3000/- विरुध्दपक्षा कडून मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. ::आदेश:: तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात अंशतः मंजूर करण्यात येते. 1) विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्या कडून स्विकारलेली रक्कम रुपये-1500/- (अक्षरी रुपये एक हजार पाचशे फक्त) तक्रार दाखल दि.07.05.2013 पासून द.सा.द.शे.9% दराने व्याजासह परत करावी. 2) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-1000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांनी परत करावे. 3) निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |