ORDER | ( आदेश पारित व्दारा -श्री नितीन घरडे, मा.सदस्य ) - आदेश - ( पारित दिनांक –21 सप्टेंबर 2015 ) - तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 खाली दाखल केली आहे.
- तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, विरुध्द पक्ष क्रं.2 हे जमिन विकसित करुन त्यावर हाऊस व्हीला/डयुप्लेक्स व रहिवासी/व्यवसाईक बांधकाम करण्याचा मे.प्रिन्स रिजेन्सी (इंडिया) प्रा.लि. या नावाने व्यवसाय करतात. विरुध्द पक्ष क्रं.1 हे मौंजा-खास, प.ह.नं.38, तह.नागपूर (ग्रामीण) येथील खसरा नं.93/8, 93/9, व 95 मधे जय श्रीक्रिष्णन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.नागपूर या संस्थेने टाकलेल्या लेआऊट मधील भुखंड क्रं.6-अ,आराजी 371.60 चौ.मी. चे मालक आहेत.
- विरुध्द पक्ष क्रं.1 ने विरुध्द पक्ष क्रं.2 सोबत त्यांचे मालकीचे भुखंड विकसित करण्याचा करारनामा दिनांक 6/4/2009 रोजी केला. विरुध्द पक्ष क्रं.2 हे सदर भुखंड विकसित करुन तेथे चंद्रकला अपार्टमेंन्ट या नावाने बहुमजली इमारत बांधणार होते. ज्यात सदनिका व दुकानाचे बांधकाम करणार होते.
- तक्रारकर्त्याला जागेची गरज असल्याने त्यांने विरुध्द पक्ष क्रं.2 चे चंद्रकला अपार्टमेंन्ट मधे तळमजल्यावरील सदनिका क्रं.जी-001, ज्याचे चटई क्षेत्रफळ 51.19 चौ.मी. बांधीव क्षेत्रफळ 64.43 चौ.मी. सुपर बिल्ट अप क्षेत्रफळ 76.08 चौ.मी. खरेदी करण्याचा करार एकुण मोबदला रुपये 15,00,000/- खरेदी करण्याचा करार दिनांक 6.4.2009 रोजी नोंदणीकृत करारनामा केला व रु.3,00,000/-विरुध्द पक्ष क्रं.2 यांना बयाणा म्हणुन दिले व उर्वरित रक्कमेकरिता गृह फायनान्सकडुन रुपये 12,00,000/-चे गृहकर्जं घेतले. मंजूर गृहकर्ज रक्कमेतील रुपये 6,00,000/-तक्रारकर्त्याने दिनांक 31/3/2009 रोजी धनादेशाव्दारे विरुध्द पक्ष क्रं.2 यांना अदा केले. पुढे वेळोवेळी 8 ते 10 महिन्यात गृह फायनान्सने उर्वरित रक्कम विरुध्द पक्ष क्रं.2 यांना अदा केल्याचे सांगत आहे. यावरुन गृह फायनान्सने एकुण रुपये 12,00,000/-व तक्रारकर्त्याने बयाणा म्हणुन दिलेले रुपये 3,00,000/- असें एकुण 15,00,000/-विरुध्द पक्ष क्रं.2 याना दिले कारण गृहकर्ज बकाया रुपये 12,00,000/- दाखवित आहे. परंतु विरुध्द पक्ष क्रं.2 हे केवळ 13,80,000/- रक्कम प्राप्त झाल्याचे कबुल करतात.
- तक्रारकर्ता पुढे नमुद करतात की, गृहकर्जापैकी रुपये 1,20,000/- चा जो वाद आहे ती रक्कम गृह फायनान्स कंपनीने नियमबाह्य पध्दतीने विरुध्द पक्ष क्रं.2 यांना धनादेशाव्दारे न देता सदर रक्कम एच डी एफ सी व्दारे तक्रारकर्त्याचे नावे दिला व पुढे ही चुक लक्षात येताच गृह फायनान्स ने त्यांचे एका कर्मचा-यास तक्रारकर्त्याचे घरी पाठवून सदर धनादेश मागीतला परंतु तक्रारकत्याने गृह फायनान्सचे नावे धनादेश देण्याची तयारी दाखविली असता गृह फायनान्सने ते नाकारले व रोख रक्कमेची मागणी केली म्हणुन वेळ वाचविण्याकरिता तक्रारकर्त्याने 1,20,000/- गृह फायनान्सचे प्रतिनीधीला रोख दिले व त्याबाबत पावती बिल्डरला ही रक्कम प्राप्त होताच आणून देण्यात देईल असे सांगीतले. परंतु बिल्डर रुपये 10,80,000/- प्राप्त झाल्याचे कबूल करतात तर गृह फायनान्स तक्रारकर्त्याकडे 12,00,000/- कर्ज परतफेडीची मागणी करीत आहे.
- तक्रारकर्ते पुढे असे सांगतात की संपूर्ण रक्कम मिळूनही विरुध्द पक्ष क्रं.2 ने सदनिकेचे बांधकाम 3 वर्षे लोटूनही पुर्ण केले नाही व अद्यापही सदर इमारत ही अर्धवट बांधलेली असून राहण्यायोग्य नाही कारण तेथे अद्यापही इलेक्ट्रीकची कामे, पेंन्टींगचे कामे व इतर बरीच कामे अर्धवट पडून आहेत. विरुध्द पक्ष क्रं.2 ने सदनिकेचे बांधकाम वेळेत पूर्ण न केल्याने तक्रारकर्त्यास विनाकारण आर्थिक भार पडत आहे. तक्रारकर्त्यास घेतलेल्या गृहकर्जाचे रुपये 13,005/- कर्जाचे परतफेडीचा भारही सोसावा लागत आहे. विरुध्द पक्ष क्रं.2 यांना वारंवार विनंती करुनही सदनिकेचे बांधकाम वेळेत पुर्ण केले नाही व विक्रीपत्र करुन नोदवून दिले नाही म्हणुन तक्रारकर्त्याने दिनांक 7/4/2012 रोजी विरुध्द पक्ष क्रं. 2 यांना कायदेशिर नोटीस दिली. परंतु विरुध्द पक्षाने नोटीसला उत्तर दिले नाही. म्हणुन तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करुन मौंजा-खास,.नं.38, तह.नागपूर (ग्रामीण) येथील खसरा नं.93/8, 93/9, व 95 मधील भुखंड क्रं.6-अ, चंद्रकला अपार्टमेंन्ट मधे तळमजल्यावरील सदनिका क्रं.जी-001, ज्याचे चटई क्षेत्रफळ 51.19 चौ.मी. बांधीव क्षेत्रफळ 64.43 चौ.मी. सुपर बिल्ट अप क्षेत्रफळ 76.08 चौ.मी.चे नोंदणीकृत खरेदी खत करुन ताबा द्यावा. सदनिकेचा मोबदला रक्कम स्वीकारुनही विक्रीपत्र करुन दिले नाही म्हणुन विरुध्द पक्ष क्रं.2 ने एप्रिल 2010 पासून तक्रार दाखल करेपर्यत रुपये 5000/- नुकसान भरपाई द्यावी अशा मागण्या केल्या आहेत.
- तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत 13 दस्तऐवज दाखल केले आहेत. त्यात विक्रीकराराची पावती,विक्रीचा करारनामा, कायदेशिर नोटीस, छायाचित्र,गृहफायनान्स लि.ने दिलेले 2008-2009 व 2010 -2011 चे विवरण,गृह फायनान्सने तक्रारकर्त्यास दिलेली नोटीस,इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
- यात विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 2 यांना मंचातर्फे नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन विरुध्द पक्ष क्रं.1 मंचामसमक्ष हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला परंतु विरुध्द पक्ष क्रं.2 नोटीस मिळूनही तक्रारीत हजर झाले नाही व आपला बचाव केला नाही म्हणुन प्रकरण त्यांचेविरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 9/2/2015 रोजी पारित करण्यात आला.
- विरुध्द पक्ष क्रं.1 आपले लेखी जवाबात विरुध्द पक्ष क्रं.2 बरोबर भुखंड विकासाचा व विक्रीचा करार झाल्याची बाब मान्य करतात व तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्रं.2 यांचे मधे झालेल्या व्यवहारातील कोणती रक्कम घेतली नाही तसेच सदर करारावर केवळ जमिन मालक म्हणुन स्वाक्षरी केली आहे. तक्रारकर्त्याचे कायदेशिर नोटीसला उत्तर देऊन तक्रारकर्त्यास विक्रीपत्र करुन देण्यास तयार असल्याचे कबुल केले परंतु तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्रं.2 यांचे मधील बांधकाम कराराबाबत व रक्कम देवाण घेवाण बाबत जबाबदार राहणार नाही असे नमुद केले. तसेच नुकसान भरपाई व विरुध्द पक्ष क्रं.2 यांना दिलेल्या रक्कम व त्यावरील व्याज देण्यास जबाबदार नाही. विरुध्द पक्ष क्रं.1 ने तक्रारकर्त्यास कोणतीही सेवा दिली नाही. त्यामुळे सेवेत त्रुटी असल्याचे कारण नाही. करिता सदर तक्रार विरुध्द पक्ष क्रं.1 विरुध्द खारीज करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
- तक्रारीत दाखल कागदपत्र, तक्रारकर्त्याचे प्रतिउत्तर लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे देण्यात येतो.
- तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्रं.2 यांचेमधे सदनिका विक्रीचा करारनामा झाला हे दाखल दस्तऐवजांवरुन सिध्द होते. विरुध्द पक्ष क्रं.2 चे “ चंद्रकला अपार्टमेंन्ट ” नावाने इमारत बाधुन त्यातील जी—001 ही सदनिका घेण्याचे निश्चित केले होते त्याकरिता तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं.2 यांना विक्री करारात नमुद केल्याप्रमाणे वेळोवेळी असे 9,00,000/- दिल्याचे नमुद केले आहे. सदर सदनिकेचे खरेदी करिता तक्रारकर्त्याने गृह फायनान्स या कंपनीकडुन रुपये 12,00,000/- कर्ज घेतले होते.ती कर्ज रक्कम दिनांक 19/7/2010 पर्यत वेळोवेळी विरुध्द पक्ष क्रं.2 यांना बांधकामाचे पोटी देण्यात आली परंतु रक्कम स्विकारुनही विरुध्द पक्ष क्रं.2 ने सदनिकेचे बांधकाम पुर्ण केले नाही व विक्रीपत्र करुन दिले नाही. सदर ईमारतीचे बांधकाम अजुनही अर्धवट स्थीतीत असुन राहण्यायोग्य नाही. सदनिका खरेदी पोटी तक्रारकर्त्याने घेतलेले कर्ज परतफेडीची रक्कम दिनांक 23/9/2011 शिल्लक असल्याचे गृह फायनान्स कंपनीचे पत्रावरुन स्पष्ट होते.
- विरुध्द पक्ष क्रं.1 जे जमिनीचे मालक आहे. त्यांनी आपल्या लेखी जवाबात तक्रारकर्त्यास त्यांचे सदनिकेचे विक्रीपत्र करुन देण्यात तयार असल्याचे नमुद केले आहे व तोंडी युक्तीवादाचे वेळी देखिल त्यानी तक्रारकर्त्यास विक्रीपत्र करुन देऊन ताबा देण्यास तयार असल्याचे सांगीतले.
- वरील सर्व परिस्थीतीवरुन हे स्पष्ट होते की तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांचेमधे सदनिका विक्रीचा करार झाला होता परंतु विरुध्द पक्ष क्रं.2 यांनी मोबदला रक्कम स्विकारुनही सदनिकेचे विक्रीपत्र करुन दिले नाही व बांधकाम पुर्ण करुन ताबा दिला नाही व आजही बांधकाम अपूर्ण स्थितीत पडून आहे. ही विरुध्द पक्ष क्रं.2 चे सेवेतील त्रुटी आहे हे स्पष्ट होते करिता हे मंच पूढील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- अं ती म आ दे श - 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. विरुध्द पक्ष क्रं.1 ने तक्रारकर्त्यास मौंजा-खास,.नं.38, तह.नागपूर (ग्रामीण) येथील खसरा नं.93/8,93/9, व 95 मधील भुखंड क्रं.6-अ, चंद्रकला अपार्टमेंन्ट मधील तळमजल्यावरील सदनिका क्रं.जी-001, ज्याचे चटई क्षेत्रफळ 51.19 चौ.मी. बांधीव क्षेत्रफळ 64.43 चौ.मी. सुपर बिल्ट अप क्षेत्रफळ 76.08 चौ.मी. अपूर्ण स्थितीत असलेल्या सदनिकेचे ताबा द्यावा. 3. विरुध्द पक्ष क्रं.2 सदनिकेचे अपूर्ण राहिलेले बांधकाम त्वरीत पूर्ण करावे. 4. सदनिकेचे बांधकाम पुर्ण झाल्यावर विरुध्द पक्ष 1 व 2 ने तक्रारकर्त्यास विक्रीपत्र करुन नोंदवून द्यावे. 5. विरुध्द पक्ष क्रं.2 ने मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 5,000/-(रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 3,000/-(रुपये तीन हजार फक्त) असे एकुण 8,000/- रुपये तक्रारकर्त्यास अदा करावे. 6. सदर आदेशाचे पालन विरुध्द पक्ष विरुध्द क्रं.1 व 2 ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे. 7. आदेशाच्या प्रती उभयपक्षकरांना नि:शुल्क पाठविण्यात याव्या. | |