जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : १५८/२०२०. तक्रार दाखल दिनांक : १८/०९/२०२०. तक्रार आदेश दिनांक : २६/०३/२०२१. कालावधी: ०१ वर्षे ०६ महिने ०८ दिवस
समाधान शिवाजी नन्नवरे, वय ४५ वर्षे,
व्यवसाय : मजुरी, रा. वाशी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(१) कार्यकारी संचालक, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि.,
मुख्य कार्यालय, उस्मानाबाद.
(२) शाखाधिकारी, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि.,
शाखा : वाशी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- (१) श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
(२) श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
(३) श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ :- एस.डी. माने
विरुध्द पक्ष यांचेतर्फे प्रतिनिधी
आदेश
१. उभय पक्षांनी दि.१७/२/२०२१ रोजी केलेल्या तडजोडपत्राचे अवलोकन केले असता विरुध्द पक्ष यांनी पूर्तता करण्याची अंतीम तारीख दि.१७/६/२०२३ आहे. तडजोडपत्रामध्ये नमूद केल्यानुसार दि.१७/३/२०२१ ते १७/६/२०२३ या कालावधीमध्ये तक्रारकर्ता यांच्या बचत खाते क्र.९४६२ मधील रकमेचे प्रतिहप्ता रु.६५,०००/- याप्रमाणे एकूण १० हप्त्यांमध्ये विरुध्द पक्ष यांनी रक्कम अदा करावयाची आहे.
२. अभिलेखावर दाखल तडजोडपत्राचे अवलोकन केले असता उभय पक्षांमध्ये परस्पर समन्वयाने तडजोड झालेली आहे. असे दिसते की, उभयतांनी अटीदर्शक तडजोडपत्र तयार केलेले आहे आणि तडजोडपत्रावर तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांची स्वाक्षरी आहे.
३. आज दि.२६/३/२०२१ रोजी विरुध्द पक्ष यांनी लेखी अर्जाद्वारे विनंती केली की, त्यांनी तक्रारकर्ता यांना १ हप्ता दिलेला आहे आणि ग्राहक तक्रार निकाली काढावी. त्यापृष्ठयर्थ त्यांनी खाते उतारा दाखल केला आहे.
४. सद्यस्थितीमध्ये तक्रारकर्ता यांना ९ हप्ते अदेय आहे. त्यामुळे तडजोडपत्रानुसार विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना उर्वरीत रक्कम अदा न केल्यास त्या-त्या देय तारखेपासून द.सा.द.शे. ९ टक्के व्याज दराने रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र राहतील, अशा निर्देशासह ग्राहक तक्रार निकाली काढणे न्यायोचित आहे. अंतिमत: खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) उभय पक्षांतील तडजोडपत्रास अधीन राहून ग्राहक तक्रार निकाली काढण्यात येते.
(2) उभय पक्षांतील तडजोडपत्रानुसार विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रक्कम अदा न केल्यास संबंधीत देय असणारी रक्कम त्या-त्या देय तारखेपासून द.सा.द.शे. ९ टक्के व्याज दराने अदा करावी.
(श्री. किशोर द. वडणे)
(श्री. मुकुंद भ. सस्ते) अध्यक्ष (श्री. शशांक श. क्षीरसागर)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
-oo-