जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 108/2024. आदेश दिनांक : 03/05/2024.
अनुराधा गणेश थेटे, वय 35 वर्षे, व्यवसाय : घरकाम,
रा. सिध्देश्वर हौसिंग सोसायटी, कालिकादेवी मंदिराच्या
मागे, जुना औसा रोड, लातूर. :- तक्रारकर्ती
विरुध्द
(1) कार्यकारी अभियंता, म.रा. विद्युत वितरण कंपनी, साळे गल्ली, लातूर.
(2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता, म. रा. विद्युत वितरण कंपनी,
उपविभाग, औसा रोड, लातूर.
(3) उषाबाई दिगंबर थेटे, वय 65 वर्षे, व्यवसाय : घरकाम,
रा. सिध्देश्वर हौसिंग सोसायटी, कालिकादेवी मंदिराच्या
मागे, जुना औसा रोड, लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- बी. एच. ननवरे
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांच्याकरिता विधिज्ञांचा प्रकरण दाखलपूर्व युक्तिवाद ऐकला. ग्राहक तक्रार व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले.
(2) सकृतदर्शनी, तक्रारकर्ती ह्या विरुध्द पक्ष यांच्याकडून प्रतिफल देऊन विद्युत सेवा घेत असल्याचे सिध्द होत नाही. ग्राहक संरक्ष अधिनियम, 2019 चे कलम 7 अन्वये तक्रारकर्ती ह्या 'ग्राहक' संज्ञेत येत नसल्यामुळे ग्राहक तक्रार दाखलपूर्व टप्प्यावर रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-