Maharashtra

Ahmednagar

MA/19/25

देवीदास भानुदास बर्गे - Complainant(s)

Versus

कार्यकारी अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी लि. - Opp.Party(s)

देठे एम. बी.

26 Nov 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Miscellaneous Application No. MA/19/25
( Date of Filing : 02 Jul 2019 )
In
Complaint Case No. CC/19/201
 
1. देवीदास भानुदास बर्गे
रा.रेणुकानगर, महादेव मंदिराशेजारी, बोल्‍हेगांव, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. कार्यकारी अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी लि.
अहमदनगर शाखा सावेडी विभाग, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Appellant:देठे एम. बी., Advocate
For the Respondent: Adv.Arvind Kakani, Advocate
Dated : 26 Nov 2019
Final Order / Judgement

निशाणी क्रं.१ वरील आदेश

निकाल दिनांक – २६/११/२०१९

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.    तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याविरूध्‍द सदर किरकोळ अर्ज तक्रारदाराचा विद्युत पुरवठा खंडीत करू नये याकरीता सदर किरकोळ अर्ज दाखल केला आहे. त्‍यावर सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात आली. निशाणी ७ वर दिनांक     २५-०७-२०१९ रोजी वादातील देयकाची ३५ टक्‍के रक्‍कम सामनेवालेकडे भरावी, सामनेवालेने तक्रारदाराचा विद्युत पुरवठा खंडीत करून नये, असा आदेश पारीत केलेला आहे. तक्रारदाराने सामनेवालेकडे आदेशाप्रमाणे ३५ टक्‍के वादातील देयकाची रक्‍कम भरणा केलेली आहे. सामनेवालेतर्फे सदर अर्जावर जबाब दाखल करण्‍यात आला व त्‍यात असे नमुद करण्‍यात आले की, तक्रारदार यांना मिटरचे रिडींगप्रमाणे योग्‍य देयक देण्‍यात आले आहे, त्‍यात कोणतीही त्रुटी दिलेली नाही. यासंदर्भात सामनेवालेने सी.पी.एल.ची प्रती सादर केली आहे.

३.   उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकुण मंचाच्‍या असे निदर्शनास आले की, तक्रारदाराने तक्रारीत मांडलेले तथ्‍थे तसेच सामनेवाले यांनी घेतलेला बचाव सिध्‍द करणेसाठी पुराव्‍याची आवश्‍यकता आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.  

आ दे श

१)  दिनांक २५-०७-२०१९ रोजी निशाणी ७ वरील अर्जावर पारीत केलेला आदेशामधील वादातील देयकाची अतिरीक्‍त ५ टक्‍के रक्‍कम तक्रारदाराने सामनेवालेकडे भरणा करावी. याप्रमाणे एकुण ४० टक्‍के वादातील देयकाची रक्‍कम सामनेवालेकडे भरणा करावी.

२)  सामनेवालेने वादातील देयकाची ४० टक्‍के रक्‍कम तक्रारदाराने भरल्‍यानंतर  तक्रार निकाली होईपर्यंत तक्रारदाराचा विद्युत पुरवठा खंडीत करू नये.

३)   तक्रारदाराने नियमीत देयकांचा रक्‍कम सामनेवालेकडे भरावी.

४)  सदर आदेशाची पुर्तता तक्रारदाराने ३० दिवसांच्‍या आत करावी.

५)  सदर आदेश तक्रारीचा निर्णय होईपर्यंत कायम राहील.

४)  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

५)  तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.