(आदेश पारीत व्दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी- मा.अध्यक्ष )
1. तक्रारकर्ता यांनी सामनेवालाकडून विद्युत पुरवठा घेतला असून तक्रारकर्ताला दिनांक 19.10.2018 रोजी अचानकपणे सामनेवालाकडून 4603 इतके प्रचंड युनिटचे विज वापर दर्शवून रक्कम रुपये 32,210/- चे देयक देण्यात आले. सदर देयक विज वापरापेक्षा जास्त पाठविले असल्याने सामनेवालाने तक्रारकर्ताप्रति अनुचित व्यवहार प्रथेचा अवलंबना केलेली आहे असे तक्रारकर्तातर्फे सामनेवाला विरुध्द सदर अर्जात तक्रार करण्यात आली आहे. सदरचे विज देयक चुकीचे आहे. सामनेवालाने संबंधीत अधिकारी यांना दिनांक 19.11.2018 ला समक्ष चौकशी करुन व चुकीचे तक्रारकर्ताला बिल पाठविण्यात आले तसेच तक्रारकर्ताचे विज पुरवठा खंडीत करण्याची शक्यता असल्याने सदर अर्ज तक्रारकर्ताने दाखल केलेला आहे.
2. तक्रारकर्ताने सदर अर्जात अशी विनंती केलेली आहे की, सामनेवालाने तक्रारकर्ताचा विज पुरवठा तक्रार निकाली होईपावेतो खंडीत करु नये अशी विनंती केलेली आहे.
3. सामनेवालाने कैफियतीसोबत सदर अर्जावर जबाब दाखल केलेला आहे. सामनेवालाने त्यांचे जबाबात असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताला विज देयक सरासरी विज युनिट प्रमाणे देण्यात आले होते. जेव्हा प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली तेंव्हा तक्रारकर्ताचे मिटर रिडींग 4603 युनिट इतके विज वापर तक्रारकर्ताने केलेला आहे असे आढळून आले. सामनेवालाने तक्रारकर्ताला रक्कम रु.1650/- चे स्लॅब बेनिफीट देऊन योग्य देयक दिलेले आहे. तसेच सदर अर्ज सुनावणीपर्यंत सामनेवालाने तक्रारकर्ताचा विज पुरवठा खंडीत केलेला नाही.
4. उभय पक्षकारांचा सदर अर्जावर तोंडी युक्तीवाद ऐकला. मंचाचे असे निदर्शनास आले की, तक्रारकर्ताला दिनांक 19.10.2018 रोजी सामनेवाला तर्फे देण्यात आलेले देयक हे योग्य आहे किंवा चुकीचे आहे ही बाब निर्णीत करण्यास पुराव्याची आवश्यकता आहे. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारकर्ताचा प्रस्तूतचा एम.ए.अर्ज क्र.11/2018 अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. तक्रारकर्ताने सामनेवालाकडून आलेले वादातील विद्युत देयकाचे रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम सामनेवालाकडे भरणा करावी. तक्रारकर्तानी सदर रक्कम सामनेवालाकडे भरल्यानंतर सामनेवाला यांनी प्रस्तुत तक्रार निकाली होईपावेतो तक्रारकर्ताचा विज पुरवठा खंडीत करु नये.
3. तक्रारकर्ताने सामनेवालाकडून आलेली विद्युत देयकाच्या रकमा सामनेवालाकडे नियमित भरणा करावी.
4. प्रस्तूतचा आदेश मुळ तक्रार निकाली होईपर्यंत लागू राहील.
5. उभय पक्षकार यांना या आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क देण्यात यावी.
6. सदर आदेश आज रोजी डायसवर पारीत करण्यात आला.