Complaint Case No. CC/11/232 |
| | 1. श्री.प्रशांत प्रदीप शेटटे | बी/501,चंद्रभागा दर्शन,सीएचएस,पारसिक रोड, खारेगांव,कळवा,ठाणे-400605 | ठाणे | महाराष्ट्र |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. कस्टमर गेव्हेन्स केरिअर्स एअरकंडीशनिग आणि रेफ्रीजेशन लि., | विनय भव्य कॉम्प्लेक्स, 159, सीएसटी रोड,कल्याण,सातांक्रुज (ईस्ट),मुंबई-400098. | मुंबई | महाराष्ट्र | 2. अर्थमेटीक कुलींग सुल्युशन | शॉप नं.3 व4, ठाक्केर होऊस, कास्टेल मिल जवळ, ठाणे-400605. | ठाणे | महाराष्ट्र |
| ............Opp.Party(s) |
|
|
ORDER | Dated the 18 Jun 2015 न्यायनिर्णय (द्वारा सौ. माधुरी एस. विश्वरुपे- मा. सदस्या) - तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 1 कॅरीअर कंपनीचे उत्पादीत केलेला 1 टन क्षमतेचा एअर कंडीशन (AC) कंपनीचे अधिकृत विक्रेते सामनेवाले क्र. 2 यांचेकडून दि. 01/04/2010 रोजी रु. 22,350/- एवढी रक्कम देऊन विकत घेतला. दि. 11/06/2010 पासून एअर कंडीशनरमध्ये cooling problem सुरु झाला. तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 2 यांचेकडे यासंदर्भात तक्रार केली असता त्यांचे टेक्निशियन यांनी मशिनची तपासणी केली. मशिनमध्ये गॅस लिकेज असल्याचे सांगून दुरुस्ती केली. त्यानंतर पुन्हा वेळोवेळी ऑक्टोबर, 2010 पर्यंत मशिनमध्ये cooling problem येत होता. टेक्निशियन येऊन दुरुस्ती करुन दिली अशी माहिती देत होते. परंतु प्रत्यक्षात मशिन दुरुस्त झाली नाही. तक्रारदारांनी नोव्हेंबर 10 ते मार्च 11 पर्यंत हिवाळा असल्यामुळे मशिनचा वापर केला नाही. परंतु मार्च 2011 मध्ये एअर कंडीशन वापरण्यास सुरुवात केला असता व्यवस्थित चालू होत नव्हता. त्यामुळे सामनेवाले क्र. 1 यांचेकडे तक्रार दाखल केली. सामनेवाले क्र. 1 यांचे प्रतिनिधी श्री. हंसल यांनी मशिनची तपासणी केली व मशिन दुरुस्तीसाठी घेऊन गेले. हंसल यांनी दि. 8/3/2011 रोजी सदर मशिनमध्ये “Compressor Problem” असल्यामुळे replace करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तक्रारदारांनी मशिनची दुरुस्ती होऊ शकत नसल्यामुळे मशिन बदलून देण्याची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी अमान्य केले अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
- सामनेवाले क्र. 1 यांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांचे मशिन डिलेव्हरी देतांना व बसविण्याचे (Installation) वेळी व्यवस्थित चालू होते. तक्रारदारांना सदर मशिनकरीता खरेदी केल्यापासून एक वर्षांचा वॉरंटी कालावधी दिला आहे. तसेच कॉम्प्रेसरचा वॉरंटी कालावधी 5 वर्षांचा आहे. पंरतु वॉरंटीमध्ये गॅस, ऑईल, टोनर समाविष्ट नाही.
- तक्रारदारांनी जून, 2010, जुलै 2010 व ऑगस्ट, 2010 मध्ये मशिनमध्ये Cooling problem असल्याबाबत तक्रार केली होती. गॅस लिकेजचा problem असल्यामुळे त्यावेळी दुरुस्ती केली होती. त्यानंतर मार्च, 2011 मध्ये मशिनमध्ये Compressor problem असल्यामुळे सदर पार्ट बदलणे आवश्यक होते. परंतु तक्रारदारांनी पूर्ण मशिन बदलून देण्याची मागणी केली. सामनेवाले क्र. 1, वॉरंटीमधील अटी व शर्तीनुसार मशिनचा नादुरुस्त झालेला पार्ट ‘compressor’ बदलून देण्यास तयार आहेत.
-
- सामनेवाले क्र. 2 यांना पाठविलेली नोटीस प्राप्त होऊनही लेखी कैफियत दाखल केलेली नसल्यामुळे दि. 21/12/2015 रोजी तक्रार त्यांचे लेखी कैफियतीशिवाय पुढे चालविण्याबाबत आदेश पारीत झाला आहे. तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, सामनेवाले क्र. 1 यांची लेखी कैफियत, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद यांचे सखोल वाचन केले.
- तक्रारदारांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाले क्र. 1 यांनी लेखी युक्तीवाद हाच तोंडी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दाखल केली.
- तक्रारीतील कागदपत्रे व तोंडी युक्तीवाद यावरुन खालील मुद्दे स्पष्ट होतातः
- सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांना सदोष (defective) मशिनची विक्री करुन त्रुटीची सेवा दिल्याची बाब तक्रारदारांनी सिध्द केली आहे का? - होय
- तक्रारदारांनी मशिनची किंमत रु. 22,350/- (Refund) परत देण्याची अथवा मशिन बदलून (Replacement) देण्याची सामनेवाले क्र. 1 यांची जबाबदारी आहे का? - होय
क. अंतिम आदेश? - निकालानुसार - कारणमिमांसाः
- तक्रारदारांनी लेखी युक्तीवादामध्ये नमूद केल्याप्रमाणे एअर कंडीशनर मशिनमध्ये जून, 2011 पासून म्हणजेच मशिन खरेदी केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच ‘गॅस लिकेज’ प्रॉब्लेम चालू झाला व सातत्याने चालू आहे. सामनेवाले क्र. 1 यांना सदर प्रॉब्लेम solve करणे अदयापपर्यंत शक्य झाले नाही, अखेर शेवटी मशिनच्या कॉम्प्रेसरमध्ये problem असल्यामुळे सामनेवाले क्र. 1 फक्त कॉम्प्रेसर बदलून देण्यास तयार आहेत. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार मशिनमध्ये नेमका काय fault आहे याबाबत सामनेवाले क्र. 1 यांचे टेक्निशियन यांना निश्चित झालेले नाही.
- तक्रारदारांचे एअर कंडीशन मशिनमध्ये विकत घेतल्यानंतर केवळ दोन महिन्यांतच गॅस लिकेज प्रॉब्लेम झाला. मशिनद्वारे कुलींग व्यवस्थित न मिळाल्यामुळे तक्रारदारांना खूप त्रास झाला व होत आहे. तक्रारदारांची मशिन वॉरंटी कालावधीत तीनवेळा नादुरुस्त झाल्याचे व सामनेवाले क्र. 1 यांनी वेळोवेळी दुरुस्त करुन दिल्याबाबत सामनेवाले क्र. 1 यांनी लेखी कैफियतीमध्ये नमूद केले आहे. तसेच कॉम्प्रेसर प्रॉब्लेमही वॉरंटी कालावधीत (खरेदी केल्यानंतर 1 वर्षाचे आंत) झाला असल्याची बाब त्यांना मान्य व कबूल आहे.
- सामनेवाले क्र. 1 यांचे महणण्यानुसार सामनेवाले क्र. 1 कॉम्प्रेसर बदलून देण्यास तयार आहेत. तक्रारदारांच्या मशिनमध्ये उत्पादकीय दोष असल्याबाबतचा पुरावा (expert opinion) दाखल नाही. त्यामुळे तक्रारदारांना मशिन (Replacement) बदलून देण्याची अथवा मशिनची किंमत (Refund) परत देण्याची सामनेवाले यांचेवर जबाबदारी येत नाही. यासंदर्भात सामनेवाले क्र. 1 यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा Maruti Udyog Ltd. Vs. Susheel Kumar & Others, AIR 2006 SC 1586 दाखल केला आहे. प्रस्तुत तक्रारीत नमूद केलेली परिस्थिती वरील न्यायनिवाडयामध्ये नमूद केल्याप्रमाणे नसल्यामुळे वरील न्यायनिवाडा प्रस्तुत प्रकरणात लागू होत नाही.
- तक्रारीतील दाखल कागदपत्रांनुसार तक्रारदारांचे मशिन खरेदी केल्यानंतर केवळ दोन महिन्यांतच तीन वेळा नादुरुस्त झाले व त्यानंतर सातत्याने नादुरुस्त होत असल्याचे स्पष्ट होते. तसेच सामनेवाले क्र. 1 यांचे टेक्निशियन यांना मशिनची दुरुस्ती करणे शक्य झाले नाही. वॉरंटी कालावधीत मशिनमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याची बाब सामनेवाले क्र. 1 यांना मान्य आहे. त्याप्रमाणे त्यांनी तक्रारदारांना वेळोवेळी मशिन दुरुस्त करुन दिली आहे, सामनेवाले ‘कॉम्प्रेसर’ हा मशिनचा पार्ट बदलून (replace) देण्यास तयार आहेत. सबब तक्रारदारांच्या एअर कंडीशनर मशिनमध्ये ‘उत्पादकीय दोष्’ असल्याचे स्पष्ट होते असे मंचाला वाटते. सबब 5 अ चे उत्तर होकारार्थी देत आहेत.
प्रस्तुत प्रकरणातील दाखल पुराव्यावरुन वादग्रस्त मशिनमध्ये ‘उत्पादकीय दोष’ असल्याची बाब स्पष्ट होत असल्यामुळे तक्रारदारांना ‘तज्ञ अहवाल’ दाखल करण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांना मशिनविकत घेतल्यापासून व्यवस्थितपणे उपयोग झाला नाही. सदर मशिन उन्हाळयामध्ये Cooling होण्यासाठी घेतलेली असून सदर कारणाकरीता मशिनचा उपयोग झाला नाही. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु. 10,000/-, तक्रारीचा खर्च रु. 10,000/- देणे योग्य आहे असे मंचाचे मत आहे. - सामनेवाले क्र. 1 ही उत्पादकीय कंपनी आहे तसेच सदर मशिनमध्ये ‘उत्पादकीय दोष’ (Manufacturing defect) असल्याची बाब स्पष्ट झाल्यामुळे तक्रारदारांची एअर कंडीशन मशिन बदलून देणे (Replacement) अथवा मशिनची किंमत परत देण्याची जबाबदारी सामनेवाले क्र. 1 ची आहे असे मंचाचे मत आहे. सबब 5 ब चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
-
- मा. सर्वोच्च न्यायालयाचा खालील न्यायनिवाडा प्रस्तुत प्रकरणात लागू होता असे मंचाचे मत आहे.
- Indochem Electronic Vs. Add. Collector of Customs
(2006) 3 SCC 721 “It was also held that in the light of specific power conferred u/s 14 (1)( c) of C.P. Act, damage equivalent to price of goods could be awarded, despite the provision of Sec. 12(3) A the sale A Goods Act, 1930, as the provisions of the C.P. Act, 1986 are in addition to and not in derogation of any other provision of law. सबब खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतोः आ दे श - तक्रार क्र. 232/2011 अंशतः मंजूर करण्यात येते.
- सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांना सदोष एअर कंडीशन मशिनची विक्री करुन त्रुटीची सेवा दिली असे जाहिर करण्यात येते.
- सामनेवाले क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की तक्रारदारांना एअर कंडीशन मशिन बदलून जुन्या मशिनच्या किंमतीचे नविन मशिन दि. 03/08/2015 पर्यंत दयावे. तसे न केल्यास तक्रारदारांना नविन मशिन देईपर्यंत दि. 04/08/2015 पासून पुढील प्रत्येक महिन्यास रु. 10,000/- रक्कम सामनेवाले यांनी दयावी.
- अथवा
- सामनेवाले क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की तक्रारदारांना एअर कंडीशन मशिनची किंमत रु. 22,350/- दि. 01/04/2010 पासून 6% व्याजदराने दि. 03/08/2015 पर्यंत दयावी. तसे न केल्यास दि. 04/08/2015 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत 9% व्याजासह दयावी.
- तक्रारदारांना आदेश देण्यात येतो की, सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांना नविन मशिन आदेश क्र. 3 मध्ये नमूद केल्यानुसार बदलून दिल्यानंतर तक्रारदारांनी जुनी मशिन तात्काळ सामनेवाले क्र. 1 यांना परत दयावी अथवा सामनेवाले क्र. 1 यांनी मशिनची संपूर्ण किंमत आदेश क्र. 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारांना अदा केल्यानंतर तात्काळ सामनेवाले क्र. 1 यांना जुनी मशिन परत दयावी.
- सामनेवाले क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु. 10,000/-, तक्रारीचा खर्च रु. 10,000/-45 दिवसांत म्हणजेच दि. 03/08/2015 पर्यंत दयावी. विहीत मुदतीत सदर रक्कम न दिल्यास दि. 04/08/2015 पासून 9% व्याजदराने रक्कम दयावी.
- सामनेवाले क्र. 2 यांचेविरुध्द तक्रार खारीज करण्यात येते.
- आदेशाची पूर्तता झाली अथवा न झालेबाबतचे शपथपत्र 45 दिवसांत म्हणजेच दि. 03/08/2014 रोजी दाखल करावे.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात.
- संचिकेच्या अतिरिक्त प्रती तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.
| |