Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/13/24

बॅ.शेषराव वानखेडे शेतकरी सह. सुतगिरणी मोहगाव - Complainant(s)

Versus

ओरीएंटल इन्श्‍युरन्‍स कंपनी लिमीटेड - Opp.Party(s)

28 Mar 2014

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/13/24
 
1. बॅ.शेषराव वानखेडे शेतकरी सह. सुतगिरणी मोहगाव
बुटीबोरी
...........Complainant(s)
Versus
1. ओरीएंटल इन्श्‍युरन्‍स कंपनी लिमीटेड
2. विभागीय व्‍यवस्‍थापक ओरिएन्‍टल इन्‍शुरंन्‍स कंपनी लिमीटेड
ऑफिस- 1 ए.डी. कॉम्‍प्‍लेक्‍स पहिला माळा,सदर,नागपूर-01
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Manohar G.Chilbule PRESIDENT
 HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्‍य )

(पारीत दिनांक28 मार्च,2014)

 

1.    प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खाली तक्रारदार बॅरिस्‍टर शेषराव वानखेडे शेतकरी सहकारी सुत गिरणी तर्फे व्‍यवस्‍थापकीय संचालक यांनी  विमा योजने अंतर्गत विरुध्‍दपक्षा कडून विमा दावा रक्‍कम  मिळणेसाठी दाखल केली आहे.

2.    तक्रारदार संस्‍थेचे कथन थोडक्‍यात येणे प्रमाणे-

       

       तक्रारदार ही एक महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम-1860 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्‍था आहे. सदर सहकारी संस्‍था ही सहकारी तत्‍वावर मालाचे उत्‍पादन करते. कुठल्‍याही नफ्याचे व व्‍यापारी फायद्दाचे उद्देशाने संस्‍था स्‍थापन झालेली नाही. तक्रारदार संस्‍थेने दि.23.12.2011 रोजी, विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून दि.24.12.2011 ते 23.12.2012 या कालावधीसाठी आगीचे धोक्‍या पासून संस्‍थेची मालमत्‍ता सुरक्षित राहावी म्‍हणून  स्‍टॅन्‍डर्ड फायर स्‍पेशल पेरील पॉलिसी ही विमा पॉलिसी काढली होती व विम्‍याचे हप्‍त्‍यापोटी वि.प.विमा कंपनीकडे रुपये-3,11,708/- भरले होते. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने आगीपासून संरक्षणा करीता रुपये-47,10,00,000/- ची जोखीम स्विकारली होती. सदर पॉलिसीचा क्रमांक-181100/11/2012/688 असा होता. सदर पॉलिसी ही एक वर्ष कालावधी करीता काढण्‍यात आली होती. पॉलिसीमध्‍ये संगणक साहित्‍य, कारखान्‍यातील यंत्रे, ईमारत, स्‍थापित इलेक्ट्रिक उपकरणे इत्‍यादीची जोखीम स्विकारण्‍यात आली होती.

        तक्रारदार संस्‍थेने पुढे असे नमुद केले की, दि.25.01.2012 चे मध्‍यरात्री 12.00 ते 12.30 चे दरम्‍यान कारखान्‍याचे आवारात अचानक आग लागली व त्‍यामुळे तक्रारदार संस्‍थेचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. आगीमुळे कारखान्‍यातील  कापसापोटी रुपये-6,19,554/- तसेच आवारातील विद्दुत तार व फीटींगचे (Electric Cables) रुपये-14,09,998/- नुकसान झाले आणि त्‍याच प्रमाणे तक्रारदार संस्‍थेचे रुपये-3780/- चे आग नष्‍ठकाचे (Fire Extinguishers) नुकसान असे मिळून एकूण रुपये-20,33,332/- नुकसान           झाले सदर रकमे मधून एकूण अवमुल्‍यनाची रक्‍कम रुपये-5,60,141/- वजा


 

 

जाता विमा दावा रक्‍कम रुपये-14,73,191/- येते व तेवढया रकमेची मागणी तक्रारदार संस्‍था करीत आहे.  तक्रारदार संस्‍थेने त्‍वरीत विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस आगीची घटना कळविली. त्‍यानुसार विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे सर्व्‍हेअर श्री बी.के.चांडक यांनी दि.26.01.2012 रोजी घटनास्‍थळास भेट देऊन निरिक्षण केले आणि झालेले नुकसान हे विमा पॉलिसीच्‍या वगळलेल्‍या पोट कलमा अंतर्गत येते, त्‍यात विमा कंपनीची जबाबदारी नाही असे सांगून तक्रारदार संस्‍थेस कागदपत्रे विमा कंपनीचे कार्यालयात जमा करण्‍यास सांगितले. तक्रारदार संस्‍थेने दि.18.02.2012 रोजी संदर्भीत कागदपत्रे वि.प.विमा कंपनीचे कार्यालयात दाखल केलीत. परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने तक्रारदार संस्‍थेचा विमा दावा पहिल्‍यांदा दि.04.04.2012 रोजीचे पत्राव्‍दारे तारामध्‍ये झालेल्‍या शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्‍या आगीत नुकसान झाल्‍यामुळे विमा क्‍लेम नाकारला.  तक्रारदार सहकारी संस्‍थेचे असे म्‍हणणे आहे की, कोणताही ठोस पुरावा नसताना विरुध्‍दपक्षाने तक्रारदार संस्‍थेचा विमा दावा नाकारला. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची विमा दावा नाकारण्‍याची कृती ही अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब आणि दोषपूर्ण सेवा आहे.

        म्‍हणून तक्रारदार संस्‍थेने प्रस्‍तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली असून त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचे दि.24.04.2012 आणि 24.05.2012 पत्राव्‍दारे तक्रारदार संस्‍थेचा विमा दावा नाकारण्‍याची कृती बेकायदेशीर असल्‍याचे घोषीत करावे. वि.प.विमा कंपनीने, तक्रारदार संस्‍थेस विमा दाव्‍या प्रित्‍यर्थ रुपये-14,73,191/- एवढी नुकसान भरपाई आणि सदर रकमेवर या अर्जाचे तारखे पासून ते पूर्ण रक्‍कमेचे भुगतान होई पर्यंत                द.सा.द.शे.18% दराने व्‍याज यासह रक्‍कम देण्‍याची आदेशित व्‍हावे. तसेच आर्थिक, मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-5,00,000/- विरुध्‍दपक्षा कडून मिळावे अशा मागण्‍या केल्‍यात.

 

                                                      

03.    विरुध्‍दपक्ष क्रं-1  व 2 विमा कंपनी तर्फे  मंचा समक्ष  एकत्रित प्रतिज्ञालेखावरील उत्‍तर सादर करण्‍यात आले. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्‍तरामध्‍ये तक्रारदार संस्‍थेनी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडून “Standard Fire & Special Perils Policy” पॉलिसी एकूण रुपये-47,10,000/- काढली असून तिचा क्रमांक-181100/11/2013/699 असा आहे. पॉलिसीचा कालावधी दि.24.12.2011 ते 23.12.2012 असा असून तक्रारदार संस्‍थेनी

 

 

विमा पॉलिसीचे प्रिमिअमपोटी रुपये-3,11,708/- भरल्‍याची बाब मान्‍य केली. पॉलिसी नुसार  खालील  विवरणा नुसार बाब निहाय जोखीम स्विकारण्‍यात आली-

अक्रं

बाब

स्विकारलेली जोखीम रुपयामध्‍ये

1

संगणक, संगणक साहित्‍य व प्रिंटर (Computer & Computer equipment Printer etc.)

10,00,000/-

2

कारखाना, संयत्रे व यंत्राचे भाग (Plant & Machinery/Accessories)

33,00,00,000/-

3

ट्रॉली, क्रेटस, रॅक्‍स आणि बिन्‍स (Trolley, Crates, Racks & Bins)

15,00,000/-

4

ईमारत     (Buildings)

10,50,00,000/-

5

विजेची स्‍थापित उपकरणे (Electrical Installations)

3,20,00,000/-

6

कार्यालयीन उपकरणे (Office equipments)

10,00,000/-

7

टुल्‍स आणि जिग्‍स (Tools & Jigs)

5,00,000/-

 

एकूण

47,10,00,000/-

 

 

      विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने पुढे असे नमुद केले की, विमा पॉलिसीचा क्रमांक-181100/11/2012/699 असा असून पॉलिसीचा कालावधी दि.24.12.2011 ते 23.12.2012 असा आहे. आगीमुळे तक्रारदार संस्‍थेचे कापसाचे (Cotton) रुपये-6,19,554/-, इलेक्ट्रिक केबलचे रुपये-14,09,998/- असे नुकसान आणि अग्‍नीशामकाचे (Fire Extinguishers) रुपये-3780/- झाल्‍याची बाब अमान्‍य आहे. तक्रारदार संस्‍थेच्‍या तक्रारी नुसार सदरचे नुकसान हे रुपये-20.00 लक्षाचे वर असल्‍यामुळे जिल्‍हा मंचास या प्रकरणी आर्थिक अधिकारक्षेत्र येत नाही. पॉलिसीचे अटी व शर्ती प्रमाणे स्विकारलेल्‍या जोखीमे अंतर्गत नुकसान भरपाई देय आहे काय हा महत्‍वाचा भाग आहे. तक्रारदार संस्‍थेने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस आगीची घटना घडल्‍या नंतर कळविल्‍या नंतर त्‍यांनी त्‍वरीत श्री के.बी.चांडक सर्व्‍हेअर यांची नियुक्‍ती केली, त्‍यानुसार श्री के.बी.चांडक यांनी घटनास्‍थळी भेट देऊन तपासणी केली व त्‍यांचा सर्व्‍हे अहवाल विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीकडे सादर केला. सर्व्‍हेअर यांचे अहवाला नुसार तक्रारदार संस्‍थेस लागलेल्‍या आगीतील नुकसानीची भरपाई ही पॉलिसीचे “Exclusion Clause” अनुसार देय नाही.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडून सर्व्‍हेअर यांनी सर्व्‍हे अहवाल दिल्‍याची बाब संपूर्णपणे नाकारण्‍यात येते. पॉलिसीचे अटी व शर्तीतील (A) General Exclusions (पेज क्रं 23 आणि 48) प्रमाणे-

      “Loss, destruction or damage to any electrical machine, apparatus, fixture or fitting arising from or occasioned by overrunning,


 

 

excessive pressure, short circuiting, arcing, self heating or leakage of electricity from whatsoever cause (Lightning included) provided that this exclusion shall apply only to the particular electrical machine, apparatus, fixture or fitting so affected and not to other machines, apparatus, fixtures or fitting which may be destroyed or damaged by fire so get up.”

 

उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे सर्व्‍हेअर श्री चांडक यांनी दिलेला सर्व्‍हे अहवाल हा योग्‍य असल्‍याचे दिसून येते. सर्व्‍हेअर श्री के.बी.चांडक यांचा अहवाल सादर करण्‍यात येतो. सर्व्‍हेअर श्री के.बी. चांडक यांनी तपासणीचे वेळी तक्रारदार संस्‍थेचे प्रॉडक्‍शन मॅनेजर श्री प्रसाद यांना नुकसान झालेले सुत (Yarn) दाखविण्‍यास सांगितले असता त्‍यांना ते दाखविता आले नाही यावरुन आगीमुळे तक्रारदार संस्‍थेचे कोणत्‍याही सुताचे नुकसान झाले नसल्‍याची बाब सिध्‍द होते. पॉलिसीचे एक्‍सक्‍ल्‍युझन क्‍लॉज अनुसार ईलेक्‍ट्रीक साहित्‍याची झालेली नुकसानी देय नाही परंतु विमाधारकाचे सततचे तगादयामुळे सर्व्‍हेअर यांनी सदर नुकसानी अहवालामध्‍ये नमुद केली. सर्व्‍हेअर यांचे अहवाला नुसार झालेल्‍या नुकसानीची रक्‍कम रुपये-1,11,963/- एवढी आहे आणि ती योग्‍य आहे परंतु पॉलिसीचे एक्‍सक्‍ल्‍युझन क्‍लॉज अनुसार सदरची नुकसानी सुध्‍दा तक्रारदार संस्‍थेस देय नाही. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारदार संस्‍थेस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने सर्व्‍हेअर यांचे अहवाला नुसार आणि पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार तक्रारदार संस्‍थेचा विमा दावा दि.24.05.2012 चे पत्र पाठवून त्‍याव्‍दारे नाकारलेला आहे आणि त्‍यामध्‍ये पॉलिसीचे एक्‍सक्‍ल्‍युझन क्‍लॉज अनुसार विमा दावा देय नसल्‍याचे नमुद केले.

विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने पुढे असे नमुद केले की, तक्रारदार संस्‍थेने जो विमा दावा सादर केला त्‍यामध्‍ये अग्‍नीशामका बद्दल रुपये-3780/- ची मागणी केली आणि तक्रारदार संस्‍थेने दि.18.02.2012 रोजी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस पाठविलेल्‍या पत्रात सदर आग ही पी.डी.बी.एरिया मध्‍ये लागली होती परंतु अग्‍नीशामक दलाला बोलाविण्‍यात आले नव्‍हते असे नमुद केले आहे. ईलेक्ट्रिक साहित्‍या संबधीचा विमा दावा रुपये-10,35,723/- हा पॉलिसीचे एक्‍सक्‍ल्‍युझन क्‍लॉज अनुसार देय नाही. तसेच सुताचे (Yarn) नुकसानी संबधी रुपये-4,33,688/- चा केलेला विमा दावा देय नाही कारण कथीत सुताचे नुकसानी झाल्‍या संबधी क्षतीग्रस्‍त सुत (Yarn) तक्रारदार संस्‍था दाखवू शकली नाही. तक्रारदार संस्‍थेचा विमा दावा देय नसल्‍याने तक्रार खारीज व्‍हावी, अशी विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनी तर्फे करण्‍यात आली.

 

 

 

 

 

04    तक्रारदार संस्‍थने दस्‍तऐवज यादी नुसार अर्जदार संस्‍थेन वि.प.विमा कंपनीकडे विमा दाव्‍या संबधी दाखल केलेले दि.18.02.20121 रोजीचे पत्र, तक्रारदार संस्‍थेने वि.प.विमा कंपनीस पाठविलेली दि.04.05.2012 रोजीची कायदेशीर नोटीस, पोच पावती, वि.प.विमा कंपनीने त.क.चे नोटीसला दि.24.05.2012 रोजी दिलेले उत्‍तर, विमा पॉलिसीचे शेडयुल, ठराव क्रं 7 दि.30.07.2012, ठराव क्रं-11 दि.21/23.07.2012 अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती सादर केल्‍यात. तसेच तक्रारदार संस्‍थेने शपथपत्र दाखल केले व लेखी युक्‍तीवाद सादर केला.

 

 

05.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तरा सोबत सर्व्‍हेअर श्री के.बी.चांडक यांचा दि.27.02.2012 रोजीचा सर्व्‍हे अहवाल सादर केला व सर्व्‍हेअर श्री के.बी.चांडक यांचे शपथपत्र सादर केले व लेखी युक्‍तीवाद सादर केला.

 

 

06.   प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार संस्‍थे तर्फे वकील श्री पी.डी.मेघे  यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

 

07.   तक्रारदार आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी यांचे परस्‍पर विरोधी कथना वरुन खालील मुद्दे मंचाचे विचारार्थ घेण्‍यात आले.

 

           मुद्दा                                 उत्‍तर

 (1)   वि.प.क्रं 1 विमा कंपनीने,

       तक्रारदाराचा विमा दावा नामंजूर

       करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे काय?...................नाही.

 (2)   काय आदेश ?...................................................तक्रार खारीज.

 

 

 

::  कारण मिमांसा व निष्‍कर्ष    ::

मुद्दा क्रं-1 व 2-

 

08.    तक्रारदार संस्‍थेचे म्‍हणण्‍या नुसार, तक्रारदार संस्‍थेनी विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून दि.24.12.2011 ते 23.12.2012 या कालावधीसाठी आगीचे


 

 

धोक्‍या पासून सुरक्षितता म्‍हणून स्‍टॅन्‍डर्ड फायर स्‍पेशल पेरील पॉलिसी काढली होती. सदर पॉलिसीचा क्रमांक-181100/11/2012/688 असा होता. पॉलिसीमध्‍ये संगणक साहित्‍य, कारखान्‍यातील यंत्रे, ईमारत, स्‍थापित इलेक्ट्रिक उपकरणे इत्‍यादीची जोखीम स्विकारण्‍यात आली होती. तक्रारदार संस्‍थेचे म्‍हणण्‍या नुसार  दि.25.01.2012 चे मध्‍यरात्री 12.00 ते 12.30 चे दरम्‍यान कारखान्‍याचे आवारात अचानक आग लागली व त्‍यामुळे तक्रारदार संस्‍थेचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. आगीमुळे कारखान्‍यातील  कापसापोटी   रुपये-6,19,554/- तसेच आवारातील विद्दुत तार व फीटींगचे (Electric Cables) रुपये-14,09,998/- नुकसान झाले आणि त्‍याच प्रमाणे तक्रारदार संस्‍थेचे  रुपये-3780/- चे आग नष्‍ठकाचे (Fire Extinguishers) नुकसान असे मिळून एकूण रुपये-20,33,332/- नुकसान झाले सदर रकमे मधून एकूण अवमुल्‍यनाची रक्‍कम रुपये-5,60,141/- वजा जाता विमा दावा रक्‍कम           रुपये-14,73,191/- मिळण्‍यास पात्र आहे. परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने तक्रारदार संस्‍थेचा विमा दावा पहिल्‍यांदा दि.04.04.2012 रोजीचे पत्राव्‍दारे तारामध्‍ये झालेल्‍या शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्‍या आगीत नुकसान झाल्‍यामुळे विमा क्‍लेम नाकारला. तक्रारदार सहकारी संस्‍थेचे असे म्‍हणणे आहे की, कोणताही ठोस पुरावा नसताना विरुध्‍दपक्षाने तक्रारदार संस्‍थेचा विमा दावा नाकारला. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची विमा दावा नाकारण्‍याची कृती ही अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब आणि दोषपूर्ण सेवा आहे.

 

09.     या उलट, विरुध्‍दपक्ष क्रं-1  व 2 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा नुसार  तक्रारदार संस्‍थेनी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडून “Standard Fire & Special Perils Policy” पॉलिसी एकूण रुपये-47,10,000/- काढली असून तिचा क्रमांक-181100/11/2013/699  तसेच पॉलिसीचा कालावधी दि.24.12.2011 ते 23.12.2012 या बाबी मान्‍य केल्‍यात. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे म्‍हणण्‍या नुसार विमा पॉलिसी नुसार  खालील  प्रमाणे बा‍ब निहाय जोखीम स्विकारण्‍यात आली होती-

अक्रं

बाब

स्विकारलेली जोखीम रुपयामध्‍ये

1

संगणक, संगणक साहित्‍य व प्रिंटर (Computer & Computer equipment Printer etc.)

10,00,000/-

2

कारखाना, संयत्रे व यंत्राचे भाग (Plant & Machinery/Accessories)

33,00,00,000/-

3

ट्रॉली, क्रेटस, रॅक्‍स आणि बिन्‍स (Trolley, Crates, Racks & Bins)

15,00,000/-

4

ईमारत     (Buildings)

10,50,00,000/-

5

विजेची स्‍थापित उपकरणे (Electrical Installations)

3,20,00,000/-

 

 

 

6

कार्यालयीन उपकरणे (Office equipments)

10,00,000/-

7

टुल्‍स आणि जिग्‍स (Tools & Jigs)

5,00,000/-

 

एकूण

47,10,00,000/-

 

 

10.    विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने आगीमुळे तक्रारदार संस्‍थेचे कापसाचे (Cotton) रुपये-6,19,554/-, इलेक्ट्रिक केबलचे रुपये-14,09,998/-  आणि अग्‍नीशामकाचे (Fire Extinguishers) रुपये-3780/- झाल्‍याची बाब अमान्‍य केली. तक्रारदार संस्‍थेने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस आगीची घटना घडल्‍या नंतर कळविल्‍या नंतर त्‍यांनी त्‍वरीत श्री के.बी.चांडक सर्व्‍हेअर यांची नियुक्‍ती केली, त्‍यानुसार श्री के.बी.चांडक यांनी घटनास्‍थळी पाहणी करुन त्‍यांचा सर्व्‍हे अहवाल विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीकडे सादर केला. सर्व्‍हेअर यांचे अहवाला नुसार तक्रारदार संस्‍थेस लागलेल्‍या आगीतील नुकसानीची भरपाई ही पॉलिसीचे “Exclusion Clause” अनुसार देय नाही.  पॉलिसीचे अटी व शर्तीतील (A) General Exclusions (पेज क्रं 23 आणि 48) प्रमाणे-

           “Loss, destruction or damage to any electrical machine, apparatus, fixture or fitting arising from or occasioned by overrunning,

excessive pressure, short circuiting, arcing, self heating or leakage of electricity from whatsoever cause (Lightning included) provided that this exclusion shall apply only to the particular electrical machine, apparatus, fixture or fitting so affected and not to other machines, apparatus, fixtures or fitting which may be destroyed or damaged by fire so get up.”

  सर्व्‍हेअर यांचे अहवाला नुसार झालेल्‍या नुकसानीची रक्‍कम                 रुपये-1,11,963/- एवढी आहे आणि ती योग्‍य आहे परंतु पॉलिसीचे एक्‍सक्‍ल्‍युझन क्‍लॉज अनुसार सदरची नुकसानी सुध्‍दा तक्रारदार संस्‍थेस देय नाही. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारदार संस्‍थेस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने सर्व्‍हेअर यांचे अहवाला नुसार आणि पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार तक्रारदार संस्‍थेचा विमा दावा दि.24.05.2012 चे पत्र पाठवून त्‍याव्‍दारे नाकारलेला आहे आणि त्‍यामध्‍ये पॉलिसीचे एक्‍सक्‍ल्‍युझन क्‍लॉज अनुसार विमा दावा देय नसल्‍याचे नमुद केले.

 

11.     मंचाचे मते, तक्रारदार संस्‍थेने आपले तक्रारीत नेमकी आग कशामुळे लागली या बद्दल कुठेही स्‍पष्‍ट खुलासा केलेला नाही. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे म्‍हणण्‍या प्रमाणे त्‍यांनी श्री के.बी.चांडक यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नियुक्‍ती केली होती व त्‍यांचे दि.27.02.2012 रोजीचे सर्व्‍हे अहवालामध्‍ये तक्रारदार संस्‍थे मध्‍ये दि.25 जानेवारी, 2012 रोजी दुपारी 12.00 वाजता संस्‍थेच्‍या पी.डी.बी.


 

रुम मध्‍ये शॉट सर्कीटमुळे केबल जळाल्‍याने सदरची आग लागली. सर्व्‍हेअर यांचे अहवालात खालील बाब नमुद आहे-

               “During my visits of survey, I have inspected the PDB Room and collected information about fire.  In the room Electrical Power Panels are installed and the cables from these panels were damaged due to bursting of cables due to short circuit in some cable.  No other loss was visible and was shown to me at the time of my visit for survey”.

         तसेच सर्व्‍हेअर श्री चांडक यांनी त्‍यांचे सर्व्‍हे अहवालामध्‍ये सदर घटनास्‍थळी लागलेली आग ही पॉलिसचे अटी व शर्ती नुसार देय नसल्‍याचे बाबत खालील प्रमाणे नमुद केले-

       “After inspection and discussions, I am also of the opinion that the Fire in cables was due to short circuit in cables.  The fire was in electrical cables by short circuit in cables and loss in electrical machines, apparatus, fixture or fitting arising due to short circuit or arcing is under exclusions of the policy and hence the loss is not within the scope of policy”.

       प्रकरणातील उपलब्‍ध पुराव्‍या वरुन मंचाचे असे निदर्शनास येते की, संदर्भीत आग ही शॉटसर्कीट मुळे लागलेली असल्‍यामुळे विमा पॉलिसीचे अटी व शर्तीतील “Exclusion Clause” अनुसार तक्रारदार संस्‍थेस विमा दावा रक्‍कम देय नाही. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारदार संस्‍थेचा विमा दावा नाकारुन सेवेत न्‍युनता दिली असे म्‍हणता येणार नाही म्‍हणून मुद्दा क्रं-1 नकारार्थी नोंदविलेला आहे.त्‍यामुळे प्रकरणातील अन्‍य कोणत्‍याही विवादीत मुद्दयानां स्‍पर्श न करता, सदर तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे म्‍हणून मुद्दा क्रं-2 चे उत्‍तर त्‍यानुसार नोंदविलेले आहे. वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                                             

           

                   ::आदेश::

1)    तक्रारदार संस्‍थेची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनी विरुध्‍द

      खारीज करण्‍यातयेते.

2)    खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.

3)    निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय  पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

      देण्‍यात यावी.

             

 

 

 
 
[HON'ABLE MR. Manohar G.Chilbule]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.