Maharashtra

Nagpur

CC/12/415

लता अल्‍लक पाटील, - Complainant(s)

Versus

ओरीएंटल इंशुरंस कंपनी मर्यादित, - Opp.Party(s)

अभयकुमार जाधव

02 Nov 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/12/415
 
1. लता अल्‍लक पाटील,
घार्ण्‍ीकी, ता. मंगळवेढा, जि.सोलापूर
सोलापूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. ओरीएंटल इंशुरंस कंपनी मर्यादित,
मॅनेजर एस.व्‍ही.महाजन, प्‍लॉट क्र. 8, हिंदुस्‍थान कॉलनी, अजनी चौक, वर्धा रोड, नागपूर 440 015
नागपूर
महाराष्‍ट्र
2. ओरीएंटल इंशूरंस कंपनी मर्यादित,
शुक्‍ला भवन, वेस्‍ट हायकोर्ट रोड, धरमपेठ, नागपूर 440 010
नागपूर
महाराष्‍ट्र
3. काबल इंशूरंस कंपनी मयौदित,
118, बी मित्‍तल टॉवर, 11 वा मजला, नरीमन पाईंट, मुंबई
4. महाराष्‍ट्र सरकार, कृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍सव्‍यवसाय विभाग,
मंत्रालय विस्‍तार, मुंबई - 400 032.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE PRESIDENT
 HON'ABLE MS. GEETA BADWAIK MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

श्रीमती गीता बडवाईक, सदस्‍या यांच्‍या आदेशाप्रमाणे.
 
-आदेश-
(02.11.2012)
1.           तक्रारकर्तीने सदर तक्रार शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विम्‍याची रक्‍कम मिळण्‍याकरीता दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीच्‍या वकिलांचा तक्रार दाखल करुन घेण्‍याच्‍या मुद्यावर युक्‍तीवाद ऐकला. तक्रारकर्तीची तक्रार व दाखल केलेले दस्‍तऐवज यांचे अवलोकन केले असता ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्ती ही रा. घार्णीकी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर येथील राहिवासी आहे. तक्रारकर्तीच्‍या पतीचा दि.28.09.2007 रोजी खुन झाला असे तक्रारकर्तीने तक्रारीत नमूद केले आहे. परंतू सदर खुन कोठे झाला, तक्रारकर्तीचे शेत कोणत्‍या ठिकाणी आहे, तसेच कोणत्‍या तहसिलदारांकडे तक्रारकर्तीचा विमा दावा अर्ज आणि इतर कागदपत्रे जमा केली याबाबत तक्रारीत कुठेही उल्‍लेख नाही. दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्तीच्‍या पतीची शेती मौजा घार्णीकी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर येथे गट क्र. 364 ही आहे व तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या मृत्‍युची नोंद ही पोलिस स्‍टेशन मंगळवेढा, जि. सोलापूर येथे करण्‍यात आलेली आहे.
2.          तक्रारकर्तीने शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना शासन निर्णयाची प्रत दाखल केलेली आहे. ज्‍यामध्‍ये स्‍पष्‍टपणे नमूद केले आहे की, घरातील कर्त्‍या व्‍यक्‍तीस झालेल्‍या अपघातामुळे कुटुंबाचे उत्‍पन्‍नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्‍थीती निर्माण होत असल्‍याने अशा अपघातग्रस्‍त शेतक-यास/त्‍यांच्‍या कुटुंबास आर्थिक लाभ देण्‍यासाठी कोणतीही स्‍वतंत्र विमा योजना नसल्‍याने सदर योजना शासनाने कार्यान्‍वीत केलेली आहे. यामध्‍ये शासन निर्णयामध्‍ये प्रामुख्‍याने नमूद केले आहे की, राज्‍यातील महसुल विभागाकडील नोंदीप्रमाणे 12 ते 75 वयोगटातील शेतकरी यांचे वतीने शासन त्‍यांच्‍या व्‍यक्‍तीगत अपघात व अपंगत्‍व यासाठी प्रस्‍तुत शासन निर्णयाद्वारे विमा पॉलिसी उतरवित आहे. यामध्‍ये विमा कंपनीची नावे आणि त्‍या‍ विमा कंपनीला सोपविण्‍यात आलेले कार्यक्षेत्र हे नमूद केलेले आहे. तक्रारकर्तीची शेती ही मौजा घार्णीकी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर येथे आहे. तसेच तिथल्‍याच तहसिलदाराकडे तक्रारकर्तीने विमा दावा प्रपत्र दाखल केले असे तक्रारकर्ती आपल्‍या तक्रारीत नमूद करते. शासन निर्णयानुसार तक्रारकर्तीने तिचे शेत ज्‍या कार्यक्षेत्रात येते, त्‍या कार्यक्षेत्रातील संबंधित अधिका-याकडे म्‍हणजेच तालुका निरीक्षक व तहसिलदार यांचेकडे विमा दावा दाखल केलेला आहे. त्‍यामुळे सदर तक्रार नागपूर मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही. करीता तक्रारकर्तीची तक्रार तिला परत करण्‍यात येते. तक्रारकर्ती योग्‍य त्‍या मंचासमोर दाद मागण्‍यास मुक्‍त आहे. करीता खालीलप्रमाणे आदेश.
 
-आदेश-
      तक्रारकर्तीची तक्रार तिला परत करण्‍यात येत आहे. तक्रारकर्ती योग्‍य त्‍या मंचासमोर दाद मागण्‍यास मुक्‍त आहे. खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.         
 
 
 
[HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MS. GEETA BADWAIK]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.