Maharashtra

Osmanabad

CC/18/188

सोनाली पंडित सातपुते - Complainant(s)

Versus

ओरिअन्तल इन्शुरन्स कं.लि. - Opp.Party(s)

श्री अजय डी. भीसे

28 Jun 2021

ORDER

DISTRICT CONSUMER REDRESSAL FORUM OSMANABAD
Aria of Collector Office Osmanabad
 
Complaint Case No. CC/18/188
( Date of Filing : 20 Jun 2018 )
 
1. सोनाली पंडित सातपुते
रा. घाटपीपरी ता.वाशी जी. उस्मानाबाद
उस्मानाबाद
महाराष्ट्र
...........Complainant(s)
Versus
1. ओरिअन्तल इन्शुरन्स कं.लि.
३२/ए/२ ओस्वाल बंधू समाज बिल्डींग जे.एन .रोड हॉटेल सेव्हन लव्ज समोर पुणे ४११०८२
पुणे
महाराष्ट्र
2. जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि.
२रा मजला जायका बिल्डींग सिव्हील लाईन नागपूर
नागपूर
महाराष्ट्र
3. तालुका कृषी अधिकारी वाशी
कार्यालय वाशी ता. वाशी जी.उस्मानाबाद
उस्मानाबाद
महाराष्ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. किशोर द. वडणे PRESIDENT
 HON'BLE MR. मुकुंद भ. सस्‍ते MEMBER
 HON'BLE MR. शशांक श. क्षीरसागर MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 28 Jun 2021
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : १८८/२०१८.                  तक्रार दाखल दिनांक : २०/०६/२०१८.

                                                                                    तक्रार निर्णय दिनांक : २८/०६/२०२१.

                                                                                    कालावधी : ०३  वर्षे ०० महिने ०८ दिवस

 

सोनाली पंडीत सातपुते, वय : २४ वर्षे, व्यवसाय : घरकाम,

रा. घाटपिंपरी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद.                                                                       तक्रारकर्ती

 

                        विरुध्द

 

(१) ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि., ३२१/ए/२, ओसवाल बंधू समाज बिल्डींग

      जे.एन. रोड, हॉटेल सेवन लव्हज् समोर, पुणे – ४११ ०४२.

(२) जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि., दुसरा मजला, जायका बिल्डींग,

     कमर्शियल रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४० ००१.

(३) तालुका कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय,

      वाशी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद.                                                                             विरुध्द पक्ष

 

 

गणपूर्ती :          मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष

                                    मा. श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य

                                    मा. श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य

 

 

तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- अजय दिलीपराव भिसे

विरुध्द पक्ष क्र.१ यांचेकरिता विधिज्ञ :- पी.वाय. जाधव

विरुध्द पक्ष क्र.३ स्वत:

 

 

आदेश

 

मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष यांचे द्वारा :-

 

(१)        तक्रारकर्ती यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, त्या मयत पंडीत विठ्ठल सातपुते (यापुढे “मयत पंडीत”) यांच्या पत्नी आहेत. मयत पंडीत यांचे नांवे मौजे घाटपिंपरी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद येथे गट क्र.१२७/अ, क्षेत्र ० हे. ४० आर., गट क्र.१२७/ब, क्षेत्र ० हे. १५ आर., गट क्र.१२७/क, क्षेत्र ० हे. २५ आर., गट क्र.१३८/अ, क्षेत्र ० हे. २६ आर., गट क्र.१३८/ब, क्षेत्र ० हे. ०६ आर., गट क्र.१३८/क, क्षेत्र ० हे. ०५ आर., गट क्र.१४१/अ, क्षेत्र ० हे. २० आर. व गट क्र.१४१/क, क्षेत्र ० हे. ०५ आर.    शेतजमिनी आहेत. दि.३/१०/२०१७ रोजी मयत पंडीत हे त्यांच्या मालकीच्या महिंद्रा अर्जून अल्ट्रा १-५५५ डी.आय. ट्रॅक्टरने शेतामध्ये पाळी घालत असताना लोखंडी फास तुटला आणि तो वेल्डींग केल्यानंतर ईट येथून परत येत असताना ट्रॅक्टर हेड पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये ते मृत्यू पावले. अपघाताबाबत पोलीस ठाणे, वाशी येथे गु.र. नं. ४३/२०१७ दि.३/१०/२०१७ रोजी नोंदविला आहे. मयत पंडीत हे शेतकरी असल्यामुळे व त्यांचा अपघाती मृत्यू असल्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत रु.२,००,०००/- रक्कम मिळण्याकरिता दि.२७/१२/२०१७ रोजी विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. परंतु विरुध्द पक्ष क्र.३ यांनी दि.२७/३/२०१८ रोजीच्या पत्रानुसार मृताकडे ट्रॅक्टर चालविण्याचा वैध परवाना नाही, या कारणास्तव विमा प्रस्ताव नाकारला. विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने तक्रारकर्ती यांनी मयत पंडीत यांच्या विम्याची रक्कम रु.२,००,०००/- तक्रार दाखल तारखेपासून ९ टक्के व्याज दराने देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.१०,०००/- देण्याचा व रु.५,०००/- तक्रार खर्च देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.

 

(2)       विरुध्द पक्ष क्र.१ यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. त्‍यांनी ग्राहक तक्रारीतील कथने चुक असल्‍यामुळे अमान्‍य केलेली आहेत. त्‍यांचे पुढे कथन आहे की, तक्रारकर्ती यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याकरिता प्रस्ताव दाखल केला होता. अपघात हा ट्रॅक्टर चालविताना झाला आणि अपघातसमयी मयत व्यक्तीकडे ट्रॅक्टर चालविण्‍याचा वैध परवाना नसल्‍यामुळे दि.२७/३/२०१८ रोजीच्‍या पत्रान्‍वये विमा दावा नामंजूर केला आहे. याबाबत विमा करारातील अट क्रमांक V VI-(A)(5) मध्‍ये नमूद केलेल्‍या अटीनुसार विमा नुकसान भरपाई अर्ज करतेवेळी मयत किंवा जखमी झालेल्‍या शेतक-याचा वाहन चालविण्‍याचा परवाना अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. तसेच विमा करारातील अट VI-A-2 मध्‍ये नमूद केल्‍यानुसार मोटार वाहन चालविणारे शेतकरी यांच्‍याकडे जर मोटार वाहन चालविण्‍याचा वैध परवाना नसेल तर अशा मयत झालेल्‍या   शेतक-यांच्‍या वारसांना किंवा जखमी शेतक-याला विमा रक्‍कम मिळणार नाही, अशी तरतूद आहे. तक्रारकर्ती यांचा विमा दावा योग्यरित्या नामंजूर करण्‍यात आलेला आहे. विरुध्द पक्ष क्र.१ यांनी सेवेमध्‍ये त्रुटी निर्माण केलेली नाही. अंतिमत: तक्रारकर्ती यांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्‍यात यावी, अशी विनंती विमा कंपनीने केलेली आहे.

           

(३)        विरुध्द पक्ष क्र.२ यांना जिल्हा आयोगाच्या सूचनापत्राची बचावणी झालेली आहे. उचित संधी प्राप्त होऊनही ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत आणि लेखी निवेदन दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत करण्यात आले.   

 

(४)       विरुध्द पक्ष क्र.३ यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. तक्रारकर्ती यांनी दि.२७/१२/२०१७ रोजी त्यांच्या कार्यालयाकडे विमा प्रस्ताव दाखल केला आणि तो प्रस्ताव दि.२८/१२/२०१७ रोजी जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्‍याकडे दाखल केला,असे त्यांनी निवेदन केले आहे.

 

(५)       तक्रारकर्ती यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे लेखी निवेदन, उभय पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता; तसेच उभय पक्षातर्फे विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्‍यानंतर तक्रारीमध्‍ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

                        मुद्दे                                                                       उत्‍तरे

 

१. विमा कंपनीने तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर करुन

   सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे सिध्‍द होते काय ?                                                           नाही.   

२. तक्रारकर्ती विमा रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत काय ?                                    नाही.

३. काय आदेश ?                                                                                   अंतिम आदेशाप्रमाणे.

 

कारणमीमांसा

 

(६)       मुद्दा क्र. 1 व 2 :- गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेसंबंधी कृषि आयुक्‍त, विरुध्द पक्ष क्र.१ व विरुध्द पक्ष क्र.२ यांच्‍यामध्‍ये झालेले करारपत्र अभिलेखावर दाखल आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेनुसार राज्‍यातील शेतक-यांना विरुध्द पक्ष क्र.१ यांनी अपघाती विमा संरक्षण दिल्‍याबाबत उभय पक्षांमध्‍ये वाद नाही. मयत पंडीत यांचे नांवे घाटपिंपरी, ता. वाशी, जि. उस्‍मानाबाद येथे शेतजमीन असल्‍याचे दर्शविणारा ७/१२ व ८-अ उतारा अभिलेखावर दाखल आहेत. यावरुन मयत पंडीत हे शेतकरी होते, ही बाब स्‍पष्‍ट होते. तसेच अभिलेखावर दाखल एफ.आय.आर., घटनास्‍थळ पंचनामा, मरनोत्‍तर पंचनामा इ. पोलीस कागदपत्रे व शवचिकित्‍सा अहवालाचे अवलोकन केले असता मयत पंडीत यांचा वाहन अपघातामुळे मृत्‍यू झाल्‍याचे निदर्शनास येते. मयत पंडीत यांच्‍या मृत्‍यूनंतर तक्रारकर्ती यांनी रितसर विमा दावा दाखल केला असता दि.२७/३/२०१८ रोजीच्‍या पत्राद्वारे अपघात हा ट्रॅक्टर चालवताना झालेला आहे व मृतकाकडे ट्रॅक्टर चालविण्‍याच्‍या वैध परवाना नाही, असे कारण देऊन विमा दावा रद्द केल्‍याचे निदर्शनास येते.

 

(७)       विरुध्द पक्ष क्र.१ यांचेतर्फे विधिज्ञांनी युक्तिवाद केला की, मयत पंडीत यांच्‍याकडे ट्रॅक्टर चालविण्‍याचा वैध परवाना नव्‍हता; जो की करारातील अटी व शर्तीनुसार बंधनकारक आहे आणि त्‍यामुळे तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर केला आहे. उलटपक्षी तक्रारकर्ती यांचेतर्फे विधिज्ञांनी असा युक्तिवाद केला की, मयत पंडीत हे शेतकरी होते आणि वाहन अपघातामध्‍ये त्‍यांचा मृत्‍यू झालेला असल्‍यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत रु.2,00,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ती पात्र आहेत.

 

(८)       कृषि आयुक्‍त, विरुध्द पक्ष क्र.१ व विरुध्द पक्ष क्र.२ यांच्‍यामध्‍ये दि.२ डिसेंबर, २०१६ रोजी झालेल्‍या करारपत्रातील कलम क्र.६ खालीलप्रमाणे आहे.

           

(VI)     Other documents required for specific kinds of accidents :

            (A)       Road Accident/Railway Accident :

                        i)          First Information Report (F.I.R.)

                        ii)         Spot Panchnama

                        iii)        Inquest Panchnama   

                        iv)        Post Mortem Report

                        v)         Valid Driving Licence

 

            Considering the motor vehicle facilities in the area in which the farmers are staying, claims arising due to some accidents as stated in (1) to (3) below will be considered as payable in case the documents stated above are submitted.

 

1.         Accidents occurring due to carrying of passenger in excess of the capacity of vehicle.

            All farmers except the one who is driving should be eligible for the claim.

2.         Accidents occurring where the driver does not have a driving license.

All farmers except the one who is driving should be eligible for the claim.

            3.         Accidents occurring where ...........

 

(९)       उपरोक्‍त तरतुदीनुसार वाहन चालविण्‍याचा परवाना नसताना अपघात घडल्‍यास वाहन चालविणा-या चालक (Driver) शेतक-याव्‍यतिरिक्‍त इतर शेतकरी दाव्‍याकरिता पात्र असल्‍याचे स्‍पष्‍ट करण्‍यात आलेले आहे.

 

(10)     तक्रारकर्ती यांचेतर्फे विधिज्ञांनी मा. बॉम्‍बे उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपिठाने लताबाई रावसाहेब देशमुख /विरुध्‍द/ महाराष्‍ट्र शासन व इतर-४’, रिट पिटीशन नं.१०१८५/२०१५, निर्णय दि.६/३/२०१९ व मा. राज्य आयोग, महाराष्ट्र यांच्या प्रथम अपिल क्र.१००९/२००७ “आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि. /विरुध्द/ सिंधुबाई खंडेराव खैरनार”, निर्णय दि. ७/१/२००८ या निवाड्यांचा आधार घेतला आहे.

 

            लताबाई रावसाहेब देशमुख /विरुध्‍द/ महाराष्‍ट्र शासन व इतर-4या न्यायनिर्णयाचे अवलोकन केले असता वाहन चालविण्याच्या परवान्याची मुदत संपुष्टात आलेली होती आणि त्याचे नुतनीकरण करण्यात आलेले नव्हते. तसेच मयतास अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात झालेला होता आणि मयताचा दोष आढळून आलेला नव्हता. परंतु प्रस्तुत प्रकरणाच्या वस्तुस्थितीनुसार मयत पंडीत याच्याकडे ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना होता, असे तक्रारकर्ती यांचे कथन नाही. तसेच मयत पंडीत हे स्वत: ट्रॅक्टर चालवत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातामुळे मृत्यू पावले आहेत. अशा स्थितीमध्‍ये तक्रारकर्ती यांचेतर्फे दाखल करण्‍यात आलेल्‍या लताबाई रावसाहेब देशमुख /विरुध्‍द/ महाराष्‍ट्र शासन व इतर-4 या मा. उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचा अत्युच्च आदर ठेवून तो प्रस्तुत प्रकरणामध्ये लागू होत नाही, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.

 

तसेच “आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि. /विरुध्द/ सिंधुबाई खंडेराव खैरनार” हा न्यायनिर्णय पाहता त्यामध्ये सन २००५ च्या शेतकरी अपघात विमा पॉलिसीचा उल्लेख आहे. तथापि प्रस्तुत प्रकरणामध्‍ये सन २०१७ मध्ये अपघाती घटना घडलेली आहे. विमा करार व त्यातील तरतुदी ह्या भिन्न असल्यामुळे तो न्यायनिर्णय येथे लागू पडणार नाही, असे आम्ही नमूद करतो.

 

(11)     विरुध्द पक्ष क्र.१ तर्फे अभिलेखावर मा. राज्‍य आयोग, महाराष्‍ट्र यांच्‍या औरंगाबाद परिक्रमा पिठाने दी न्‍यू इंडिया अश्‍युरन्‍स कं.लि. /विरुध्‍द/ श्रीमती अलका अच्‍युत टेळे व इतर-3, प्रथम अपील क्र.151/2015 मध्‍ये दि.27/6/2016 रोजी पारीत न्यायनिर्णय दाखल केला आहे. मयताकडे वाहन चालविण्‍याचा विशिष्‍ट परवाना नव्‍हता आणि विमाधारकाने पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचे उल्‍लंघन केल्‍यामुळे विमा कंपनीने विमा दावा योग्‍य नाकारला, असे प्रतिपादन प्रस्‍तुत न्यायनिर्णयामध्‍ये केले आहे. निश्चितच सदर न्यायनिर्णयातील तत्व प्रस्तुत प्रकरणामध्ये लागू पडते. 

 

            तसेच विरुध्द पक्ष क्र.१ यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि. /विरुध्द/ झहारुलनिशा’, २००८ ए.सी.जे. १९२८ या न्यायनिर्णयाचा संदर्भ दाखल केला आहे. मोटार अपघात दावा अर्जामध्ये झालेल्या निवाडयाच्या अनुषंगाने न्यायनिर्णय झालेला असल्यामुळे त्यातील न्यायिक प्रमाण प्रस्तुत निवाडयामध्ये विचारात घेता येणार नाही.

 

(12)     या ठिकाणी आम्‍ही हे सुध्‍दा स्‍पष्‍ट करतो की, मोटार वाहन कायद्याचे कलम 3 प्रमाणे कोणत्‍याही व्‍यक्‍तीस तिला मोटार वाहन चालविण्‍यास प्राधिकार देणारे खुद्द तिला देण्‍यात आलेले परिणामक चालन लायसन धारण करीत असल्‍याशिवाय, तिला कोणत्‍याही सार्वजनिक ठिकाणी ते वाहन चालविता येणार नाही. याचाच अर्थ सार्वजनिक स्‍थळी वाहन चालविण्‍याकरिता कार्यक्षम (Effective) ड्रायव्‍हींग लायसेन्‍सची आवश्‍यकता वाहनचालकाकडे असणे गरजेचे आहे. पॉलिसी करारान्‍वये वाहन अपघाताविषयी दावे निकाली काढण्‍याकरिता अट (VI) तरतूद समाविष्‍ट केलेली दिसून येते. तसेच विमा करार अट (VI) (A) (2) प्रमाणे जो शेतकरी वाहन चालवत होता, त्‍याच्‍याकडे वाहन चालविण्‍याचा परवाना नसेल तर तो शेतकरी अथवा त्‍याचे वारसदार विमा लाभ मिळण्‍यास पात्र नाहीत. मयत  पंडीत यांच्‍याकडे अपघातसमयी वैध व कार्यक्षम वाहन चालवण्‍याचा परवाना नव्‍हता आणि त्‍या कारणास्‍तव विमा दावा नामंजूर केला असल्‍यास विमा कंपनीचे ते कृत्‍य सेवेतील त्रुटी ठरणार नाही. त्‍या अनुषंगाने तक्रारकर्ती ह्या विमा नुकसान भरपाई मिळविण्‍यास पात्र नाहीत, या निष्‍कर्षाप्रत आम्‍ही येत आहोत. वरील विवेचनाअंती आम्‍ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.  

 

आदेश

 

(१)        तक्रारकर्ती यांची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.

(२)       खर्चासंबंधी आदेश नाहीत.

 

 

(श्री. किशोर दत्तात्रय वडणे)

(श्री. मुकुंद भगवान सस्ते)                              अध्यक्ष                     (श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर)

            सदस्य                                                                                            सदस्य

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MR. किशोर द. वडणे]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. मुकुंद भ. सस्‍ते]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. शशांक श. क्षीरसागर]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.