Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/13/30

सौ.बेबीताई ग्‍यानदेवजी कठाणे - Complainant(s)

Versus

एजंट श्री.वनराज हरीशचंद्र वैदय एच.पी.गॅस एजन्‍सी - Opp.Party(s)

दादाराव भेदरे/चिचबनकर

01 Jan 2014

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/13/30
 
1. सौ.बेबीताई ग्‍यानदेवजी कठाणे
मु.पो.ता.पारशिवनी
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. एजंट श्री.वनराज हरीशचंद्र वैदय एच.पी.गॅस एजन्‍सी
एच.पी.गॅस एजन्‍सी मु.पो.ता. पारशिवनी
नागपूर
महाराष्‍ट्र
2. अधिकृत विक्रेता ः- गांधी गॅस एजंसी एच.प.गॅस
यश कॉम्‍प्‍लेक्‍स, शॉप नं.10 तेलंगखेडी ले आऊट, अमरावती रोड नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
3. मुख्‍य विक्रेता - हिन्‍दुस्‍थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड
भारत सरकार उप‍क्रम पंजीयन ऑफीस,17 जमशेदजी टाटा रोड,मुंबई
मुंबई - 20
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Manohar G.Chilbule PRESIDENT
 HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
PRESENT:
 Bhushan Mohta, Advocate for the Opp. Party 0
ORDER

निकालपत्र::

(पारीत व्‍दारा- श्री मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्‍यक्ष )

(पारीत दिनांक 01 जानेवारी, 2014 )

 

1.    तक्रारकर्तीने, विरुध्‍दपक्ष क्रं-1 कडून विकत घेतलेल्‍या गॅस कन्‍केशन संबधाने एकूण 02 गॅस सिलेंडर पैकी फक्‍त 01 गॅस सिलेंडर मिळाल्‍यामुळे त्‍याचा हिशोब मिळावा व इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी  प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली मंचा समक्ष दाखल केली.

2.   तक्रारकर्तीचे संक्षीप्‍त कथन खालील प्रमाणे-

     तक्रारकर्तीने, विरुध्‍दपक्ष क्रं-1 एजंट वनराज हरिचंद्र वैद्द एच.पी.गॅस एजन्‍सी, पारशिवनी यांचे कडून दि.09.12.2002 रोजी 02 सिलेंडरचे गॅस कनेक्‍शन रुपये-2400/- एवढया किंमतीत विकत घेतले . तक्रारकर्तीस 02 गॅस सिलेंडर मंजूर असताना फक्‍त 01 गॅस सिलेंडर तक्रारकर्तीस दिला आणि फक्‍त रुपये-1500/- ची पावती दिली. उर्वरीत रुपये-900/- व 01 सिलेंडर वि.प.क्रं 1 एजंट वनराज हरिचंद्र वैद्द यांनी हडपले आणि तक्रारकर्तीची फसवणूक केली. वि.प.क्रं 1 यांची सदर कृती  ग्रा.सं.कायद्दा प्रमाणे  दोषपूर्ण सेवा आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब आहे.

      यातील विरुध्‍दपक्ष क्रं 2 व क्रं 3 हे अनुक्रमे एच.पी.गॅस एजन्‍सीचे  अधिकृत विक्रेता आणि मुख्‍य विक्रेता असल्‍याने त्‍यांना सुध्‍दा प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये समाविष्‍ठ करण्‍यात आले. तक्रारकर्तीने वि.प.क्रं 1 कडून एच.पी.गॅस एजन्‍सीचे सिलेंडर विकत घेतले असल्‍यामुळे, तक्रारकर्ती ही वि.प.क्रं 1 ते 3 यांची ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे ग्राहक आहे.

 

 

 

 

      तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की,  वि.प.क्रं 1 यांनी, प्रती 03 महिन्‍या नंतर  रुपये-300/- घेऊन फक्‍त 01 सिलेंडर दिले व उरलेले 01 सिलेंडर जास्‍त पैसे घेऊन काळया बाजारात विकले. तक्रारकर्तीने, वि.प.क्रं 1 यांचेकडे प्रत्‍येक महिन्‍यास दुस-या सिलेंडरची मागणी केली असता त्‍यांनी ते देण्‍यास टाळाटाळ केली. यामुळे तक्रारकर्तीस व तिचे कुटूंबियास मनःस्‍ताप सहन करावा लागला, ज्‍यामुळे त्‍यांचे रुपये-40,000/- चे नुकसान झाले. वि.प.क्रं 1 ते 3 यांनी तक्रारकर्तीस प्रतीमाह 02 सिलेंडर न देता हिशोब सुध्‍दा दिला नाही, आणि तक्रारकर्तीचे नावावर आलेले संपूर्ण सिलेंडर वि.प.क्रं 1 यांनी काळया बाजारात जास्‍त दराने विक्री केले व यासाठी वि.प.क्रं 1 ते 3 यांची संपूर्ण जबाबदारी येते.

     तक्रारकर्तीने पुढे असेही नमुद केले की, ती एक अशिक्षीत स्‍त्री असून तिला सही सुध्‍दा करता येत नाही, ती सहीचे ऐवजी अंगठा लावते परंतु वि.प.क्रं 1 यांनी तक्रारकर्तीचे नावाने खोटी सही केलेली आहे, यावरुन भारतीय दंड संहिता 1860 नुसार तक्रारकर्तीची फसवणूक झाल्‍याची बाब सिध्‍द होते. वि.प.क्रं 1 ते 3 तर्फे पारशिवनी येथे गॅस सिलेंडरचा नियमित पुरवठा होत नसल्‍यामुळे त्‍याच्‍या उपभोगा पासून तक्रारकर्ती वंचित आहे, त्‍यामुळे गॅस कनेक्‍शनचे ट्रान्‍सफर करणे आवश्‍यक आहे.

     तक्रारकर्तीने वि.प.क्रं 1 ते 3 यांना दि.03.12.2012 रोजी अधिवक्‍त्‍या मार्फत कायदेशीर नोटीस नोंदणीकृत डाकेने पाठविली. सदरची नोटीस वि.प.क्रं 1 ते 3 यांना प्राप्‍त होऊन सुध्‍दा कोणतेही उत्‍तर दिले नाही. म्‍हणून शेवटी तक्रारकर्तीने, विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार न्‍यायमंचा समक्ष दाखल केली.

 

      तक्रारकर्तीची प्रार्थना-

1)    वि.प.क्रं 1 ते 3 यांचे कडून तक्रारकर्तीने दि.09.12.2012 रोजी घेतलेले

      गॅस कनेक्‍शन ज्‍यावर 02 सिलेंडरची नोंद आहे, त्‍याचा संपूर्ण हिशोब

      तक्रारकर्तीस देण्‍याचे विरुध्‍दपक्षास आदेशित व्‍हावे.

2)    तक्रारकर्तीचे नावे नोंद असलेले सिलेंडर कोणास विकले याची माहिती

      वि.प.क्रं 1 ते 3 यांचे कडून तक्रारकर्तीस देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

 

 

 

3)    वि.प.क्रं 2 व 3 यास अनुचित व्‍यापारी पध्‍दती अवलंबल्‍यामुळे त्‍यांचा

      शासकीय परवाना रद्द करण्‍यात यावा यासाठी योग्‍य ते आदेश व्‍हावेत.

 

3.    प्रस्‍तुत प्रकरणात यातील विरुध्‍दपक्ष क्रं 1ते 3 यांना न्‍यायमंचा तर्फे नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्‍यात आली.

अ)    विरुध्‍दपक्ष क्रं-1 एजन्‍ट वनराज हरिश्‍चंद्र वैद्द, एच.पी.गॅस एजन्‍सी, मु.पो.पारशिवनी, जिल्‍हा नागपूर या नाव आणि पत्‍त्‍यावर पाठविलेली नोटीस घेण्‍यास इन्‍कार या पोस्‍टाचे शे-यासह परत आली. सदर परत आलेले पोस्‍टाचे पॉकीट अभिलेखावर निशाणी क्रं 17 अनुसार उपलब्‍ध आहे. परंतु                 रजि .नोटीसची सुचना मिळूनही विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांनी स्विकारण्‍यास नकार दिल्‍याने ते न्‍यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा आपले लेखी निवेदनही न्‍यायमंचा समक्ष सादर केले नाही. म्‍हणून सदरची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश न्‍यायमंचाने दि.11/09/2013 रोजी प्रकरणात पारीत केला.

 

ब)           विरुध्‍दपक्ष क्रं 2 एच.पी.गॅसचे अधिकृत विक्रेता-गांधी गॅस एजन्‍सी,                                             नागपूर यांनी निशाणी क्रं 18 वर प्रतिज्ञालेखावरील उत्‍तर दाखल केले.

त्‍यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की, प्रस्‍तुत तक्रारीचे कारण हे सन-2002 मध्‍ये घडले असल्‍याने आणि तक्रार ही जवळपास 11 वर्षा नंतर मंचा समक्ष दाखल झालेली असल्‍याने ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी नुसार ती मुदतबाहय ठरत असल्‍याने खर्चासह खारीज व्‍हावी. तसेच तक्रारकर्तीने मुदतीत तक्रार दाखल न करण्‍या बाबत कोणतेही कारण आपल्‍या तक्रारीत नमुद केलेले नाही. त्‍यांनी तक्रारीतील सर्व परिच्‍छेद नाकारलेत. वि.प.क्रं 2 यांनी आपले उत्‍तराचे विशेष कथनात नमुद केले की, त्‍यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांना एजंट म्‍हणून नियुक्‍त केलेले नाही आणि वि.प.क्रं 1 व वि.प.क्रं 2 यांच्‍यामध्‍ये तसा कोणताही करार झालेला नाही आणि वि.प.क्रं 2 हे वि.प.क्रं 1 यांच्‍या व्‍यवहाराला बांधील नाहीत, त्‍यामुळे वि.प.क्रं 1 यांनी 01 सिलेंडर तक्रारकर्तीस न दिल्‍या बाबत जो काही  गैरव्‍यवहार केला असल्‍यास त्‍याची जबाबदारी ही  वि.प.क्रं 2 यांचेवर येऊ शकत नाही. तक्रारकर्तीस निश्‍चीत केलेल्‍या किंमतीमध्‍ये गॅस कनेक्‍शन दिले आणि त्‍याची पावती सुध्‍दा देण्‍यात आली. तक्रारकर्तीची वि.प.क्रं 2 विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे नमुद केले.

 

 

 

 

क)   वि.प.क्रं 3 हिंदुस्‍थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., मुंबई यांनी              नि.क्रं 15 नुसार प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्‍तर न्‍यायमंचासमक्ष सादर केले.  त्‍यांनी आपल्‍यालेखी उत्‍तरामध्‍ये तक्रारकर्तीने वि.प.क्रं 3 कडून पैसे उकळण्‍याचे

दृष्‍टीने तक्रार दाखल केली असून ती खारीज होण्‍यास पात्र असल्‍याचे नमुद

केले. ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी नुसार तक्रारीचे कारण घडल्‍या पासून 02 वर्षाचे आत तक्रार दाखल होणे आवश्‍यक असताना जवळपास 11 वर्षा पेक्षा जास्‍त कालावधी उलटून विलंबाने मंचा समक्ष तक्रार दाखल झाल्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार मुदतबाहय  कारणा वरुन खारीज होण्‍यास पात्र आहे. तक्रारकर्तीने आपले तक्रारीत वि.प.क्रं 1 यांनी दि.09.02.2002 रोजी गॅस कनेक्‍शन देण्‍यासाठी रक्‍कम घेतली आणि 02 सिलेंडर नमुद असताना फक्‍त 01 सिलेंडर पुरविला आणि अशारितीने तक्रारकर्तीची फसवणूक केली असे नमुद केले, यावरुन तक्रारकर्तीस सदर बाबीचे ज्ञान सन-2002 पासूनच होते. तक्रारकर्तीने मंचा समक्ष तक्रार दाखल करण्‍यास एवढा विलंब का लागला याची कारणे सुध्‍दा तक्रारीत नमुद केलेली नाहीत. तक्रारकर्तीचे नोटीसला  वि.प.क्रं 3 यांनी दि.12.01.2013 रोजी उत्‍तर दिले आहे, त्‍यामुळे तक्रारकर्तीचे म्‍हणणे की, तिचे नोटीसला विरुध्‍दपक्षानी उत्‍तर दिले नाही हे म्‍हणणे खोटे आहे. वि.प.क्रं 3 ने लेखी बयाना सोबत नोटीसच्‍या उत्‍तराची प्रत व पोस्‍टाची पावती दाखल केली आहे. तक्रारकर्ती ही वि.प.क्रं 3 यांची ग्राहक असून, त्‍यांनी  दोषपूर्ण सेवा दिली हे विधान अमान्‍य केले आहे. वि.प.क्रं 3 यांनी 02 सिलेंडर तक्रारकर्तीस पुरविले असल्‍याने त्‍याचा हिशोब देण्‍याची त्‍यांची जबाबदारी नाही. तक्रारकर्तीची तक्रार गुणवत्‍तारहित असल्‍यामुळे खर्चासह खारीज व्‍हावी, अशी विनंती वि.प.क्रं 3 यांनी केली आहे.

 

4.    तक्रारकर्तीने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार राशन कॉर्ड, बँकेचे पासबुक, गॅस कॉर्ड, वि.प.क्रं 3 यांचे गॅस कनेक्‍शनचे दस्‍तऐवज, निवडणूक ओळखपत्र, तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्षास दिलेली नोटीस, पोस्‍टाची पावती, पोच अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या आहेत. तक्रारकर्तीने मंचा समक्ष दि.27.11.2013 रोजी पुरसिस दाखल करुन तिची प्रतिज्ञालेखावरील तक्रार हेच प्रतीउत्‍तर समजावे असे कळविले.

 

5.   प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्ती तर्फे अधिवक्‍ता श्री भेदरे यांचा तर विरुध्‍दपक्ष क्रं-2 तर्फे अधिवक्‍ता श्री मोहता यांचा  युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

 

 

6.    तक्रारकर्तीची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, वि.प.क्रं 2 आणि क्रं-3 यांची प्रतिज्ञालेखावरील उत्‍तरे आणि प्रकरणातील उपलब्‍ध कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले असता, न्‍यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्‍यावरील निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहेत-

              मुद्दे                                  उत्‍तर

(1)              तक्रारकर्तीची तक्रार, वि.प.क्रं 2 व 3 चे

      आक्षेपा नुसार ग्रा.सं.कायद्दातील

       तरतुदीनुसार मुदतीचे कारणावरुन मंचा समक्ष

       चालविण्‍यास पात्र आहे काय?....................................नाही.

(2)     काय आदेश?..........................................................तक्रार खारीज.

 

::कारण मिमांसा::

मु्द्दा क्रं 1 बाबत-

7.    तक्रारकर्तीने वि.प.क्रं 3 हिन्‍दुस्‍तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांनी तक्रारकर्तीचे गॅस कनेक्‍शन संबधी जारी केलेल्‍या दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता गॅस कनेक्‍शन दि.09.12.2002 उपभोक्‍ता क्रमांक-624160, डिलरकोड-952030 गॅस सिलेंडर संख्‍या-02 असे त्‍यावर नमुद आहे, यावरुन तक्रारकर्तीने गॅस कनेक्‍शन संबधाने रुपये-1500/- दिल्‍या बद्दल आणि त्‍याचे मोबदल्‍यात तिला 02 गॅस सिलेंडर मंजूर झाल्‍या बद्दलचा  पुरावा मंचा समक्ष आलेला आहे.

 

8.    तक्रारकर्तीचे तक्रारी नुसार तिने विरुध्‍दपक्ष क्रं-1 एजंट वनराज हरिचंद्र वैद्द एच.पी.गॅस एजन्‍सी, पारशिवनी यांचे कडून दि.09.12.2002 रोजी गॅस कनेक्‍शन रुपये-2400/- एवढया किंमतीत विकत घेतले आणि त्‍या मोबदल्‍यात त्‍यांनी 02 सिलेंडर मंजूर असताना फक्‍त 01 सिलेंडर तक्रारकर्तीस दिले आणि फक्‍त रुपये-1500/- ची पावती तक्रारकर्तीस दिली व उर्वरीत रुपये-900/-              01 गॅस सिलेंडर वि.प.क्रं 1 एजंट वनराज हरिचंद्र वैद्द यांनी हडपले आणि तक्रारकर्तीची फसवणूक केली. परंतु वि.प.क्रं 1 ने तक्रारकर्ती कडून             रुपये-2400/- घेतले व  02 ऐवजी  फक्‍त 01 गॅस सिलेंडर दिले  या आरोपास

 

 

 

 

तक्रारकर्तीच्‍या शब्‍दाशिवाय कोणताही प्रत्‍यक्ष किंवा परिस्थितीजन्‍य समर्थक पुराव्‍या अभावी 11 वर्षानंतर वि.प.क्रं 1 ने रुपये-2400/- घेऊन रुपये-1500/- ची पावती दिली व 02 गॅस सिलेंडर ऐवजी फक्‍त 01 सिलेंडर दिला या तक्रारकर्तीच्‍या म्‍हणण्‍यावर विश्‍वास ठेवता येत नाही.

 

9.    विरुध्‍दपक्ष क्रं 2 आणि क्रं 3 यांचा मुख्‍य आक्षेप असा आहे की,  ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी नुसार तक्रारीचे कारण (दि.09.02.2002 गॅस कनेक्‍शन विकत घेतल्‍या पासून) घडल्‍या पासून 02 वर्षाचे आत तक्रार दाखल होणे आवश्‍यक असताना जवळपास 11 वर्षा पेक्षा जास्‍त कालावधी उलटून विलंबाने मंचा समक्ष तक्रार दाखल झाल्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार मुदतबाहय  कारणा वरुन खारीज होण्‍यास पात्र आहे.

       सदर आक्षेपाचा सर्वप्रथम विचार होणे आवश्‍यक आहे.

       ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली मुदतीची तरतुद खालील प्रमाणे आहे -

Section-24 A-      Limitation Period

1)   The District Forum, the State Commission or the National

         Commission shall not admit a complaint unless it is filed within

          two years from the date on which the cause of action has arisen.

 

2)       Notwithstanding anything contained in sub-section (1), a

          Complaint may be entertained after the period specified in

          sub-section (1), if the complainant satisfies the District Forum,

          the State Commission or the National Commission, as the case

          may be , that he had sufficient cause for not filing the complaint

          within such period:

         PROVICED that no such complaint shall be entertained unless

          the National Commission, the State Commission or the District

         Forum, as the case may be, records its reasons for condoning

          such delay.

 

 

 

 

 

 

 

      आमचे समोरील प्रकरणात त‍क्रारकर्तीचे म्‍हणण्‍या प्रमाणे तिने          वि.प.क्रं 1 कडून गॅस कनेक्‍शन दि.09.02.2002 रोजी विकत घेतले आहे आणि त्‍याच दिवशी तिला रुपये-2400/- ऐवजी रुपये-1500/- ची पावती आणि 02 गॅस सिलेंडर ऐवजी 01 गॅस सिलेंडर मिळाले. म्‍हणजेच वि.प.क्रं 1 ने अधिकचे रुपये-900/- घेतले आणि 01 सिलेंडर कमी दिल्‍याची माहिती तिला त्‍याच दिवशी झाली होती. सदर तारखे पासून प्रस्‍तुत तक्रार 02 वर्षाचे आत मंचा समक्ष दाखल करणे ग्राहक संरक्षण कायद्दाचे कलम-24 (A) (1) प्रमाणे आवश्‍यक असताना सदरची तक्रार मंचा समक्ष दि.29.01.2013 रोजी म्‍हणजे 11 वर्षानीं दाखल केली असल्‍याने मुदतबाहय आहे व सदर तक्रारीची दखल घेण्‍याचा मंचाला अधिकार नाही म्‍हणून मुद्दा क्रं 1 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविला आहे.

मु्द्दा क्रं 2 बाबत-

10.   मुद्दा क्रं 1 वरील निष्‍कर्षा प्रमाणे तक्रारकर्तीची तक्रार मुदतबाहय असल्‍याने खारीज होण्‍यास पात्र आहे.

 

11.    वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो.

                  ::आदेश::

 

1)      तक्रारकर्तीची तक्रार मुदतबाहय असल्‍याचे कारणा वरुन  खारीज

        करण्‍यात येते.

2)      खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.

3)      निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

        देण्‍यात यावी.

              

 

 

 
 
[HON'ABLE MR. Manohar G.Chilbule]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.