नि.1 वर आदेश
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तो वासनवाडी ता.बीड येथे रहातो. गांवात गैरअर्जदारांनी अनेक डीपी बसवल्या आहेत. त्या खराब झाल्यामुळे तक्रारदारांनी अनेक वेळा गैरअर्जदारांकडे तक्रार केली. तक्रारदाराकडे तीन म्हशी घेतलेल्या होत्या. दि.17.06.2012 रोजी म्हशी चरण्यासाठी नेल्या होत्या. म्हशी घेऊन घरी येत असताना लाईटच्या खांबामध्ये विज प्रवाह उतरला व म्हशीच्या शिंगाला विजेचा धक्का बसल्याने म्हैस जागीच मरण पावली. गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराचे वकील यांचा प्राथमिक युक्तीवाद ऐकला, परंतु ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 2 (1) (डी) नुसार तक्रारदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक होऊ शकत नाही. गैरअर्जदाराने कोणत्याच स्वरुपात तक्रारदाराला सेवा पुरवलेली नाही अथवा तक्रारदाराने गैरअर्जदाराला सेवेचा मोबदला दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्यात ग्राहक व सेवा पुरवणारा हे नाते प्रस्थापित झालेले नाही.
सबब, या मंचारला सदरची तक्रार चालवण्याचा अधिकार नाही असा निष्कर्ष मंच काढत आहे व खालील आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार प्राथमिक अवस्थेत फेटाळण्यात येत आहे.
2. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड