Maharashtra

Beed

CC/13/95

जयद्रथ तात्‍याराम वाघमारे - Complainant(s)

Versus

उपअभियंता महावितरण - Opp.Party(s)

साळवे

06 Jan 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/13/95
 
1. जयद्रथ तात्‍याराम वाघमारे
आनंदनगर,मुनोत नेत्रालयाजवळ बीड
बीड
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. उपअभियंता महावितरण
माळीवेस बीड
बीड
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

निकाल
                      दिनांक- 06.01.2014
                  (द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष)
            तक्रारदार जयद्रथ तात्‍याराम वाघमारे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले यांनी तक्रारदार यांनी चूकीचे देयक देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे म्‍हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
             तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे, तक्रारदार हे आनंद नगर बीड येथे कूटूंबियासोबत राहतात. तक्रारदार यांनी 2003 साली घरगुती वापरासाठी विज पुरवठा घेतलेला आहे. त्‍यांचा ग्राहक क्र.805A021 व नवीन ग्राहक क्र.576010280876 व मिटर क्र.9800408516 असा आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे वेळोवेळी विज देयक भरली आहेत. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. सामनेवाले यांनी विज देयक मिटरच्‍या वाचनाप्रमाणे दिलेले नाही. तसेच 05.10.2012 ते 05.11.2012 या कालावधीसाठी तक्रारदार यांना रु.8040/- चे देयक देण्‍यात आले. सदरील देयक हे तक्रारदार यांनी वापरलेल्‍या यूनिट प्रमाणे नव्‍हते. तक्रारदार यांनी सदरील बाब सामनेवाले यांचे निदर्शनास आणली.  सामनेवाले यांनी विज देयक दूरुस्‍त करुन दिले. त्‍यांचा भरण तक्रारदार यांनी केला आहे. दि.5.4.2013 रोजी मिळालेले देयक तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे भरले आहे.तक्रारदार यांना दि.5.5.2013 ते 5.6.2013 या कालावधीतील विज देयक प्राप्‍त झाले ते विज देयक रककम रु.51,530/- या रक्‍कमेचे होते. त्‍यामध्‍ये समायोजित युनिट 14897 दर्शविलेले होते. तक्रारदार यांनी घरगुती वापरासाठी विज पुरवठा घेतलेला आहे. सदरील बिल हे अवाजवी व बेकायदेशीर आहे. तसेच मिटरचे वाचन न घेता दिलेले आहे. तक्रारदार हा सेवानिवृत्‍त कर्मचारी आहे. सदरील बिल पाहून तक्रारदार यांना मानसिक धक्‍का बसला आहे. तक्रारदार यांनी सदर बिल दूरुस्‍त करुन देण्‍याची विनंती केली असता सामनेवाले यांनी बिल दूरुस्‍त करुन दिले नाही.सबब, तक्रारदार यांना सामनेवाले यांनी दिलेले विज देयक रदद करण्‍यात यावे तसेच तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.
            सामनेवाले यांना या मंचाची नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही, म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला.
            तक्रारदार यांनी नि.5 अन्‍वये तक्रारीसोबत खालील नमूद केलेले दस्‍त हजर केलेले आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे दिलेला अर्ज, विज देयके, तक्रारदार यांनी वेळोवेळी भरलेल्‍या देयकाच्‍या पावत्‍या, तक्रारदार यांचे स्‍वतःचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्र यांचे अवलोकन केले. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
            मुददे                                            उत्‍तर
1.     सामनेवाले यांनी चूकीचे विज देयक देऊन सेवेत त्रूटी
      ठेवली आहे ही तक्रारदार शाबीत करतात काय                 होय.
2.    तक्रारदार तक्रारीत मागणी केलेली रक्‍कम मिळण्‍यास
     पात्र आहेत काय                                          होय.
3.    काय आदेश                                       अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2ः-
            तक्रारदार यांचे वकील श्री.साळवे यांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांना सामनेवाले यांनी जी वेळोवेळी विज देयक दिली ती तक्रारदार यांनी भरली आहेत. तक्रारदार यांना सामनेवाले हयांनी दि.5.04.2013 ते 5.6.2013 या कालावधीचे देयक रक्‍कम रु.51,530/- दिले. सदरील देयक हे बेकायदेशीर असून मिटर रिंडींग प्रमाणे नाही. त्‍या बाबत तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे अर्ज देऊनही सामनेवाले यांनी त्‍यांची दखल घेतली नाही. म्‍हणून तक्रारदार यांची विनंती की, त्‍यांची मागणी मान्‍य करण्‍यात यावी.
            तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र यांचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांनी वादातील बिल प्राप्‍त होईपावेतो सर्व देयक सामनेवाले यांचेकडे भरली आहेत. तक्रारदार यांनी सदरचा विज पुरवठा घरगुती वापरासाठी घेतलेला आहे. एक महिन्‍याचे बिल रु.51,530/- येऊ शकत नाही. यांचा अर्थ सामनेवाले यांनी मिटरचे वाचन न करता विज देयक दिलेले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना अवास्‍तव देयक देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे. सदरील बिल रदद होण्‍यास पात्र आहे व सामनेवाले यांना निर्देश देणे उचित वाटते की, देयक दूरुस्‍त करुन तक्रारदार यांना दयावेत व तक्रारदार यांचा विज पुरवठा खंडीत करु नये. तसेच तक्रारदार यांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.500/- सामनेवाले यांनी दयावेत.
            मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.
            सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
 
                         आदेश
            1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येत आहे.          
            2) सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की, विज देयक रककम
                रु.51,530/- चे रदद करण्‍यात यावे. तक्रारदार यांना मिटर रिंडींग
                प्रमाणे नवीन देयक देण्‍यात यावे.               .
3) सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार यांना
    मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी
     रु.500/- दयावेत.
4)  ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
                20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत
                करावेत.     
 
 
 
                       श्रीमती मंजूषा चितलांगे,         श्री.विनायक लोंढे,
                             सदस्‍य                    अध्‍यक्ष
                            जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
 
 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.