Maharashtra

Beed

CC/13/64

देशमुख अ‍ितिशकुमार शंकरराव - Complainant(s)

Versus

उत्‍तमचंद नेमीचंद जैन - Opp.Party(s)

25 Jun 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/13/64
 
1. देशमुख अ‍ितिशकुमार शंकरराव
रा.गुरुछाया निवास संत नामदेव नगर धानोरा रोड,बीड
बीड
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. उत्‍तमचंद नेमीचंद जैन
सुभाष रोड,बीड
बीड
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MRS. MANJUSHA CHITALANGE MEMBER
 HON'BLE MR. R.S.Rathodkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकाल

                       दिनांक- 25.06.2014

               (द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्‍य)

            तक्रारदार देशमुख अतिशकुमार शंकरराव यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांच्‍याकडून  खरेदी केलेल्‍या दोन झुंबरापैकी एक झुंबर काळे पडल्‍याने बदलून मिळणेबाबत व नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.

              तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणेप्रमाणे, तक्रारदार यांनी दि.24.08.2012 रोजी सामनेवाला यांच्‍याकडून सोन्‍याचे दोन ट्रीपल कोयमतुरी झुंबर खरेदी केले त्‍याचे वजन 8 ग्रॅम 560 इतके आहे. सदरील झुंबर तक्रारदार यांनी रु.31,000/- भावाप्रमाणे रु.27,255/- चे सामनेवाला यांचेकडून खरेदी केले. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्‍या दोन झुंबरापैकी एक झुंबर सोन्‍याचे असून काळे पडलेले आहे. त्‍याबददल तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे चौकशी केली असता सामनेवाला यांनी तक्रारदारास सदरील झुंबर मोडण्‍याचा सल्‍ला दिला व बाजार भावाप्रमाणे बटटा व मोड कमी करुन रक्‍कम देण्‍याचे सांगितले.

            तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेवर विश्‍वास ठेवून सोन्‍याचे झुंबर खरेदी केले होते, एक झुंबर काळे पडल्‍याने ते सोन्‍याचे आहे किंवा नाही याची खात्री येत नाही. सबब तक्रारदारास बाजार भावाप्रमाणे नुकसान भरपाई देण्‍यात यावी. सामनेवाला यांनी रक्‍कम रु.27,255/- व त्‍यापैकी एक झुंबरचे पैसे व्‍याजासह परत करण्‍याचे आदेश व्‍हावे, तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात यावी.

            सामनेवाला हे मंचासमोर हजर झाले. त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे निशाणी क्र.8 वर सादर केले आहे. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून कोयमतुरी सोन्‍याचे झुंबर खरेदी केले ही बाब मान्‍य आहे. उर्वरित मजकूर हा स्‍पष्‍टपणे नाकारलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास सोन्‍याचे अलंकार बाबत खरेदी पावती दिलेली आहे, सदर पावतीमध्‍ये सोन्‍याची शुध्‍दता बाबत लेखी माहिती दिलेली आहे. तसेच सोने खरेदी करत असताना अलंकार हा किती डागी बटयाचा आहे या बाबत तक्रारदारास स्‍पष्‍ट तोंडी व लेखी पावतीद्वारे सांगितलेले आहे. अलंकार खरेदी नंतर एक वर्षाने अलंकार वापरल्‍यानंतर बदलून देणे शक्‍य नाही. तसेच तक्रारदार यांनी सदरील अलंकार हे प्रयोगशाळेत शुध्‍दता तपासणीसाठी पाठविल्‍यास व सदर अलंकार हे सोन्‍याचे नाही असे निष्‍पन्‍न  झाल्‍यास सामनेवाला हे तक्रारदारांना सदर अलंकारासाठी रक्‍कम देण्‍याची जबाबदारी घेत आहे.

            सामनेवाला यांचे कथन की, सदर झुंबर हे काळे पडण्‍यास वेगवेगळे असे कारणे असू शकतात. जसे- मानवी शरीराची उष्‍णता, शरीराचा घाम व सुवासिक फवारे वापरण्‍यात आलेले तेल व वातावरणाचा परिणाम यामुळे सुध्‍दा सदर झुंबर हे काळे पडले. सामनेवाला यांचे कथन की, मा.न्‍यायालयाने सदरचे झुंबर हे प्रथमतः सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेल्‍या पावतीप्रमाणे शुध्‍दतेचे आहे किंवा नाही याबाबत तपासण्‍याकरता प्रयोगशाळेत पाठविणे आवश्‍यक आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेले झुंबर हे सोन्‍याचेच आहे, तक्रारदाराची कोणत्‍याही प्रकारे फसवणूक केलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रदद होण्‍यास पात्र आहे.

            तक्रारदाराने तक्रारीसोबत झुंबर खरेदी केलेली पावती दाखल केलेली आहे. सामनेवाला यांनी निशाणी क्र.7 अन्‍वये कागदपत्र दाखल केले आहे, कागदपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार व सामनेवाला यांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद ऐकला. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

           मुददे                                       उत्‍तर

1) सामनेवाला यांनी तक्रारदारास सदोष झुंबर देऊन

सेवेत त्रुटी ठेवलेली आहे, ही बाब तक्रारदार यांनी

शाबीत केली आहे काय ?                                होय.

2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्‍यास

   पात्र आहे काय?                                       होय. 

3) आदेश काय ?                                  अंतिम आदेशाप्रमाणे.

                              कारणमिंमासा

मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केला आहे. तक्रारदार हे सामनेवाला यांच्‍या दुकानात दागिने खरेदीसाठी गेले तेव्‍हा त्‍यांनी विकत घेतलेला दागिना हा केवळ सोनेरी रंगाचा दिसत होता. खरेदी केला तेव्‍हा सदर दागिन्‍यात  कोणतेही असे दोष दिसत नव्‍हते. पण 10 – 15 दिवसांनी सदरील दागिन्‍याचा काही भाग काळा पडल्‍यासारखा दिसला. सदर दागिना घेऊन तक्रारदार हे सामनेवाला यांच्‍याकउे गेले असता व सदरील दागिना हा परत अथवा बदलून देण्‍याची विनंती केली असता सामनेवाला यांनी सदर दागिना मोडून पैसे देण्‍याची तयारी दर्शविली होती. दागिना बदलून किंवा परत घेऊन त्‍याची किंमत देण्‍यास सामनेवाला तयार नव्‍हता. सामनेवाला यांनी दिलेला दागिना हा डाग दिलेला आहे व त्‍याचेवर पॉलीश करुन दिली आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदाराची फसवणूक केलेली आहे. सबब तक्रारदाराची मागणी की, सदरील दागिना बदलून देण्‍याची किंवा घेतलेल्‍या किंमतीची रक्‍कम परत देण्‍याचे आदेश व्‍हावे ही विनंती.

            सामनेवाला यांनी लेखी युक्‍तीवाद निशाणी क्र.14 अन्‍वये दाखल केलेला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून सोन्‍याचे झुंबर खरेदी केलेले आहे ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सोन्‍याचे अलंकार बाबत खरेदी पावती दिलेली आहे ही बाब मान्‍य आहे. सदर झुंबर काळे पडण्‍यास वेगवेगळे कारण असतात. सदर झुंबर हे काळे पडले म्‍हणजे सोने नाही असे म्‍हणता येणार नाही. मा.मंचानी सदर झुंबर हे प्रयोगशाळेत तपासणी करीता पाठविल्‍यास सदर झुंबर हे सोन्‍याचे नाही असे निष्‍पन्‍न झाल्‍यास सामनेवाला हे तक्रारदार यांना सदर झुंबरची रक्‍कम देण्‍यास तयार आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रदद करण्‍यात यावी.

                        वर नमुद केलेला युक्‍तीवाद  लक्षात घेतला. तक्रारदार यांनी दाखल केलेले पुराव्‍याचे शपथपत्र व कागदपत्र याचे अवलोकन केले. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्र याचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडून सोन्‍याचे कोयमतुरी ट्रीपल झुंबर खरेदी केले ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. खरेदी पावती बाबत ही वाद नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडून 8 ग्रॅम 560 मि.ली.ग्रॅम वजनाचे रक्‍कम रु.27,255/- चे झुंबर खरेदी केले आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्‍या झुंबर पैकी एक झुंबर हे काही दिवसांनी काळे पडले असता तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडे सदर झुंबर हे सोन्‍याचे नसून बदली करुन देण्‍याबाबत मागणी केली असता सामनेवाला यांनी तक्रारदारास सदर झुंबर बदलून दिले नाही. मा.मंचानी तक्रारदाराच्‍या विनंतीवरुन सदर झुंबर हे प्रयोगशाळेत तपासणी करीता पाठविण्‍याची परवानगी दिली होती परंतू तक्रारदाराने सदर झुंबर हे तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले नाही. तसेच सामनेवाला यांनी सुध्‍दा सदर झुंबर हे सोन्‍याचे आहे व त्‍यामध्‍ये कोणताही दोष नाही. सदर झुंबर हे काळे पडण्‍यास वेगवेगळे कारण असू शकतात असा बचाव घेतला आहे परंतू त्‍याबाबतचे कोणतेही ठोस पुरावा मंचासमोर दाखल केला नाही जेणेकरुन ही बाब सिध्‍द होऊ शकली असती.  तक्रारदार यांनी सदर प्रकरणात युक्‍तीवाद करत असताना सदर झुंबर हे मंचाच्‍या निदर्शनास आणून त्‍याकडे मंचाचे लक्ष वेधले. मा.मंचानी सदर झुंबरचे अवलोकन केले असता खरेदी केलेल्‍या दोन झुंबरापैकी एक झुंबर प्रथमदर्शनी काळे असलेले दिसले. यावरुन असे निदर्शनास येते की, सदर झुंबर हे काळे असणे सोन्‍याच्‍या शुध्‍दतेवर अवलंबून असते. तक्रारदार याने खरेदी केलेल्‍या झुंबरापैकी एकच झुंबर काळे होते, दुसरे झुंबर चांगले होते. सोन्‍यामध्‍ये डागी बटटा जास्‍त असल्‍याकारणाने सुध्‍दा सोने काळे दिसते. तक्रारदारांनी केलेल्‍या विनंतीवरुन सामनेवाला यांनी सदर झुंबर बदलून न देऊन सेवा देण्‍यात त्रुटी ठेवली आहे.

             यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदारांनी खरेदी केलेल्‍या दोन झहुंबरापैकी एक झुंबर काळे आहे. तक्रारदारांनी केलेल्‍या विनंतीवरुन सामनेवाला यांनी सदर झुंबर बदलून न देऊन सेवा देण्‍यात त्रुटी ठेवली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास सदर सोन्‍याचे झुंबर आहे तेवढया वजनाचे बदलून देणे किंवा सदर झुंबरची रक्‍कम रु.13,627/- तक्रारदारास देण्‍यात यावी. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे. म्‍हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

            सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

                         आदेश

            1)  तक्रारदाराची  तक्रार मंजूर  करण्‍यात येत आहे.          

            2)  सामनेवाला यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारदारास

                आदेश प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाच्‍या आत सदर सोन्‍याचे

                झुंबर हे आहे तेवढया वजनाचे बदलून देणे किंवा सदर झुंबरची

                रक्‍कम रु.13,627/- देण्‍यात यावे.

            3)  तक्रारदार यांना आदेश देण्‍यात येतो की, सामनेवाला यांनी

                आदेशाची परिपूर्तता केल्‍यानंतर तक्रारदार यांनी तक्रारीतील

                झुंबर सामनेवाला यांना परत द्यावे.

            4)  ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील

                कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला

                परत करावेत.     

         श्री.रविंद्र राठोडकर,   श्रीमती मंजूषा चितलांगे,    श्री.विनायक लोंढे,

               सदस्‍य               सदस्‍य               अध्‍यक्ष

                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MANJUSHA CHITALANGE]
MEMBER
 
[HON'BLE MR. R.S.Rathodkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.