Maharashtra

Nanded

CC/14/126

माणिका रामचंद्र गादेवार - Complainant(s)

Versus

आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल ईन्शुरन्स कं. - Opp.Party(s)

अँड. डि. एफ. हरदडकर

12 Jan 2015

ORDER

District consumer Disputes Redressal Forum
Nanded
Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
 
Complaint Case No. CC/14/126
 
1. माणिका रामचंद्र गादेवार
महादेव पिंपळगाव, ता. अर्धापुर
नांदेड
महाराष्ट्र
...........Complainant(s)
Versus
1. आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल ईन्शुरन्स कं.
कलामंदीरजवळ, अँक्सीस बँकेच्यावर, बसस्थानकासमोर, नांदेड
नांदेड
महाराष्ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Smita B.Kulkarni PRESIDENT
 HON'ABLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकालपत्र

(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्‍यक्ष )

 

1.    अर्जदार यांनी  गैरअर्जदार यांचेविरुध्‍द सेवेत त्रुटी दिल्‍याच्‍या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.

      अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्‍यात खालील प्रमाणेः-

2.    अर्जदार हा व्‍यवसायाने कायद्याचे शिक्षण घेत आहे. दिनांक 21.06.2013 रोजी सकाळी 11 वाजता पेठवडज येथन नांदेड येथे मोटार सायकल क्रमांक एमएच 26/एजे 0343 वर बसून येत असतांना टेळकी रोड फाटयाजवळ अचानक कुत्रा मोटार सायकल समोर आल्‍याने कुत्र्यास वाचविणेसाठी प्रयत्‍न करीत असतांना मोटार सायकल स्‍लीप झाली व अर्जदार रोडावर मोटार सायकलसह खाली पडला त्‍यामुळे अर्जदारास गंभीर स्‍वरुपाचा मार लागला व कायमचे अपंगत्‍व आले आहे.  अर्जदाराने अपगंत्‍वाबाबत गुरुगोविंदसिंघजी मेमोरिअल हॉस्‍पीटल,नांदेड येथे उपचार घेतला असून त्‍यांना आजपर्यंत रु.30,000/- खर्च आलेला आहे व त्‍यांना रु.1000/- ते 1200/- चे औषधी घ्‍यावी लागतात.  अर्जदार हा व्‍यवसायाने कायद्याचे शिक्षण घेत आहे.  सदर अपघातामुळे अर्जदारास कायद्याचे शिक्षण घेण्‍यास अडचण येत आहे.  तसेच वैयक्‍तीक कामाकरीता अडचण येत आहे.  भविष्‍यामध्‍ये कोणत्‍याही नोकरीपासून वंचीत राहण्‍याची शक्‍यता आहे. कारण त्‍यांना निरनिराळया ठिकाणी मार लागलेला असल्‍याने कोणत्‍याही प्रकारचा कामधंदा करु शकत नाही. गैरअर्जदार यांचेकडून मोटार सायकलची विमा पॉलिसी अर्जदाराने काढलेली असून पॉलिसीचा कालावधी दिनांक 31.12.2012 ते 30.12.2013 पर्यंत वैध आहे.  अपघात झाल्‍यानंतर गैरअर्जदार यांचे कार्यालयात जाऊन अपघात झाल्‍याबाबत व्‍यवस्‍थापकांना माहिती दिली,मोटार सायकल पॉलिसीची नियमानुसार अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे वेळोवेळी जाऊन कायमचे अपंगत्‍व आल्‍याबाबत मागणी करुनही गैरअर्जदार यांनी आजपर्यंत अर्जदारास काहीही रक्‍कम दिलेली नाही.  अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्‍ये नियमानुसार विमापॉलिसी कायद्याने करार झालेला आहे.  सदर कराराचे पालन गैरअर्जदार यांनी केलेले नाही.  अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्‍ये ग्राहक व संरक्षण यामधील नाते व्‍यवसायाचे आहे.  गैरअर्जदाराने अर्जदार यांचे सेवेमध्‍ये उणीव ठेवलेली आहे. त्‍यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार गैरअर्जदार यांचेविरुध्‍द दाखल केलेली आहे.  तक्रारीमध्‍ये अर्जदार गैरअर्जदार यांचेकडून कायमचे अपंगत्‍व आल्‍यामुळे रक्‍कम रु.2,00,000/- द.सा.द.शे. 12टक्‍के व्‍याजासह व मानसिक व इतर त्रासापोटी खर्चाबाबत  रु. 5,000/- इत्‍यादी रक्‍कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्‍दारे केलेली आहे. 

3.       गैरअर्जदार यांना दिनांक 27.08.2014 रोजी नोटीस  प्राप्‍त झालेली असूनही गैरअर्जदार प्रकरणामध्‍ये हजर राहिलेले नाहीत.  त्‍यामुळे दिनांक 01.11.2014 रोजी गैरअर्जदार यांचेविरुध्‍द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत करण्‍यात आला.  त्‍यानंतर दिनांक 24.11.2014 रोजी †ò›ü.अविनाश जी.कदम गैरअर्जदार यांचेवतीने वकीलपत्र दाखल केले. परंतु लेखी जबाब दाखल केला नाही.

5.          अर्जदार यांनी तक्रारीच्‍या पुराव्‍याकामी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहे.  युक्‍तीवाद ऐकला.  त्‍यावरुन खालील बाबी स्‍पष्‍ट होतात. 

6.       अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्‍द यापुर्वी तक्रार क्रमांक 189/2013 दाखल केलेली होती.  सदर प्रकरणामध्‍ये अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह विमा दावा दाखल करावा व विमा कंपनीने तीस दिवसांच्‍या आत विमा दाव्‍यावर गुणवत्‍तेवर निर्णय द्यावा असा आदेश दिलेला होता.  त्‍यानुसार अर्जदाराने विमा दावा केल्‍यानंतर दिनांक 12.05.2014 रोजी पत्राव्दारे अर्जदाराचा विमा दावा नाकारलेला आहे.  विमा दावा नाकारतांना गैरअर्जदार यांनी खालील कारण दिलेले आहेः-

            “We are in receipt of letter from your end asking for claim for injuries sustained by you in vehicular accident involving no.MH-26-AJ-0343.  We want to  bring to your notice that the claim is not maintainable as there is no permanent disability as per terms mentioned in IMT(Indian Motor Tariff).”

 

        अर्जदाराने वैद्यकीय अधिकारी शासकीय महाविद्यालय,नांदेड यांनी दिलेले अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र दाखल केलेले आहे.  सदर प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता अर्जदारासस 32 टक्‍के कायमचे अपंगत्‍व आलेले असल्‍याचे नमूद केलेले आहे.  अर्जदार हा कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे.  अर्जदारास अपघातामध्‍ये आलेल्‍या 32 टक्‍के कायमचे अपंगत्‍वामुळे अर्जदाराच्‍या शिक्षणावर तसेच त्‍याच्‍या वैयक्‍तीक कार्यप्रणालीवर निश्चितच परिणाम झालेला असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

            गैरअर्जदार यांनी प्रकरणामध्‍ये हजर होऊनही अर्जदार यांच्‍या तक्रारीतील कथनावर आक्षेप घेतलेला नाही.  त्‍यामुळे गैरअर्जदारास अर्जदाराचे तक्रारीमधील कथन मान्‍य असल्‍याचे दिसून येते. अर्जदाराने तक्रारीमध्‍ये विमा रक्‍कम रु.2,00,000/- ची मागणी केलेली आहे. परंतु अर्जदारास 32 टक्‍के एवढेच कायमचे अपंगत्‍व आलेले आहे.  त्‍यामुळे अर्जदाराची रक्‍कम रु.2,00,000/- ची मागणी अवास्‍तव  आहे असे मंचाचे मत आहे.  वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.

आ दे श

1.    अर्जदार यांची  तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.    गैरअर्जदार यांनी अर्जदारास 32 टक्‍के कायमचे अपंगत्‍व आलेले असल्‍याने रक्‍कम रु.50,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत द्यावेत.

3.    खर्चाबद्दल आदेश नाही.

4.    दोन्‍ही पक्षकारास निकालाच्‍या प्रती मोफत पुरविण्‍यात याव्‍यात. 

5.    वरील आदेशाच्‍या  पुर्ततेचा अहवाल दोन्‍ही पक्षकारांनी निकालाच्‍या तारखेपासून  45 दिवसांच्‍या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर   आदेशाच्‍या पुर्ततेसाठी ठेवण्‍यात यावे.

 
 
[HON'ABLE MRS. Smita B.Kulkarni]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.