Maharashtra

Ahmednagar

CC/20/352

अनुराग श्रीगोपाल धुत - Complainant(s)

Versus

आयसीआयसीआय बॅंक लि.तर्फे मॅनेजर - Opp.Party(s)

संदीप मुळे

12 Feb 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/20/352
( Date of Filing : 21 Dec 2020 )
 
1. अनुराग श्रीगोपाल धुत
रा.धुत निवास,एसटी स्‍टॅण्‍ड जवळ,सहकार सभागृह जवळ,अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. आयसीआयसीआय बॅंक लि.तर्फे मॅनेजर
पहिला मजला,नयनतारा बिल्‍डींग,भांडारकर रोड,पुणे.४११००४
पुणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:संदीप मुळे, Advocate for the Complainant 1
 
Dated : 12 Feb 2021
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – १२/०२/२०२१

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.   तक्रारदार गैरहजर. तक्रारदारतर्फे वकील श्री.मुळे हजर. दाखल सुनावणीवर युक्तिवाद ऐकण्‍यात आला.  त्‍यात असे सांगण्‍यात आले की, सामनेवाले बॅंकेने दिनांक १२-१०-२०१७ रोजीला दंड करून एन.ओ.सी. दिली. त्‍यामुळे रजिस्‍ट्रार ऑफ कंपनीज यांचा दंड भरावा लागला. सामनेवालेने दंड भरला व १७ दिवस  उशीराने एन.ओ.सी. देण्‍यास विलंब केला, ही सामनेवालेची तक्रारदाराप्रती सेवेत त्रुटी आहे. म्‍हणुन त्‍याची तक्रार स्विकृत करण्‍यात यावी, अशी विनंती केली.  तक्रारदाराने तक्रारीचे परिच्‍छेद क्रमांक १० मध्‍ये असे नमुद केलेले आहे की, सदर तक्रार दाखल करणेकरीता कारण घडल्‍यानंतर दोन वर्षाचे आत तक्रार दाखल करण्‍यात आलेली आहे.  परंतु तक्रारीचे पडताळणी करतांना असे दिसुन आले की, सदर तक्रार दाखल करण्‍याचे कारण दिनांक १२-१०-२०१७ ला झाले आहे व त्‍यानंतर रजिस्‍ट्रार ऑफ कंपनीज कडे दंड भरल्‍याची पावतीही घेतली होती.  सदर तक्रार आयोगामध्‍ये दिनांक २१-१२-२०२० ला दाखल करण्‍यात आली आहे. तक्रारीतसुध्‍दा कोणताही विलंब माफीचा अर्ज नाही. सदर तक्रार दाखल करण्‍याचे कारण घडल्‍यानंतर तीन वर्षाचे नंतर आयोगासमक्ष दाखल केली असल्‍याने सदर तक्रार मुदतीत दाखल करण्‍यात आली नाही. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आदेश

१.  तक्रारदाराची तक्रार मुदतीत दाखल केली नसल्‍याने तक्रार अस्विकृत करण्‍यात येत आहे.

२. तक्रारदाराचे वकिलांनी केलेल्‍या तोंडी विनंतीवरून सदर तक्रार पुन्‍हा योग्‍य अर्जासोबत दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यात येत आहे.

३. तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

४.  आदेशाची प्रत तक्रारदाराला विनामुल्‍य देण्‍यात यावी.

५.  सदर प्रकरणाची ‘क’ व ‘ब’ फाईल तक्रारदार यांना परत करण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.