Maharashtra

Beed

CC/13/75

प्रल्‍हाद शिवाजी उणवने - Complainant(s)

Versus

आकाश एन्‍टरप्राईजेस,बीड - Opp.Party(s)

कांबळे

20 Feb 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/13/75
 
1. प्रल्‍हाद शिवाजी उणवने
समता कॉलनी,मित्र नगर बीड
बीड
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. आकाश एन्‍टरप्राईजेस,बीड
सारडा संकुल सुभाष रोड,बीड
बिड
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक 75/2013                       तक्रार दाखल तारीख – 09/07/2013
                                       तक्रार निकाल तारीख–  20/02/2014
प्रल्‍हाद भिवाजी उनवणे
वय 60 वर्ष धंदा पेन्‍शनर
रा.समता कॉलनी,मित्र नगर,
बीड ता.जि.बीड                                               ...अर्जदार
           विरुध्‍द
आकाश एन्‍टरप्रायजेस,
प्रो.प्रा.
पत्‍ता सारडा संकुल,
सुभाष रोड,बीड ता.जि.बीड                                   ...गैरअर्जदार
-----------------------------------------------------------------------------------                                      
                                  समक्ष - श्री.विनायक लोंढे, अध्‍यक्ष
                                           श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्‍य.
------------------------------------------------------------------------------------तक्रारदारातर्फे                                 - अँड.एस.आर.कांबळे
गैरअर्जदारा तर्फे                               – अँड.के.आर.टेकवानी
---------------------------------------------------------------------------------------------------
                                     निकाल
                      दिनांक- 20.02.2014
                  (द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष)
            तक्रारदार प्रल्‍हाद भिवाजी उनवणे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्‍हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
             तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे,तक्रारदार हे समता कॉलनी मित्र नगर येथील रहिवासी आहेत. सामनेवाले हे सारडा संकूल मध्‍ये आकाश एन्‍टरप्रायजेस नांवाचे विद्यूत उपकरण विक्रीचे दूकान चालवतात. दि.6.5.2013 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले हयांचे दूकानातून केनस्‍टार कंपनीचे एयर कुलर एम डब्‍ल्‍यू 9704  हे रक्‍कम रु.7500/- खरेदी केले होते. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना विक्री बाबत पावती लिहून दिलेली आहे. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्‍या उपकरणाची एक वर्षाची वॉरंटी आहे. सामनेवाले हयांनी वॉरंटी कार्ड दिलेले नाही. दि.11.5.2013 रोजी तक्रारदार यांनी खरेदी केलेल्‍या कूलरची मोटार जळाली. तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडे दि.12.5.2013 रोजी गेले व सदरील मोटार जळाल्‍या बाबत दूरुस्‍ती करुन देणे बाबत विनंती केली. सामनेवाले यांनी मोटार जळाली असल्‍यास बदलून देऊ असे सूचविले तसेच सदरील मोटार तक्रारदार यांचे ओळखीच्‍या इलेक्‍ट्रीशीयन कडून दूरुस्‍त करुन घेण्‍या बाबत कळविले. सामनेवाले यांनी सदरील मोटार दूरुस्‍त करण्‍यास नकार दिला. दि.13.5.2013 रोजी तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडे जळालेली मोटार घेऊन गेले व ती जमा केली. सामनेवाले यांनी सदरील मोटार ठेऊन घेतली व नवीन मोटार बदलून देतो असे आश्‍वासन दिले.तक्रारदार यांनी दि.14.5.2013 व 17.5.2013 रोजी सामनेवाले यांना फोन केला. इलेक्‍ट्रीक मोटार बदलून देण्‍याची विनंती केली तसेच वारंवार सामनेवाले यांचेकडे   जाऊन मोटार बदलून देण्‍याची विनंती केली. सामनेवाले यांना वेळोवेळी मोटार बदलून देण्‍यास टाळाटाळ केली.दि.22.5.2013 रोजी सामनेवाले यांनी मोटार बदलून देण्‍यास नकार दिला. तक्रारदार यांना सदरील कूलरचा उपभोग घेता आला नाही. त्‍यामुळे त्‍यांना शारीरिक व मानसिक त्रास झाला. दि.23.5.2013 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले यांना नोटीस पाठवून नुकसान भरपाई दयावी अशी मागणी केली. सदरील नोटीस सामनेवाले यांना मिळाली. सामनेवाले हयांनी त्‍या नोटीसचे चूकीचे उत्‍तर दिले व मोटार बदलून देण्‍यास नकार दिला. सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून नुकसान भरपाई रककम रु.22,500/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
            सामनेवाले हे मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी नि.9 अन्‍वये लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून कूलर खरेदी केले आहे ही बाब मान्‍य केली आहे. सामनेवाले यांनी कूलरच्‍या मोटार पंपाची वॉरंटी दिलेली आहे व तसे कार्ड करुन दिलेले आहे हे नमूद केलेले आहे. सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार हे कधीही सामनेवाले यांचेकडे कूलरची मोटार जळाली आहे अशी तक्रार घेऊन आलेले नाहीत. सामनेवाले यांनी मोटार बदलून देण्‍यास कधीही नकार दिलेला नाही. तक्रारदार यांनी जळालेली मोटार सामनेवाले यांचेकडे जमा केलेली नाही व ती सामनेवाले यांनी ठेऊन घेतलेली नाही. तक्रारदार यांनी फोनद्वारे सामनेवाले यांना कधीही कळविले नाही. सामनेवाले यांचे कथन की, मोटार  वॉरंटी कूलर कंपनी देते. सामनेवाले हे फक्‍त विक्रेते आहेत. मोटार पंप खराब झाल्‍यास वॉरंटी कार्ड मध्‍ये नमूद केलेल्‍या कस्‍टमर केअरला फोन करुन तक्रार दयावी लागते. अशा प्रकारची कोणतीही तक्रार तक्रारदार यांनी कंपनीकडे केलेली नाही. तक्रारदार यांनी कंपनीकडे तक्रार नोंदविली असती तर तक्रारदार यांना इलेक्‍ट्रीक मोटार बदलून मिळाली असती. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही वॉरंटी दिलेली नाही. सामनेवाले हे कूलर कंपनीकडे तक्रारदार यांची तक्रार नोंदवून कंपनीकडून मोटार बदलून देण्‍यास तयार आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे तसा संपर्क केलेला नाही. सामनेवाले हे सदरील मोटार बदलून देण्‍यास तयार आहेत. तक्रारदार हे मंचासमोर दि.3.9.2013 रोजी गैरहजर राहिले. सामनेवाले यांनी कंपनीचे मॅकेनिकला आणून नवीन मोटार बदलून देण्‍याची तयारी दर्शवली परंतु तक्रारदार यांनी त्‍यांस प्रतिसाद दिला नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद करण्‍यात यावी.
            तक्रारदार यांनी तक्रारीसोबत नि.4 अन्‍वये कूलर खरेदी केल्‍या बाबत पावती हजर केली, तसेच भारत संचार निगम बीड कार्यालयातून फोन केल्‍या बाबत तक्‍ता दाखल केला आहे. तक्रारदार यांनी स्‍वतःचे शपथपत्र नि.10 अन्‍वये दाखल केले आहे. सामनेवाले यांनी स्‍वतःचे शपथपत्र नि.13 अन्‍वये दाखल केले आहे.
            तक्रारदार यांचे वकील श्री.कांबळे यांचा यूक्‍तीवाद ऐकला, सामनेवाले यांचे वकील श्री टेकवानी यांचा यूक्‍तीवाद ऐकला. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
            मुददे                                            उत्‍तर
1.     सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत
      त्रुटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी
      शाबीत केली आहे काय ?                                       होय. 
2.    तक्रारीत मागणी केलेली रक्‍कम मिळण्‍यास तक्रारदार
     पात्र आहेत काय ?                                      होय, अंशतः
3.    काय आदेश ?                                   अंतिम आदेशाप्रमाणे.
                              कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
            तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व सामनेवाले यांनी दाखल केलेले शपथपत्र यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी नमूद केलेले वादातीत कूलर हा सामनेवाले यांचेकडून विकत घेतला आहे ही बाब मान्‍य आहे. तसेच सदरील कूलरचे इलेक्‍ट्रीक मोटार नादूरुस्‍त झाली या बाबतही वाद नाही. तक्रारदार यांचे वकिलांनी असा यूक्‍तीवाद केला की, सदरील कूलरची इलेक्‍ट्रीक मोटार जळाली. त्‍या बाबत सामनेवाले यांचेकडे वेळोवेळी पाठपूरावा केला परंतु ती मोटार सामनेवाले यांनी बदलून दिली नाही.तक्रारदार यांनी सामनेवाले यांना नोटीस पाठविली व सदरील जळालेली मोटार सामनेवाले यांचेकडे दिली परंतु सामनेवाले यांनी ती मोटार बदलून दिली नाही. सामनेवाले हयांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रास झाला. सबब, तक्रारदार यांना नुकसान भरपाई रक्‍कम रु.22,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
            सामनेवाले यांचे वकिलांनी असा यूक्‍तीवाद केला की, सामनेवाले हे कंपनीच कूलकर विक्रेते आहेत. कूलर मध्‍ये काही बिघाड झाली त्‍या बाबत तक्रार कंपनीचे ग्राहक सेवा केंद्र यांचेकडे दयावी लागते. तक्रारदार यांनी अशा प्रकारची कोणतीही तक्रार ग्राहक सेवा केंद्राकडे दिली नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली नाही. तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडे मोटार बदलून घेण्‍यासाठी कधीही आलेली नाहीत व सामनेवाले यांनी ती बदलून देण्‍यास कधीही नकार दिलेला नाही. सामनेवाले यांचे वकिलांनी असे कथन केले की, सामनेवाले हे तक्रारदार यांचे कूलर मधील मोटार बदलून देण्‍यास तयार आहेत व होते. या मंचासमोर सामनेवाले हे दि.3.9.2013 रोजी कंपनीचा मॅकेनिक घेऊन आले व नवीन मोटार घेऊन हजर राहिले होते. परतु तक्रारदार हे मंचासमोर हजर राहिले नाही. त्‍यामुळे सदरील मोटार बदलून देता आली नाही. सामनेवाले हे सदरील मोटार बदलून देण्‍यास तयार आहेत परंतु तक्रारदार हे त्‍यांस तयार नाहीत. सबब, तक्रारदार यांची तक्रार खारीज करण्‍यात यावी.
            संपूर्ण पूराव्‍याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी विकत घेतलेला कूलरची मोटार नादूरुस्‍त झाली आहे. तक्रारदार यांनी कंपनीच्‍या ग्राहक सेवा केंद्राकडे तक्रार केलेली दिसत नाही. तसेच तक्रारदार म्‍हणतात त्‍याप्रमाणे सामनेवाले यांनी दिलेल्‍या नोटीसच्‍या स्‍थळप्रती हजर केलेल्‍या नाहीत. सामनेवाले यांना दिलेली नोटीसचे उत्‍तरही हजर केलेले नाही. सामनेवाले यांचे कथन पाहता तक्रारदार यांनी दिलेल्‍या नोटीसचे उत्‍तर दि.30.05.2013 रोजी दिल्‍याचे आढळून येते. तक्रारदार यांनी विकत घेतलेल्‍या एयर कूलरची इलेक्‍ट्रीक मोटार सामनेवाले हे बदलून देण्‍यास तयार आहेत. सबब, या मंचाचे मते सामनेवाले यांनी तक्रारदार यांनी खरेदी केलेलया एयर कूलकरची इलेक्‍ट्रीक मोटार बदलून दयावी, सदरील इलेक्‍ट्रीक मोटार ही तक्रारदार यांनी खरेदी करतेवेळी ज्‍या कंपनीची इलेक्‍ट्रीक मोटार आहे त्‍यांच कंपनीची नवीन इलेक्‍ट्रीक मोटार बदलून दयावी व तक्रारदार यांचे कूलर सूरु करुन दयावे तसेच तक्रारदार यांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रु.500/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.500/- दयावेत.
            मुददा क्र.1 ते 3 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.
            सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
 
                         आदेश
            1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येत आहे.          
            2) सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की, निकाल कळाल्‍यापासून
                30 दिवसांचे आंत तक्रारदार यांना कूलर सोबत असलेल्‍या
                कंपनीची नवीन इलेक्‍ट्रीक मोटार बसवून एयर कूलर सुरु करुन
                दयावे.               
3) सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार यांना
    मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्‍कम रु.500/- व तक्रारीच्‍या
    खर्चापोटी रु.500/- दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
                20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत
                करावेत.
 
                       श्रीमती मंजूषा चितलांगे,         श्री.विनायक लोंढे,
                             सदस्‍य                    अध्‍यक्ष
                            जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.