(आदेश पारीत व्दारा - सौ.चंद्रिका कि. बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 27 जुलै 2016)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अनव्ये दाखल केली असून, तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
1. तक्रारकर्ता हा नागपूर चा राहिवासी असून विरुध्दपक्ष क्र.1 ही रजिस्टर्ड फर्म असून तिचा रजिस्टेशन नंबर एनजीपी/9825/2006-07 चा आहे. विरुध्दपक्ष क्र.2 हे विरुध्दपक्ष क्र.1 फर्मचे प्रोप्रायटर आहे. त्याचप्रमाणे विरुध्दपक्ष क्र.1 व 2 फर्मच्या उद्देशाप्रमाणे सर्व आवश्यक ते काम करण्यास अधिकृत व जबाबदार आहेत. विरुध्दपक्ष क्र.1 चा प्रमुख उद्देश व व्यवसाय हा ठिक-ठिकाणी ले-आऊटस् मध्ये प्लॉट्स टाकणे व ते गरजू लोकांना विकणे होय. विरुध्दपक्षाच्या सांगण्याप्रमाणे त्यावर विश्वास ठेवून तक्रारकर्त्याने प्लॉट क्र.23, मौजा – नारी, खसरा क्र.2/2(बी), प.ह.नं.11, एकूण आराजी 1000 चौ.फु. असलेला प्लॉट विकत घेतला. सदर प्लॉटचा मोबदला रक्कम एकूण 80,000/- ऐवढी ठरविण्यात आली. दिनांक 24.4.2008 ला विरुध्दपक्षानी तक्रारकर्त्याच्या नावाने बयाणापञ लिहून दिले व तक्रारकर्त्याने बयाणा रक्कम म्हणून रुपये 20,000/- ऐवढी जमा केली. त्याचप्रमाणे बयाणापञाच्या ठरलेल्या शर्ती व अटी प्रमाणे रुपये 60,000/’ तक्रारकर्त्यास रुपये 2000/- प्रतीमाह प्रमाणे अदा केले. मोबदल्याची एकूण रक्कम रुपये 80,000/- तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे अदा केले, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास एक किस्त कार्ड दिले होते त्यावर पैसे दिल्याची तारीख, रक्कम व अधिकृत व्यक्तीची स्वाक्षरी नमूद केलेली आहे.
2. त्याशिवाय, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे रुपये 5,500/- विक्रीपञ नोंदणीकृत करण्यास येणा-या खर्चाच्या स्वरुपात दिले. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने मोबदल्याची रक्कम व विक्रीपञाच्या खर्चाची रक्कम देवून चुकला आहे व आता काही रक्कम देणे राहिलेली नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास विक्रीपञ नोंदवून देण्याची विनंती केली, परंतु विरुध्दपक्षाने प्रत्येकवेळी कोणत्या न कोणत्या शुल्कक कारणावरुन तक्रारकर्त्यास रजिस्ट्री करुन देण्याचे टाळले. दिनांक 20.4.2012 रोजी तक्रारकर्ता पुन्हा एकदा विरुध्दपक्षास भेटण्यास गेला असता, विरुध्दपक्षाने अतिशय अभद्र भाषेत बोलून नकार दिला व तक्रारकर्त्याचा अवमान केला. तक्रारकर्त्याने दिनांक 12.7.2012 रोजी वकीला मार्फत कायदेशिर नोटीस पाठविली, सदर नोटीस विरुध्दपक्षास मिळूनही त्याची पुर्तता केली केली, तसेच मोबदल्याची संपूर्ण रक्कम मिळूनही विक्रीपञ करुन दिले नाही त्यामुळे विरुध्दपक्ष अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करीत असल्याचे निदर्शनास येते.
3. तक्रारकर्त्याच्या प्रार्थने नुसार तक्रारीमधील उपरोक्त प्लॉट हा नागपूर शहराच्या हद्दीमध्ये वसलेले असून तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्याची प्रार्थना खालील प्रमाणे आहे.
1) विरुध्दपक्षाने प्लॉट नंबर 23, मौजा – नारी, खसरा क्र.2/2(बी), प.ह.नं.11, एकूण आराजी 1000 चौ.फुट या प्लॉटचे विक्रीपञ तक्रारकर्त्याचे नावे नोदंणीकृत करुन द्यावे.
2) हे विक्रीपञ करुन देणे शक्य नसल्यास आजच्या भावाप्रमाणे रक्कम तक्रारकर्त्यास रुपये 9,00,000/- देण्यात यावी.
3) त्याचप्रमाणे, अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्यामुळे रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च मागितला आहे.
4. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही मंचात उपस्थित झाले नाही व सतत गैरहजर आहे, त्यामुळे मंचाने विरुध्दपक्ष क्र.1 व 2 विरुध्द अनुक्रमे दिनांक 4.4.2016 व 24.7.2015 ला एकतर्फा आदेश पारीत केला. तक्रारकर्त्याच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. प्रकरणात दाखल केलेल्या अभिलेखावरील दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले. त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ताची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
// निष्कर्ष //
5. तक्रारकर्ता हा नागपूर शहराचा रहिवासी असून विरुध्दपक्ष क्र.1 ही रजिस्टर्ड फर्म आहे. विरुध्दपक्ष क्र.2 हे विरुध्दपक्ष क्र.1 फर्मचे प्रोप्रायटर आहे. विरुध्दपक्ष क्र.1 चा प्रमुख उद्देश ले-आऊटस् पाडून प्लॉट विकणे हा आहे. तक्रारकर्त्याने प्लॉट क्र.23, मौजा – नारी, खसरा क्र.2/2(बी), प.ह.नं.11, एकूण आराजी 1000 चौ.फु. प्लॉट विकत घेतला. दिनांक 27.4.2008 ला विरुध्दपक्ष क्र.1 ने बयाणपञ लिहून दिले होते ते निशाणी क्र.1 वर आहे. त्याचप्रमाणे निशाणी क्र.2 वर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.2 कडे भरलेल्या पैशाच्या पावत्या जोडलेल्या आहेत, सव्र मिळून रुपये 80,,000/- तक्रारकर्त्याने दिनांक 9.7.2010 पर्यंत भरले, ते निशाणी क्र.2 वर किस्त कार्ड जोडलेले आहे असे एकूण रुपये 80,000/- भरले आहे. तरी सुध्दा वेळोवेळी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला रजिस्ट्री लावून देण्याकरीता विनंती केला व रजिस्ट्रेशन चार्ज रुपये 5,500/- भरले, तरी देखील रजिस्ट्री लावून दिली नाही. विरुध्दपक्षाने टाळाटाळ केली व सदर प्लॉटची रजिस्ट्री लावून दिली नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दिनांक 12.7.2012 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठविली, नोटीस पाठवूनही विरुध्दपक्षाने रजिस्ट्री लावून दिली नसल्यामुळे तक्रारकर्त्याने मंचात तक्रार दाखल केली.
6. विरुध्दपक्षास दिनांक 31.9.2015 व 31.12.2015 ला मंचा मार्फत नोटीस देवून देखील ते मंचात उपस्थित झाले नाही, त्यामुळे तक्रारकर्ता तर्फे दिनांक 8.2.2016 ला दैनिक भास्कर वृत्तपञामध्ये जाहीर नोटीस काढण्यात आला आणि निशाणी क्र.19 वर जाहीर नोटीस लावण्यात आला आहे. दिनांक 4.4.2016 रोजी तक्रारकर्त्याने शपथपञ दाखल केले आहे त्यात त्यांनी मुळ बयाणापञ, किस्त काड्र व सर्व मुळ रसिदा निशाणी क्र.20 वर जोडलेल्या आहे. विरुध्दपक्षास वारंवार भेटल्यानंतर देखील व रजिस्ट्रेशन पैसे भरल्यानंतर देखील तक्रारकर्त्यास रजिस्ट्री लावून दिली नाही व टाळाटाळ केली, करीता विरुध्दपक्ष क्र.1 व 2 हे अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करीत असल्याचे निदर्शनास येते. करीता खालील आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याचा आरक्षित प्लॉट क्रमांक 23, मौजा – नारी, खसरा क्र.2/2(बी), प.ह.नं.11, एकूण आराजी 1000 चौरस फुट या प्लॉटचे विक्रीपञ स्वखर्चाने तक्रारकर्त्यास नोंदणीकृत करुन द्यावे.
किंवा
विक्रीपञ करुन देणे शक्य नसल्यास आजच्या शासकीय मुल्यांकनाप्रमाणे येणारी भूखंडाची रक्कम तक्रारकर्त्यास देण्यात यावी.
(3) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 27/07/2016