जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 71/2020. आदेश दिनांक : 26/07/2022.
मकरंद पिता रंगनाथ कुलकर्णी, वय 50 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. शिवपूर, तालुका : शि. अनंतपाळ, जिल्हा : लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत,
मंडळ कार्यालय, विद्युत भवन, तळ मजला, जुने पॉवर हाऊस,
साळे गल्ली, लातूर.
(2) सहायक कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण
कंपनी मर्यादीत, शिरुर अंतपाळ. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- उमेश व्ही. जोशी
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) विरुध्द पक्ष यांनी आकारणी केलेले विद्युत देयक रद्द होण्यासह अन्य अनुषंगिक अनुतोष मिळण्यासाठी तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रार दाखल करुन घेतल्यानंतर ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्यात आले. उचित संधी प्राप्त होऊनही तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्यावर सूचनापत्र बजावणी होण्याकरिता उचित कार्यवाही केलेली नाही. अनेक तारखांपासून तक्रारकर्ता व त्यांचे विधिज्ञ सातत्याने अनुपस्थित आहेत. नैसर्गिक न्याय-तत्वानुसार विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणे आवश्यक आहे. उचित संधी देऊनही विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणी करण्यासाठी आवश्यक पूर्तता न केल्यामुळे तक्रारकर्ता यांना ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने स्वारस्य दिसून येत नाही. ग्राहक तक्रारींचे कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-