Maharashtra

Pune

CC/11/521

सौ वीणा मिलींद तेरकर - Complainant(s)

Versus

अंबिकाश्री टुर्स अॅण्‍डट्रॅव्‍हलस तर्फे पूजालाडला - Opp.Party(s)

Adv.Jayashree Kulkarni

28 Mar 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/521
 
1. सौ वीणा मिलींद तेरकर
रघुनंदन कॉम्‍पलेक्‍स,विठठलवा्डी,पुणे47
पुणे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. अंबिकाश्री टुर्स अॅण्‍डट्रॅव्‍हलस तर्फे पूजालाडला
ऐश्‍वर्या कॉम्‍पलेक्‍स,हिंगणेपोस्‍ट ऑफिसइमारतसिहंगडरोड,पुणक41
पुणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा-  श्री. एस. के. कापसे, मा. सदस्‍य 

                                     निकालपत्र

                      दिनांक 28 मार्च 2012

तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे-

1.           तक्रारदारांनी जाबदेणारांतर्फे आयोजित करळ स‍हलीसाठी रुपये 36,500/- भरले.  सहलीसाठी एसी थ्री टायर नव्‍हता. दिनांक 26/10/2011 ची सहल रद्य करुन दिनांक 28/10/2011 रोजी नेली. प्रत्‍यक्षात रेल्‍वेचे तिकीट कन्‍फर्म नव्‍हते, प्रवासात गैरसोय झाली, गाईड नव्‍हता, नॉन ए.सी गाडी होती, हॉटेलची सोय केलेली नसल्‍यामुळे तक्रारदारांना स्‍वखर्चाने दुस-या रेस्‍टॉरंट मध्‍ये रहावे लागले. नंतर ड्रायव्‍हरने तक्रारदारांना मुन्‍नार येथे नेले, स्‍टेशन पासून 10 ते 15 कि.मी लांब असलेल्‍या 3 किंवा 4 स्‍टार नसलेल्‍या ठिकाणी तक्रारदारांची रहाण्‍याची सोय केलेली होती, स्‍पॉट सीनची तिकीटे तक्रारदारांनाच रांगेत उभे राहून काढावी लागली. जंगलसफारीची वेळ चुकीची सांगण्‍यात आली, तिथे देखील रहाण्‍याची सोय हॉटेल मध्‍ये न करात प्‍लॅट मध्‍ये केलेली होती. नंतर ड्रायव्‍हर तक्रारदारांना बोटिंग साठी घेऊन गेला, गाडीचा खर्च रुपये 500/- तक्रारदारांनीच केला, परंतू शेवटचे बोटिंग 3.30 वा. होते, वेळ निघून गेलेली होती, वेळ जाण्‍यासाठी तक्रारदारांनी रुपये 200/- खर्च करुन कथकली स्‍टंट गेम बघितला कारण रहायला दिलेले घर व परिसर स्‍वच्‍छ नव्‍हता. तक्रारदारांना 24 तास हाऊस बोट व ए.सी असेल असे सांगण्‍यात आले होते, परंतू ती प्रत्‍यक्षात 2 तासच होती, ए.सी नव्‍हता, बोट नं 5 गलिच्‍छ ठिकाणी उभी करण्‍यात आली होती, परिसर स्‍वच्‍छ नव्‍हता. नंतर तक्रारदारांना ड्रायव्‍हरने कोचीनला नेले, तेथे हॉटेलमध्‍ये उतरविले परंतू रुपये 10,000/- भरल्‍याशिवाय चेक आऊट करता येणार नाही असे तक्रारदारांना सांगण्‍यात आले, तक्रारदारांना ते भरावे लागले. परतीची तिकीटे तक्रारदारांना ऑनलाईन मिळाली, ती कन्‍फर्म नव्‍हती. तक्रारदारांची संपुर्ण सहलीत गैरसोय झाली म्‍हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून रुपये 36,500/- 18 टक्‍के व्‍याजासह, नुकसान भरपाई पोटी रुपये 25,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.

2.          जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्‍हणून जाबदेणार यांच्‍याविरुध्‍द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.

3.          तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या जाबदेणार यांच्‍या पावतीचे अवलोकन केले असता त्‍यावर तक्रारदारांचे नावे, प्रवासाचा दिनांक, फुल पेमेंट रिसीव्‍ह, सर्व्हिसेस- ब्रेकफास्‍ट, ट्रेन- नॉन ए.सी,  बस नॉन ए.सी, रुम ए.सी असे नमूद केल्‍याचे दिसून येते.  तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या पावत्‍यांवरुन तक्रारदारांना जेवणासाठी, रहाण्‍यासाठी, फिरण्‍यासाठी स्‍वत: खर्च करावा लागला हे दिसून येते. तसेच जाबदेणार यांनी कन्‍फर्म रेल्‍वे तिकीट दिले नसल्‍यामुळे लांबच्‍या प्रवासात गैरसोय सहन करावी लागली, रुम ए.सी. नव्‍हती त्‍यामुळे देखील गैरसोय झाली याबाबी स्‍पष्‍ट होतात. जाबदेणार यांच्‍या सेवेतील हया त्रुटी आहेत असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारदारांची ठरल्‍याप्रमाणे सहल पूर्ण झाली, परंतु जाबदेणार यांच्‍या सेवतील त्रुटींमुळे, गैरसोईमुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. जाबदेणार यांच्‍या सेवेतील त्रुटीमुळे  यासदंर्भात मंचाने मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निवाडा 2000 DGLS 1448 चरणसिंह विरुध्‍द हिलींग टच हॉस्पिटल चा आधार घेतला. सदरहू निवाडयात नमूद केल्‍याप्रमाणे “It is for the Consumer Forum to grant compensation to the extent it finds it reasonable, fair and proper in the facts and circumstances of a given case according to established judicial standards where the claimant is able to establish his charge.”  म्‍हणून नुकसान भरपाई व तक्रारीच्‍या खर्चापोटी एकत्रित रक्‍कम रुपये 15,000/- मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.

           वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे-

 

 

 

                              :- आदेश :-

[1]    तक्रार अंशत: मान्‍य करण्‍यात येत आहे.

[2]    जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीच्‍या खर्चापोटी एकत्रित रक्‍कम रुपये 15,000/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत अदा करावी

      आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.

 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.